Thursday, 26 December 2024

वार्षिक स्नेहसम्मेलनात अग्रसेन विद्या मंदिराने जागविल्या ‘सामाजिक जाणिवा’

 वार्षिक स्नेहसम्मेलनात अग्रसेन विद्या मंदिराने 

जागविल्या ‘सामाजिक जाणिवा’

इटखेडा / प्रतिनिधी - पैठण रोड येथील अग्रसेन विद्या मंदिर ह्या सी.बी.एस.ई. बोर्ड शाळेमध्ये दि. 22 ते 24 डिसेंबर या तीन दिवसांमध्ये शाळेच्या छत्रपती अग्रसेन महाराज सभागृहात 18 वे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात साजरे केले गेले. वर्षभरात परीक्षा, विविध शैक्षणिक उपक्रम यातून उसंत मिळावी व आपल्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून स्नेहसंमेलनासाठी आसुसलेले विद्यार्थी या कार्यक्रमात हिरिरीने सहभागी झाले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना फुलविणार्‍या तसेच उत्साह निर्माण करणार्‍या या पर्वात विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व जोश पहावयास मिळला. कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांना सर्वप्रथम शिक्षक सौरभ जोशी व दीपा देहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली.
दि.22 डिसेंबर रोजी सकाळ व दुपार या अनुक्रमे दोन सत्रात सकाळी पूर्वप्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी ‘रेनबो’ या शिर्षकांतर्गत आपल्या कलागुणाद्वारे प्रेक्षकांना सभागृहात बांधून ठेवले. रेनबो म्हणजे इंद्रधनुष्य ज्यात सात रंगाच्या छटा दिसतात व पावसाळी आसमंताला हे इंद्रधनु सुशोभित करते त्याचप्रमाणे चिमुकल्यांनी आपल्या कलागुणांच्या विविध छटांमधून रंगांचे स्वभाववैशिष्ट्ये दर्शवून रसीक प्रेक्षकांना दाद देण्यास भाग पाडले. त्यानंतर दुपारच्या सत्रात इ. 1 ली व 2 री च्या विद्याथ्याँर्थ्यांनी ’विज्ञान आणि संस्कृती’ या शिर्षकांतर्गत भारताच्या समृद्ध संस्कृतीचे वर्णन करतांना आजच्या विज्ञान युगात ती कशी श्रेष्ठ हे छोट्याछोट्या प्रसंगातून प्रेक्षकांसमोर सअभिनय व नृत्याद्वारे प्रस्तुत केले.
दुसर्‍या दिवशी दि. 23 डिसेंबर 2024, सोमवार रोजी सकाळच्या सत्रात इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी ’सुधा मुर्ती’ यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध कंगोरे आपल्या अभिनय व नृत्याद्वारे प्रेक्षकांसमोर जीवंत केले. विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा हाच या व्यक्तिविशेषाचा उद्देश. दुपारच्या सत्रात मानवी स्थायीभावाला कलेद्वारे प्रत्यक्ष रसनिर्मितीत कसे परिवर्तीत करता येते हे ’नवरस’ यामध्ये दर्शविले. हास्य, करूण, रौद्र, वीर, भयानक, शृंगार, शांत, अद्भुत, बीभत्स या रसांनी युक्त नृत्याद्वारे प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
दि. 24 डिसेंबर 2024, मंगळवार रोजी सकाळच्या सत्रात इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी देवों के देव ’महादेव’ यांना भोलेनाथ, नीलकंठ, कालभैरव, वीरभद्र, आदियोगी ही नावे कशी मिळाली हे विविध प्रसंग व नृत्य रूपात प्रेक्षकांसमोर सादर केले. दुपारच्या सत्रात इ. नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी ’महाभारत’ या शिर्षकांतर्गत नाटिका सादर करतांना प्राचीन काळातील भगवान श्रीकृष्ण व आधुनिक काळातील शिक्षक यांच्या भूमिकेमध्ये सहसंबंध साधून सामाजिक जागृती जागवण्याचा प्रयत्न केला.कार्यक्रमाची सुरूवात प्रतिमापूजन, ईशस्तवन व थिमसाँगने करण्यात आली. प्रस्तुत स्हेनसंम्मेलाचा उद्देश्य केवळ मनोरंजन नसून विद्यार्थ्यांच्या आजच्या काळातील समस्या, त्यांचे सामाजिक भान व कर्तव्ये हा होता.
या तीन दिवसीय कार्यक्रमास उद्घाटकपदी अनुक्रमे पहिल्या दिवशीच्या सत्रात नंदकुमारजी घोडेले (माजी महापौर, छ. संभाजीनगर) व डॉ.सचिनजी सोनी (नेफ्रोलॉजी विभागप्रमुख, मेडिकव्हर हॉस्पिटल, छ. संभाजीनगर), दुसर्‍या दिवशीच्या सत्रात नितीनजी बगाटे (पोलीस उपायुक्त, छ. संभाजीनगर), कुंजबिहारीजी अग्रवाल (अध्यक्ष, अग्रवाल सभा), तिसर्‍या दिवशीच्या सत्रात डॉ.उल्हासजी गवळी, डॉ.पुरुषोत्तमजी दरक (एम.सीएच., यूरोलॉजी, एमबीबीएस, जनरल फिजिशियन) तर प्रमुख पाहुणे पदी शाळेचे विश्वस्त केशवजी लीला, मनीजी लीला यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास शाळा समितीचे विद्यमान अध्यक्ष राजकुमारजी टिबडेवाला, उपाध्यक्ष राजेशजी भारुका, सचिव निधिजी अग्रवाल, कोषाध्यक्ष पंकजजी अग्रवाल, सत्यनारायणजी अग्रवाल (माजी अध्यक्ष, अग्रसेन विद्या मंदिर), किशोरजी अग्रवाल, संजयजी अग्रवाल,  गोकुळचंदजी अग्रवाल अग्रवाल, नितीनजी बगडिया, सच्चानंदजी अग्रवाल, राकेशजी अग्रवाल, राजकुमारजी अग्रवाल तसेच इतर मान्यवर सदस्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे प्राचार्य संतोष कुमार करवा व उपप्राचार्या मयुरी लोगलवार, अधीक्षक अजय सोनुने यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रबद्ध लेखन व दिग्दर्शन सारिका हानवते, सविता आरबोले, योगिता लाळे व आकाश काळे यांनी केले. सुयोग्य नियोजनासाठी नृत्य विभागातील शिक्षक विक्रम शर्मा, सौरभ जोशी, दिव्या गुप्ता, तृप्ती तायडे व शितल श्रोत्रिय तसेच संगीत विभागातील नेहा नेरळकर, सागर नागापुरकर, सुप्रिया खरात, नंदा (बेबी) साळवे यांनी तर नाटिकेतील आकर्षक कलानेपत्थ्य मिनल शिरूडे, प्रीती केळगावकर व मिनल देशमुख यांनी केले.
दिनविशेषानुसार सुयोग्य रांगोळीद्वारे परिसर सुशोभनासाठी अंजली खरपुडे, पुनम अग्रवाल, आरती दिक्षीत, वैशाली देशमुख, संस्कृती अग्रवाल यांनी परिश्रम घेतले. भारतीय संस्कृती दर्शवणारे प्रमुख पाहुण्यांचे स्वागत मिनाक्षी खंडेलवाल व प्राजक्ता फोकणे यांच्या मार्गदर्शनखाली विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाच्या संपन्नतेसाठी विभाग प्रमुख सरिता काळे, स्मिता पाटील, लक्ष्मी दयालानी, उर्मिला करंगुला, सुचिता मुंदडा, नम्रता गील, सीमा धूत, दीपाली मोरे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अविरत परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन खुवी पाटणी, अक्षरा जसोरिया, श्रेया भापकर, यशी झा, उत्कर्ष जाधव, हरिश गुंजलेकर, नुपूर शुक्ला, प्राप्ती पवार, वैष्णवी सुरेका, आर्या भालेराव व वेदश्री खडके यांनी तर आभार प्रदर्शन कस्तुरी काथार, विधी कुटे, दिवीजा शहापुरकर, अक्षरा मुंदडा, भार्गवी पाटील, श्रृती रोटे यांनी शिक्षिका वैशाली खरात यांच्या मार्गदर्शनाखाली केले. संगीत शिक्षक नेहा नेरळकर यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi