Monday, 23 September 2024

राज्यातील धान उत्पादकांना दिलासा धान भरडाईसाठी अतिरिक्त ४० रुपये दर

 राज्यातील धान उत्पादकांना दिलासा

धान भरडाईसाठी अतिरिक्त ४० रुपये दर

 

मुंबईदि. २३ - पणन हंगाम २०२३-२४ करिता किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत खरेदी केलेल्या धानाच्या भरडाईसाठी भात गिरणी धारकांना राज्य शासनाकडून ४० रुपये प्रति क्विंटल अतिरिक्त भरडाई दर देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

   केंद्र शासनाकडून देण्यात येणाऱ्या १० रुपये प्रति क्विंटल अतिरिक्त दरासोबतच आता राज्याकडून ४० रुपये प्रति क्विंटल अतिरिक्त दर मिळणार आहे. त्यामुळे भात गिरणीधारकांना आता अतिरिक्त ५० रुपये भरडाई दर मिळणार आहे. यासाठी लागणाऱ्या ४६ कोटी ५५ लाख रुपयांच्या खर्चासही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi