सारथी, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना नोंदणीपासून संपूर्ण अधिछात्रवृत्ती
बार्टी संस्थेतील नियमाप्रमाणेच कायम नोंदणी झालेल्या सारथीच्या 724 व महाज्योतीच्या पात्र विद्यार्थ्यांना शंभर टक्के अधिछात्रवृत्ती देण्यास मान्यता आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
या निर्णयानुसार बार्टी संस्थेप्रमाणे सारथी संस्थेकडे 1 एप्रिल ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत कायम नोंदणी असलेल्या 724 विद्यार्थ्यांना व महाज्योतीच्या पात्र विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून शंभर टक्के अधिछात्रवृत्तीचा लाभ देण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली.
No comments:
Post a Comment