Thursday, 25 July 2024

कृषी विषयक योजनांबाबत डॉ. अशोककुमार पिसाळ यांची 'दिलखुलास' कार्यक्रमात मुलाखत

 कृषी विषयक योजनांबाबत डॉ. अशोककुमार पिसाळ यांची

 'दिलखुलासकार्यक्रमात मुलाखत

 

            मुंबईदि. 24: खरीप हंगामातील पीक पेरणीचे नियोजन व कृषी विषयक विविध योजनांबाबत राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत असणाऱ्या कोल्हापूर येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ.अशोककुमार पिसाळ यांनी 'दिलखुलासकार्यक्रमात शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती दिली असून शाश्वत शेतीबद्दलही मार्गदर्शन केले आहे.

            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ कार्यक्रमातील या मुलाखतीत डॉ. पिसाळ यांनी खरीप हंगामातील शेतीची कामेपीक पेरणीचे नियोजननैसर्गिकसेंद्रियशाश्वत शेतीतृणधान्ये उत्पादनकृषी विषयक तंत्रज्ञान व संशोधन तसेच पीक विमा योजनेसह कृषी विभागाच्या अन्य विविध योजनांबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत गुरुवार दि. 25शुक्रवार दि.26शनिवार दि.27सोमवार दि.29मंगळवार दि.30 जुलै 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरुन व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲप वर प्रसारित होणार आहे. कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

----00000 ---

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर

 मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा

सुधारित कार्यक्रम जाहीर

 

            मुंबईदि. २४ : महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी राज्यातील मतदार याद्या अद्ययावतीकरणाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. भारत निवडणूक आयोगाने १ जुलै २०२४ रोजीच्या अर्हता दिनांकाच्या आधारे मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे (दुसरा) वेळापत्रक निश्चित केले आहे. त्यात आता सुधारणा करण्यात आली आहेअशी माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.

            18 व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका यशस्विरित्या पार पडल्यानंतरभारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.  त्यासाठी राज्यांमधील मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम घोषीत केलेला आहे. भारत निवडणूक आयोगाने त्यांचे दि. 20 जून2024 रोजीचे पत्रान्वये दि.1.7.2024 या अर्हता दिनांकाच्या आधारावर राज्यात मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा) बाबतचे वेळापत्रक निश्चित केले होते.

            मात्रभारत निवडणूक आयोगाने  आज दि. २४ जुलै २०२४ रोजीच्या पत्रान्वये या कार्यक्रमाच्या वेळापत्रकात बदल केला असूनसुधारीत कार्यक्रम जाहीर केला आहेतो असा : मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारा प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणीमतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरणमतदार यादी/ मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करणे इ.आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे तसेचअस्पष्ट/ अंधूक छायाचित्र बदलून त्याऐवजी संबंधित मतदाराकडून योग्य दर्जाचे छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे,  विभाग / भागांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करून मतदान केंद्राच्या सीमांची पुनर्रचना तयार करून मतदान केंद्राच्या यादीस मान्यता घेणे आणि तुलनात्मक फरक शोधून फरक दूर करण्यासाठी कालबध्द योजना आखणे,  कंट्रोल टेबल अद्ययावत करणेनमुना १-८ तयार करणे०१ जुलै२०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत पुरवणी व एकत्रीत प्रारूप यादी तयार करणे - २५ जून ते १ ऑगस्ट २०२४.

            एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणे- २ ऑगस्ट २०२४. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी- २ ते १६ ऑगस्ट २०२४.

            विशेष मोहिमांचा कालावधी- दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत सर्व शनिवार व रविवार. दावे व हरकती निकालात काढणेअंतिम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी मागणे,  डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई- २६ ऑगस्ट २०२४ पर्यंत मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणे- २७ ऑगस्ट २०२४.

राज्यातील मत्स्य व्यवसायाला बळ देणार

 राज्यातील मत्स्य व्यवसायाला बळ देणार

- मंत्री सुधीर मुनगंटीवार

            मुंबईदि. २४:  राज्याला ७२०  किलोमीटर लांबीचा सागरी किनारा असून सात सागरी जिल्ह्यांचा समावेश यात आहेमत्स्यव्यवसाय हा राज्यात रोजगार निर्मितीस अनुकूल व अत्यंत महत्वाचा विषय आहे. यासाठी मत्स्य व्यवसायाला मत्स्य शेतीचा दर्जा देण्यापासूनया विभागासाठी खास धोरण समिती गठित करण्यासारखे विविध महत्वाचे निर्णय या सरकारने घेतले आहेत. यामागे केवळ राज्यातील मत्स्य व्यवसायाला बळ देणे आणि संपूर्ण देशात महाराष्ट्राचे मत्स्यधोरण अव्वल असावे हीच भूमिका असल्याचे प्रतिपादन राज्याचे मत्स्य व्यवसायवने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

            मंगळवारी (दि. २३ जुलै २०२४) सायंकाळी सह्याद्री राज्य अतिथीगृहात राज्याच्या मत्स्यव्यवसाय धोरण समितीची पहिली बैठक झालीत्यावेळी ते बोलत होते. धोरण समितीचे अध्यक्ष राम नाईक उपस्थित होते.

            राज्याच्या मत्स्य व्यवसाय क्षमतेच्या केवळ १५ टक्के क्षमतेचाच आज वापर होत असूनक्षमतेचा पूर्ण वापर झाला तर राज्य या क्षेत्रात देशात अव्वल ठरेलअसा विश्वास व्यक्त करत मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले कीही क्षमता पूर्ण वापरण्याकरता राज्याचे सर्वंकष मत्स्यव्यवसाय धोरण असणे आवश्यक आहे.

            गोड्या पाण्यातील मासेमारीभूजल मत्स्यमालन हे मत्स्यव्यवसाय मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करू शकतात. तसेच समाजातील मोठ्या घटकांना अन्न पुरवठा करू शकतात. त्यामुळेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने गोड्या पाण्यातील मासेमारीकरता विविध योजना जाहीर केल्या आहेत. या योजनांचा संपूर्ण लाभ राज्याला घ्यायचा असेल, तर राज्याचे मत्स्यव्यवसाय धोरण लवकरात लवकर तयार केले पाहिजेअसेही मंत्री श्री मुनगंटीवार यांनी सांगितले. या विषयात जेथे अडचणी येतील तेथे केंद्र सरकारच्या मत्स्योद्योग विभागाची मदत घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

            सागरी किनारपट्टी वरील इतर राज्यांच्या मत्स्य व्यवसाय विषयक धोरणांचा तसेच इतर राज्यांच्या गोड्या पाण्यातील मासेमारी व भूजल मत्स्यपालन विषयक धोरणांचाही राज्याच्या मत्स्यव्यवसाय धोरण समितीने तौलनिक अभ्यास करावा आणि राज्याचे मत्स्य धोरण लवकरात लवकर तयार करावेअशी सूचनाही श्री.  मुनगंटीवार यांनी यावेळी केली.

            समितीचे अध्यक्ष श्री. नाईक म्हणाले कीराज्याचे नवीन मत्स्यव्यवसाय धोरण हे सर्वसमावेशक आणि सर्वंकष होईल. राज्यातील कुठल्याच भागावर आणि मत्स्य व्यवसायाशी संबंधित कुणावरही अन्याय होणार नाहीयाची काळजी आपली समिती घेईल. त्यासाठी या समितीच्या दर आठवड्याला बैठका घेऊन लवकरात लवकर धोरणाचा मसुदा तयार करून शासनाला सादर केला जाईल. केवळ आमदारनेते आणि मच्छिमार संस्थाच नव्हे, तर जनसामान्यांकडूनही धोरणविषयक सूचनांचे स्वागत आहेअसे सांगून श्री. नाईक यांनी समितीला आपल्या सूचना लेखी पाठविण्याचे आवाहन यावेळी केले.

            मत्स्यव्यवसाय धोरण समितीच्या या बैठकीत विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरमंत्री सर्वश्री उदय सामंत,  दीपक केसरकरआमदार सर्वश्री महेश बालदीप्रशांत ठाकूरनितेश राणेआशिष जयस्वालरमेश पाटील,  प्रवीण दटके,  राजन साळवीराजेश पाटीलभारती लव्हेकरश्रीमती मनीषा चौधरी,  गीता जैन यांच्यासह मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणेमत्स्यव्यवसाय विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पंकजकुमार,  कांदळवन महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी व मत्स्यव्यवसाय विभागाचे सर्व वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            या बैठकीत सर्व आमदारांनी व मच्छिमार प्रतिनिधींनी मच्छिमारांच्या विविध समस्या मांडल्या तसेच पायाभूत सुविधांविषयीच्या विविध मागण्या मांडल्या. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. संभाव्य धोरणात या सर्व बाबींचा साकल्याने विचार करून योग्य धोरण आखूअसे या चर्चेअंती समितीचे अध्यक्ष राम नाईक यांनी सांगितले.

सायबर गुन्हेमुक्त मुंबई करण्यासाठी मुंबई पोलीस सदैव तत्पर

 सायबर गुन्हेमुक्त मुंबई करण्यासाठी मुंबई पोलीस सदैव तत्पर

- पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर

            बृहन्मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर म्हणाले कीसायबर गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी मुंबई पोलीस आपल्या सदैव पाठिशी आहे. मुंबई पोलिस सायबर सुरक्षेसाठी विविध उपक्रम राबवित आहे. युवकांनी समाजमाध्यमे वापरताना अनोळखी व्यक्तींचे कॉलफ्रेंड रिक्वेस्ट यांना प्रतिसाद देवू नये. फसवणुकीची घटना घडल्यास आपल्या पालकांना कल्पना द्यावी. तसेच कुठलीही शंका न बाळगता पोलिसांकडे तक्रार नोंदवावी. अशा प्रकरणांमध्ये पोलिसांच्या 1930 या हेल्पलाईन क्रमांकाची सुद्धा मदत घ्यावी. व्हॉट नाऊ संस्थेच्या माध्यमातून सुरू केलेली मोहीम प्रशंसनीय आहे. युवकांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून सायबर विषयक जनजागृती करावीअसे आवाहन करून मुंबई पोलिस आपल्या सहकार्यासाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

          मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह म्हणाले की,  मोबाईल हे केवळ संपर्काचे साधन राहिलेले नसून आपली ओळख बनले आहे. यामध्ये आर्थिक व्यवहारांची सर्व माहिती संकलित असते. त्यामुळे मोबाईलला हॅक करूनत्यामधील माहिती चोरून आपली फसवणूक होवू शकते. देशात नवीन कायदे लागू झाले असून याबाबत पोलिसांचे प्रशिक्षणही घेण्यात येत आहे. हे कायदे पीडितांना नक्कीच न्याय देणारे आहेत. व्हॉट नाऊ संस्थेने सुरू केलेला हा उपक्रम निश्चितच समाजात सायबर सुरक्षा विषयक साक्षरता निर्माण करणारा ठरणार आहेअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            यावेळी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे पोलीस महासंचालक बी. के. सिंग यांनी सायबर सुरक्षेसाठी जनजागृती आवश्यक असल्याचे सांगत व्हॉट नाऊ संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले. 'व्हॉट नाऊ'च्या संस्थापक निती गोयल व सहसंस्थापक निवेदिता श्रेयांश यांनी संस्थेच्या उपक्रमाबाबत माहिती दिली. ऑनलाईन फसवणूक झाल्यास मदत करणारा हा उपक्रम युवकांना निश्चितच सहाय्यभूत ठरणारा असून युवकांमार्फत युवकांसाठी सुरू झालेली ही चळवळ असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

सायबर सुरक्षा अधिक भक्कम करण्यावर भर सायबर गुन्हेमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील

 सायबर सुरक्षा अधिक भक्कम करण्यावर भर

सायबर गुन्हेमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील

- मुख्य सचिव सुजाता सौनिक

व्हॉट नाऊ संस्थेच्या हेल्पलाईनचे उद्घाटन

 

            मुंबईदि. 24 : सध्या समाजात डिजीटल साधनांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. मात्रऑनलाईन व्यवहारांच्या माहिती अभावी अनेकांची फसवणूक होण्याच्या घटनाही घडत आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील सायबर सुरक्षा अधिक भक्कम करून सायबर गुन्हेमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. व्हॉट नाऊ’ ही संस्था सायबर जनजागृतीबाबत काम करीत आहे. अशा उपक्रमांना शासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहीलअसे प्रतिपादन राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज केले.

            यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात महाराष्ट्र युवा सायबर सुरक्षा उपक्रम तसेच ‘व्हॉट नाऊ’ संस्थेच्या 9019115115 या हेल्पलाईनचे उद्घाटन मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांच्या हस्ते करण्यात आले. बृहन्मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकरमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे पोलीस महासंचालक बी. के. सिंगमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह, 'व्हॉट नाऊ'च्या फाऊंडर निती गोयलनिवेदिता श्रेयांस आदी यावेळी उपस्थित होते.

महापे येथे सायबर सुरक्षा केंद्राची उभारणी

            सायबर गुन्हे व ऑनलाईन छळवणूकीच्या प्रकारांमुळे युवकांवर विपरीत परिणाम होत असल्याचे सांगत मुख्य सचिव श्रीमती सौनिक म्हणाल्यामहाराष्ट्रात सायबर गुन्ह्यांवर प्रतिबंध व उलगड्यासाठी यंत्रणा मजबूत करण्यात येत आहे. महापे येथे सायबर सुरक्षेबाबत केंद्राची उभारणी करण्यात येत आहे. व्हॉट नाऊ संस्थेने हेल्पलाईन क्रमांक जारी करून सर्वांना सायबर सुरक्षा देण्याविषयी पाऊल उचलले आहे. यासोबतच राज्याच्या पोलीस विभागाची सायबर गुन्ह्यांमध्ये मदतीसाठी 1930 क्रमांकाची हेल्पलाईन सुरू आहे.  ऑनलाईन व्यवहार व वर्तनाबाबत फसवणूक  झाल्यास न घाबरता पुढे येवून या हेल्पलाईनवर तक्रार द्यावी. तसेच संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवावीअसे आवाहनही त्यांनी केले. 

            शाळामहाविद्यालयकार्यालयेरहिवासी संकुले यामध्ये सायबर सुरक्षेसाठी युवकांनी जनजागृती करावीअशी सूचना त्यांनी केली. महाराष्ट्र सायबर सेलच्या सहकार्याने सुरू होत असलेल्या 'व्हॉट नाऊचळवळीच्या माध्यमातून  सायबर सुरक्षा अधिक मजबूत होण्यास हातभार लागेलअसा विश्वासही मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनी यावेळी व्यक्त केला.

Janam समजा करो


 

कृषी विषयक योजनांबाबत डॉ. अशोककुमार पिसाळ यांची 'दिलखुलास' कार्यक्रमात मुलाखत

 कृषी विषयक योजनांबाबत डॉ. अशोककुमार पिसाळ यांची

 'दिलखुलासकार्यक्रमात मुलाखत

 

            मुंबईदि. 24: खरीप हंगामातील पीक पेरणीचे नियोजन व कृषी विषयक विविध योजनांबाबत राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत असणाऱ्या कोल्हापूर येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ.अशोककुमार पिसाळ यांनी 'दिलखुलासकार्यक्रमात शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती दिली असून शाश्वत शेतीबद्दलही मार्गदर्शन केले आहे.

            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ कार्यक्रमातील या मुलाखतीत डॉ. पिसाळ यांनी खरीप हंगामातील शेतीची कामेपीक पेरणीचे नियोजननैसर्गिकसेंद्रियशाश्वत शेतीतृणधान्ये उत्पादनकृषी विषयक तंत्रज्ञान व संशोधन तसेच पीक विमा योजनेसह कृषी विभागाच्या अन्य विविध योजनांबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत गुरुवार दि. 25शुक्रवार दि.26शनिवार दि.27सोमवार दि.29मंगळवार दि.30 जुलै 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरुन व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲप वर प्रसारित होणार आहे. कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

----00000 ---

Featured post

Lakshvedhi