Thursday, 16 January 2025

ज्ञान आणि भक्तीच्या या महान धर्तीवर इस्कॉन

 ज्ञान आणि भक्तीच्या या महान धर्तीवर इस्कॉन मंदिराचे उद्घाटन होत आहे. श्री राधा मदनमोहनजी मंदिर संकुलाची रचना आणि संकल्पना अध्यात्म आणि ज्ञानाच्या संपूर्ण परंपरेचे प्रतिबिंबित करते. मंदिरात दिव्यत्वाची विविध रूपे दिसून येतातजी 'एको अहं बहु स्यमही कल्पना व्यक्त करते. नवीन पिढीच्या आवडी आणि आकर्षणांना पूर्ण करण्यासाठी येथे रामायण आणि महाभारतावर आधारित संग्रहालय बांधले जात आहे. त्याचप्रमाणे वृंदावनच्या 12 वनांपासून प्रेरित एक बाग विकसित केली जात आहे. हे मंदिर भारताच्या चेतनेला श्रद्धेसह समृद्ध करणारे एक पवित्र केंद्र बनेल असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.  समाज जसजसा अधिक आधुनिक होत जातो तसतसा त्याला अधिक करुणा आणि संवेदनशीलतेची आवश्यकता असते. मानवी गुण आणि आपलेपणाची भावना असलेल्या संवेदनशील व्यक्तींचा समाज निर्माण करण्याची गरज आहे. इस्कॉनत्यांच्या भक्ती वेदांताद्वारे जागतिक संवेदनशीलतेत नवीन जीवन फुंकू शकते आणि जगभरात मानवी मूल्यांचा विस्तार करू शकतेअसे सांगून शेवटी पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला कीइस्कॉनचे सदस्य श्रील प्रभुपाद स्वामींच्या आदर्शांचे पालन करीत राहतील.

            पंतप्रधान श्री.मोदी पुढे म्हणालेगेल्या दशकात देशाने विकास आणि वारसा यामध्ये एकाच वेळी प्रगती पाहिली आहे. इस्कॉनसारख्या संस्थांचे वारशाच्या माध्यमातून विकासाच्या या मोहिमेत महत्त्वपूर्ण योगदान आहे. मंदिरे आणि धार्मिक स्थळे शतकानुशतके सामाजिक जाणीवेचे केंद्र आहेत आणि गुरुकुलांनी शिक्षण आणि कौशल्य विकासाला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. इस्कॉन आपल्या कार्यक्रमांद्वारे तरुणांना अध्यात्माला त्यांच्या जीवनाचा भाग बनवण्यास प्रेरित करते. इस्कॉनचे तरुण अभ्यासक त्यांच्या परंपरांचे पालन करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करतातत्यांचे माहिती नेटवर्क हे इतरांसाठी एक आदर्श आहे. इस्कॉनच्या मार्गदर्शनाखालीतरुण सेवा आणि समर्पणाच्या भावनेने राष्ट्रीय हितासाठी काम करतीलअसा विश्वास आहे. मंदिर संकुलात स्थापन झालेल्या भक्तीवेदांत आयुर्वेदिक उपचार केंद्र आणि भक्तिवेदांत वैदिक शिक्षण महाविद्यालयाचा समाज आणि संपूर्ण देशाला फायदा होईलअसे सांगून पंतप्रधान श्री.मोदी यांनी 'हील इन इंडियाअसे आवाहनही केले.

            या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इस्कॉन मंदिराचे मुख्य चिकित्सक सूरदास प्रभू यांनी केले. या कार्यक्रमास इस्कॉन मंदिराचे सदस्यप्रसिद्ध आध्यात्मिक नेते आणि संत आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi