खासगी विद्यापीठांना ऑफ कॅम्पस स्थापन करण्यासाठी
शासनाची परवानगी घ्यावी लागेल
- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. १२ : खासगी विद्यापीठांना ऑफ कॅम्पस स्थापन करण्यासाठी राज्य शासनाच्या परवानगी बरोबरच ज्या विद्यापीठ क्षेत्रात ऑफ कॅम्पस सुरू करणार आहेत त्या विद्यापीठाचीही परवानगी घ्यावी लागेल, असे उत्तर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
राज्यात खाजगी विद्यापीठांना ऑफ कॅम्पस स्थापन करण्याबाबतच्या कोणत्या अटी लागू केल्या आहेत याबाबत सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
श्री.पाटील म्हणाले, खाजगी विद्यापीठांनी जर कॉलेज सुरू केली तर त्यामध्ये आर्थिक मागास विद्यार्थ्यांसाठी १० टक्के आरक्षणाची अट आहे. तसेच शासनाची व ज्या विद्यापीठ क्षेत्रात ऑफ कॅम्पस सुरू करणार त्यांना ही परवानगी घ्यावी लागेल. २००१ च्या आधीची जीच्या ७८ महाविद्यालयांना अनुदान देणे बाकी आहे या अनुदानाचा आर्थिक भार किती येतो त्याचा पूर्ण अभ्यास करून हा प्रश्न लवकरच सोडविणार आहे असेही श्री.पाटील यांनी सांगितले.
या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment