Thursday, 26 December 2024

सहकार चळवळ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा

 सहकार चळवळ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा

-         सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

सहकार विभागाच्या कामकाजाचा आढावा

 

मुंबईदि. 26 :- सहकार चळवळ अधिक गतिमान करून या चळवळीत ग्रामीण भागातील शेवटचा घटक सहभागी झाला पाहिजेया दृष्टीने  सहकार विभागाने सुयोग्य नियोजन करावे व त्यानुसर कार्यवाही करावीअशा  सूचना  सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिल्या.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साखर भवन येथे सहकार विभागाची आढावा बैठक झाली. बैठकीस सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरअपर मुख्य सचिव राजगोपाल देवरासहकार आयुक्त दीपक तावरे,अपर आयुक्त श्रीकृष्ण वाडेकरसंतोष पाटील यांच्यासह सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सहकार मंत्री श्री. पाटील म्हणाले की,  राज्याला सहकार चळवळीचा मोठा वारसा आहे. या चळळीत अनेक महनीय व्यक्तींचे योगदान राहिले आहे. या व्यक्तींनी राज्यात सहकार चळवळ रुजवलीवाढवली आहे. सहकार चळवळीमुळे राज्याची प्रगती झाली. सहकारी साखर कारखानेनागरी बँकाविविध कार्यकारी सेवा सोसायट्यापतपुरवठा संस्था यामुळे  शहरी व ग्रामीण अर्थकारणाला गती मिळाली. सहकार चळवळीच्या माध्यमातून  जनसामान्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य येण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करावे. सहकार चळवळीत शेवटचा घटक सामील व्हावाअसे प्रयत्न सहकार विभागाने करावेत.

            मंत्री श्री. पाटील म्हणाले की, सहकरामध्ये चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील. देशात सहकार क्षेत्रात आदर्शवत  काम करून या क्षेत्रात राज्याचे वेगळेपण सिद्ध करून एक वेगळा ठसा उमविण्यासाठी सर्वांनी चांगले काम करावे, असे आवाहन सहकार मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी केले.

आढावा बैठकीत सहकार विभागसाखर आयुक्त कार्यालय आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित पुणे यांच्यामार्फत  राबविण्यात येत असलेल्या विविध योजनाउपक्रम व कामकाजाची माहिती सादर करण्यात आली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा विस्तार तालुकास्तरावर

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

स्वाधार योजनेचा विस्तार तालुकास्तरावर

- सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

सामाजिक न्याय विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर विभागाच्या विविध योजनांचा घेतला आढावा

 

मुंबई दि. 26 : सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज केला असेल परंतु वसतिगृह प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांना निवास व भोजनाची व्यवस्था व्हावी याकरिता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत निर्वाह भत्ता देण्यात येतो तालुकास्तरावरील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून स्वाधार योजनेचा विस्तार (व्याप्ती)तालुकास्तरावर करण्यात येत असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली. याबाबतीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

सामाजिक न्याय मंत्री श्री. शिरसाट यांनी मंत्रालयात विभागाचा कार्यभार स्वीकारला व विभागाची आढावा बैठक घेतली. त्यावेळी श्री. शिरसाट बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव विजय वाघमारेसहसचिव सो.ना.बागुल यांच्यासह विभागाचे अधिकारी आणि सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी सामाजिक न्याय मंत्री श्री शिरसाट म्हणाले कीस्वाधार योजनेची व्याप्ती आता तालुकास्तरापर्यंत वाढविण्यात येत आहे. या योजनेची संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाईन करण्यात येत आहे. अर्ज प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रांमध्ये सुटसुटीतपणा आणत आहोत. ५० टक्के वरील पात्र विद्यार्थ्यांना गुणवत्तेप्रमाणे लाभ दिला जाणार आहे. तसेच प्रथमच अनुसूचित जाती प्रवर्गातील तृतीयपंथींयानाही योजनेचा लाभ मिळणार असल्याचेही श्री. शिरसाट यांनी सांगितले.

 

मंत्री श्री. शिरसाट यांनी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेऊन या योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्याची सूचना केली. विशेषत: या विभागांतर्गत येणाऱ्या वसतिगृहाच्या सोयीसुविधाकडे प्राधान्याने लक्ष द्यावे. वसतिगृहाच्या सोयीसुविधांचा आढावा घेण्यासाठी वसतिगृहाना भेटी देण्यात येणार आहेत. विभागाच्या योजना आणि महामंडळाच्या योजनांचा लाभ योग्य त्या लाभार्थ्यांना देण्यात यावा असेही मंत्री श्री. शिरसाट यांनी यावेळी सांगितले.

 महाराष्ट्राच्या करीना थापा आणि केया हटकर

'प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा'ने सन्मानित

 

नवी दिल्ली 26 : महाराष्ट्राच्या दोन धाडसी आणि प्रेरणादायी मुलींच्या शौर्य आणि प्रतिभेचा सन्मान राष्ट्रीय स्तरावर करण्यात आला. अमरावतीच्या करीना थापाला शौर्यासाठी तर मुंबईच्या केया हटकरला तिच्या साहित्य व सामाजिक कार्यासाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री श्रीमती अन्नपूर्णा देवी राज्यमंत्री श्रीमती सावित्री ठाकूर व महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे सचिव अनिल मलिक उपस्थित होते.

या पुरस्काराचे स्वरूप पदकसन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे असूनयंदा 14 राज्यांमधील10 मुली व 7 मुले असे एकूण 17 मुलांना गौरविण्यात आले. यामध्ये शौर्यविज्ञान-तंत्रज्ञानकला-संस्कृतीसमाजसेवाक्रीडा आणि पर्यावरण यांसारख्या विविध क्षेत्रांतील असामान्य कामगिरी करणाऱ्या मुला-मुलींचा समावेश आहे. 

            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनावरून 2022 पासून 26 डिसेंबर या दिवशी वीर बाल दिवस’ म्हणून दोन्ही साहिबजादा बाबा जोरावरसिंग व बाबा फतेहसिंग यांना अभिवादन  व  शौर्याचे स्मरण करण्यात येते. शिख धर्मातील दहावे गुरुगुरु गोबिंद सिंग यांचे सुपुत्र बाबा जोरावर सिंग (वय 9) आणि बाबा फतेहसिंग (वय 5) यांच्या अव्दितीय शौर्याला समर्पित या दिवसाला विशेष महत्त्व आहे. त्यांच्या बलिदानाचे स्मरण म्हणून हे पुरस्कार प्रजासत्ताक दिनाएवजी वीर बाल दिवस म्हणजेच 26 डिसेंबर रोजी राष्ट्रपती भवनात समारंभपूर्वक प्रदान  करण्यात येतात. 

करीना थापाचे शौर्य: 70 कुटुंबांचे प्राण वाचवले

अमरावतीच्या कठोरा परिसरातील जय अंबा अपार्टमेंटमध्ये 15 मे 2024 रोजी लागलेल्या भीषण आगीच्या घटनेत करीना थापाने 70 कुटुंबांचे प्राण वाचवले. बी-विंगमधील एका फ्लॅटमध्ये आग लागल्याचे दिसताचकरिनाने प्रसंगावधान दाखवत कुलूप तोडून आत प्रवेश केला. सिलेंडरजवळील आग आटोक्यात आणत सिलेंडर बाहेर काढल्याने मोठा स्फोट होण्याची भीती टळली. तिच्या शौर्याची दखल घेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

केया हटकर: साहित्य आणि समाजकार्याची ओळख

मुंबईच्या केया हटकरने अपंगत्वावर मात करत आपली ओळख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रस्थापित केली आहे. तिच्या ‘डान्सिंग ऑन माय व्हिल्स’ आणि ‘आय एम पॉसीबल’  ही दोन्ही पुस्तके जागतिक स्तरावर नावाजले गेले आहेत. 13 वर्षांच्या केयाने दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला असून तिचे साहित्य 26 देशांमध्ये लोकप्रिय ठरले आहे. केयाला 10 महिन्यांपासून स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी (SMA) या आजाराने ग्रसित आहेज्यामुळे ती कायमस्वरूपी व्हीलचेअरवर असते. मात्रतिने हा आजार तिच्या यशाच्या मार्गातील अडथळा होऊ दिला नाही. तिच्या साहित्य व सामाजिक कार्याची दखल घेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ ने सन्मानित करण्यात आले.

भारत मंडपम येथे राष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन

पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर राजधानीतील भारत मंडपम येथे केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाकडून आयोजित करण्यात आलेल्या वीर बाल दिवसाच्या राष्ट्रीय कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री श्रीमती अन्नपूर्णा देवी उपस्थित होते. हा कार्यक्रम युवा प्रतिभेला  प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या अतुलनीय गुणांची  दखल घेऊनभविष्यात  नवीन भारताच्या निर्मितीसाठी लक्ष केंद्रित करण्यासाठी आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या उद्घाटन भाषणात श्रीमती अन्नपूर्णा देवी यांनी मुलांच्या रचनात्मकतेला प्रोत्साहन देण्याचे महत्त्व सांगितले आणि वीर बाल दिवसाचे उद्देश स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुपोषित पंचायत अभियानाचे उद्घाटन केले. पोषण संबंधित सेवांची अंमलबजावणी बळकट करून आणि सक्रिय सामुदायिक सहभाग सुनिश्चित करून पोषण परिणाम आणि कल्याण हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमात पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेते आणि मान्यवर व्यक्तींसह सुमारे 3500 मुले सहभागी झाली. मुलांनी विविध भारतीय संस्कृतींचे प्रतिनिधित्व करणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले आणि विविध संस्कृतींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मार्च पास्टमध्ये भाग घेतला.

यासोबतचयुवा मनांना गुंतवून ठेवण्यासाठीया दिवसाच्या महत्त्वाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी आणि देशाप्रती धैर्य आणि समर्पणाची संस्कृती वाढवण्यासाठी देशभरात विविध उपक्रम राबवले जातील. MyGov आणि MyBharat पोर्टलच्या माध्यमातून परस्पर संवादात्मक प्रश्नमंजुषेसह ऑनलाईन स्पर्धांची मालिका आयोजित केल्या जातील. शाळाबालसंगोपन संस्था आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये कथाकथनसर्जनशील लेखनभित्तीचित्रे तयार करणे यासारखे मनोरंजक उपक्रम हाती घेतले जातील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

0000


 


शौर्य आणि त्यागाची प्रेरणा देणारा शहीद वीर बाल दिवस

  

शौर्य आणि त्यागाची प्रेरणा देणारा शहीद वीर बाल दिवस

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. 26 : गुरू गोविंद सिंग यांनी देशासाठीसमाजाचेसंस्कृतीचेधर्माचे रक्षण करण्यासाठी संपूर्ण कुटुंबाचे बलिदान दिले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानुसार गुरू गोविंद सिंगजी यांचे दोन पुत्र जोरावर सिंग आणि फतेह सिंग. या दोन साहेबजादे यांचे हौतात्म्य शहीद वीर बाल दिवसाच्या निमित्ताने आपण नेहमीच स्मरणात ठेऊयात, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त करून त्यांना नमन केले.

वीर बाल दिवसाचे औचित्य साधून गोरेगाव येथील गुरुद्वारामध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी आमदार विद्या ठाकूरकार्यक्रमाचे राष्ट्रीय प्रभारी शक्ती सिंगसंयोजक किरण पाटीलसहसंयोजक सुरींदर सिंग पुरीसहसंयोजक राणी द्विवेदीगुरुद्वारा कमिटीचे पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की पुढील अनेक पिढ्यांपर्यंत आपल्याला गुरू गोविंद सिंगजी आणि त्यांचे दोन पुत्र जोरावर सिंग आणि फतेहसिंग यांच्याकडून प्रेरणा मिळत राहील. त्यांच्या हौतात्म्याची कहाणी आपल्या भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवणेही आपली जबाबदारी आहे. या शहीद वीर बाल दिनानिमित्त या दोन साहेबजादे यांना आणि आदरणीय गुरु गोविंद सिंग जी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या चरणी नतमस्तक होतो.

यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी गुरु गोविंद सिंगजीत्यांचे दोन पुत्र साहेबजादे जोरावर सिंग आणि साहेबजादे फतेह सिंग यांच्या शौर्य तसेच संपूर्ण कुटुंबाच्या त्यागाची महती अधोरेखित केली.

लोककेंद्रित योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी विभागांनी 100 दिवसांच्या आराखड्यातून ठोस कामगिरी करण्याचे निर्देश

 लोककेंद्रित योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी

विभागांनी 100 दिवसांच्या आराखड्यातून ठोस कामगिरी करण्याचे निर्देश

-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदि. 26 :  राज्याच्या सर्वांगिण प्रगतीसाठी पुढील 100 दिवसांचा आराखडा सर्व विभाग तयार करीत आहेत. या आराखड्यात लोककेंद्रीत योजनातंत्रज्ञानाच्या उपयोगाने सहजतेने नागरिकांना लाभ मिळणाऱ्या योजना तसेच राज्याचे पुढारलेपण कायम ठेवत प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या कामगिरीचा समावेश असावाअसे निर्देश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील 100 दिवसांच्या आराखड्यातून विभागांनी ठोस कामगिरी करण्याच्या सूचना दिल्या.  

            सह्याद्री अतिथीगृह येथे उच्च व तंत्र शिक्षणवन व कृषि विभागाच्या पुढील 100 दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आढावा घेतला. बैठकीस मुख्य सचिव सुजाता सौनिकमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगेनियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवराप्रधान सचिव अश्विनी भिडेउच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीवन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डीसचिव श्रीकर परदेशी, कृषि विभागाच्या सचिव जयश्री भोजकौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटीलवित्त विभागाच्या सचिव शैला ए आदी उपस्थित होते.

             मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, वन्य प्राणी व मानव यामधील संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाने कृत्रिम बुद्धिमत्ता व माहिती तंत्रज्ञानाच्या उपयोगातून उपाययोजना कराव्यात. मानव व वन्य प्राणी संघर्षामध्ये जलद गतीने मदत मिळण्यासाठी जलद बचाव दलाची स्थापना करण्यात यावी. या दलातील मनुष्यबळाला उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यात यावे. पुढील 100 दिवसांच्या आराखड्यात अशा उपाययोजनांचा समावेश वन विभागाने करावा. वृक्षलागवडीचा संस्कार रूजण्यासाठी असे अभिनव उपक्रम कायमस्वरूपी अंमलात आणावे. या आराखड्याच्या माध्यमातून लोकांचे जीवन सुसह्य होण्यासाठी काम करण्यात यावे. 

            मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेबिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांना अन्य राज्यातील अभयारण्यात गरजेप्रमाणे देण्याची व्यवस्था करावी. बिबटे निवारा केंद्रांची क्षमता वाढविण्यात यावी. विभागाने कार्बन क्रेडीट कंपनी स्थापन करण्याबाबत धोरण तयार करावे. शहरी भागातील वनीकरण वाढविण्यासाठी मियावाकी वृक्षलागवड पद्धत शहरांमध्ये उपयोगात आणावी. कृषि विभागाने आपल्या आराखड्यातून शेतकरी केंद्रबिंदू ठेवत योजनांची अंमलबजावणी करावी. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने देशात येणाऱ्या परदेशी विद्यापीठांना आकर्षित करून  शैक्षणिक संकुल निर्माण करावे.

            यावेळी संबंधित विभागाच्या सचिवांनी विभागांच्या आराखड्याचे सादरीकरण केले.

0000

सुशासन निर्देशांकात क्षेत्रानुसार क्रमानुसार पहिले पाच जिल्हे कृषी वसुशासनाच्या माध्यमातून एक ट्रिलीयन अर्थव्यवस्थेचा मार्ग बळकट होईल

 सुशासनाच्या माध्यमातून एक ट्रिलीयन अर्थव्यवस्थेचा मार्ग बळकट होईल

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचे अनावरण

 

मुंबईदि. 26 :  राज्याची प्रगती तेथील ईज ऑफ लिव्हींग’ वर अवलंबून असते. त्यामुळे शासनही राज्यातील ईज ऑफ लिव्हींग’ सुधारण्यासाठी प्राधान्याने काम करीत आहे. नागरिकांना विविध सेवा विनाविलंब मिळतात की नाहीयावरून राज्यातील सुशासन  लक्षात येत असते. सुशासनाच्या माध्यमातून एक ट्रिलीयन अर्थव्यवस्था करण्याचा मार्गही बळकट होईलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

            सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र जिल्हा सुशासन निर्देशांक2024 अहवालाचे अनावरण मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास मुख्य सचिव सुजाता सौनिकमुख्यमंत्री यांचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगेनियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरामहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, प्रधान सचिव अश्विनी भिडेसचिव श्रीकर परदेशीउच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी,  वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डीकृषि विभागाच्या सचिव जयश्री भोजकौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटीलवित्त विभागाच्या सचिव शैला ए तसेच अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक कृष्णा फिरकेसहसंचालक सविता दिक्षीत आदी उपस्थित होते. दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे केंद्र शासनाच्या प्रशासनिक सुधारणा व नागरिकांच्या तक्रारी विभागाचे सचिव यु. श्रीनिवास यांनीही संबोधीत केले.

             मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीकेंद्र शासनाच्या सहकार्याने जिल्हा सुशासन निर्देशांक हा विविध क्षेत्रांच्या मापदंडानुसार सुशासनाची व्याप्ती दर्शविते. अतिशय विस्तृत अशाप्रकारचा हा निर्देशांक आहे. मागील काळात शासनाने लोककेंद्रीत प्रशासनावर भर देत नागरिकांना तक्रारी सोडविण्यासाठी आपले सरकार नावाचे पोर्टल उपलब्ध करून दिले.  जिल्हा सुशासन निर्देशांक ही पद्धत केवळ रॅकिंग दाखविणारी नाहीतर सुधारणा करण्यास वाव देणारी आहे. राज्यात जास्तीत जास्त गुण मिळणारे जिल्हे आणि कमी गुण मिळणाऱ्या जिल्ह्यांमध्ये गुणांचा फरक कमी आहे. त्यामुळे सर्वच जिल्हे प्रगती करताना दिसत आहेत.

जिल्हा सुशासन निर्देशांक हा 10 विकास क्षेत्रातील 161 मापदंडांवर आधारीत असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी निर्देशांकात चांगली कामगिरी केलेल्या जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले. तसेच ज्या जिल्ह्यांची कामगिरी गुणवत्तेच्या आधारे उंचावणे गरजेचे आहे. त्या जिल्ह्यांनी कामगिरी सुधारत निर्देशांकात प्रगती करावी, यामध्ये पालक सचिवांनी लक्ष घालण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. 

जिल्हा सुशासन निर्देशांकात क्षेत्रानुसार क्रमानुसार पहिले पाच जिल्हे

कृषी व संबंधित क्षेत्र : अमरावतीवाशिमछत्रपती संभाजीनगरलातूरपरभणी. वाणिज्य व उद्योग : मुंबई शहररायगडपुणेपालघरठाणे. मनुष्यबळ विकास : नाशिकगोंदीयापुणेयवतमाळसातारा. सार्वजनिक आरोग्य : सिंधुदुर्गमुंबई उपनगरपालघरबीडरत्नागिरी. पायाभूत सोयी - सुविधा : लातूरनाशिकबुलढाणाचंद्रपूरहिंगोली. सामाजिक विकास : गोंदियाअमरावतीनाशिकधुळेनागपूर. आर्थिक सुशासन : मुंबई उपनगरमुंबई शहररायगडजळगांवभंडारा. न्यायप्रणाली व सुरक्षा : मुंबई उपनगरमुंबई शहरनागपूरगडचिरोलीरायगड. पर्यावरण : सांगलीछत्रपती संभाजीनगरसोलापूरमुंबई शहरमुंबई उपनगर. लोककेंद्रीत प्रशासन : नाशिकवाशिमयवतमाळबुलढाणाअमरावती.

वार्षिक स्नेहसम्मेलनात अग्रसेन विद्या मंदिराने जागविल्या ‘सामाजिक जाणिवा’

 वार्षिक स्नेहसम्मेलनात अग्रसेन विद्या मंदिराने 

जागविल्या ‘सामाजिक जाणिवा’

इटखेडा / प्रतिनिधी - पैठण रोड येथील अग्रसेन विद्या मंदिर ह्या सी.बी.एस.ई. बोर्ड शाळेमध्ये दि. 22 ते 24 डिसेंबर या तीन दिवसांमध्ये शाळेच्या छत्रपती अग्रसेन महाराज सभागृहात 18 वे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात साजरे केले गेले. वर्षभरात परीक्षा, विविध शैक्षणिक उपक्रम यातून उसंत मिळावी व आपल्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून स्नेहसंमेलनासाठी आसुसलेले विद्यार्थी या कार्यक्रमात हिरिरीने सहभागी झाले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना फुलविणार्‍या तसेच उत्साह निर्माण करणार्‍या या पर्वात विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व जोश पहावयास मिळला. कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांना सर्वप्रथम शिक्षक सौरभ जोशी व दीपा देहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली.
दि.22 डिसेंबर रोजी सकाळ व दुपार या अनुक्रमे दोन सत्रात सकाळी पूर्वप्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी ‘रेनबो’ या शिर्षकांतर्गत आपल्या कलागुणाद्वारे प्रेक्षकांना सभागृहात बांधून ठेवले. रेनबो म्हणजे इंद्रधनुष्य ज्यात सात रंगाच्या छटा दिसतात व पावसाळी आसमंताला हे इंद्रधनु सुशोभित करते त्याचप्रमाणे चिमुकल्यांनी आपल्या कलागुणांच्या विविध छटांमधून रंगांचे स्वभाववैशिष्ट्ये दर्शवून रसीक प्रेक्षकांना दाद देण्यास भाग पाडले. त्यानंतर दुपारच्या सत्रात इ. 1 ली व 2 री च्या विद्याथ्याँर्थ्यांनी ’विज्ञान आणि संस्कृती’ या शिर्षकांतर्गत भारताच्या समृद्ध संस्कृतीचे वर्णन करतांना आजच्या विज्ञान युगात ती कशी श्रेष्ठ हे छोट्याछोट्या प्रसंगातून प्रेक्षकांसमोर सअभिनय व नृत्याद्वारे प्रस्तुत केले.
दुसर्‍या दिवशी दि. 23 डिसेंबर 2024, सोमवार रोजी सकाळच्या सत्रात इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी ’सुधा मुर्ती’ यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध कंगोरे आपल्या अभिनय व नृत्याद्वारे प्रेक्षकांसमोर जीवंत केले. विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा हाच या व्यक्तिविशेषाचा उद्देश. दुपारच्या सत्रात मानवी स्थायीभावाला कलेद्वारे प्रत्यक्ष रसनिर्मितीत कसे परिवर्तीत करता येते हे ’नवरस’ यामध्ये दर्शविले. हास्य, करूण, रौद्र, वीर, भयानक, शृंगार, शांत, अद्भुत, बीभत्स या रसांनी युक्त नृत्याद्वारे प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
दि. 24 डिसेंबर 2024, मंगळवार रोजी सकाळच्या सत्रात इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी देवों के देव ’महादेव’ यांना भोलेनाथ, नीलकंठ, कालभैरव, वीरभद्र, आदियोगी ही नावे कशी मिळाली हे विविध प्रसंग व नृत्य रूपात प्रेक्षकांसमोर सादर केले. दुपारच्या सत्रात इ. नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी ’महाभारत’ या शिर्षकांतर्गत नाटिका सादर करतांना प्राचीन काळातील भगवान श्रीकृष्ण व आधुनिक काळातील शिक्षक यांच्या भूमिकेमध्ये सहसंबंध साधून सामाजिक जागृती जागवण्याचा प्रयत्न केला.कार्यक्रमाची सुरूवात प्रतिमापूजन, ईशस्तवन व थिमसाँगने करण्यात आली. प्रस्तुत स्हेनसंम्मेलाचा उद्देश्य केवळ मनोरंजन नसून विद्यार्थ्यांच्या आजच्या काळातील समस्या, त्यांचे सामाजिक भान व कर्तव्ये हा होता.
या तीन दिवसीय कार्यक्रमास उद्घाटकपदी अनुक्रमे पहिल्या दिवशीच्या सत्रात नंदकुमारजी घोडेले (माजी महापौर, छ. संभाजीनगर) व डॉ.सचिनजी सोनी (नेफ्रोलॉजी विभागप्रमुख, मेडिकव्हर हॉस्पिटल, छ. संभाजीनगर), दुसर्‍या दिवशीच्या सत्रात नितीनजी बगाटे (पोलीस उपायुक्त, छ. संभाजीनगर), कुंजबिहारीजी अग्रवाल (अध्यक्ष, अग्रवाल सभा), तिसर्‍या दिवशीच्या सत्रात डॉ.उल्हासजी गवळी, डॉ.पुरुषोत्तमजी दरक (एम.सीएच., यूरोलॉजी, एमबीबीएस, जनरल फिजिशियन) तर प्रमुख पाहुणे पदी शाळेचे विश्वस्त केशवजी लीला, मनीजी लीला यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास शाळा समितीचे विद्यमान अध्यक्ष राजकुमारजी टिबडेवाला, उपाध्यक्ष राजेशजी भारुका, सचिव निधिजी अग्रवाल, कोषाध्यक्ष पंकजजी अग्रवाल, सत्यनारायणजी अग्रवाल (माजी अध्यक्ष, अग्रसेन विद्या मंदिर), किशोरजी अग्रवाल, संजयजी अग्रवाल,  गोकुळचंदजी अग्रवाल अग्रवाल, नितीनजी बगडिया, सच्चानंदजी अग्रवाल, राकेशजी अग्रवाल, राजकुमारजी अग्रवाल तसेच इतर मान्यवर सदस्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे प्राचार्य संतोष कुमार करवा व उपप्राचार्या मयुरी लोगलवार, अधीक्षक अजय सोनुने यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रबद्ध लेखन व दिग्दर्शन सारिका हानवते, सविता आरबोले, योगिता लाळे व आकाश काळे यांनी केले. सुयोग्य नियोजनासाठी नृत्य विभागातील शिक्षक विक्रम शर्मा, सौरभ जोशी, दिव्या गुप्ता, तृप्ती तायडे व शितल श्रोत्रिय तसेच संगीत विभागातील नेहा नेरळकर, सागर नागापुरकर, सुप्रिया खरात, नंदा (बेबी) साळवे यांनी तर नाटिकेतील आकर्षक कलानेपत्थ्य मिनल शिरूडे, प्रीती केळगावकर व मिनल देशमुख यांनी केले.
दिनविशेषानुसार सुयोग्य रांगोळीद्वारे परिसर सुशोभनासाठी अंजली खरपुडे, पुनम अग्रवाल, आरती दिक्षीत, वैशाली देशमुख, संस्कृती अग्रवाल यांनी परिश्रम घेतले. भारतीय संस्कृती दर्शवणारे प्रमुख पाहुण्यांचे स्वागत मिनाक्षी खंडेलवाल व प्राजक्ता फोकणे यांच्या मार्गदर्शनखाली विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाच्या संपन्नतेसाठी विभाग प्रमुख सरिता काळे, स्मिता पाटील, लक्ष्मी दयालानी, उर्मिला करंगुला, सुचिता मुंदडा, नम्रता गील, सीमा धूत, दीपाली मोरे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अविरत परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन खुवी पाटणी, अक्षरा जसोरिया, श्रेया भापकर, यशी झा, उत्कर्ष जाधव, हरिश गुंजलेकर, नुपूर शुक्ला, प्राप्ती पवार, वैष्णवी सुरेका, आर्या भालेराव व वेदश्री खडके यांनी तर आभार प्रदर्शन कस्तुरी काथार, विधी कुटे, दिवीजा शहापुरकर, अक्षरा मुंदडा, भार्गवी पाटील, श्रृती रोटे यांनी शिक्षिका वैशाली खरात यांच्या मार्गदर्शनाखाली केले. संगीत शिक्षक नेहा नेरळकर यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Featured post

Lakshvedhi