Friday, 9 August 2024

मुंबई शहर व उपनगरमधील महाविद्यालयांनी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांच्या अर्जाची प्रक्रिया तातडीने करण्याचे आवाहन

 मुंबई शहर व उपनगरमधील महाविद्यालयांनी

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांच्या अर्जाची प्रक्रिया तातडीने करण्याचे आवाहन

 

            मुंबईदि. ८ : मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांची चालू शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता महाडीबीटी पोर्टलवरून नवीन (fresh) आणि नूतनीकरण (Renewal) च्या अर्जाची ऑनलाईन स्विकृती दि. २५ जुलै २०२४  पासून सुरू करण्यात आली आहे. मुंबई शहर/ उपनगरमधील अधिनस्त सर्व महाविद्यालयांनी लवकरात लवकर नोंदणीकृत झालेल्या अर्जाबाबत पुढील प्रक्रिया करावीअसे आवाहन मुंबई शहर व उपनगर जिल्ह्याचे समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले आहे.

            मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील अधिनस्त सर्व महाविद्यालयांनी लवकरात लवकर नोंदणीकृत झालेले अर्ज ऑनलाईन मंजूर करावेत. दरवर्षी प्रमाणे नोंदणीकृत झालेल्या अर्जापैकी नूतनीकरण अर्जाचे प्रमाण नवीन अर्जाच्या तुलनेत जास्त असते. त्यामुळे सर्व महाविद्यालयांनी आपल्या स्तरावरील नुतनीकरणाचे अर्ज प्रथम प्राधान्याने पडताळणी करुन ऑनलाईन मंजूर करुन संबधित सहायक आयुक्तसमाज कल्याण, ( मुंबई शहर/उपनगर) यांच्या लॉगीनकरिता तात्काळ पाठवावेत. तसेच भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तसेच शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या लाभापासून अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी वंचित राहणार नाहीयांची दक्षता महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी घ्यावीअसे श्री.खैरनार यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

0000

भुसावळ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेच्या कामांना गती द्यावी

 भुसावळ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेच्या कामांना गती द्यावी

-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

            मुंबईदि. ८ :-  अमृत योजनेतून  भुसावळ शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या तांत्रिक बाबी तपासल्या जाव्यात.  या योजनेतून पाणी पुरवठा लवकर  सुरू होण्यासाठी  योजनेच्या कामांना गती द्यावीअशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या.

             उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आमदार संजय सावकारे यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने बैठक झाली.  बैठकीस आमदार श्री. सावकारेऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्लाकामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांच्यासह संबधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीस जिल्हाधिकारी जळगाव दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले,  पाणी पुरवठा योजनाची कामे वेगाने पूर्ण होणे महत्वाचे आहे.  यासाठी संबधित  यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी. भुसावळ शहराला पाणी पुरवठा योजनेसंदर्भात जिल्हाधिकारी जळगाव यांनी बैठकीचे आयोजन करून याबाबत आढावा घ्यावा. बैठकीत वरणगाव पाणी  पुरवठा योजनेबाबातही चर्चा करण्यात आली. संबधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

            जळगाव महानगरपालिका व वरणगाव नगरपंचायत क्षेत्रातील सांडपाण्यावरील प्रक्रिया प्रकल्पाबाबत महाजनकोसमवेत तातडीने सामंजस्य करार करावाअशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिल्या. महाराष्ट्र विद्युत निर्मिती केंद्रातील प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबतही चर्चा यावेळी करण्यात आली

भिल्ल समाजासाठी स्वतंत्र योजना सुरू करण्याचा विचार

 शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून


भिल्ल समाजासाठी स्वतंत्र योजना सुरू करण्याचा विचार


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


 


            मुंबई, दि. ८ :- भिल्ल समाजाची आर्थिक उन्नती व्हावी, यासाठी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून भिल्ल समाजासाठी स्वतंत्र योजना सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने बैठक झाली. बैठकीस आमदार मंगेश चव्हाण, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, अपर आयुक्त सुदर्शन नगरे, निलेश अहिरे यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, भिल्ल समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी पुरेशी आर्थिक तरतूद उपलब्ध करून दिली जाईल. या समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. भिल्ल समाजासाठी घरकुल योजनेचा लक्षांक वाढवून अनुदानामध्ये वाढ करण्याबाबत शासन सकारात्मक आहे.


            भडगाव (जि.जळगाव) येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला असून या प्रस्तावाचा पाठपुरावा करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी बैठकीत दिल्या. तसेच भगवान वीर एकलव्य यांचे मंदिर तसेच पुतळा उभारण्यासाठी परवानगी देण्याची प्रक्रिया सुलभ केली जाईल,असे ते म्हणाले.

राज्यात घरोघरी तिरंगा पोहचवून हे अभियान यशस्वी करावे

 राज्यात घरोघरी तिरंगा पोहचवून हे अभियान यशस्वी करावे

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

घरोघरी तिरंगा अभियानाच्या अंमलबजावणीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

 

            मुंबई दि.८- राज्यात ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा मोहिम राबविण्यात येत आहे. हा आपला राष्ट्रीय सण असून यात सर्वांना सहभागी करुन घ्यावे आणि प्रत्येक घरापर्यंत तिरंगा पोहचवून हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत घरोघरी तिरंगा अभियानाच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.आय. एस. चहलविकास खारगेमहसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरापरिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठीजलसंपदा विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांच्यासह विविध विभागांचे सचिव आणि विभागीय आयुक्तजिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त उपस्थित होते.

            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेकी घरोघरी तिरंगा हे अभियान राष्ट्रभक्ती चेतवणारे अभियान असून या काळात प्रत्येक दिवशी रॅलीसहमॅरेथॉनसांस्कृतिक कार्यक्रमांसह अनेक अभिनव उपक्रमांचे आयोजन केले आहे. या उपक्रमांमुळे सगळीकडे देशभक्तीमय वातावरण तयार होणार आहे. या अभियानात व्यापक जनसहभाग वाढण्यासाठी समाजमाध्यमांसह विविध माध्यमातून जनजागृती करावी. सोबतच घरोघरी राष्ट्रध्वज उपलब्ध करुन द्यावा याकरिता जिल्हास्तरावर नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन द्यावा. राज्यातील प्रमुख धरणांसह मुंबई ट्रान्सहार्बर लिंकवरळी सी लिंकगेटवे ऑफ इंडिया यासारख्या महत्वाच्या ठिकाणी तिरंग्याची रोषणाई करण्यात यावीअशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

            यावेळी मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री.खारगे यांनी घरोघरी तिरंगा अभियानाबाबत सादरीकरण केले.

वाढवण बंदर विकासात मच्छिमार बांधवांच्या हिताचाच विचार

 वाढवण बंदर विकासात मच्छिमार बांधवांच्या हिताचाच विचार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मच्छिमारस्थानिकांच्या मागण्यांबाबत संवादसमन्वयातूनच मार्ग काढणार

 

            मुंबईदि. ८: - वाढवण बंदर विकासात मच्छिमार बांधव आणि स्थानिकांचे हितच पाहिले जाईल. मच्छिमार व्यवसायाचे नुकसानतसेच स्थानिकांच्या मागण्यांबाबत बंदर विकास यंत्रणांनी बैठक घेऊनसंवाद आणि समन्वयातून काम करावेअसे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

            वाढवण बंदर समन्वय समितीच्या शिष्टमंडळासमवेत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली. बैठकीस माजी आमदार कपिल पाटीलमाजी आमदार रविंद्र फाटकमुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहलमुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगेबंदरे व परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजीव सेठीपर्यावरण व वातावरण बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे,  वन विभागाचे सचिव वेणू गोपाल रेड्डीजेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ उपस्थित होते. कोकण विभागीय आयुक्त पी. वेलारासू दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते..

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेवाढवण बंदर महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या उभारणी पासून ते पूर्ण होईपर्यंत स्थानिकांचे आणि मच्छिमार बांधवांचे हितच पाहिले जाईल. यातून कुणाचंही नुकसान होणार नाहीयाची खबरदारी घेतली जाईल. प्रत्येक गोष्टीत सकारात्मक आणि व्यवहार्य असे पर्याय शोधले जातील. बंदर विकासासाठी भूसंपादनअधिग्रहण झाल्यासत्याला विहीतपद्धतीने नुकसान भरपाई मिळेलयाची दक्षता घेतली जाईल. या प्रकल्प उभारणीपूर्वीच जेएनपीए आणि बंदर विभागाने या मच्छिमार बांधवांशी संवाद साधूनत्यांचे म्हणणे जाणून घ्यावे. त्यांच्या शंकांचे समाधान करावे. त्यांच्या व्यवसायाबाबत काही अडचणी असल्यासत्यांना द्यावे लागणारे नुकसान याबाबत सर्वंकष अशी चर्चा करूनत्याबाबतची भरपाई आणि उपाययोजनां पर्याय निश्चित करावेतअसेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            यावेळी जेएनपीएचे अध्यक्ष श्री. वाघ यांनी या बंदरामुळे निर्माण होणाऱ्या रोजगार संधी या स्थानिकांनाच मिळाव्यात यासाठी आतापासूनच प्रयत्न केले जात आहेत. बंदराच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या रोजगारांसाठी त्यासाठी लागणाऱ्या कौशल्याचे प्रशिक्षणाचे तीस कार्यक्रम निश्चित केले गेले आहेत. त्यानुसार पालघर जिल्ह्यातील बंदर परिसरातील तालुक्यांत तरुणांसाठी हे प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याचे नियोजनही करण्यात आले आहे.

            बैठकीत वाढवण बंदर समन्वय समितीच्यावतीने झाईसातपाटीसह विविध गावांतील मच्छिमार बांधवाच्या मागण्यांची माहिती देण्यात आली. या सर्व मागण्यांबाबत समन्वय बैठकांतून सकारात्मक मार्ग काढण्यात येईलअशी चर्चाही यावेळी झाली.

हा प्रकल्प राष्ट्रहिताचा आणि पालघर जिल्ह्यात मोठ्या रोजगार संधी निर्माण करण्यासाठी महत्वाचा असल्याने आता जिल्ह्यातील पंधराहून अधिक मच्छिमार संघटनांनी या प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याची माहितीही या बैठकीत देण्यात आली.

घरोघरी तिरंगा अभियान' आता

'घरोघरी तिरंगा अभियान' आता लोकचळवळ -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घरोघरी तिरंगा अभियानाचा ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदान येथून राज्यस्तरीय शुभारंभ मुंबई, दि. 9 : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणाचे बलिदान दिले. त्यांच्या त्याग आणि बलिदानाची जाणीव ‘घरोघरी तिरंगा अभियान‘ आपल्याला सतत करून देईल. घरोघरी तिरंगा अभियान राष्ट्रप्रेमाची नवी उभारी देईल, कारण आता हे अभियान लोकचळवळ बनले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने ऑगस्ट क्रांती मैदान येथे आज घरोघरी तिरंगा ( हर घर तिरंगा) अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नगरविकास विकास विभागाचे प्रधान सचिव के. गोविंद राज, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी व अतिरिक्त आयुक्त अमित सैनी, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांची यावेळी उपस्थिती होती. मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीत 1942 रोजी याच ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदान येथून चले जाव चा नारा देण्यात आला. त्यानंतर स्वातंत्र्यासाठीचे हे आंदोलन अधिक व्यापक झाले. लाखो जणांनी आपले प्राण या देशासाठी अर्पण केले. या देशप्रेमाची, शहिदांच्या बलिदानाची आठवण आणि शहीद वीरांप्रती कृतज्ञता म्हणून आपण देशभरात आपल्या राष्ट्रध्वजाविषयी नव्या पिढीत आत्मीयता निर्माण करत आहोत. मागील दोन वर्षात राज्यात घरोघरी तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आले. मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, यावर्षीही राज्यातील अडीच कोटी घरावर तिरंगा फडकवला जाणार आहे. देशप्रेमाची भावना त्याद्वारे जागवली जाणार आहे. विविध दुकाने, आस्थापना यांच्यावरही तिरंगा फडकवला जाणार आहे. आपल्या राष्ट्र ध्वजातील तिरंगा रंग केशरी, पांढरा आणि हिरवा हे रंग त्याग, धैर्य, प्रेम, शांतता आणि विश्वासाचे प्रतीक आहेत. नव्या पिढीत हीच प्रेरणा आणि विश्वास निर्माण करण्याचे काम हे अभियान करणार आहे. अधिक उत्साहात आणि जल्लोषात हे अभियान साजरे करून राज्यभरात देशभक्तीचा मळा फुलणार आहे आणि देशप्रेमाचा सुगंध वाहणार आहे. या अभियानात गावागावात, शहरात रॅली, पदयात्रा, तिरंगा सेल्फी, स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार अशा माध्यमातून हे अभियान साजरे करायचे आहे. सर्वांच्या सहकार्यातून हे अभियान यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात विकास आणि कल्याणकारी योजनाच्या माध्यमातून नागरिकांची सेवा करण्याचे काम राज्य शासन करत असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नमूद केले. आपल्या खेळाडूंनी ऑलिम्पिक स्पर्धेत विविध पदक मिळवून तिरंगा फडकवला, याचा अभिमान आपल्या सर्वांना आहे. आपल्या राज्याच्या स्वप्नील कुसाळे यांच्यासह नीरज चोप्रा, मनू भाकर, हॉकी संघाने पदक पटकावले. ही खरोखरच अभिमानाची आणि आनंदाची बाब असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी नमूद केले. प्रास्ताविकात अपर मुख्य सचिव श्री. खारगे म्हणाले की, देशभरात घरोघरी तिरंगा अभियान राबविले जात आहे. राज्यातही मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात हे अभियान साजरे केले जात आहे. या अभियानात मागील दोन वर्षा प्रमाणेच आपले राज्य आघाडीवर राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि इतर मान्यवरांनी हुतात्मा स्मृती स्तंभास अभिवादन केले. कार्यक्रमानंतर पदयात्रा आणि सायक्लाथॉन यात्रेस यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी तिरंगा कॅनव्हास वर स्वाक्षरी केली आणि त्याठिकाणी असलेल्या घरोघरी तिरंगा अभियानाच्या सेल्फी पॉईंटवर सेल्फीही घेतली. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी उपस्थितांना तिरंगा प्रतिज्ञा दिली. या कार्यक्रमास विविध मान्यवरांसह शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 0000

Friday, 2 August 2024

महसूल विभाग गतिमान प्रशासनाचा अग्रणी दूत

 महसूल विभाग गतिमान प्रशासनाचा अग्रणी दूत

- विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

·       मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे महसूल पंधरवड्याचे आयोजन

 

            मुंबईदि. १ : नैसर्गिक आपत्ती असो की निवडणूक प्रत्येक उपक्रमात महसूल विभागाचा सक्रिय सहभाग असतो. महसूल विभाग हा गतिमान प्रशासनाचा अग्रणी दूत आहे. महसूल विभाग अन्य विभागांचा मार्गदर्शक आहेअशा शब्दात विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी महसूल विभागाचा गौरव केला.

            महसूल पंधरवडा व महसूल दिनानिमित्त मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संजय यादवनिवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी आदी उपस्थित होते. विधानसभेचे अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांच्या हस्ते महसूल योजनांची माहिती असलेल्या डिजिटल पत्रिकेचे अनावरण करण्यात आले. यावेळी विविध दाखल्यांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. तसेच ॲड. नार्वेकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या कक्षाचे उदघाटन करण्यात आले.

            ॲड. नार्वेकर म्हणाले कीमहसूल विभागाचा सर्वसामान्य जनतेशी जवळचा संबंध आहे. या विभागाने नागरिकांच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने स्पर्श केला आहे. पोलिसपाटील यांच्यापासून ते जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत सर्वच अधिकारी व कर्मचारी नेहमीच परिश्रमपूर्वक कामकाज करतात. त्यामुळे शासनाच्या विविध योजना यशस्वी होत आहेत. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह अन्य योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावीअसेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले कीमहसूल विभागाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचविल्या जात आहेत. याबाबत जनजागृतीसाठी आराखडा तयार करण्यात आला आहे.

            वैभव पांगम यांनी सूत्रसंचालन केले. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कारभारी यांनी आभार मानले. यावेळी महसूल विभागासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

Featured post

Lakshvedhi