Tuesday, 24 September 2024

सारथी, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना नोंदणीपासून संपूर्ण अधिछात्रवृत्ती

 सारथीमहाज्योतीच्या विद्यार्थ्यांना नोंदणीपासून संपूर्ण अधिछात्रवृत्ती

 

बार्टी संस्थेतील नियमाप्रमाणेच कायम नोंदणी झालेल्या सारथीच्या 724  व महाज्योतीच्या पात्र विद्यार्थ्यांना शंभर टक्के अधिछात्रवृत्ती देण्यास मान्यता आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या निर्णयानुसार बार्टी संस्थेप्रमाणे सारथी संस्थेकडे 1 एप्रिल ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत  कायम नोंदणी असलेल्या 724 विद्यार्थ्यांना व महाज्योतीच्या पात्र विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून शंभर टक्के अधिछात्रवृत्तीचा लाभ देण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली.


ये 16 मंत्र है जो हर सनातनी को सीखना और बच्चों को सिखाना चाहिए`*

 *`ये 16 मंत्र है जो हर सनातनी को सीखना और बच्चों को सिखाना चाहिए`*


*1. Gayatri Mantra*

            ॐ भूर्भुवः स्वः,

            तत्सवितुर्वरेण्यम् 

            भर्गो देवस्य धीमहि 

            धियो यो नः प्रचोदयात् ॥


*2. Mahadev*

          ॐ त्रम्बकं यजामहे, 

           सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ,

           उर्वारुकमिव बन्धनान्,

           मृत्योर्मुक्षीय मामृतात् !!


*3. Shri Ganesha*

              वक्रतुंड महाकाय, 

              सूर्य कोटि समप्रभ 

              निर्विघ्नम कुरू मे देव,

              सर्वकार्येषु सर्वदा !!


*4. Shri hari Vishnu*

           मङ्गलम् भगवान विष्णुः,

           मङ्गलम् गरुणध्वजः।

           मङ्गलम् पुण्डरी काक्षः,

           मङ्गलाय तनो हरिः॥


*5. Shri Brahma ji*

             ॐ नमस्ते परमं ब्रह्मा,

              नमस्ते परमात्ने ।

              निर्गुणाय नमस्तुभ्यं,

              सदुयाय नमो नम:।।


*6. Shri Krishna*

               वसुदेवसुतं देवं,

               कंसचाणूरमर्दनम्।

               देवकी परमानन्दं,

               कृष्णं वन्दे जगद्गुरुम।


*7. Shri Ram*

              श्री रामाय रामभद्राय,

               रामचन्द्राय वेधसे ।

               रघुनाथाय नाथाय,

               सीताया पतये नमः !


*8. Maa Durga*

            ॐ जयंती मंगला काली,

            भद्रकाली कपालिनी ।

            दुर्गा क्षमा शिवा धात्री,

            स्वाहा स्वधा नमोऽस्तु‍ते।।


*9. Maa Mahalakshmi*

            ॐ सर्वाबाधा विनिर्मुक्तो,

            धन धान्यः सुतान्वितः ।

            मनुष्यो मत्प्रसादेन,

            भविष्यति न संशयःॐ ।


*10. Maa Saraswathi*

            ॐ सरस्वति नमस्तुभ्यं,

             वरदे कामरूपिणि।

             विद्यारम्भं करिष्यामि,

             सिद्धिर्भवतु मे सदा ।।


*11. Maa Mahakali*

             ॐ क्रीं क्रीं क्रीं,

             हलीं ह्रीं खं स्फोटय,

             क्रीं क्रीं क्रीं फट !!


*12. Hanuman ji*

          मनोजवं मारुततुल्यवेगं,

          जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं।

          वातात्मजं वानरयूथमुख्यं,

          श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये॥


*13. Shri Shanidev*

             ॐ नीलांजनसमाभासं,

              रविपुत्रं यमाग्रजम ।

              छायामार्तण्डसम्भूतं, 

              तं नमामि शनैश्चरम्।।


*14. Shri Kartikeya*

        ॐ शारवाना-भावाया नम:,

         ज्ञानशक्तिधरा स्कंदा ,

         वल्लीईकल्याणा सुंदरा।

          देवसेना मन: कांता,

          कार्तिकेया नामोस्तुते।


*15. Kaal Bhairav ji*

          ॐ ह्रीं वां बटुकाये,

          क्षौं क्षौं आपदुद्धाराणाये,

          कुरु कुरु बटुकाये,

          ह्रीं बटुकाये स्वाहा।


*16. Bharat Mata*

     नमस्ते सदा वत्सले मातृभूमे

     त्वया हिन्दुभूमे सुखद् वर्धितोऽहम्

     महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे

     पतत्वेष काथो नमस्ते-नमस्ते।।


*सनातनी परिवार के सभी सदस्य सीखें और बच्चों को भी सिखायें...!!🙏🙏*

Monday, 23 September 2024

बॉयलर इंडिया- 2024 नवी मुंबईत तीन दिवस प्रदर्शन

 बॉयलर इंडिया- 2024

नवी मुंबईत तीन दिवस प्रदर्शन

संचालक धवल अंतापूरकर

 

नवी मुंबई दि. 23 :- उद्योग आणि शासन यांची सांगड घालून बाष्पके उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. बाष्पकांचा सुरक्षित आणि कार्यक्षम वापर कसा करता येईल या उद्देशाने राज्याच्या कामगार विभागाअंतर्गत असलेल्या बाष्पके संचालनालयाच्या वतीने दि. 25, 26 आणि 27 सप्टेंबर 2024 या कालावधीत सिडको प्रदर्शन केंद्रवाशीनवी मुंबई येथे जागतिक स्तरावरील बॉयरल इंडिया 2024 प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बाष्पके संचालनालयाचे संचालक धवल अंतापूरकर यांनी दिली आहे. 

बॉयरल इंडिया 2024 या प्रदर्शनाचे उदघाटन सकाळी 10.30 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते होणार असून या कार्यक्रमास राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच शासकीय अधिकारी आणि उद्योजक उपस्थित राहणार आहेत.

या प्रदर्शनामध्ये बॉयलर  मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंट  सॉफ्टवेअर ( BMMS ) या प्रणालीचे लोकार्पण होणार आहे. BMMS प्रणालीमुळे बाष्पके उद्योगांमध्ये बाष्पक व त्याच्या सुट्या भागाच्या निर्मितीची प्रक्रिया जलदपारदर्शक आणि कार्यक्षम होणार आहे. BMMS सॉफ्टवेअरच्या मदतीने आता उत्पादनातील प्रत्येक टप्प्याचे संपूर्ण दस्तऐवजीकरण एका प्लॅटफॉर्मवर सहजपणे करण्यात येईलज्यामुळे उत्पादक आणि नियामक यांच्यातील समन्वय अधिक चांगला होईल. BMMS सॉफ्टवेअरमुळे बॉयलर निर्मितीच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल आणि संबंधित कागदपत्रांमध्ये सुलभता येईल. हे सॉफ्टवेअर केवळ औद्योगिक कार्यक्षमता वाढवणार नाहीतर कामगारांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी देखील महत्त्वपूर्ण ठरेल.

या प्रदर्शनात बाष्पके (बॉयलर) संबंधीत विविध यंत्रेसाहित्य मांडण्यात येणार आहेत. याशिवाय बाष्पके उद्योगातील नवनवीन तंत्रज्ञानघडामोडी यांची माहिती होण्यासाठी चर्चासत्र व परिसंवादाचे आयोजन तीन दिवस चालणार आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञ यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. हे चर्चासत्र व प्रदर्शन कामगार सुरक्षेला प्रोत्साहन देणारे आहे व बाष्पकांच्या सुरक्षित व कार्यक्षम वापर कसा करावा हे सुनिश्चित करण्यासाठी महत्वाचे व्यासपीठ ठरेल.

या चर्चासत्र व प्रदर्शनीमध्ये उद्योगातील अपघात टाळण्यासाठी सुरक्षा उपायनवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने औद्योगिक कार्यक्षमता वाढवणे आणि पर्यावरणाची हानी कमी करण्यासाठी हरित उपाययोजना यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाईल.हा उपक्रम उद्योगांना सुरक्षितता सुनिश्चित करण्यात आणि कार्यक्षमता वाढवण्यात मदत करेल.

बाष्पकांचा सुरक्षित व कार्यक्षम वापर कसा करावाबाष्पकहीट एक्सचेन्जरप्रेशर व्हेसल्स निर्मितीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान कसे वापरावेबाष्पके (बॉयलर) क्षेत्रात होणारे बदलया क्षेत्रासंबंधीची माहिती प्रदर्शनचर्चासत्र आणि कार्यशाळेच्या माध्यामांतून कौशल्य विकास व रोजगारांची संधी सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरणार आहे. या प्रदर्शनाचा जास्तीत जास्त उद्योजक आणि नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन बाष्पके संचालनालयाचे संचालक श्री. अंतापूरकर यां

सरपंच व उपसरपंचांचे मानधन दुप्पट, ग्रामविकास

 सरपंच व उपसरपंचांचे मानधन दुप्पट

- ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

 

         मुंबई, दि. 23 : सरपंच व उपसरपंच यांचे मानधन दुप्पट केले असूनग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे एकच पद करण्याबाबत आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

            मंत्री श्री.महाजन म्हणाले की, राज्यातील सरपंच व उपसरपंच यांचे मानधन दुप्पट  करण्यात आले असून ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या 2000 पर्यंत आहे त्या सरपंचाचे मानधन रु. 3000 वरुन रु. 6000. तर उपसरंपचाचे मानधन 1000 रुपये वरुन 2000 रुपये करण्यात आले आहे. ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या 2000 ते 8000 पर्यंत आहे त्या सरपंचाचे मानधन रु. 4000 वरुन रु. 8000. तर उपसरपंचाचे मानधन 1500 वरुन रु. 3000 करण्यात आले आहे.ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या 8000 पेक्षा जास्त आहे त्या सरपंचाचे मानधन 5000 रु. वरुन 10,000 रु. तर उपसरपंचाचे मानधन 2000 रुपये वरुन 4000 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.या मानधनवाढीपोटी राज्य शासनावर वार्षिक 116 कोटी रुपयांचा आर्थीक भार येणार आहे.

        मंत्री श्री.महाजन म्हणाले की,राज्यातील कार्यरत ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे एकच पद करण्यास आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामविकास विभागाने राज्यातील ग्रामपंचायतींना 15 लाख रूपयापर्यंतची विकासकामे ग्रामपंचायत एजन्सी म्हणून करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे ज्या ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्न 75 हजार रूपयांपर्यंत आहे त्या ग्रामपंचायतींना 10 लाख रूपयांपर्यंतची. ज्या ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्न 75 हजारापेक्षा जास्त आहे त्या ग्रामपंचायतींना 15 रुपये लाखापर्यंतची कामे ग्रामपंचायत एजन्सी म्हणून करता येतील. या निर्णयाची अंमलबजावणी करताना 10 लाखांच्यावरील कामाकरिता ई-निविदा पध्दतीचा अवलंब करणे अनिवार्य आहे. ग्रामविकास विभागाने ग्रामीण गृहनिर्माण योजनेतील बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत अधिकारीकर्मचारी यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज्यातील घरकुले विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्यस्तरविभागस्तरजिल्हास्तर व तालुकास्तरावरील कार्यरत असणाऱ्या कंत्राटी व बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असणाऱ्या अधिकारीकर्मचारी यांना प्रोत्साहन देण्यासाठी व कामे गतीने पूर्ण करण्यासाठी त्यांच्या मानधनामध्ये 20% वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

            मंत्री श्री.महाजन म्हणाले की,  मागील दोनवर्षामध्ये ग्रामविकास विभागाने 10 लाख घरकुले पूर्ण  केली असून राज्यातील कामाची गती विचारात घेता केंद्र सरकारने देखील या वर्षाकरिता प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये देशामध्ये सर्वात जास्त 6.37 लाखाचे उद्दिष्ट  राज्याला दिले आहे. प्रधानमंत्र्यांनी जी जबाबदारी आमच्यावर दिलेली आहे ती वेळेत आम्ही 100 टक्के पार पाडू. राज्यामध्ये मोदी आवास योजनेअंतर्गत ओबीसी व एसबीसी प्रवर्गासाठी 3 वर्षामध्ये 10 लाख घरकुले आम्ही वेळेत पूर्ण करु. बचतगटासाठी कार्यरत असलेल्या प्रभाग स्तरावरील संसाधन व्यक्तींच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आली असून. प्रभाग स्तरावरील संसाधन व्यक्ती कृषी व्यवस्थापकपशु व्यवस्थापकमत्स्य व्यवस्थापक आणि प्रभाग संघ व्यवस्थापक यांच्या मानधनामध्ये 20% वाढ करण्यात आली आहे. पूर्वी त्यांचे मानधन रु. 7500 ते 11000 होते ते आता 9000 ते 13200 पर्यंत झालेले आहे.

               राज्यामध्ये 6.50 लक्ष बचत गट कार्यरत आहेत. मागील दोन वर्षामध्ये आम्ही 1.25 लक्ष बचतगट नव्याने निर्माण केले आहेत. बचतगटासाठी कार्यरत असलेल्या समाज संसाधन व्यक्ती (CRP) यांच्या मानधनामध्ये आम्ही दुप्पटवाढ (रु. 3000 वरुन रु. 6000) केलेली आहे. बचतगटांच्या फिरता निधी (Revolving Fund) मध्ये आम्ही दुप्पट वाढ (रु. 15,000 वरुन रु. 30,000) केली आहे. यासाठी 913 कोटीं रुपयांचा निधी वितरीत केला आहे. मागील दोन वर्षात बचतगटांना बँकांमार्फत 15 हजार कोटी रुपयांचे कर्ज वितरीत केले आहे. दोन वर्षात राज्यामध्ये 16 लाख लखपती दिदी तयार झाल्या आहेत. महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून विभागीय स्तरावर देखील बचतगटातील उत्पादीत मालाला बाजारपेठ उपलब्ध करुन देत आहोत, असेही मंत्री श्री.महाजन म्हणाले.

           दोन वर्षात ग्रामविकास विभागाने 40 हजार कि.मी.च्या ग्रामीण रस्त्यांच्या कामांना मान्यता दिली असून 10 लाख घरकुले बांधून पूर्ण केली आहेत.दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेअंतर्गत 16 हजार प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले असून त्यापैकी 11 हजारांना नोकरी मिळाली आहे. 4 हजार 500 नवीन ग्रामपंचायत कार्यालय बांधकामांना मान्यता मिळाली आहे. 2515 या लेखाशिर्षाअंतर्गत लोकप्रतिनीधींना सुचविलेल्या ग्रामीण भागातील पायाभुत सुविधांची 7 हजार 100 कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. ग्रामीण तीर्थक्षेत्र व यात्रास्थळांच्या विकासासाठी ब वर्ग स्थळांसाठी रु. 5 कोटी पर्यंतची कामे मंजूर यासाठी रुपये दोन हजार कोटींची तरतूद. निर्मल वारी स्वच्छवारी साठी 77 कोटींची तरतूद करण्यात आली असून, संत सेवालाल महाराज समृध्द तांडा सुधार योजनेसाठी 500 रूपये कोटींची तरतूद. प्रत्येक तांड्याच्या विकासाठी 30 लाख रुपयांची कामे हाती घेणार असून, मागील दोन वर्षामध्ये पंचायत राज यंत्रणेतील 21 लाख पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती मंत्री श्री. महाजन यांनी दिली.

राज्यातील धान उत्पादकांना दिलासा धान भरडाईसाठी अतिरिक्त ४० रुपये दर

 राज्यातील धान उत्पादकांना दिलासा

धान भरडाईसाठी अतिरिक्त ४० रुपये दर

 

मुंबईदि. २३ - पणन हंगाम २०२३-२४ करिता किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत खरेदी केलेल्या धानाच्या भरडाईसाठी भात गिरणी धारकांना राज्य शासनाकडून ४० रुपये प्रति क्विंटल अतिरिक्त भरडाई दर देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

   केंद्र शासनाकडून देण्यात येणाऱ्या १० रुपये प्रति क्विंटल अतिरिक्त दरासोबतच आता राज्याकडून ४० रुपये प्रति क्विंटल अतिरिक्त दर मिळणार आहे. त्यामुळे भात गिरणीधारकांना आता अतिरिक्त ५० रुपये भरडाई दर मिळणार आहे. यासाठी लागणाऱ्या ४६ कोटी ५५ लाख रुपयांच्या खर्चासही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

मंत्रालयातील 'मुख्यमंत्री वॉर रूम' चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

 मंत्रालयातील 'मुख्यमंत्री वॉर रूमचे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

 

मुंबईदि. २३ : मंत्रालयातील सातव्या मजल्यावरील नूतनीकरण केलेल्या मुख्यमंत्री वॉर रूमआणि म्युरल (भित्तीचित्र) चे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रिमोटची कळ दाबून आज करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे,  प्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह, आदी उपस्थित होते.

उद्घाटनानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वॉर रूममधील सोयी सुविधांची माहिती घेतली.  राज्यातील प्रकल्पांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या डॅशबोर्डप्रकल्पाची फाईलची सद्यस्थितीज्या विभागाकडे प्रलंबित आहेत्या विभागाला जाणारी नोटिफिकेशन आदींबाबत माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी घेतली. या सर्व पद्धतीमुळे  प्रकल्पाला गती मिळून विहित कालावधीत प्रकल्प पूर्ण होण्यास मदत होणार आहे.

   राज्यातील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पावर नियंत्रण ठेवून सातत्याने पाठपुरावा ‘मुख्यमंत्री वॉर रूम’ करीत असते. नवीन वॉर रूम अत्यंत प्रशस्त असून आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे.

वॉर रूमची वैशिष्ट्ये :-

* राज्यातील १५ क्षेत्रातील विविध ७४ प्रकल्पांच्या  विविध टप्प्यांवरील कामाचा आढावा. 

* प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अंमलबजावणी यंत्रणानिधी देणारी यंत्रणा यांच्यामधे समन्वय.

* एक्झिक्यूटिव्हसेक्टरल आणि प्रोजेक्ट डॅशबोर्डची निर्मितीया डॅशबोर्डच्या माध्यमातून प्रकल्पाच्या प्रत्येक क्षेत्रातील कामाचे मूल्यमापन.

* प्रकल्पाला गती मिळण्यासाठी त्यामधील प्रश्न सोडविण्याकरिता सबंधित विभागाला नोटिफिकेशन आणि अलर्ट देण्याची सुविधा.

* प्रकल्पामधील अडचणी दूर करण्यासाठी रियल टाईम मॉनिटरिंग'  व्यवस्था.

*  प्रकल्पाच्या प्रगतीमध्ये अडथळा ठरणारे प्रश्न  सोडविण्यासाठी  विभागांमध्ये प्रभावी समन्वय व ट्रॅकिंग यंत्रणेचा विकास.

थोडक्यात वॉर रूम बाबत..

*कॉर्पोरेट क्षेत्रातील कार्यालयासारखी अंतर्गत रचना व रंगसंगती.

*राज्यात सुरु असलेल्या पायाभूत सोयी सुविधांचे प्रतिबिंब दाखविणारे दर्शनी भागात असणारे आकर्षक भित्तीचित्र

*विविध अँगलमधून सादरीकरण बघणे सहज व्हावेयासाठी एलईडी स्क्रीन.

*सध्या सुमारे ७० पायाभूत प्रकल्प डॅशबोर्डवर आहेत.  ज्यांची एकूण किंमत सुमारे 4 लाख कोटी रुपये असून हे प्रकल्प  15 क्षेत्रांमधील आहे.

 *सीएम वॉर रूमला आजपर्यंत विविध प्रकल्पांशी संबंधित सुमारे 350 समस्या प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी 165 समस्यांचे निराकरण करण्यात आले आहे.

*प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी  सुमारे 200 हून अधिक बैठका आयोजित केल्या आहेत.

००००

निलेश तायडे/विसंअ/

 

कुणबीच्या तीन पोट जातींचा इतर मागासवर्ग यादीत समावेश

 कुणबीच्या तीन पोट जातींचा इतर मागासवर्ग यादीत समावेश

राज्य मागासवर्गीय आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार आज मंत्रीमंडळाने तिलोरी कुणबीतिल्लोरी कुणबीति.कुणबी या पोटजातींचा महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्ग यादीतील अ.क्र.83 येथे समावेश करण्यास आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

आयोगाच्या शिफारसीनुसार या पोटजातींचा महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्ग यादीतील अ.क्र.83 येथे कुणबीपोट जाती लेवा कुणबीलेवा पाटीललेवा पाटीदारमराठा कुणबीकुणबी मराठा यांच्यापुढे समावेश होईल.

Featured post

Lakshvedhi