Monday, 29 July 2024

सब ज्योतिर्लिंग के दर्शन किजिये

 


Maa tuzhe salam


 A 3 year old boy at hand and 

a 6 months old foetus in the womb !!!!! Hubby at the front 

and expectant wife manning 

the ordinance !!!!!

What an incredible story !!!!!

What a Lady!!!!

What an Army, Indian Army !!!

Salutes 🫡🫡🫡🫡🫡

Jai Hind  🇮🇳

Jai Hind ki Sena  🇮🇳

Safe Deposit Locker of the year 1840 ... one of Engineering marvel's of our Ancients.

 Safe Deposit Locker of the year 1840 ... one of Engineering marvel's of our Ancients.


*पगार!* 🙏🏻

 *पगार!*  🙏🏻


*'Miss World'* contest मधे  *'हरियाणा' ची डॉ मानुषी छिल्लर* हिने विजेते पद पटकाविले होते.

शेवटच्या निर्णायक राऊंड मधे तिला प्रश्न विचारण्यात आला होता की *सर्वात जास्त पगार* कोणत्या क्षेत्रातील लोकांना मिळाला पाहिजे? तेंव्हा तिचे *'winning' उत्तर* हे होते की *"सर्वात जास्त पगार 'आई'ला मिळाला पाहिजे." आईच्या कामाचे मोल नाही!*

तिच्या या उत्तराने तिने ती *स्पर्धा तर जिंकलीच.* बरोबर *जगात एक नवीन विषय चर्चेला दिला.* 

त्यानंतर फोर्ब्स व्दारे  संचालित वेबसाईट 'Salary.com' वर research सुरू झाला की एक *आई* जेवढं काम करते, त्या कामांसाठी जर वेगवेगळी माणसे ठेवली, तर त्यांना किती पगार द्यावा लागेल? *तेंव्हा सर्व गोष्टी लक्षात घेता, एका आईचा पगार वर्षाला एक लाख पंधरा हजार डॉलर  (१,१५,००० डॉलर) असायला हवा. हा निष्कर्ष निघाला. म्हणजे तिला महिन्याला अंदाजे  ९,५०० डॉलर मिळायला हवा. म्हणजे भारतीय आईला ९,५०० × ७५ = ₹ ७,१२,५०० अंदाजे एवढा पगार मिळाला पाहिजे दरमहा.*

*तिच्या उत्तराने जगात ही  गोष्ट प्रकर्षाने उजागर झाली. जगासमोर भारतीय परिवार व त्यात आईची  भूमिका समोर आली.*   अनंत काळापासून *आई* हेच काम करते आहे रोजच, वर्षानुवर्षे. न  थकता, न थांबता  आनंदाने. कुठेही *उपकाराची भावना* नाही. *अहंपणा* नाही. *कंटाळा* नाही. *ती सुखी घराची किल्ली आहे.*

*एकाच वेळी ती  असंख्य  departments सहज सांभाळते.* सकाळ ते संध्याकाळ असंख्य कामं सहज करते. अगदी काटेकोरपणे बिनबोभाट. ती घरची   *Administrative officer* आहे. वेळ पडली तर *डॉक्टर,  टीचर, सल्लागार* आहे आणि कधी कधी *हिटलरही* होते. जवळ जवळ *सर्वच मंत्रालये*  तिच्याकडे असतात. घराची *गृह मंत्री, वित्त मंत्री* आहे ती. थोडक्यात *घ

Sunday, 28 July 2024

ऐतिहासिक सरस्वती पूजनासाठी विद्यार्थी आणि पालकांनी केली अलोट अशी गर्दी

 ऐतिहासिक सरस्वती पूजनासाठी विद्यार्थी आणि पालकांनी केली अलोट अशी गर्दी


बन्सीलाल नगर येथे आयोजित सरस्वती पूजन व विद्या आरंभ सोहळा करिता संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील जवळपास 25000 विद्यार्थ्यांनी ह्या पवित्र सोहळ्यात आपला सहभाग नोंदविला होता यासाठी आदरणिय गुरुपुत्र व युवा संत नितीनभाऊ मोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले त्यांनी त्यांच्या हितगुजतून सरस्वती पूजन व बालसंस्कार याचे महत्त्व समजाऊन सांगितले तसेच पालकांनी पंचमीला विद्यार्थ्यांच्या जिभेवर दर्भाच्या काडीने मधाने हा सरस्वतीचा बिज मंत्र लिहला तर ते विदयार्थी अभ्यासात अतिशय कुशाग्र होतात व त्यांची वाणी ही शुद्ध होते असे सांगितले या कार्यक्रमासाठी 250 सेवेकर्यांनी आपली सेवा विविध समितीतून केली सर्वासाठी महाप्रसादाचा व्यवस्था करण्यात आली होती या विशेष पूजनासाठी त्रांबकेश्र्वर येथील स्वामी समर्थ गुरुकुल पिठातून श्री दिपक मुळे शास्त्री व त्यांची टीम आली होती त्यांनी अतिशय सोप्या पद्धतीने सर्व पूजन सर्वांकडून करून घेतले कार्यक्रमाला मंत्री श्री अतुल सवे महापौर नंदकुमार घोडेले लायन्स क्लबचे अध्यक्ष राजू बागडे व मराठवाडा विभाग प्रमुख विलासराव देशमुख व फूड अँड ड्रग चे कमिश्नर श्री पाटील साहेब त्यांची उपस्थिती होती.



विद्यार्थी जीवनात शिक्षणास संस्काराची जोड हवी: गुरूपुत्र आदरणीय श्री नितिन भाऊ
छत्रपती संभाजीनगर येथे ऐतिहासिक सामूहिक सरस्वती पूजन सोहळा व विद्यारंभ उत्साहात संपन्न
दिंडोरीप्रणित अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने व गुरुपुत्र आदरणीय श्री नितीन भाऊ मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिनांक 28.07.2024 रोजी संभाजीनगर येथे सरस्वती माता सामूहिक पूजन व विद्यारंभ सोहळा उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी गुरुपुत्र आदरणीय श्री नितीन भाऊ यांचे प्रमुख उपस्थिती होती. या सामूहिक सरस्वती पूजन सोहळ्यात संभाजीनगर व जालना या दोन जिल्ह्यांतील हजारो पालक व पाल्य सहभागी झाले होते. वेद विज्ञान विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या सरस्वती मातेचे सर्वांनी भक्तीभावाने पूजन केले.
गुरूपुत्र आदरणीय श्री नितीन भाऊ यांनी सोहळ्यास उपस्थित सर्व सेवेकरी पालकांना व पाल्यांना प्रबोधनात्मक मार्गदर्शन करताना "विद्यार्थी जीवनात शिक्षण व संस्कार हे दोन्ही महत्वाचे आहेत" असे नमूद केले.
या सोहळ्यासाठी संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील अनेक शाळा, पालक-पाल्य युवक-युवती व सेवेकरी परिवाराची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाकरीता राज्यात सर्वात प्रथम

 मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाकरीता राज्यात सर्वात प्रथम

मुंबई उपनगर जिल्ह्यात दहा उमेदवाराची  निवड

 

            मुंबई दि.२८ :  मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण  योजनेअंतर्गत खाजगी उद्योजकांकडून राज्यात प्रथमच  मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी दहा उमेदवाराची निवड करण्यात आली आहे.

                              

            मुंबई उपनगर जिल्ह्यातील ईबिक्सकॅश ग्लोबल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड (EBIXCASH GLOBAL SERVICES PVT. LTD) या खाजगी आस्थापनेने कस्टमर सर्व्हिस असोसिएट  (Customer Service Associate)  हिंदी आणि इंग्रजी या पदाकरीता  खाजगी आस्थापनेतून महाराष्ट्रातून प्रथमच   दहा प्रशिक्षणार्थी उमेदवारांची निवड करून नियुक्ती दिली आहे.

 

       स्नेहा बिडलांग, प्रविण शिंदेतेजस्वी बनकर, फहाद खान, जितेंद्र यादव, रचना कांबळे, अक्षदा कांबळेसुभाष अवघडे, शिवम पांडे, श्याम शिंदे या उमेदवाराची निवड झालेली आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाकरीता प्रशिक्षणार्थीची निवड करणारी ही महाराष्ट्रातील पहिली खाजगी आस्थापना ठरली आहे. 

     

            या  योजनेत मुंबई उपनगर जिल्ह्यात वीस हजार उमेदवारांचे नियुक्तीचे उद्दिष्ट आहे. प्रशिक्षणार्थी उमेदवारास त्यांच्या शैक्षणिक अर्हता प्रमाणे म्हणजे बारावी पास रू.६०००/-  आयटीआयडिप्लोमा रू,८०००/- आणि पदवीधर इंजीनियरिंग साठी रू.१०,०००/- इतके विद्यावेतन ६ महिन्यांसाठी शासनाकडून मिळणार आहे.

 

             मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीयनिमशासकीय कार्यालयेमहामंडळेमहानगरपालिका तसेच खाजगी आस्थापनाउद्योजकसेवा क्षेत्रातील उद्योजक या योजनेमध्ये सहभागी होणार आहेत. तरी मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व बेरोजगार उमेदवारांनी आपली नोंदणी www. mahaswayam.gov.in या विभागाच्या वेबसाईटवर करून मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त श्री रविंद्र सुरवसे यांनी केले आहे.

पॅरिस ऑलिंपिकमध्ये देशाला कांस्यपदक जिंकून देणाऱ्या नेमबाज मनू भाकर हीचे अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

 पॅरिस ऑलिंपिकमध्ये देशाला कांस्यपदक जिंकून देणाऱ्या नेमबाज

मनू भाकर हीचे अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

            मुंबईदि. 28 :- "फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताची नेमबाज मनू भाकर हीने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल क्रीडा प्रकारात भारताला स्पर्धेतील पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून दिले आहे. मनू भाकर हिने जिंकलेले कांस्यपदक ही देशासाठी चांगली सुरुवात असून या यशाने देशवासीयांच्या आशा अधिक उंचावल्या आहेत. महाराष्ट्रातील जनतेच्या आणि महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने मनू भाकर हीचे  मनःपूर्वक अभिनंदन करतो. येणाऱ्या काळात भारतीय खेळाडू अधिकाधिक पदके जिंकतील आणि त्यात महाराष्ट्राचा वाटा मोठा असेलअसा मला विश्वास आहे.  ऑलिंपिक स्पर्धेत पदक जिंकणारी मनु भाकर ही पहिली महिला नेमबाज ठरली आहेहे सुद्धा या पदकाचे वैशिष्ट्य.. मनू भाकर हिचे पुन:श्च अभिनंदन. भारतीय ऑलिम्पिक पदकाला अधिकाधिक पदके जिंकण्यासाठी  मनापासून शुभेच्छा...," अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी पॅरिस ऑलिंपिकमध्ये देशाला स्पर्धेतील पहिले पदक जिंकून देणाऱ्या कांस्यपदक विजेत्या नेमबाज मनू भाकर हिचे अभिनंदन केले आहे.

00000


Featured post

Lakshvedhi