Thursday, 25 July 2024

राज्यातील बालगृहांच्या अडचणीसंदर्भात महिला व बालविकास मंत्री यांनी घेतला आढावा

 राज्यातील बालगृहांच्या अडचणीसंदर्भात

महिला व बालविकास मंत्री यांनी घेतला आढावा

 

            मुंबई, दि.24 : राज्यातील स्वयंसेवी संस्थांतर्फे चालविण्यात येणाऱ्या बालगृहांच्या अडचणीबाबत महिला व बाल विकास मंत्री आदिती  तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली.

यावेळी सुरेखा ठाकरे, संस्थेचे प्रतिनिधी बाबूसिंग जाधव, कविता वाघ यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            बैठकीत स्वयंसेवी संस्थांतर्फे चालविण्यात येणाऱ्या बालगृहांच्या प्रतिनिधींनी बालगृहांसंबंधी विविध समस्या मांडल्या. यामध्ये बालगृहातील कर्मचाऱ्यांना मानधन मंजूर करणे, बालगृहाच्या इमारतींना बांधकाम व्हॅल्युएशन प्रमाणे इमारत भाडे मंजूर करणे, बाल गृहातील प्रवेशितांच्या परिपोषण अनुदान वाढ करणे याबाबत चर्चा झाली.

            ‘मिशन वात्सल्य’च्या धर्तीवर कर्मचारी संख्यावाढ संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री कु.तटकरे यांनी  यावेळी सांगितले.

000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi