Thursday, 26 December 2024

सहकार चळवळ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा

 सहकार चळवळ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा

-         सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

सहकार विभागाच्या कामकाजाचा आढावा

 

मुंबईदि. 26 :- सहकार चळवळ अधिक गतिमान करून या चळवळीत ग्रामीण भागातील शेवटचा घटक सहभागी झाला पाहिजेया दृष्टीने  सहकार विभागाने सुयोग्य नियोजन करावे व त्यानुसर कार्यवाही करावीअशा  सूचना  सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिल्या.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साखर भवन येथे सहकार विभागाची आढावा बैठक झाली. बैठकीस सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरअपर मुख्य सचिव राजगोपाल देवरासहकार आयुक्त दीपक तावरे,अपर आयुक्त श्रीकृष्ण वाडेकरसंतोष पाटील यांच्यासह सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सहकार मंत्री श्री. पाटील म्हणाले की,  राज्याला सहकार चळवळीचा मोठा वारसा आहे. या चळळीत अनेक महनीय व्यक्तींचे योगदान राहिले आहे. या व्यक्तींनी राज्यात सहकार चळवळ रुजवलीवाढवली आहे. सहकार चळवळीमुळे राज्याची प्रगती झाली. सहकारी साखर कारखानेनागरी बँकाविविध कार्यकारी सेवा सोसायट्यापतपुरवठा संस्था यामुळे  शहरी व ग्रामीण अर्थकारणाला गती मिळाली. सहकार चळवळीच्या माध्यमातून  जनसामान्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य येण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करावे. सहकार चळवळीत शेवटचा घटक सामील व्हावाअसे प्रयत्न सहकार विभागाने करावेत.

            मंत्री श्री. पाटील म्हणाले की, सहकरामध्ये चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील. देशात सहकार क्षेत्रात आदर्शवत  काम करून या क्षेत्रात राज्याचे वेगळेपण सिद्ध करून एक वेगळा ठसा उमविण्यासाठी सर्वांनी चांगले काम करावे, असे आवाहन सहकार मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी केले.

आढावा बैठकीत सहकार विभागसाखर आयुक्त कार्यालय आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित पुणे यांच्यामार्फत  राबविण्यात येत असलेल्या विविध योजनाउपक्रम व कामकाजाची माहिती सादर करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi