Thursday, 16 January 2025

महाराष्ट्रातील 132 शासकीय औद्योगिक संस्थांना नवी ओळख नामकरणास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय जाहीर

 महाराष्ट्रातील 132 शासकीय औद्योगिक संस्थांना नवी ओळख

नामकरणास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय जाहीर

कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती

 

 मुंबईदि. 15 : महाराष्ट्रातील १३२ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण यशस्वीपणे करण्यात आले आहे. प्रथम १४ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाद्वारे घेण्यात आला होता. महाराष्ट्रातील फक्त  औद्योगिक संस्था सोडल्या तर इतर औद्योगिक संस्थांना या आधी कोणत्याही प्रकारची नावे नव्हती. त्यानंतर कौशल्य विकास विभागाद्वारे महाराष्ट्रातील शासकीय औद्योगिक संस्थांसाठी नागरिकांकडून नावांबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे राज्यातील १३२ आयटीआयचे नामकरण करण्याचा निर्णय आज जाहीर करण्यात आला. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ही माहिती दिली.

त्यानुसार अकोलाअमरावतीकोल्हापूरगडचिरोलीगोंदियाचंद्रपूरछत्रपती संभाजीनगरजळगावजालनाधाराशिवधुळेनंदुरबारनागपूरनांदेडनाशिकपरभणीबीडबुलढाणाभंडारामुंबई उपनगरयवतमाळरत्नागिरीरायगडलातूरवर्धावाशिमसांगलीसातारासोलापूर आणि हिंगोली जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक संस्थांना नवीन ओळख मिळाली. याबाबतचा सविस्तर निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर आजच प्रसिद्ध करण्यात आला आहे.

0000

संध्या गरवारे/विसंअ/


 

वृत्त क्र. 189

 

राज्य कामगार विमा सोसायटीच्या रुग्णालयांमधून दर्जेदार आरोग्य सुविधा द्याव्यात

 राज्य कामगार विमा सोसायटीच्या रुग्णालयांमधून दर्जेदार आरोग्य सुविधा द्याव्यात

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीचा आरोग्यमंत्र्यांनी घेतला आढावा

 

मुंबईदि. 15 : राज्य कामगार विमा सोसायटी कामगारांसाठी आपल्या १२ रुग्णालयांच्या माध्यमातून आरोग्य सुविधा देत असते.  राज्यात विमाधारक कामगारांची ४८ लाख ७० हजार ४६० कुटुंब आहेत. लाभार्थी संख्या जवळपास दोन कोटी पर्यंत आहे.  विमा सोसायटीने विमाधारक कामगारांसाठी या रुग्णालयांमधून दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यातअसे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज दिले.

राज्य कामगार विमा सोसायटीने मिळणाऱ्या निधीचा रुग्ण सेवेसाठी पुरेपूर उपयोग करावा.  या निधीतून आरोग्य व्यवस्था बळकट करावी.  तसेच संलग्न केलेल्या 253 रुग्णालयांमधील उपचारांची कामगारांना माहिती होण्यासाठी जनजागृती करावी. रिक्त जागा भरण्यासाठी आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी,  अशा सूचनाही मंत्री श्री. आबिटकर यांनी दिल्या. 

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीचा आढावा मंत्री श्री. आबिटकर यांनी आरोग्य भवन येथे आयोजित बैठकीत घेतला. बैठकीस आरोग्य सेवा आयुक्त अमगोतू श्री रंगा नायकराज्य कामगार विमा सोसायटीचे संचालक (वैद्यकीय) शशी कोळनुरकर,  सहसचिव श्री. लहानेसहसंचालक तुलसीदास सोळंके उपस्थित होते.

आरोग्य मंत्री म्हणालेराज्य कामगार विमा सोसायटीच्या शिखर समितीची बैठक तातडीने घेण्यात यावी. सोसायटीच्या नव्याने मंजूर 18 रुग्णालयांसाठी भूसंपादन पूर्ण करावे. राज्य कामगार विमा सोसायटीने मागील तीन वर्षातील कार्य अहवाल सादर करावा. सद्यस्थितीत असलेल्या कामगार रुग्णालयांची डागडुजी करून त्यांचा मेक ओव्हर करावा.  सोसायटीच्या रुग्णालयांची जागा अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी आहे,  अशा ठिकाणी आरोग्य सुविधा उपलब्ध केल्यास कामगारांना महागड्या खाजगी रुग्णालयांमधून उपचार घ्यावे लागणार नाही.  दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या कामगारांसाठी ही रुग्णालये संजीवनी आहेत. सोसायटीच्या कामकाजाचा  दरमहा आढावा घेण्यात यावा. या सोसायटीच्या रुग्णालयांमधून गतिमान वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्यावीअशा सूचनाही मंत्री श्री. आबिटकर यांनी दिल्या.

सोसायटीचे संचालक श्री. कोळनुरकर यांनी यावेळी सादरीकरण केले. बैठकीला संबंधित अधिकारी उपस्थित होते.


धरणातील पाण्याचा पूर्ण क्षमतेने सिंचनासाठी वापर करावा

 धरणातील पाण्याचा पूर्ण क्षमतेने सिंचनासाठी वापर करावा

- जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

 

मुंबईदि. 15 :- धरणातील पाण्याचे नियोजन आणि व्यवस्थापन करावे. धरणाची साठवण क्षमतासध्याची पाणी पातळी याचा नियमित आढावा घ्यावा. पाण्याची उपलब्धताशेतकऱ्यांची मागणी आणि पिकांच्या प्रकारानुसार विभागणी करून धरणातील पाण्याचा सिंचनासाठी पूर्ण क्षमतेने  वापर करावा अशा सूचना जलसंपदा (विदर्भतापीकोकण पाटबंधारे विकास महामंडळ)आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या.

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची बैठक मंत्री श्री. महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात झाली. बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरलाभक्षेत्र विकास सचिव संजय बेलसरेविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरचे संचालक रा.श्री.सोनटक्केमुख्य अभियंता अभय पाठक  यांच्यासह वित्त व नियोजन विभागाचे आणि  विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. महाजन म्हणाले,  पाटबंधारे प्रकल्पाची कामे नियोजनबध्द व गतीने पूर्ण करावीत.  सिंचन क्षेत्र वाढून शेतकऱ्यांना सिंचनाच्या पाण्यासाठी अडथळा येऊ नये असे नियोजन जलसंपदा विभागाने करणे आवश्यक आहे. मोठ्या प्रकल्पांच्या सुधारित मान्यतेचे प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणावेत अशा सूचना त्यांनी दिल्या. त्यानुसार पूर्व विदर्भातील गोदावरी खोऱ्यातील वैनगंगा नदीवर बांधकामाधिन व केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत (PMKSY) अर्थ सहाय्यीत  महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पास चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता देणे, बुलढाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळ बुलढाणा अंतर्गत पाणी वापर संस्थेच्या बळकटीकरण अंतर्गत बैठका व प्रशिक्षणाकरिता सहभागृहाचे बांधकाम तसेच लघु पाटबंधारे विभाग बुलढाणा अंतर्गत कार्यालयीन इमारतीच्या दुरुस्ती व विस्तार कामाचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्यासाठी नियामक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यासह विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाकडील अन्य १३ कामांना नियामक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाकडील सर्वच पदांचा आकृतीबंध त्वरित तयार करण्यात  येऊन रिक्त पदांचा अनुशेष भरण्याबाबतची कार्यवाही करावीअशा सूचना मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

००००

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आयोजित होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी, खोखो, कुस्ती, व्हॉलीबॉल या चार स्पर्धांच्या आयोजनासाठी आता एक कोटींचा निधी

 छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आयोजित होणाऱ्या राज्यस्तरीय

कबड्डीखोखोकुस्तीव्हॉलीबॉल या चार स्पर्धांच्या आयोजनासाठी आता एक कोटींचा निधी

उपमुख्यमंत्री अजित पवार

 

मुंबई, दि. 15 : राज्य शासनाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि महाराष्ट्र क्रीडा असोसिएशन यांनी बारामती येथे संयुक्तपणे आयोजित केलेल्या 23 व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचे’ चे उद्घाटन आज सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. उदघाटन समारंभावेळीस्पर्धेत सहभागी खेळाडूमार्गदर्शकप्रशिक्षककबड्डी रसिकांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनीमहाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने आयोजित होणाऱ्या कबड्डीखोखोकुस्ती आणि व्हॉलीबॉल या चार राज्यस्तरीय स्पर्धांसाठी दिले जाणारे 75 लाख रुपयांचे अनुदान वाढवून ते एक कोटी करण्याची घोषणा केली.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या या घोषणेमुळे देशी खेळांच्या प्रचार-प्रसार आणि खेळाडूंच्या विकासाला अधिक बळ मिळणार आहे. उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या या घोषणेचे क्रीडा जगतातून स्वागत होत आहे.


दूध भेसळ तपासणीत दोषी आढळल्यास कारवाई होणार

 दूध भेसळ तपासणीत दोषी आढळल्यास कारवाई होणार

- अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

दूध, अन्नपदार्थांमध्ये भेसळ आढळल्यास १८००२२२३६५ या हेल्पलाईनवर संपर्क करावा

 

मुंबई१५ - :  आरोग्याच्या दृष्टिकोनातून दूध हे शरीरासाठी खूप उपयुक्त असून मोठ्या प्रमाणावर दुधाचा वापर लहान बालकांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत पिण्यासाठी केला जातो. मात्र राज्यात काही ठिकाणी दुधात  भेसळीचे प्रकार होत असल्याचे   निदर्शनास येत आहे.  त्यानुसार अन्न व औषध प्रशासन  विभागाने आज एकाच दिवशी दूध भेसळ तपासणी मोहीम राबविण्यात येऊन १ हजार ६२ दुधाचे सर्वेक्षण नमुने  विश्लेषणासाठी  ताब्यात घेतले. या तपासणी नमुन्यात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनास देण्यात आल्या आहेत अशी माहिती, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.

अन्न व औषध प्रशासन विभाग अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नियम व नियमन २०११ ची अंमलबजावणी करुन राज्यातील नागरिकांना सकस व निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध करुन त्यांचे जीवनमान उंचावण्याबाबत विविध उपाययोजना करीत असल्याचे मंत्री श्री. झिरवाळ यांनी सांगितले.

दूध/दुग्धजन्य अन्नपदार्थात भेसळ करणाऱ्यांवर जरब बसण्याकरिता व भेसळ रोखण्याकरिता तसेच राज्यातील जनतेस उपलब्ध होणाऱ्या दूध व दुग्धजन्य अन्नपदार्थांची गुणवत्ता तपासण्याच्या अनुषंगाने  आज १५ जानेवारी रोजी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळराज्यमंत्री  योगेश कदम यांच्या  मार्गदर्शनाखाली प्रशासनामार्फत संपूर्ण राज्यात व्यापक स्वरूपात दूध या अन्नपदार्थाची सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेअंतर्गत एकाचवेळी राज्यभरातील विविध ठिकाणांहून दूधाचे सर्वेक्षण नमुने घेऊन त्यांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी १०३ अन्न सुरक्षा अधिकारी यांना सर्वेक्षण नमुने घेण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आज सकाळी ५.०० वाजेपासून राज्यभरातील अन्न सुरक्षा अधिकारी यांनी दूध उत्पादकवितरकविक्रेते व रस्त्यावरील विक्री केंद्रांवरून १ हजार ६२ दुधाचे सर्वेक्षण नमुने विश्लेषणासाठी घेतले.  त्यापैकी राज्यात विक्री होणाऱ्या विविध ब्रान्डच्या दुधाचे ६८० पाउच / पिशवी पॅकिंग मधून व ३८२ सुट्या स्वरूपातील दुधाचे आहेत. ताब्यात घेण्यात आलेले  नमुने अन्न सुरक्षा व मानके प्राधिकृत अन्न प्रयोगशाळेत पाठवून भेसळरसायनांचे प्रमाण व दूधाच्या गुणवत्तेची तपासणी केली जाणार आहे.

या सर्वेक्षण नमुने विश्लेषणांती दुधाच्या नमुन्यामध्ये भेसळ आढळल्यास तात्काळ या आस्थापनेमधून कायदेशीर नमुने घेऊन संबंधित उत्पादक व पुरवठादार यांचेवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अन्न व औषध प्रशासन आयुक्त  राजेश नार्वेकर यांनी  सांगितले की, "दूधातील भेसळ ही गंभीर समस्या आहे. नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम टाळण्यासाठी  दूध भेसळ हा विषय  गांभीर्याने घेतला आहे. भेसळ करणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुषंगाने आज राज्यभरामध्ये दूधाचे सर्वेक्षण नमुने घेण्याची मोहीम राबविण्यात आली आहे. अन्न भेसळ रोखण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा वारंवार घेण्यात येणार आहेत. नागरिकांनी दूध किंवा अन्नपदार्थांमध्ये भेसळ दिसल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या हेल्पलाइन क्रमांक [१८००२२२३६५] वर त्वरित संपर्क साधावा किंवा jc-foodhq@gov.in या ईमेल वर किंवा https://foscos.fssai.gov.in/consumergrievance या पोर्टलवर तक्रार नोंदवावी." असे आवाहन अन्न व औषध प्रशासन आयुक्त  राजेश नार्वेकर  यांनी केले आहे.

००००

ज्ञान आणि भक्तीच्या या महान धर्तीवर इस्कॉन

 ज्ञान आणि भक्तीच्या या महान धर्तीवर इस्कॉन मंदिराचे उद्घाटन होत आहे. श्री राधा मदनमोहनजी मंदिर संकुलाची रचना आणि संकल्पना अध्यात्म आणि ज्ञानाच्या संपूर्ण परंपरेचे प्रतिबिंबित करते. मंदिरात दिव्यत्वाची विविध रूपे दिसून येतातजी 'एको अहं बहु स्यमही कल्पना व्यक्त करते. नवीन पिढीच्या आवडी आणि आकर्षणांना पूर्ण करण्यासाठी येथे रामायण आणि महाभारतावर आधारित संग्रहालय बांधले जात आहे. त्याचप्रमाणे वृंदावनच्या 12 वनांपासून प्रेरित एक बाग विकसित केली जात आहे. हे मंदिर भारताच्या चेतनेला श्रद्धेसह समृद्ध करणारे एक पवित्र केंद्र बनेल असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.  समाज जसजसा अधिक आधुनिक होत जातो तसतसा त्याला अधिक करुणा आणि संवेदनशीलतेची आवश्यकता असते. मानवी गुण आणि आपलेपणाची भावना असलेल्या संवेदनशील व्यक्तींचा समाज निर्माण करण्याची गरज आहे. इस्कॉनत्यांच्या भक्ती वेदांताद्वारे जागतिक संवेदनशीलतेत नवीन जीवन फुंकू शकते आणि जगभरात मानवी मूल्यांचा विस्तार करू शकतेअसे सांगून शेवटी पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला कीइस्कॉनचे सदस्य श्रील प्रभुपाद स्वामींच्या आदर्शांचे पालन करीत राहतील.

            पंतप्रधान श्री.मोदी पुढे म्हणालेगेल्या दशकात देशाने विकास आणि वारसा यामध्ये एकाच वेळी प्रगती पाहिली आहे. इस्कॉनसारख्या संस्थांचे वारशाच्या माध्यमातून विकासाच्या या मोहिमेत महत्त्वपूर्ण योगदान आहे. मंदिरे आणि धार्मिक स्थळे शतकानुशतके सामाजिक जाणीवेचे केंद्र आहेत आणि गुरुकुलांनी शिक्षण आणि कौशल्य विकासाला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. इस्कॉन आपल्या कार्यक्रमांद्वारे तरुणांना अध्यात्माला त्यांच्या जीवनाचा भाग बनवण्यास प्रेरित करते. इस्कॉनचे तरुण अभ्यासक त्यांच्या परंपरांचे पालन करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करतातत्यांचे माहिती नेटवर्क हे इतरांसाठी एक आदर्श आहे. इस्कॉनच्या मार्गदर्शनाखालीतरुण सेवा आणि समर्पणाच्या भावनेने राष्ट्रीय हितासाठी काम करतीलअसा विश्वास आहे. मंदिर संकुलात स्थापन झालेल्या भक्तीवेदांत आयुर्वेदिक उपचार केंद्र आणि भक्तिवेदांत वैदिक शिक्षण महाविद्यालयाचा समाज आणि संपूर्ण देशाला फायदा होईलअसे सांगून पंतप्रधान श्री.मोदी यांनी 'हील इन इंडियाअसे आवाहनही केले.

            या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इस्कॉन मंदिराचे मुख्य चिकित्सक सूरदास प्रभू यांनी केले. या कार्यक्रमास इस्कॉन मंदिराचे सदस्यप्रसिद्ध आध्यात्मिक नेते आणि संत आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

Wednesday, 15 January 2025

*पपईच्या पानांचा चहा* -

 *पपईच्या पानांचा चहा* -



कोणत्याही अवस्थेतील कर्करोग केवळ 60 ते 90 दिवसांत मुळापासून नष्ट होऊ शकतो.


    

पपईची पाने -

तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजचा कर्करोग केवळ 35 ते 90 दिवसांत बरा होऊ शकतो.


आता पर्यंत -

आपण मानवांनी फक्त पपईच्या पानांचा वापर मर्यादित प्रमाणात केला असेल...

(विशेषतः प्लेटलेट कमी करण्यासाठी किंवा त्वचेशी संबंधित किंवा इतर कोणत्याही लहान किंवा मोठ्या प्रयोगासाठी)


परंतु,

आज आम्ही तुम्हाला काय सांगणार आहोत -

हे खरोखर तुम्हाला आश्चर्यचकित करेल.


कॅन्सर सारख्या गंभीर आजाराला तुम्ही फक्त पाच आठवड्यांत समूळ नष्ट करू शकता.


ती निसर्गाची शक्ती आहे


अनेक प्रकारच्या वैज्ञानिक शोधांमधून बरेच ज्ञान मिळाले -


पपईच्या प्रत्येक भागामध्ये जसे की फळ, स्टेम, बिया, पाने, मुळे या सर्वांमध्ये कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी आणि त्यांची वाढ थांबवण्यासाठी शक्तिशाली औषध असते.


विशेषतः -

कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्याचे आणि त्यांची वाढ रोखण्याचे गुणधर्म पपईच्या पानांमध्ये मुबलक प्रमाणात आढळतात.


चला तर मग जाणून घेऊया...


फ्लोरिडा विद्यापीठ (2010) आणि अमेरिका आणि जपानमधील आंतरराष्ट्रीय डॉक्टर आणि संशोधकांनी केलेल्या संशोधनातून असे आढळून आले आहे की -


पपईची पाने कर्करोगाच्या पेशी मारण्यासाठी आढळतात.


श्री. नाम डांग - एमडी, पीएचडी जो शोधक आहे,


त्याच्या मते -


पपईची पाने कॅन्सरवर थेट उपचार करू शकतात.


त्याच्या मते -

पपईची पाने सुमारे 10 प्रकारचे कर्करोग नष्ट करू शकतात.


मुख्य म्हणजे -

स्तनाचा कर्करोग,

फुफ्फुसाचा कर्करोग,

यकृताचा कर्करोग,

स्वादुपिंडाच्या कर्करोगाने,

गर्भाशयाचा कर्करोग,


त्यात जितकी पपईची पाने टाकली जातात,

चांगले परिणाम.


पपईच्या पानांमुळे कर्करोग बरा होतो

आणि,

कर्करोगाच्या वाढीस प्रतिबंध करते.


चला तर मग जाणून घेऊया -

पपईची पाने कर्करोग कसा बरा करतात?


(1) पपई कर्करोगविरोधी रेणू Th1 साइटोकिन्सचे उत्पादन वाढवते.


जे रोगप्रतिकारक शक्तीला शक्ती प्रदान करते.

ज्यामुळे कर्करोगाच्या पेशी नष्ट होतात.


(२) पपईच्या पानातील पापेन सॉल्ट -

प्रोटीओलाइटिक एंजाइम आढळतात,


जे कॅन्सरच्या पेशींवरील प्रोटीन लेप तोडते...

त्यामुळे कर्करोगाच्या पेशींना शरीरात टिकून राहणे कठीण होते.


अशा प्रकारे,

पपईच्या पानांचा चहा –

रुग्णाच्या रक्तात मिसळून मॅक्रोफेजला उत्तेजित करते...

रोगप्रतिकारक शक्ती उत्तेजित करून,

कर्करोग पेशी नष्ट करू लागतो.


केमोथेरपी / रेडिओथेरपी आणि पपईच्या पानांद्वारे उपचार यातील मुख्य फरक म्हणजे -


केमोथेरपीमध्ये -

रोगप्रतिकारक शक्ती 'दबली' जाते.


पपई पाने करताना -

  रोगप्रतिकारक शक्तीला 'उत्तेजित' करते,


केमोथेरपी आणि रेडिओथेरपीमध्ये सामान्य पेशीही 'प्रभावित' होतात.


पपई फक्त कर्करोगाच्या पेशी नष्ट करते.


सर्वात मोठी गोष्ट म्हणजे -

कर्करोगाच्या उपचारात पपईच्या पानांचे कोणतेही 'साइड इफेक्ट' नाहीत.


*कर्करोगात पपई खाण्याचा विधी:


कर्करोगासाठी उत्तम पपई चहा :-


पपईचा चहा दिवसातून ३ ते ४ वेळा बनवा.

ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे.


आता जाणून घेऊया -

पपईचा चहा कसा बनवायचा:-


(१) प्रथम ५ ते ७ पपईची पाने उन्हात चांगली वाळवावीत.

मग,

त्याचे लहान तुकडे करा.


आपण 500 मि.ली. पाण्यात -

त्यात थोडी वाळलेली पपईची पाने घालून चांगले उकळावे.

इतके उकळवा की -

ते अर्धवट राहते.

आपण ते 125 मिली देऊ शकता. दिवसातून 2 वेळा करी प्या.

आणि,

जर तुम्ही जास्त केले तर दिवसातून 3 ते 4 वेळा प्या.


उरलेले द्रव फ्रीजमध्ये ठेवा आणि आवश्यकतेनुसार वापरा.


याची काळजी घ्या -

ते पुन्हा गरम करू नका.


(२) पपईची ७ ताजी पाने घ्या.

हाताने चांगले मळून घ्या.

आता ते 1 लिटर पाण्यात उकळवा.


जेव्हा ते 250 मि.ली. जर ते वाढले तर ते 125 मिली फिल्टर करा. ते 2 वेळा म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी प्या.


हा प्रयोग तुम्ही दिवसातून ३ ते ४ वेळा करू शकता.


तुम्ही जितकी जास्त पपईची पाने वापराल...

जितक्या लवकर फायदा मिळेल.


टीप :-

हा चहा प्यायल्यानंतर अर्धा तास काहीही खाऊ किंवा पिऊ नका.


* हा प्रयोग किती दिवस करायचा?


तर हा प्रयोग तुम्हाला त्याचा परिणाम 5 आठवड्यांत दाखवेल...

तथापि

आम्ही तुम्हाला ते 3 महिन्यांसाठी वापरण्याची शिफारस करतो.


आणि,

हे ज्यांना कळले आहे,

त्या लोकांनीही त्या लोकांचे भले केले आहे,

ज्यांचा कर्करोग 'तिसरा' किंवा 'चौथा' स्टेज होता.


हा संदेश -

सर्वांना पाठवावा ही नम्र विनंती.

जेणेकरून गरजू इतरांपर्यंत पोहोचता येईल.....


🌹🌺🌺🌺🙏🌺🌺🌺🌺🌹


*(कॉपी पेस्ट)*

*आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला🙂*

*

Featured post

Lakshvedhi