Wednesday, 24 July 2024

आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तकांना अपघाती मृत्यूसाठी दहा लाख, अपंगत्वासाठी पाच लाख रूपये सानुग्रह अनुदान -

 आशा स्वयंसेविकागट प्रवर्तकांना अपघाती मृत्यूसाठी दहा लाख,

अपंगत्वासाठी पाच लाख रूपये सानुग्रह अनुदान

-       सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

 

            मुंबईदि. 23 :   राज्यात गावपातळीवर शासकीय योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी आशा स्वयंसेविकाअंगणवाडी सेविकागट प्रवर्तक यांच्यावर असते. या घटकांना आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सानुग्रह अनुदान देवून मदत देण्याचा शासनाचा मानस होता. राज्यातील आशा स्वयंसेविकाअंगणवाडी सेविकामदतनीसगटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख आणि अपंगत्वासाठी पाच लाख रुपये अनुदान देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहेअशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिली. 

            आशा स्वयंसेविकागट प्रवर्तकअंगणवाडी सेविकामदतनीस यांना सानुग्रह अनुदानासाठी प्रति वर्षी अंदाजे 1 कोटी 5 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला. हा निर्णय 1 एप्रिल 2024 पासून लागू करण्यात येणार आहे.   सध्या 75 हजार 578 अशा स्वयंसेविका आणि 3622 गटप्रवर्तक कार्यरत असून त्या आरोग्यासंदर्भात महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळतात.  हे करताना अपघाती मृत्यू आल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्यांना आर्थिक सहाय्य व्हावेयासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

आधी वंदू तुज मोरया


 

महसूल कर्मचाऱ्यांचा संप मागे

 महसूल कर्मचाऱ्यांचा संप मागे

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बैठकीनंतर महसूल संघटनेचा निर्णय

 

            मुंबई, दि.२३ : महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचा संप आज महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीनंतर मागे घेण्यात आला. यावेळी मंत्री श्री. विखे पाटील यांनी संप मागे घेण्याचे आवाहन करून वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीद्वारे तोडगा काढण्याचे निर्देश दिले. यामुळे महसूल संघटनांनी मंत्री श्री. विखे पाटील यांचे आभार मानले.

            महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महसूल मंत्री श्री. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीला अपर मुख्य सचिव राजेश कुमार, महाराष्ट्र राज्य महसूल संघटनेचे अध्यक्ष जीवन आहेरराज्य महसूल संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकरमुंबई उपनगर जिल्हा महसूल संघटनेचे अध्यक्ष अविनाश सांगाडे आणि इतर सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी सर्वच जिल्ह्यातील  १५ जुलैपासून हे कर्मचारी बेमुदत संपावर गेले होते. मंत्री श्री. विखे-पाटील यांनी महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या असून इतर मागण्यांसाठी शासन सकारात्मक असून लवकरच शासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यावर या मागण्या मान्य केल्या जातील, असे आश्वासन दिले. त्यानंतर संप मागे घेतल्याचे महसूल संघटनांनी जाहीर केले.

0000


 

 

वृत्त क्र. ९३५


न्हावा-शेवा पाणीपुरवठा योजनेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची प्रलंबित वर्गणी ईपीएफमध्ये जमा करणार

 न्हावा-शेवा पाणीपुरवठा योजनेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची

 प्रलंबित वर्गणी ईपीएफमध्ये जमा करणार

--मंत्री गुलाबराव पाटील

 

            मुंबईदि.२५ :- न्हावा-शेवा पाणीपुरवठा योजना टप्पा एक अंतर्गत कार्यरत कंत्राटी कामगारांच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची (ईपीएफ) २००९ ते २०१८ पर्यंतच्या प्रलंबित वर्गणी शासनाकडून जमा करण्यात येणार आहे. यासाठी ६९ लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

            मजीप्रा अंतर्गत विविध विषयांबाबत मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी आमदार महेश बालदीपाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेमजीप्राचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णाविविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते

            पाणीपुरवठा मंत्री श्री. पाटील म्हणाले कीईपीएफ ऑर्गनायझेशन कडून प्रलंबित वर्गणी जमा होण्यातील त्रुटी दूर करण्यासाठी ईपीएफओकडे पाठपुरावा सुरू असून आवश्यकता भासल्यास कामगार सचिव यांच्यामार्फत कार्यवाही करण्यात येईल. न्हावा शेवा पाणीपुरवठा प्रकल्पातील कंत्राटी कामगारांच्या ईपीएफसाठी व विविध मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांकडून उपोषण केले होते. तसेच आमदार श्री. बालदी यांच्यासह विविध संघटनांनी मागणी केली होती.

०००००

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमधील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका

 महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमधील कर्मचाऱ्यांच्या

प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका

- मंत्री गुलाबराव पाटील

 

            मुंबईदि.२३ :- महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) मधील कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून  सकारात्मक भूमिका  घेतली असून कालबद्ध पदोन्नतीबोनसप्रलंबित फरक या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक घेऊन पाठपुरावा करू व या प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

            ‘मजीप्रा’ अंतर्गत विविध विषयांबाबत मंत्री श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

            यावेळी आमदार महेश बालदीपाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे  प्रधान सचिव संजय खंदारेमजीप्राचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णाविविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

            मंत्री श्री. पाटील म्हणाले कीसेवेत असताना मृत्यू झाल्याने ४६० कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यास अनुकंपा पद्धतीने नियुक्ती देण्यात आली आहे.  यापूर्वी कंत्राटी कर्मचाऱ्याच्या ३५०० रूपये वेतनवाढ दिली आहे.

            यावेळी मजीप्रा संचालक मंडळाची बैठक होऊन विविध योजनांतील कामांचा आढावा घेण्यात आला. कर्मचारी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी अनुकंपाबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत मंत्री श्री.पाटील यांचे आभार मानले.

००००

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीसाठी ग्रामस्तरीय, तालुकास्तरीय समित्या तातडीने गठीत कराव्यात

 मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीसाठी

ग्रामस्तरीय, तालुकास्तरीय समित्या तातडीने गठीत कराव्यात

महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

 

            मुंबईदि. 23 : ‘मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गाव पातळीवरील ग्रामस्तरीयतालुकापातळीवर तालुकास्तरीय समिती आणि  महानगरपालिका क्षेत्रासाठी वॉर्ड स्तरीय समिती तातडीने गठीत करावीअसे निर्देश महिला व बाल विकास मंत्री यांनी आदिती तटकरे यांनी दिले.

            मंत्रालयात ‘मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण’ योजनेचा आढावा मंत्री कु. तटकरे यांनी घेतला.या बैठकीला महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादवमहिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरेमुंबई शहरअकोलाधाराशिव,हिंगोली,वर्धा जिल्हाधिकारी (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे)मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ.सुधाकर शिंदे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की,  राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी व कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी 'मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीणयोजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीला अधिक गती देण्यासाठी आणि या समित्या तातडीने गठित करव्यात. असे सांगून राज्यातील या योजनेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाईन अर्जांची सद्य: स्थिती याबद्दल  त्यांनी माहिती घेतली.

0000

तरुणांच्या आकांक्षांना बळ देणारा अर्थसंकल्प

 तरुणांच्या आकांक्षांना बळ देणारा अर्थसंकल्प

                                               - मंत्री मंगल प्रभात लोढा

 

            मुंबईदि.२३  : प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्प आज सादर केला.  हा अर्थसंकल्प देशाला विकसित भारताच्या ध्येयाकडे घेऊन जाईल. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून युवामहिलाशेतकरी आणि गरीब सक्षम होतील. या अर्थसंकल्पात कौशल्य विकास आणि रोजगाराच्या दृष्टीने जाहीर केलेल्या योजना तरुणांच्या आकांक्षाना बळ देतील, अशी प्रतिक्रिया कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केली आहे. 

            मंत्री श्री. लोढा म्हणाले की, "केंद्र सरकारने रोजगार निर्मिती आणि कौशल्य विकासासाठी विशेष तरतूद केली आहे. प्रधानमंत्री पॅकेज अंतर्गत 'रोजगार संबंधित प्रोत्साहनया योजनेत तीन प्रमुख योजना जाहीर करण्यात आल्या असूनरोजगारकौशल्यएमएसएमई आणि मध्यमवर्गावर लक्ष केंद्रीत करत सरकारने पाच वर्षांच्या कालावधीसाठी दोन लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या काळात चार कोटींहून अधिक तरुणांना रोजगारकौशल्य आणि इतर संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हा अर्थसंकल्प भारतातील सर्व वर्गांना विशेषतः तरुण पिढीला विकसित बनवणारा अर्थसंकल्प आहे. या महत्त्वकांक्षी अर्थसंकल्पासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे आभार मानतो, अशा शब्दात मंत्री श्री.लोढा यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

            "देशातील २० लाख तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ही अतिशय महत्वाची गोष्ट असूनत्यासाठी कौशल्य प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण करण्यावर देखील भर देण्यात येणार आहे. कालानुरूप आवश्यक नवे कौशल्य अभ्यासक्रम सुद्धा सुरु करण्यात येणार आहेत. विकसित भारताच्या ध्येयाकडे वाटचाल करताना महाराष्ट्र देखील आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची निर्मिती करूनलाखो युवकांना प्रशिक्षण देण्यास सज्ज आहोत. पुढील पाच वर्षात एक कोटी तरुणांना देशातील नामांकित कंपन्यांमध्ये कौशल्य शिक्षण दिले जाणार आहेदरमहा ५ हजार रुपये इंटर्नशिप भत्ता आणि सहा हजार रुपयांची एकरकमी मदत दिली जाईल. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील 'मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांना विद्यावेतनप्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर आहोत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी १० लाख रुपयांचे शैक्षणिक कर्ज देण्यात येणार आहे. मॉडेल स्किल लोन योजनेद्वारे जवळपास २५ हजार तरुणांना ७.५ लाख रुपयापर्यंतचे कौशल विकास शिक्षणासाठी कर्ज दिले जाणार आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारतरुणांच्या विकासासाठी प्रयत्न करत असल्याने त्याचा दुप्पट लाभ महाराष्ट्रातील तरुणांना होईल!" असे देखील कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

००००

Featured post

Lakshvedhi