Tuesday, 14 January 2025

एसटी कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘एसटी’च्या जागेवर २५ तर बोरिवलीत १०० खाटांचे रूग्णालय उभारणार

 एसटी कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘एसटी’च्या जागेवर २५ तर

बोरिवलीत १०० खाटांचे रूग्णालय उभारणार

राज्यातील अनेक बसस्थानके बांधावापरा आणि हस्तांतरित कराया तत्वावर विकसित करण्यात येत आहेत. एस. टी. कर्मचाऱ्यांसाठी या ‘एस. टी.’च्या प्रकल्पात प्रत्येक जिल्ह्यात २५ तर मुंबईतील बोरिवली येथील जागेवर १०० खाटांचे रूग्णालय सुरू करण्यात येणार आहे. या रूग्णालयात एस. टी. कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार करण्यात येतीलतसेच पाच लाखांपर्यंतच्या शस्त्रक्रियांचा खर्च राज्यशासन करेलअसेही परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी सांगितले.

सध्या राज्यभरात विविध ठिकाणी बांधा - वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर ‘एसटी’च्या जागांचा विकास केला जात आहे. भविष्यात या रुग्णालयांमध्ये ‘एसटी’ कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येतील. पुणेकोल्हापूरपुसदवाशिम येथे रूग्णालय उभारण्यासंदर्भातील सादरीकरण करण्यात आले. 


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi