Thursday, 16 January 2025

वेंगुर्ला गवळीवाडा येथील रहिवाशांच्या जमिनीचा प्रस्ताव करा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेवू

 वेंगुर्ला गवळीवाडा येथील रहिवाशांच्या जमिनीचा प्रस्ताव करा

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेवू

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबईदि. १६ :-  वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील कॅम्प गवळीवाडा येथील स्थानिक रहिवाशांना प्रती कुटुंब दीड हजार स्क्वे. फूट जमीन विनामूल्य देण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावाअशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील कॅम्प गवळीवाडा येथील स्थानिक रहिवाशांच्या कब्जा भोग्यातील जमिनीसंदर्भात महसूलमंत्र्यांच्या दालनात बैठक झाली. बैठकीस आमदार दीपक केसरकरमहसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमारसहसचिव अजित देशमुख उपस्थित होते तर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील हे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

महसूल मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले कीमौजे वेंगुर्ला येथील शासकीय जमिनीमध्ये १९०५ पूर्वीपासून गवळ्यांची वसाहत आहे. गवळीवाडा येथील रहिवाशी ब्रिटीशकालापासून या जागेचा वापर करीत आहेत.  जमिनीवर अतिक्रमण केले नसलेबाबत व ब्रिटीशांनी सेवेकरिता वास्तव्यासाठी विनामूल्य जमिनी दिल्या असल्यानेवहिवटीखाली असणारी घरे व इतर जमिनी विनामूल्य मिळण्याची मागणी संबधित रहिवाशांनी केली आहे. त्यानुसार गवळीवाडा येथील रहिवाशांना  प्रती कुटुंब दीड हजार स्क्वेअर फुट जमीन विनामूल्य देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळात  सादर करा. ज्या रहिवाशांच्या ताब्यात  दीड हजार स्क्वे. फुट पेक्षा अधिक जमीन आहे याबाबत जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी 1980 च्या रेडीरेकनर दरानुसार संबंधितांकडून रक्कम घेण्याबाबत प्रस्ताव शासनास सादर करावाअशा सूचना बावनकुळे यांनी दिल्या.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi