Wednesday, 24 July 2024

आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तकांना अपघाती मृत्यूसाठी दहा लाख, अपंगत्वासाठी पाच लाख रूपये सानुग्रह अनुदान -

 आशा स्वयंसेविकागट प्रवर्तकांना अपघाती मृत्यूसाठी दहा लाख,

अपंगत्वासाठी पाच लाख रूपये सानुग्रह अनुदान

-       सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

 

            मुंबईदि. 23 :   राज्यात गावपातळीवर शासकीय योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी आशा स्वयंसेविकाअंगणवाडी सेविकागट प्रवर्तक यांच्यावर असते. या घटकांना आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सानुग्रह अनुदान देवून मदत देण्याचा शासनाचा मानस होता. राज्यातील आशा स्वयंसेविकाअंगणवाडी सेविकामदतनीसगटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख आणि अपंगत्वासाठी पाच लाख रुपये अनुदान देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहेअशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिली. 

            आशा स्वयंसेविकागट प्रवर्तकअंगणवाडी सेविकामदतनीस यांना सानुग्रह अनुदानासाठी प्रति वर्षी अंदाजे 1 कोटी 5 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला. हा निर्णय 1 एप्रिल 2024 पासून लागू करण्यात येणार आहे.   सध्या 75 हजार 578 अशा स्वयंसेविका आणि 3622 गटप्रवर्तक कार्यरत असून त्या आरोग्यासंदर्भात महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळतात.  हे करताना अपघाती मृत्यू आल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्यांना आर्थिक सहाय्य व्हावेयासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi