Wednesday, 24 July 2024

न्हावा-शेवा पाणीपुरवठा योजनेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची प्रलंबित वर्गणी ईपीएफमध्ये जमा करणार

 न्हावा-शेवा पाणीपुरवठा योजनेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची

 प्रलंबित वर्गणी ईपीएफमध्ये जमा करणार

--मंत्री गुलाबराव पाटील

 

            मुंबईदि.२५ :- न्हावा-शेवा पाणीपुरवठा योजना टप्पा एक अंतर्गत कार्यरत कंत्राटी कामगारांच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची (ईपीएफ) २००९ ते २०१८ पर्यंतच्या प्रलंबित वर्गणी शासनाकडून जमा करण्यात येणार आहे. यासाठी ६९ लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

            मजीप्रा अंतर्गत विविध विषयांबाबत मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी आमदार महेश बालदीपाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेमजीप्राचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णाविविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते

            पाणीपुरवठा मंत्री श्री. पाटील म्हणाले कीईपीएफ ऑर्गनायझेशन कडून प्रलंबित वर्गणी जमा होण्यातील त्रुटी दूर करण्यासाठी ईपीएफओकडे पाठपुरावा सुरू असून आवश्यकता भासल्यास कामगार सचिव यांच्यामार्फत कार्यवाही करण्यात येईल. न्हावा शेवा पाणीपुरवठा प्रकल्पातील कंत्राटी कामगारांच्या ईपीएफसाठी व विविध मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांकडून उपोषण केले होते. तसेच आमदार श्री. बालदी यांच्यासह विविध संघटनांनी मागणी केली होती.

०००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi