Monday, 23 September 2024

बॉयलर इंडिया- 2024 नवी मुंबईत तीन दिवस प्रदर्शन

 बॉयलर इंडिया- 2024

नवी मुंबईत तीन दिवस प्रदर्शन

संचालक धवल अंतापूरकर

 

नवी मुंबई दि. 23 :- उद्योग आणि शासन यांची सांगड घालून बाष्पके उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. बाष्पकांचा सुरक्षित आणि कार्यक्षम वापर कसा करता येईल या उद्देशाने राज्याच्या कामगार विभागाअंतर्गत असलेल्या बाष्पके संचालनालयाच्या वतीने दि. 25, 26 आणि 27 सप्टेंबर 2024 या कालावधीत सिडको प्रदर्शन केंद्रवाशीनवी मुंबई येथे जागतिक स्तरावरील बॉयरल इंडिया 2024 प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बाष्पके संचालनालयाचे संचालक धवल अंतापूरकर यांनी दिली आहे. 

बॉयरल इंडिया 2024 या प्रदर्शनाचे उदघाटन सकाळी 10.30 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते होणार असून या कार्यक्रमास राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच शासकीय अधिकारी आणि उद्योजक उपस्थित राहणार आहेत.

या प्रदर्शनामध्ये बॉयलर  मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंट  सॉफ्टवेअर ( BMMS ) या प्रणालीचे लोकार्पण होणार आहे. BMMS प्रणालीमुळे बाष्पके उद्योगांमध्ये बाष्पक व त्याच्या सुट्या भागाच्या निर्मितीची प्रक्रिया जलदपारदर्शक आणि कार्यक्षम होणार आहे. BMMS सॉफ्टवेअरच्या मदतीने आता उत्पादनातील प्रत्येक टप्प्याचे संपूर्ण दस्तऐवजीकरण एका प्लॅटफॉर्मवर सहजपणे करण्यात येईलज्यामुळे उत्पादक आणि नियामक यांच्यातील समन्वय अधिक चांगला होईल. BMMS सॉफ्टवेअरमुळे बॉयलर निर्मितीच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल आणि संबंधित कागदपत्रांमध्ये सुलभता येईल. हे सॉफ्टवेअर केवळ औद्योगिक कार्यक्षमता वाढवणार नाहीतर कामगारांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी देखील महत्त्वपूर्ण ठरेल.

या प्रदर्शनात बाष्पके (बॉयलर) संबंधीत विविध यंत्रेसाहित्य मांडण्यात येणार आहेत. याशिवाय बाष्पके उद्योगातील नवनवीन तंत्रज्ञानघडामोडी यांची माहिती होण्यासाठी चर्चासत्र व परिसंवादाचे आयोजन तीन दिवस चालणार आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञ यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. हे चर्चासत्र व प्रदर्शन कामगार सुरक्षेला प्रोत्साहन देणारे आहे व बाष्पकांच्या सुरक्षित व कार्यक्षम वापर कसा करावा हे सुनिश्चित करण्यासाठी महत्वाचे व्यासपीठ ठरेल.

या चर्चासत्र व प्रदर्शनीमध्ये उद्योगातील अपघात टाळण्यासाठी सुरक्षा उपायनवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने औद्योगिक कार्यक्षमता वाढवणे आणि पर्यावरणाची हानी कमी करण्यासाठी हरित उपाययोजना यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाईल.हा उपक्रम उद्योगांना सुरक्षितता सुनिश्चित करण्यात आणि कार्यक्षमता वाढवण्यात मदत करेल.

बाष्पकांचा सुरक्षित व कार्यक्षम वापर कसा करावाबाष्पकहीट एक्सचेन्जरप्रेशर व्हेसल्स निर्मितीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान कसे वापरावेबाष्पके (बॉयलर) क्षेत्रात होणारे बदलया क्षेत्रासंबंधीची माहिती प्रदर्शनचर्चासत्र आणि कार्यशाळेच्या माध्यामांतून कौशल्य विकास व रोजगारांची संधी सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरणार आहे. या प्रदर्शनाचा जास्तीत जास्त उद्योजक आणि नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन बाष्पके संचालनालयाचे संचालक श्री. अंतापूरकर यां

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi