Saturday, 13 July 2024

शिक्षकांसाठीच्या टप्पा अनुदानाची अंमलबजावणी जून पासून

 शिक्षकांसाठीच्या टप्पा अनुदानाची अंमलबजावणी जून पासून

- शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर

 

मुंबई, दि. १२ : शालेय शिक्षण विभागाच्यावतीने शिक्षकांना देण्यात येणा-या  टप्पा अनुदानाचा अमंल हा  जून महिन्यापासून सुरु होईल. असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितले. 

 या संदर्भात निवेदन करताना मंत्री श्री.केसरकर बोलत होते.  

            जून ते डिसेंबरचा फरक हा ज्या वेळी टप्पा अनुदान दिला जाईल त्यावेळी या फरकासह ते देण्यात येईल. त्याचबरोबर  शाळांची पटसंख्या बघून उर्वरित शाळा स्वयं अर्थसहाय्यितामध्ये टाकत आहेत. हे करत असताना ही  डोंगरी  भागातील शाळांसाठीची २० ची अट शिथिल करुन १५ विद्यार्थी संख्या करत आहोत. त्याचप्रमाणे अल्पसंख्याकांची संख्या खूप कमी असल्याने अल्पसंख्याकांच्या शाळांमध्ये पुरेश्या प्रमाणात विद्यार्थी संख्या मिळत नसल्याने त्यांची ३० ही संख्या २० वर करण्यात येत असल्याची माहिती, मंत्री श्री. केसरकर यांनी निवेदनाद्वारे दिली

0000


 

नगरपरिषद व नगरपंचायतीमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी 11 ऑगस्टला मतदान

 नगरपरिषद व नगरपंचायतीमधील रिक्तपदांच्या

पोटनिवडणुकीसाठी 11 ऑगस्टला मतदान

 

            मुंबईदि. 12 : विविध नगरपंचायती व एका नगरपरिषदेतील एकूण 11 सदस्य पदांच्या रिक्त जागांसाठी आणि हातकणंगले (जि. कोल्हापूर) नगरपंचायतीच्या थेट अध्यक्षपदाच्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी 11 ऑगस्ट 2024 रोजी मतदान होणार आहेअसे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.

            खालापूरपाली (जि. रायगड)निफाडसुरगाणा (जि. नाशिक)बोदवड (जि. जळगाव)धडगाव-वडफळ्या-रोषमाळ बु. (जि. नंदुरबार)कवठेमहांकाळखानापूर (जि. सांगली)चंदगड (जि. कोल्हापूर) आणि बाभूळगाव (जि. यवतमाळ) या नगरपंचायतींच्या सदस्यपदांच्या प्रत्येकी एका रिक्त जागेसाठी मतदान होईल. त्याचबरोबर कन्हान-पिपरी (जि. नागपूर) नगरपरिषदेच्या सदस्यपदाच्या एका रिक्त जागेसाठी देखील मतदान होणार आहे.

            नामनिर्देशनपत्रे 18 ते 24 जुलै 2024 या कालावधीत स्वीकारली जातील. रविवारी सुटीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. 25 जुलै 2024 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. 11 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 12 ऑगस्ट 2024 रोजी मतमोजणी होईलअसेही राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे

खानोटा येथील उर्वरित घरांचे पुनर्वसन करण्यात येणार

 खानोटा येथील उर्वरित घरांचे पुनर्वसन करण्यात येणार

- मंत्री  हसन मुश्रीफ

            मुंबईदि. 12: उजनी धरणाच्या क्षेत्रात येणाऱ्या खानोटा (ता. दौंड जि. पुणे) येथील 128 घरांचे पुनर्वसन करण्यात येईलअसे मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या उत्तरात सांगितले.

             यासंदर्भात सदस्य राहूल कुल यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

            मंत्री श्री. मुश्रीफ म्हणालेखानोटा येथील एकूण 287 घरांपैकी 500 तलांकाखाली 89 घरांचे पुनर्वसन सन 1975-76 मध्ये करण्यात आले आहे. उर्वरित 198 घरांपैकी 500 ते 504 तलांकामधील 70 घरांच्या पुनर्वसनासही मान्यता देण्यात आली आहे. उर्वरित 128 ओलावा येत आहे. त्यामुळे या घरांचेही पुनर्वसन तातडीने करण्यात येईल..

खासगी विद्यापीठांना ऑफ कॅम्पस स्थापन करण्यासाठी शासनाची परवानगी घ्यावी लागेल

 खासगी विद्यापीठांना ऑफ कॅम्पस स्थापन करण्यासाठी

शासनाची परवानगी घ्यावी लागेल

- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

          मुंबई, दि. १२ : खासगी विद्यापीठांना ऑफ कॅम्पस स्थापन करण्यासाठी राज्य शासनाच्या परवानगी बरोबरच ज्या विद्यापीठ क्षेत्रात ऑफ कॅम्पस सुरू करणार आहेत त्या विद्यापीठाचीही परवानगी घ्यावी लागेल, असे उत्तर उच्च  व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

          राज्यात खाजगी विद्यापीठांना ऑफ कॅम्पस स्थापन करण्याबाबतच्या कोणत्या अटी लागू केल्या आहेत याबाबत सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

         श्री.पाटील म्हणालेखाजगी विद्यापीठांनी जर कॉलेज सुरू केली तर त्यामध्ये आर्थिक मागास विद्यार्थ्यांसाठी १० टक्के आरक्षणाची अट आहे. तसेच शासनाची व ज्या विद्यापीठ क्षेत्रात ऑफ कॅम्पस सुरू करणार त्यांना ही परवानगी घ्यावी लागेल. २००१ च्या आधीची जीच्या ७८ महाविद्यालयांना अनुदान देणे बाकी आहे या अनुदानाचा आर्थिक भार किती येतो त्याचा पूर्ण अभ्यास करून हा प्रश्न लवकरच सोडविणार आहे असेही श्री.पाटील यांनी सांगितले.

            या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला.

मराठवाडा विभागातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरणार

 मराठवाडा विभागातील जिल्हा परिषद शाळांमधील

शिक्षकांची रिक्त पदे भरणार

-: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

 

            मुंबई, दि. १२ : मराठवाडा विभागातील मुख्याध्यापकांची पदे लवकरच भरण्यात येतील. याबाबत लवकरच तोडगा काढला जाईल, असे उत्तर विधानपरिषदेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

            मराठवाडा विभागातील जिल्हा परिषद शाळांमधील मुख्याध्यापकांची रिक्त पदे भरण्याबाबत विधानपरिषद सदस्य विक्रम काळे यांनी प्रश्न उपस्थित केला.

            श्री.केसरकर म्हणाले की, मराठवाडा विभागामध्ये जिल्हा परिषद माध्यमिक शाळांमध्ये मुख्याध्यापकांची वर्ग-२ ची पदे रिक्त असल्यामुळे वर्ग च्या मुख्याध्यापकांना पदावनत करून वर्ग ३ चा दर्जा  दिलेला नाही. तसेच जी शिक्षकांची पदे रिक्त आहेत ती लवकरच भरण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना योजनेतंर्गत लातूर शैक्षणिक विभागात एकूण ११६ आदर्श शाळा बांधकामे पूर्ण झाली आहेत.राज्यात जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियांनांतर्गत निजामकालीन शाळांच्या दुरूस्ती व बांधकामासाठी रूपये २०० कोटींची कामे हाती घेण्यात आली आहेत.

          या प्रश्नाच्या चर्चेत सर्वश्री ज.मो.अभ्यंकरकिरण सरनाईक,ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सहभाग घेतला.

विकसित भारताची संकल्पना हे एक लक्ष्य नव्हे, तर ते एक पवित्र अभियान

 विकसित भारताची संकल्पना हे एक लक्ष्य नव्हे, तर ते एक पवित्र अभियान

- उपराष्ट्रपती जगदीप धनखड

 

             मुंबईदि. 12 : विकसित भारत @2047 हे केवळ एक लक्ष्य नसून ते एक पवित्र अभियान आहे, असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज सांगितले. हे दशक भारताचे दशक आहे असे ठाम प्रतिपादन करत प्रत्येक नागरिकप्रत्येक संस्था आणि आपल्या समाजातील प्रत्येक घटकाने या अभियानात अधिकाधिक योगदान द्यावे, असे आवाहन उपराष्ट्रपती श्री. धनखड यांनी केले.

            उपराष्ट्रपती श्री. धनखड यांनी आज मुंबईतील नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी - विद्यार्थिनीप्राध्यापकांना संबोधित केले. याप्रसंगी राज्याचे राज्यपाल रमेश बैसउपराष्ट्रपतींच्या पत्नी डॉ.सुदेश धनखड राज्यसभेचे सदस्य प्रफुल्ल पटेलएन एम आय एम एस अभिमत विद्यापीठाचे कुलपती अमरीश पटेलकुलगुरू रमेश भट उपस्थित होते.

            उपराष्ट्रपती श्री.धनखड यांनी 'भारताचे सक्षमीकरण : विकसित भारत 2047 घडवण्यात उच्च शिक्षण संस्थांची भूमिकायाविषयी विचार व्यक्त केले.

            ते म्हणाले,  2047 मधील विकसित भारतासाठी आपल्या सर्वांचे योगदान बहुमूल्य आहे. मी यास 1947 नंतरचे हे दुसरे मिशन म्हणून पाहतो आहे. गुणवत्ता पूर्ण शिक्षण व्यक्तीच्या जीवनात चमत्कार घडवते आहे. शिक्षण नवोन्मेषाला चालना देतेआर्थिक वाढीला प्रोत्साहन देते आणि स्वप्ने तसेच महत्वाकांक्षासाठी मार्ग बनवते. शिक्षण हे व्यक्तीसमाजआणि देशाच्या विकासात मोठे काम करते. व्यक्ती आणि समाजाला सक्षम बनवण्याची शक्ती शिक्षणातून निर्माण होते.उच्च शिक्षण हे राष्ट्राच्या विकासासाठी आणि सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आजचे युवक व विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक असून भविष्यातील देशाचे आधारस्तंभ आहेत.

            ते म्हणाले2047 मधील विकसित भारताला घडविण्यासाठी आपल्या सर्वांचे योगदान बहुमूल्य ठरणार आहे. विद्यार्थी व युवकांनी कोषामधून बाहेर पडून भविष्यातील या संधीचा वेध घ्यावाआजची युवा पिढी चांगल्या पद्धतीने विकसित झाली पाहिजेत. आपण अजूनही स्पर्धा परीक्षांच्या गराड्यात आहोत. फार प्राचीन काळापासून नालंदातक्षशिलाविक्रमशिला अशा सर्वोत्कृष्टनामांकित विद्यापीठांचाप्राचीन शिक्षण पद्धतीचा परंपरेचा वारसा भारताला लाभला आहे. या संस्थांनी भारताला एक शक्ती स्थानी बसवले आहे. जागतिक पटलावर भारत मुत्सद्देगिरीतील मोठी सुप्त शक्ती आहेया प्रेरणादायी इतिहासाचा उच्चार त्यांनी केला.

            उपराष्ट्रपती श्री.धनखड मार्गदर्शन करताना पुढे म्हणालेमनात जिद्द आणि चिकाटी असली की विदयार्थी कुठेही पोहचवू शकतो. युवकांनी बाहेर पडून भविष्यातील या संधीचा वेध घेतला पाहिजे.  पण काही नकारात्मक बाबींचा धोका देखील आहे त्या ओळखून त्यावर मात करता आली पाहिजे. जीवनामध्ये चांगला मार्ग निवडणे गरजेचे आहे यशासाठी कधीही शॉर्टकट वापरू नका. कायद्याचा आदर करणे म्हणजे राष्ट्रवादाचा आदर,  लोकशाहीचा आदरआणि गुणीजनांच्या गुणवत्तेचा आदर करणे होय. म्हणूनचकायद्याच्या योग्यतेवर आपला विश्वास असला पाहिजे. न्यायापुढे सर्व समान असतात, असेही त्यांनी सांगितले.

            युवा पिढीसाठी असलेल्या अमर्याद संधींबाबत बोलताना उपराष्ट्रपती श्री.धनखड यांनी नवीन शिक्षण धोरण हे फक्त पदवी देणारे नसून माणूस घडवणारे ठरेल असे सांगितले. त्यांनी 1947 नंतर आतापर्यंत देशाने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला. सरदार वल्लभभाई पटेलभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघटित एकसंघ भारताच्या उभारणीतील योगदानाचा उल्लेख केला. आजची जागतिक स्तरावरील गुंतवणूकदारांसाठी आकर्षण असणारी तिसरी सर्वात मोठी भारतीय अर्थव्यवस्था प्रचंड वेगाने वाढत आहे. युरोपीय युनियन मधील देशांसाठी महत्त्वाचे ठरली आहे.  जी20,  भारत मंडपमवर्ल्ड पार्लमेंट या घटना त्याच्या निदर्शक आहेत.  चांद्रयान मोहिमेचे यशस्टार्ट अप इंडियाग्रीन हायड्रोजन मिशनहर घर जलसोलर पॉवर होमडिजिटालायझेशनडी बी टीभारताचे निर्यातीतील बलस्थान अशा विकासाच्या अनेक पाऊलखुणांबद्दल त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे काम महत्त्वाचे आहे. अत्याधुनिक उद्योगांनी या उच्च शिक्षणाच्या संस्थांमध्ये संशोधन व विकासासाठी प्रयोगशाळा म्हणून पहावे असे आवाहन त्यांनी केले. या वेगात बदलणाऱ्या विकसित भारताच्यामध्ये योगदानासाठी युवा विद्यार्थ्यांनी पुढे यावे असे सांगून नवी दिल्ली येथील नवीन संसद भवन येथे भेट देण्यासाठी त्यांनी या युवा विद्यार्थ्यांना आमंत्रण दिले.

कार्यक्रमात सुरुवातीस विद्यापीठाचे कुलपती श्री. पटेल यांनी उपराष्ट्रपती श्री. धनखड व सर्व मान्यवरांचे स्वागत केले. खासदार श्री. पटेल यांनी मनोगत व्यक्त केले. कुलगुरू श्री. भट यांनी प्रास्ताविक केले.

000000

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आज शुभारंभ

 मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आज शुभारंभ

 

            मुंबईदि. १२ : रोजगार निर्मिती करून देश प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एका वर्षात ५० लाख रोजगार निर्मितीचा संकल्प केला आहे. रोजगार वाढीसाठी केंद्र शासनाच्या या निर्णयावर आधारित राज्यात मुख्यमंत्री   एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली  मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष आणि कौशल्य विकास विभागामार्फत  ग्रामीण व शहरी रोजगार निर्मिती वाढीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना'  सुरू केली जात आहे. राज्यातील युवकांना प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होऊन  रोजगार  मिळण्याच्या संधी निर्माण होणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या योजनेचा शनिवार, दि. १३ जुलै २०२४ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. गोरेगावमधील नेस्को प्रदर्शन मैदान येथे १३ जुलै रोजी सायंकाळी  ५.३० वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

            कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले कीयुवकांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते नोकरी व्यवसायाच्या शोधात असतात. युवकांना व्यवसाय व नोकरी प्राप्त करण्यासाठी त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य प्राप्त व्हावे, यासाठी शासन त्यांच्यासोबत आहे. १२ वी उत्तीर्ण, आयटीआय व पदविका उत्तीर्णपदवीधर आणि पदव्युत्तर उत्तीर्ण यामधील युवकांचा या योजनेत समावेश करण्यात आलेला आहे. उद्योजक आणि बेरोजगार युवकांमध्ये  संवाद निर्माण करून त्यांना उद्योग व्यवसायाच्या त्यांच्या क्षेत्रातील संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि त्यांनी प्राप्त केलेल्या कौशल्यानुसार रोजगाराच्या संधी निर्माण करून दिल्या जाणार आहेत.

          मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता ५ हजार ५०० कोटींची तरतूद करण्यात आली असूनउमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्षे या वयोगटातील असावेउमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत १२ वी उत्तीर्णसाठी ६ हजार रुपयेआयटीआय व पदविका उत्तीर्णसाठी ८ हजार रुपये आणि पदवीधर आणि पदव्युत्तर उत्तीर्णसाठी १० हजार रुपये दरमहा विद्यावेतन मिळणार आहे. तसेच कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) कालावधी सहा महिने असणार आहे. या योजनेचा युवकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावाया प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घ्यावाअसे आवाहन मंत्री श्री. प्रभात लोढा यांनी केले आहे. कौशल्य रोजगार उद्योजकता विभागाचे सचिव गणेश पाटीलमहाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या आयुक्त निधी चौधरी यांनी या कार्यक्रमात युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

००००

Featured post

Lakshvedhi