खानोटा येथील उर्वरित घरांचे पुनर्वसन करण्यात येणार
- मंत्री हसन मुश्रीफ
मुंबई, दि. 12: उजनी धरणाच्या क्षेत्रात येणाऱ्या खानोटा (ता. दौंड जि. पुणे) येथील 128 घरांचे पुनर्वसन करण्यात येईल, असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या उत्तरात सांगितले.
यासंदर्भात सदस्य राहूल कुल यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, खानोटा येथील एकूण 287 घरांपैकी 500 तलांकाखाली 89 घरांचे पुनर्वसन सन 1975-76 मध्ये करण्यात आले आहे. उर्वरित 198 घरांपैकी 500 ते 504 तलांकामधील 70 घरांच्या पुनर्वसनासही मान्यता देण्यात आली आहे. उर्वरित 128 ओलावा येत आहे. त्यामुळे या घरांचेही पुनर्वसन तातडीने करण्यात येईल..
No comments:
Post a Comment