Thursday, 16 January 2025

महाराष्ट्रातील 132 शासकीय औद्योगिक संस्थांना नवी ओळख नामकरणास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय जाहीर

 महाराष्ट्रातील 132 शासकीय औद्योगिक संस्थांना नवी ओळख

नामकरणास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय जाहीर

कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती

 

 मुंबईदि. 15 : महाराष्ट्रातील १३२ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण यशस्वीपणे करण्यात आले आहे. प्रथम १४ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाद्वारे घेण्यात आला होता. महाराष्ट्रातील फक्त  औद्योगिक संस्था सोडल्या तर इतर औद्योगिक संस्थांना या आधी कोणत्याही प्रकारची नावे नव्हती. त्यानंतर कौशल्य विकास विभागाद्वारे महाराष्ट्रातील शासकीय औद्योगिक संस्थांसाठी नागरिकांकडून नावांबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे राज्यातील १३२ आयटीआयचे नामकरण करण्याचा निर्णय आज जाहीर करण्यात आला. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ही माहिती दिली.

त्यानुसार अकोलाअमरावतीकोल्हापूरगडचिरोलीगोंदियाचंद्रपूरछत्रपती संभाजीनगरजळगावजालनाधाराशिवधुळेनंदुरबारनागपूरनांदेडनाशिकपरभणीबीडबुलढाणाभंडारामुंबई उपनगरयवतमाळरत्नागिरीरायगडलातूरवर्धावाशिमसांगलीसातारासोलापूर आणि हिंगोली जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक संस्थांना नवीन ओळख मिळाली. याबाबतचा सविस्तर निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर आजच प्रसिद्ध करण्यात आला आहे.

0000

संध्या गरवारे/विसंअ/


 

वृत्त क्र. 189

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi