Tuesday, 14 January 2025

एसटी कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘एसटी’च्या जागेवर २५ तर बोरिवलीत १०० खाटांचे रूग्णालय उभारणार

 एसटी कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘एसटी’च्या जागेवर २५ तर

बोरिवलीत १०० खाटांचे रूग्णालय उभारणार

राज्यातील अनेक बसस्थानके बांधावापरा आणि हस्तांतरित कराया तत्वावर विकसित करण्यात येत आहेत. एस. टी. कर्मचाऱ्यांसाठी या ‘एस. टी.’च्या प्रकल्पात प्रत्येक जिल्ह्यात २५ तर मुंबईतील बोरिवली येथील जागेवर १०० खाटांचे रूग्णालय सुरू करण्यात येणार आहे. या रूग्णालयात एस. टी. कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार करण्यात येतीलतसेच पाच लाखांपर्यंतच्या शस्त्रक्रियांचा खर्च राज्यशासन करेलअसेही परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी सांगितले.

सध्या राज्यभरात विविध ठिकाणी बांधा - वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर ‘एसटी’च्या जागांचा विकास केला जात आहे. भविष्यात या रुग्णालयांमध्ये ‘एसटी’ कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येतील. पुणेकोल्हापूरपुसदवाशिम येथे रूग्णालय उभारण्यासंदर्भातील सादरीकरण करण्यात आले. 

खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार

 खागी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना

एकाच नियमावलीअंतर्गत आणणार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई दि. १४ ओलाउबेर व रॅपिडो सारख्या खागी प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व कंपन्यांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. प्रवासी सुरक्षाकार पुलींगलायसन्सट्रॅफिक समस्या यासंदर्भातील पारदर्शक तक्रार यंत्रणा तातडीने तयार करण्याचे निर्देश परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी दिले.

राज्यातील खागी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना एकाच शासकीय नियमावलीअंतर्गत आणण्यासंदर्भात आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी परिवहनचे अपर मुख्य सचिव संजय सेठीपरिवहन आयुक्त विवेक भीमनवारएसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह प्रवासी वाहतूक पुरवठादार कंपनीचे प्रतिनिधी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

विविध पॅनेल चर्चा : कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढाजानेवारीला राष्ट्रीय स्टार्टअप दिन घोषित केला आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाज माध्यमांवरही

 दिवसभरात होणार विविध पॅनेल चर्चा : कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

         कौशल्य विकास मंत्री श्री. मंगल प्रभात लोढा म्हणाले कीदिवसभरात होणाऱ्या पॅनेल चर्चांमध्ये गुंतवणूकदारांच्या गरजा आणि युवा उद्योजकांच्या यशकथा यावर विशेष सत्रे आयोजित केली जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 जानेवारीला राष्ट्रीय स्टार्टअप दिन घोषित केला आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाज माध्यमांवरही कार्यक्रम थेट प्रक्षेपित केला जाणार आहे.

एक दिवसीय कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, कौशल्य विकास आयुक्त प्रदीपकुमार डांगे यांनी केले आहे.               

राष्ट्रीय स्टार्टअप दिवसाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १६ जानेवारीला उद्घाटन देशभरातून एक हजार स्टार्टअप्सचा सहभाग

 राष्ट्रीय स्टार्टअप दिवसाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

१६ जानेवारीला उद्घाटन

देशभरातून एक हजार स्टार्टअप्सचा सहभाग

- कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

  मुंबई, दि. 14 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने एम्पॉवरींग इनोव्हेशन, एलिव्हेटिंग महाराष्ट्र (Empowering Innovation, Elevating Maharashtra) या संकल्पनेवर आधारित ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये १६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे. महाराष्ट्रासह देशभरातील तंत्रज्ञान, कृषी, सेवा क्षेत्र, औषधनिर्माण तसेच पर्यटन अशा विविध क्षेत्रांतील १००० स्टार्टअप या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

         या कार्यक्रमास मेरीको लिमिटेडचे अध्यक्ष हर्ष मारीवाला, अपग्रेड अँड स्वदेस फाउंडेशनचे सह संस्थापक रॉनी स्क्रूवाला, नायकाच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी फाल्गुनी नायर,व्हेंचर कॅपिटल अँड स्टार्ट अप्स गुगलचे जागतिक प्रमुख अपूर्वा चमरिया, स्थानिक सरकार आणि शिक्षण AWS चे प्रमुख, राज्य अजय कौल, ईव्ही कॅप वेंचर्सचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय पार्टनर विक्रम गुप्ता,अवेंडसचे सह-संस्थापक आणि कार्यकारी उपाध्यक्ष राणू वोहरा, इनक्युबेशन MGB इनोव्हेशन फाउंडेशन पार्टनर अध्यक्ष JITO जिनेंद्र भंडारी,व्हेंचर कॅटालिस्ट अँड नाईन युनिकॉर्नचे सह-संस्थापक अपूर्व रंजन शर्मा, ब्लू स्मार्टचे सह-संस्थापक पुनीत गोयल,रेनट्री फाउंडेशनच्या संस्थापक आणि संचालिका लीना दांडेकर, ओपन सीक्रेटच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अहाना गौतम, चलो मोबिलिटीच्या सह संस्थापक आणि संचालक प्रिया सिंग, जिओ जेन नेक्स्टच्या प्रमुख अमेय माशेलकर, सुपर बॉटम्सच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी उतगी, अस्थिरोग तज्ज्ञ आणि कलाकार सलोनी पटवर्धन इ. मान्यवर उपस्थित राहुन आपल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण करणार आहेत.

मकर संक्रांती हा एक महत्त्वाचा

 *✨🌟मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा✨🌟*

*मकर संक्रांती हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे, जो प्रत्येक वर्षी १४ जानेवारीला साजरा केला जातो. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या सणाला मकर संक्रांती असे म्हणतात. मकर संक्रांती सूर्याचा उत्तरायणात प्रवेश होणारा दिवस आहे, जे दर्शवते की सूर्य दक्षिणायणातून उत्तरायणात जात आहे, जे एक शुभ संकेत मानले जाते.*

*मकर संक्रांतीच्या महत्त्वपूर्ण पैलूंवर नजर:*

*1. धार्मिक महत्त्व:*:मकर संक्रांतीला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व दिले जाते. हे उत्तरायण सुरू होण्याचा दिवस असतो, जो हिंदू मान्यतेनुसार शुभ आणि पवित्र मानला जातो. या दिवशी भक्त सूर्य देवतेची पूजा करतात.

*2. खाद्यपदार्थ:* या दिवशी तिळगुळ किंवा तिळाचे पदार्थ खाल्ले जातात, कारण तिळ गोड आणि उबदार असतो, जो थंड हवेतील थोड्या गरमीसाठी लाभकारी मानला जातो. तसेच तिळ गुड असं म्हणून गोड पदार्थांचा आदानप्रदान केला जातो.

*3. कृषी महत्त्व:* मकर संक्रांती कृषी सण म्हणूनही ओळखला जातो. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना हंगामाची सुरूवात होते आणि त्यांना त्यांच्या शेतमालाचे यशस्वी उत्पादन मिळावे म्हणून या दिवशी पूजा केली जाते.

*4. सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व:* मकर संक्रांती समाजातील एकजुटीचा आणि प्रेमाचा संदेश देणारा सण आहे. लोक एकमेकांना तिळगुळ देतात आणि "तिळगुळ घ्या, गोड गोड बोला" असे सांगतात.

*5. विशेष सण:* विविध राज्यांमध्ये मकर संक्रांती विविध प्रकारे साजरी केली जाते:

महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये तिळगुळ आणि पतंग उडवणे ही प्रमुख परंपरा आहे.

उत्तर भारतात, विशेषत: पंजाबमध्ये, लोहडी सण साजरा केला जातो.

दक्षिण भारतात, खासकरून तमिळनाडूमध्ये, पोंगल हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

मकर संक्रांती हा एक आनंदाचा सण आहे जो फक्त धार्मिकदृष्ट्या नाही, तर सामाजिक आणि सांस्कृतिक दृषटिकोनातूनही खूप महत्त्वाचा आहे.

*माहिती आवडली तर इतर ग्रुप वर शेअर करा📲आणि आरोग्य विषयक नवनवीन माहिती साठी ग्रुप जॉइन करा*

🌹🌺🌺🌺🙏🌺🌺🌺🌺🌹

 हिंदू एज्युकेशन सोसायटी व भोसला मिलिटरी स्कूल संचलीत  ओंकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे

रक्त तपासणी (लिपिड प्रोफाइलअनोख्या पद्धतीने समजावून सांगणारी एक सुंदर गोष्ट येथे आहे.

 *रक्त तपासणी (लिपिड प्रोफाइल)*

रक्त तपासणी केल्यानंतर जी लिपिड प्रोफाइल रिपोर्ट येते, तिचा अर्थ एका अनोख्या पद्धतीने समजावून सांगणारी एक सुंदर गोष्ट येथे आहे.

रक्त तपासणीमध्ये जे कोलेस्ट्रॉल (Cholesterol), ट्रायग्लिसराइड (Triglycerides), HDL, आणि LDL असतात, ते काय आहेत?

कल्पना करा की आपले शरीर हे एक छोटेसे शहर (City) आहे. या शहरातील मुख्य गुन्हेगार म्हणजे कोलेस्ट्रॉल (Cholesterol) आहे.

त्याचे काही साथीदारही आहेत, जे गुन्हेगारीत भाग घेतात. यातील मुख्य साथीदार म्हणजे ट्रायग्लिसराइड (Triglycerides). त्यांचे काम म्हणजे रस्त्यावर फिरणे, गोंधळ निर्माण करणे, आणि रस्ते अडवणे (Block).

आपले ❤️हृदय हे या शहराचे “सिटी सेंटर” आहे. सगळे रस्ते “हृदय” पर्यंत जातात. जेव्हा गुन्हेगार (कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड) यांची संख्या वाढते, तेव्हा काय होते? ते हृदयाच्या कामकाजात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात.

पण आपल्या शरीररूपी शहरात एक पोलिस दलसुद्धा आहे, ज्याला HDL म्हणतात. HDL हा एक चांगला पोलीस आहे, जो गुन्हेगारांना पकडतो आणि त्यांना तुरुंगात म्हणजेच यकृतात (Liver) पाठवतो. यकृत नंतर त्या गुन्हेगारांना पेशींच्या माध्यमातून शरीराबाहेर टाकतो.

मात्र, एक वाईट पोलीसही आहे, ज्याला LDL म्हणतात. तो सत्तेचा हव्यास धरून उलट गुन्हेगारांना तुरुंगातून सोडवतो आणि त्यांना परत रस्त्यावर आणतो.

जेव्हा चांगल्या पोलीस “HDL” ची संख्या कमी होते, तेव्हा गुन्हेगार कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड, आणि LDL मोकाट सुटतात, ज्यामुळे आपले “हृदयाचे शहर” अस्थिर होते. अशा शहरात राहायला कोणाला आवडेल?

❓गुन्हेगारांना कमी करायचे आहे आणि चांगले पोलीस (HDL) वाढवायचे आहेत का?

   *🚶🏼‍♀️चालणे सुरू करा*  

        *🚶🏻‍♂️खूप चालावे*  

  *🚶🏻जितके शक्य आहे तितके चालावे*  

प्रत्येक पावलाबरोबर, चांगल्या पोलिसांची (HDL) संख्या वाढेल, आणि समस्या निर्माण करणारे (कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड आणि LDL) कमी होतील.

चालण्याने तुमचे शरीररूपी शहर नवचैतन्य प्राप्त करेल. तुमच्या हृदयाचे सिटी सेंटर गुन्हेगारांपासून (हार्ट ब्लॉक) सुरक्षित राहील. आणि तुमचे हृदय निरोगी राहील तर तुम्हीही निरोगी रहाल.

म्हणून, जेव्हा शक्य होईल तेव्हा चालायला सुरुवात करा! 

*चला तर चाला ….*

आपल्याकडे जे आहे त्याबद्दल आभार मानण्याची सवय लावा. धन्यवाद दिल्याने केवळ समाधानच नव्हे तर जीवनातील प्रत्येक चांगल्या गोष्टींना वाढवते.

माझ्या सर्व मित्र-परिवाराने सुखी रहावे, निरोगी रहावे आणि दीर्घायुष्य लाभावे.

Featured post

Lakshvedhi