Thursday, 26 December 2024

सुशासन निर्देशांकात क्षेत्रानुसार क्रमानुसार पहिले पाच जिल्हे कृषी वसुशासनाच्या माध्यमातून एक ट्रिलीयन अर्थव्यवस्थेचा मार्ग बळकट होईल

 सुशासनाच्या माध्यमातून एक ट्रिलीयन अर्थव्यवस्थेचा मार्ग बळकट होईल

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचे अनावरण

 

मुंबईदि. 26 :  राज्याची प्रगती तेथील ईज ऑफ लिव्हींग’ वर अवलंबून असते. त्यामुळे शासनही राज्यातील ईज ऑफ लिव्हींग’ सुधारण्यासाठी प्राधान्याने काम करीत आहे. नागरिकांना विविध सेवा विनाविलंब मिळतात की नाहीयावरून राज्यातील सुशासन  लक्षात येत असते. सुशासनाच्या माध्यमातून एक ट्रिलीयन अर्थव्यवस्था करण्याचा मार्गही बळकट होईलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

            सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र जिल्हा सुशासन निर्देशांक2024 अहवालाचे अनावरण मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास मुख्य सचिव सुजाता सौनिकमुख्यमंत्री यांचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगेनियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरामहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, प्रधान सचिव अश्विनी भिडेसचिव श्रीकर परदेशीउच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी,  वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डीकृषि विभागाच्या सचिव जयश्री भोजकौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटीलवित्त विभागाच्या सचिव शैला ए तसेच अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक कृष्णा फिरकेसहसंचालक सविता दिक्षीत आदी उपस्थित होते. दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे केंद्र शासनाच्या प्रशासनिक सुधारणा व नागरिकांच्या तक्रारी विभागाचे सचिव यु. श्रीनिवास यांनीही संबोधीत केले.

             मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीकेंद्र शासनाच्या सहकार्याने जिल्हा सुशासन निर्देशांक हा विविध क्षेत्रांच्या मापदंडानुसार सुशासनाची व्याप्ती दर्शविते. अतिशय विस्तृत अशाप्रकारचा हा निर्देशांक आहे. मागील काळात शासनाने लोककेंद्रीत प्रशासनावर भर देत नागरिकांना तक्रारी सोडविण्यासाठी आपले सरकार नावाचे पोर्टल उपलब्ध करून दिले.  जिल्हा सुशासन निर्देशांक ही पद्धत केवळ रॅकिंग दाखविणारी नाहीतर सुधारणा करण्यास वाव देणारी आहे. राज्यात जास्तीत जास्त गुण मिळणारे जिल्हे आणि कमी गुण मिळणाऱ्या जिल्ह्यांमध्ये गुणांचा फरक कमी आहे. त्यामुळे सर्वच जिल्हे प्रगती करताना दिसत आहेत.

जिल्हा सुशासन निर्देशांक हा 10 विकास क्षेत्रातील 161 मापदंडांवर आधारीत असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी निर्देशांकात चांगली कामगिरी केलेल्या जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले. तसेच ज्या जिल्ह्यांची कामगिरी गुणवत्तेच्या आधारे उंचावणे गरजेचे आहे. त्या जिल्ह्यांनी कामगिरी सुधारत निर्देशांकात प्रगती करावी, यामध्ये पालक सचिवांनी लक्ष घालण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. 

जिल्हा सुशासन निर्देशांकात क्षेत्रानुसार क्रमानुसार पहिले पाच जिल्हे

कृषी व संबंधित क्षेत्र : अमरावतीवाशिमछत्रपती संभाजीनगरलातूरपरभणी. वाणिज्य व उद्योग : मुंबई शहररायगडपुणेपालघरठाणे. मनुष्यबळ विकास : नाशिकगोंदीयापुणेयवतमाळसातारा. सार्वजनिक आरोग्य : सिंधुदुर्गमुंबई उपनगरपालघरबीडरत्नागिरी. पायाभूत सोयी - सुविधा : लातूरनाशिकबुलढाणाचंद्रपूरहिंगोली. सामाजिक विकास : गोंदियाअमरावतीनाशिकधुळेनागपूर. आर्थिक सुशासन : मुंबई उपनगरमुंबई शहररायगडजळगांवभंडारा. न्यायप्रणाली व सुरक्षा : मुंबई उपनगरमुंबई शहरनागपूरगडचिरोलीरायगड. पर्यावरण : सांगलीछत्रपती संभाजीनगरसोलापूरमुंबई शहरमुंबई उपनगर. लोककेंद्रीत प्रशासन : नाशिकवाशिमयवतमाळबुलढाणाअमरावती.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi