Thursday, 25 July 2024

मंत्रालयातील नियंत्रण कक्षातून पुण्यासह राज्याच्या विविध भागातील पाऊस-पाणी, पूरस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी खडकवासल्याचे पाणी रात्री सोडण्याऐवजी पहाटे सोडण्याचा निर्णय

 मंत्रालयातील नियंत्रण कक्षातून पुण्यासह राज्याच्या विविध भागातील

पाऊस-पाणीपूरस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा

 

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी खडकवासल्याचे पाणी

रात्री सोडण्याऐवजी पहाटे सोडण्याचा निर्णय

- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

            मुंबईदि. २५ :- खडकवासला धरणाची क्षमता पावणे तीन टीएमसी एवढी आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत पुणे जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे खडकवासला धरण अगोदरच ५० टक्के भरले होते. त्यातच काल दिवसभर आणि रात्री खडकवासला धरणाच्यावरच्या क्षेत्रात ८ इंच आणि पाणलोट क्षेत्रात ५ इंच पाऊस पडला आहे. साधारण ७५ टक्के धरण भरल्यानंतर त्यातून पाणी सोडले जाते. मात्रधरणाच्यावरच्या भागातून तीन टीएमसीपेक्षा जास्त पाणी धरणात आले आहे. त्यामुळे खडकवासल्याच्या बाबतीत पाणी सोडण्याची संधी मिळाली नाही. झोपेत असलेल्या नागरिकांना त्रास होऊ नयेनागरिकांची सोय आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने खडकवासला धरणाचे पाणी रात्री सोडण्याऐवजी पहाटे सोडण्यात आलेअशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

            पुणे शहर आणि जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर  उपमुख्यमंत्री जिल्ह्यात उपस्थित राहून बचाव आणि मदतकार्याचे नेतृत्व करणार आहेत.

            उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले कीपुणे जिल्ह्यातील पुणेपिंपरी-चिंचवड शहर परिसरासह पाऊस जास्त असणाऱ्या भोरवेल्हामुळशी भागातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील वरसगावटेमघरखडकवासलापानशेत या धरणात यापूर्वी पाणी कमी असल्यामुळे शहराला काही काळ पुरेल एवढाच पाणीसाठा होता. त्यामुळे त्यातून पाणी सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. आता या धरण क्षेत्रामध्येही पावसाचे प्रमाण जास्त आहे. त्यातूनही पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करून नागरिकांना सतर्क करण्यात येत आहे. मुळशी परिसरात दरड कोसळली आहेतर काही भागात जीवित हानी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेतअशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

            पूरपरिस्थिती आणि बचावकार्याविषयी माहिती देताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीखडकवासला परिसराबरोबच पुणे परिसरात पावसाचे प्रमाण जास्त होते. पुणे शहर परिसरात डांबरी रस्तेक्राँक्रिटीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. वन विभागाच्या जमिनीटेकड्याशासकीय इमारतींचा परिसर सोडला तर इतर ठिकाणी मोकळ्या जागा कमी आहेत. या पार्श्वभूमीवर दोन-तीन दिवस पाऊस पडत असल्याने जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी झाली होते. शहरातून वाहणाऱ्या नद्यांची पाणी वहन क्षमता ठरलेली आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून नदीकाठावरील काही परिसरातनगररोडएकतानगर यासारख्या सखल भागात पाणी साचले आहे. या भागातील इमारतींमध्येवाहनतळ परिसरातवाहनांमध्ये पाणी शिरले आहे. इमारतीच्या वरच्या भागात नागरीक सुरक्षित आहेतत्यांना खाली येण्याचे आवाहन करून सुरक्षितस्थळी नेण्यात येत आहे.

            सध्या नागरिकांना अडचणीतून बाहेर काढण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असल्याचे सांगताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीपूरपरिस्थितीतून नागरिकांचा बचाव करण्याची कर्यवाही युद्धपातळीवर करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी पूरग्रस्त भागात पोहोचले आहेत. माझ्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेमदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटीलकेंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळआमदार माधुरी मिसाळ यांच्याकडून मदत व बचाव कार्याचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. नागरिकांच्या मदत व पुनर्वसनासाठी सर्व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. त्यांच्याकडून विविध ठिकाणी मदत व बचावकार्य सुरु आहे.

            हवामान खात्याने पुढील पाच दिवसांचे अंदाज वर्तवले आहेत. त्यानुसार काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टतर काहींना यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व यंत्रणा अलर्ट करण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास संबंधित ठिकाणी मदत व बचावकार्यासाठी आवश्यक सामग्री उपलब्ध करण्यात आली आहे. मुंबईतील कुर्ला व घाटकोपरठाणेरायगडपालघररत्नागिरीसिंधुदुर्गसातारासांगली अशा जिल्ह्यांमध्ये एकूण १८ ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकेतसेच ६ राज्य आपत्ती निवारण पथके तैनात करण्यात आली आहेतअशी माहितीही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिली.

००००

 

राज्यातील बालगृहांच्या अडचणीसंदर्भात महिला व बालविकास मंत्री यांनी घेतला आढावा

 राज्यातील बालगृहांच्या अडचणीसंदर्भात

महिला व बालविकास मंत्री यांनी घेतला आढावा

 

            मुंबई, दि.24 : राज्यातील स्वयंसेवी संस्थांतर्फे चालविण्यात येणाऱ्या बालगृहांच्या अडचणीबाबत महिला व बाल विकास मंत्री आदिती  तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली.

यावेळी सुरेखा ठाकरेसंस्थेचे प्रतिनिधी बाबूसिंग जाधवकविता वाघ यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            बैठकीत स्वयंसेवी संस्थांतर्फे चालविण्यात येणाऱ्या बालगृहांच्या प्रतिनिधींनी बालगृहांसंबंधी विविध समस्या मांडल्या. यामध्ये बालगृहातील कर्मचाऱ्यांना मानधन मंजूर करणेबालगृहाच्या इमारतींना बांधकाम व्हॅल्युएशन प्रमाणे इमारत भाडे मंजूर करणेबाल गृहातील प्रवेशितांच्या परिपोषण अनुदान वाढ करणे याबाबत चर्चा झाली.

            ‘मिशन वात्सल्य’च्या धर्तीवर कर्मचारी संख्यावाढ संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईलअसे मंत्री कु.तटकरे यांनी  यावेळी सांगितले.

000

कला का री


 

ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निधनाने पर्यावरणवादी विचारांचा कृतीशील साहित्यिक पडद्याआड

 ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निधनाने

पर्यावरणवादी विचारांचा कृतीशील साहित्यिक पडद्याआड

                                                            - उपमुख्यमंत्री अजित पवार

 

            मुंबईदि. २५ :- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्षज्येष्ठ साहित्यिकसामाजिक कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी मराठी साहित्यसामाजिक आणि पर्यावरण चळवळीत मोलाचे योगदान दिले आहे. भारतीय संस्कृती आणि संत साहित्याचा गाढा अभ्यास असलेल्या ख्रिस्ती धर्मगुरु फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी समाजात एकताबंधुताशांतता,  सामाजिक सलोखा रहावा यासाठी व्याख्यानांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम केले. 'सुवार्तासाप्ताहिकाच्या माध्यमातून पर्यावरणनागरीसामाजिक प्रश्न प्रभावीपणे हाताळले. हरित वसई चळवळीसाठी त्यांनी तळमळीने केलेले काम सदैव लक्षात राहील.  त्यांच्या निधनाने पर्यावरणवादी विचारांचा कृतीशील साहित्यिक आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि अनुयायांच्या दुःखात सहभागी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या कार्याचं स्मरण करीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

सायबर सुरक्षा अधिक भक्कम करण्यावर भर सायबर गुन्हेमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील

 सायबर सुरक्षा अधिक भक्कम करण्यावर भर

सायबर गुन्हेमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील

- मुख्य सचिव सुजाता सौनिक

व्हॉट नाऊ संस्थेच्या हेल्पलाईनचे उद्घाटन

 

            मुंबईदि. 25 : सध्या समाजात डिजीटल साधनांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. मात्रऑनलाईन व्यवहारांच्या माहिती अभावी अनेकांची फसवणूक होण्याच्या घटनाही घडत आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील सायबर सुरक्षा अधिक भक्कम करून सायबर गुन्हेमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. व्हॉट नाऊ’ ही संस्था सायबर जनजागृतीबाबत काम करीत आहे. अशा उपक्रमांना शासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहीलअसे प्रतिपादन राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी  केले.

            यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात महाराष्ट्र युवा सायबर सुरक्षा उपक्रम तसेच ‘व्हॉट नाऊ’ संस्थेच्या 9019115115 या हेल्पलाईनचे उद्घाटन मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. बृहन्मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकरमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे पोलीस महासंचालक बी. के. सिंगमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह, 'व्हॉट नाऊ'च्या फाऊंडर निती गोयलनिवेदिता श्रेयांस आदी यावेळी उपस्थित होते.

महापे येथे सायबर सुरक्षा केंद्राची उभारणी

            सायबर गुन्हे व ऑनलाईन छळवणूकीच्या प्रकारांमुळे युवकांवर विपरीत परिणाम होत असल्याचे सांगत मुख्य सचिव श्रीमती सौनिक म्हणाल्या कीमहाराष्ट्रात सायबर गुन्ह्यांवर प्रतिबंध व उलगड्यासाठी यंत्रणा मजबूत करण्यात येत आहे. महापे येथे सायबर सुरक्षेबाबत केंद्राची उभारणी करण्यात येत आहे. व्हॉट नाऊ संस्थेने हेल्पलाईन क्रमांक जारी करून सर्वांना सायबर सुरक्षा देण्याविषयी पाऊल उचलले आहे. यासोबतच राज्याच्या पोलीस विभागाची सायबर गुन्ह्यांमध्ये मदतीसाठी 1930 क्रमांकाची हेल्पलाईन सुरू आहे.  ऑनलाईन व्यवहार व वर्तनाबाबत फसवणूक  झाल्यास न घाबरता पुढे येवून या हेल्पलाईनवर तक्रार द्यावी. तसेच संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवावीअसे आवाहनही त्यांनी केले. 

            शाळामहाविद्यालयकार्यालयेरहिवासी संकुले यामध्ये सायबर सुरक्षेसाठी युवकांनी जनजागृती करावीअशी सूचना त्यांनी केली. महाराष्ट्र सायबर सेलच्या सहकार्याने सुरू होत असलेल्या 'व्हॉट नाऊचळवळीच्या माध्यमातून  सायबर सुरक्षा अधिक मजबूत होण्यास हातभार लागेलअसा विश्वासही मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनी यावेळी व्यक्त केला.

सायबर गुन्हेमुक्त मुंबई करण्यासाठी मुंबई पोलीस सदैव तत्पर

- पोलिस आयुक्त विवेक फणसळकर

            बृहन्मुंबई पोलीस आयुक्त  फणसाळकर म्हणाले कीसायबर गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी मुंबई पोलीस आपल्या सदैव पाठिशी आहे. मुंबई पोलिस सायबर सुरक्षेसाठी विविध उपक्रम राबवित आहे. युवकांनी समाजमाध्यमे वापरताना अनोळखी व्यक्तींचे कॉलफ्रेंड रिक्वेस्ट यांना प्रतिसाद देवू नये. फसवणुकीची घटना घडल्यास आपल्या पालकांना कल्पना द्यावी. तसेच कुठलीही शंका न बाळगता पोलिसांकडे तक्रार नोंदवावी. अशा प्रकरणांमध्ये पोलिसांच्या 1930 या हेल्पलाईन क्रमांकाची सुद्धा मदत घ्यावी. व्हॉट नाऊ संस्थेच्या माध्यमातून सुरू केलेली मोहीम प्रशंसनीय आहे. युवकांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून सायबर विषयक जनजागृती करावीअसे आवाहन करून मुंबई पोलीस आपल्या सहकार्यासाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

          मुख्यमंत्रीयांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह म्हणाले की,  मोबाईल हे केवळ संपर्काचे साधन राहिलेले नसून आपली ओळख बनले आहे. यामध्ये आर्थिक व्यवहारांची सर्व माहिती संकलित असते. त्यामुळे मोबाईलला हॅक करूनत्यामधील माहिती चोरून आपली फसवणूक होवू शकते. देशात नवीन कायदे लागू झाले असून याबाबत पोलिसांचे प्रशिक्षणही घेण्यात येत आहे. हे कायदे पीडितांना नक्कीच न्याय देणारे आहेत. व्हॉट नाऊ संस्थेने सुरू केलेला हा उपक्रम निश्चितच समाजात सायबर सुरक्षा विषयक साक्षरता निर्माण करणारा ठरणार आहेअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            यावेळी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे पोलीस महासंचालक बी. के. सिंग यांनी सायबर सुरक्षेसाठी जनजागृती आवश्यक असल्याचे सांगत व्हॉट नाऊ संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले. 'व्हॉट नाऊ'च्या संस्थापक निती गोयल व सहसंस्थापक निवेदिता श्रेयांश यांनी संस्थेच्या उपक्रमाबाबत माहिती दिली. ऑनलाईन फसवणूक झाल्यास मदत करणारा हा उपक्रम युवकांना निश्चितच सहाय्यभूत ठरणारा असून युवकांमार्फत युवकांसाठी सुरू झालेली ही चळवळ असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

पुणे शहर व जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला परिस्थितीचा आढावा बचाव आणि मदतकार्यासाठी सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासन आणि आपत्ती निवारण यंत्रणेला निर्देश

    पुणे शहर व जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला परिस्थितीचा आढावा

 

बचाव आणि मदतकार्यासाठी सतर्क राहण्याचे

जिल्हा प्रशासन आणि आपत्ती निवारण यंत्रणेला निर्देश

- उपमुख्यमंत्री अजित पवार

 

            मुंबईदि. २५ :- पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे प्रमुख श्री. सुहास दिवसे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून जिल्ह्यातील पूरपरिस्थिती तसेच बचाव व मदतकार्याच्या तयारीचा आढावा घेतला.

            खडकवासला तसेच जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत असल्याने प्रशासन तसेच आपत्ती निवारण यंत्रणेने सतर्क राहून नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पुणे शहरपिंपरी चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे व आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधण्याचे तसेच महत्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावेअसे आवाहनही श्री.पवार यांनी केले आहे.

CRकृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाची बैठक

 कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली

महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाची बैठक

 

            मुंबई, दि.24 : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची 242 वी बैठक कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली.

            महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावलेमहाव्यवस्थापक सुजित पाटील यांच्यासह महामंडळाचे सदस्य व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी गोवा राज्यात पशुखाद्य आणि भात शेती मध्ये फवारणी साहित्य तसेच शेत उपयोगी औजारे व निविष्ठा यांची आवश्यकता आहे.यामध्ये महामंडळाने पुरवठा केल्यास महामंडळाला सुध्दा गोवा राज्यात व्यवसायाची संधी मिळेल व महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होईल, याबाबत चर्चा करण्यात आली.महामंडळाच्या रिक्त पदाबाबत लोकसेवा आयोगामार्फत कार्यवाही करण्यात यावी.तसेच अनुकंपा तत्त्वावर भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी.महामंडळाच्या कामकाजाच्या अनुषंगाने इतर विषयांचीही चर्चा करण्यात आली.

00000

Featured post

Lakshvedhi