Thursday, 25 July 2024

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर

 मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा

सुधारित कार्यक्रम जाहीर

 

            मुंबईदि. २४ : महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी राज्यातील मतदार याद्या अद्ययावतीकरणाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. भारत निवडणूक आयोगाने १ जुलै २०२४ रोजीच्या अर्हता दिनांकाच्या आधारे मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे (दुसरा) वेळापत्रक निश्चित केले आहे. त्यात आता सुधारणा करण्यात आली आहेअशी माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.

            18 व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका यशस्विरित्या पार पडल्यानंतरभारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.  त्यासाठी राज्यांमधील मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम घोषीत केलेला आहे. भारत निवडणूक आयोगाने त्यांचे दि. 20 जून2024 रोजीचे पत्रान्वये दि.1.7.2024 या अर्हता दिनांकाच्या आधारावर राज्यात मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा) बाबतचे वेळापत्रक निश्चित केले होते.

            मात्रभारत निवडणूक आयोगाने  आज दि. २४ जुलै २०२४ रोजीच्या पत्रान्वये या कार्यक्रमाच्या वेळापत्रकात बदल केला असूनसुधारीत कार्यक्रम जाहीर केला आहेतो असा : मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारा प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणीमतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरणमतदार यादी/ मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करणे इ.आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे तसेचअस्पष्ट/ अंधूक छायाचित्र बदलून त्याऐवजी संबंधित मतदाराकडून योग्य दर्जाचे छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे,  विभाग / भागांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करून मतदान केंद्राच्या सीमांची पुनर्रचना तयार करून मतदान केंद्राच्या यादीस मान्यता घेणे आणि तुलनात्मक फरक शोधून फरक दूर करण्यासाठी कालबध्द योजना आखणे,  कंट्रोल टेबल अद्ययावत करणेनमुना १-८ तयार करणे०१ जुलै२०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत पुरवणी व एकत्रीत प्रारूप यादी तयार करणे - २५ जून ते १ ऑगस्ट २०२४.

            एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणे- २ ऑगस्ट २०२४. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी- २ ते १६ ऑगस्ट २०२४.

            विशेष मोहिमांचा कालावधी- दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत सर्व शनिवार व रविवार. दावे व हरकती निकालात काढणेअंतिम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी मागणे,  डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई- २६ ऑगस्ट २०२४ पर्यंत मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणे- २७ ऑगस्ट २०२४.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi