Wednesday, 10 July 2024

बुड्डीलेन सोशल ग्रुप द्वारा रक्तदान का सफल आयोजन

 बुड्डीलेन सोशल ग्रुप द्वारा रक्तदान का सफल आयोजन


  बुड्डीलेन सोशल ग्रुप ने इनाम हॉल जामा मस्जिद में एक सफल मेगा रक्तदान शिविर का आयोजन किया, जिसमें 605 युवाओं ने अपना रक्तदान करके मानवता की बेहतरीन मिसाल कायम की और हर तीन महीने में रक्तदान करने का संकल्प लिया। 13 साल बाद बुड्डीलेन सोशल ग्रुप ने सफल रक्तदान शिविर का आयोजन किया. युवाओं की सक्रिय भागीदारी से इस शिविर को सफल बनाया गया। शिविर सुबह 10 बजे से रात 8 बजे तक चला। इस शिविर में शहर के युवाओं ने धर्म और जाती से ऊपर उठकर अपना बहुमूल्य रक्तदान किया. इस संबंध में आयोजकों ने कहा कि घाटी एवं कैंसर अस्पताल में इलाज के लिए पूरे मराठवाडा से आने वाले गरीब मरीजों को देखते हुए युवा समूह ने रक्त दान शिविर लगाने का निर्णय लिया है। यह पहली बार है कि रक्त दान शिविर लगाया गया है जामा मस्जिद में आयोजित शांति और भाईचारे को बढ़ावा देने के लिए एक छोटा सा प्रयास किया गया है। मानव सेवा समय की सबसे बड़ी जरूरत है और हर इंसान को अपनी हैसियत के अनुसार सेवा करनी चाहिए और अपने खून से दूसरों की जान बचाना एक महत्वपूर्ण सेवा है। और सच्ची मानवता। लोगों को चाहिये के मानव सेवा मे बढ़ चढ़कर भाग लेना चाहिए. बुड्डीलेन सोशल ग्रुप उन युवाओं के उत्साह को सलाम करता है जिन्होंने इस शिविर को सफल बनाने के लिए महत्वपूर्ण योगदान किया हैं । लोगो ने अपने अपने मोहल्ले मे इस तरह के रक्तदान शिवीर का आयोजन  करना चाहिए ताकि शहर में खून कही भी कमी महसूस न हूँ । शिविर में शहर प्रसिद्ध हस्तियों ने भाग लिया और अपना रक्तदान किया । ब्लड बँक के अधिकारियो का कहना हैं इस शिविर के आयोजन से शहर मे कम से कम दो महीने ब्लड की कमी महसूस नहीं होंगी अस्पताल और मरीज़ों को दो महीने ब्लड की परेशनी नहीं होंगी और बुड्डीलेन सोशल ग्रुप को बधाई दी और युवाओं को प्रार्थनाओं के साथ आशीर्वाद दिया। इस शिविर में लगभग 39 महिलाओं ने भी अपना रक्तदान किया और कुल 605 रक्त बैग एकत्र किए गए। इस शिविर में पुलिस आयुक्त प्रवीण पवार साहेब, डीसीपी नितिन भगाटे साहेब, शासकीय निम् शासकीय अधिकारी, डॉक्टर्स, अलग अलग राजनीतिक दल के अधिकारी पदाधिकारी समाज सेवको ने भाग लिया और युवाओं को 

*'मासिक पाळी'चे पुरुष बळी.

 *'मासिक पाळी'चे पुरुष बळी..*


*लेख -*

 ✒️ 

*सुरेंद्र नेमळेकर.*

शीर्षक वाचून तुम्ही हादरला असाल, पण हे सत्य आहे. संपूर्ण भारतात दरवर्षाला 5000 सफाई कामगार जे हंगामी काम करणारे कामगार असतात, एकाद्या कंत्राटदाराचकडे पाचशे रुपये हजेरी वरती दिवसभर काम करणारे कामगार आणि कुठल्यातरी झोपडपट्टीत राहणारे असतात. अशा कामगारांना हाताशी धरून हाउसिंग सोसायटीमध्ये एखाद्या गटाराचा चेंबर किंवा नाल्याचा चेंबर  चॉक झाला असेल, तर तो ते साफ करण्याचे काम असे कामगार करत असतात. एखादा दारू चा पेग पोटात घालून हे अश्या मेन हॉल मध्ये खाली उतरतात. कधी कधी अशा चेंबरमध्ये मिथेन गॅस तयार झालेला असतो तेथे गुदमरून अशा कामगारांचा मृत्यू होतो. पनवेल मध्ये तर एका वेळेला तीन कामगार6 अशाच उतरले आणि बराच वेळ आले नाही म्हणून त्यांचा कंत्राटदार जो स्वतः इंजिनीयर होता तो सिडकोचा कंत्राटदार मस्कर भाऊ म्हणून फेमस होता. तो सुद्धा आत मध्ये गुदमरून मेला. नाका कामगारांना ड्रेनेज चोकअप होण्याची कारणे विचारली असता त्यांची उत्तरं ठरलेली असतात. मासिक पाळीच्या वेळी महिला ज्या सॅनेटरी पॅड वापरतात ते बहुतेक वेळा संडासा मध्ये टाकून फ्लश चालू करतात. फ्लश मुळे साधारण कोरडे असलेले सॅनेटरी नॅपकिन पेड पाईप मधून खाली उतरते. जोपर्यंत त्यामध्ये असलेला कापूस मोठ्या आकाराचा होत नाही तोपर्यंत तो पुढे पुढे प्रवास करत जात असतो. मात्र त्याचा प्रवास सुरू असताना वाटेमध्ये चेंबरच्या पाईप मध्ये त्याचा आकार पाणी झिरपून मोठा होतो, व तो काढण्यासाठी चेंबर मध्ये मेन हॉल मध्ये कंत्राटी कामगार उतरतात. कधी कधी तर चेंबर आठ फूट उंच असतो व तोंडो तोंड शिगोशीग भरलेला असतो. अशा वेळेला कामगार खाली उतरून नाक दाबून चेंबर साफ करणाऱ्यांचे फोटो व्हायरल झालेले आहेत. मघाशी सांगितल्याप्रमाणे कधीकधी त्या कापसा भोवती येऊन इतर प्लास्टिकचे तुकडे कंडोम गुटख्याची पाकिटे जमा होऊन चेंबर जाम झालेले असतात. हे प्रमाण 99 टक्के असते. एक टक्का उंदीर किंवा घुशी ने माती काढल्यामुळे चेंबर जाम होतात. आपणास कल्पना नसेल दरवर्षी भारतात किमान साडेचार ते पाच हजार कामगार चेंबर साफ करताना मेन हॉल मध्ये गुदमरून मेले आहेत. आणखी एक उदाहरण देतो भारतात सर्वात स्वच्छ पेट्रोल पंप म्हणून ओळखला जाणारा पेट्रोल पंप संगमेश्वर धामणी येथे असून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला तो आहे. इतका स्वच्छ पेट्रोल पंप पाहून बरेच लोक आपली गाडी त्या पंपावरची घेऊन जातात त्या पंपावर असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची मी एकदा मुलाखत घेतली, मुलाखतीमध्ये त्याला प्रश्न विचारला तुम्ही एवढा पेट्रोल पंपपरिसर प्रसाधनगृह स्वच्छ करता तर तुम्हाला कोणत्या गोष्टीचा त्रास जास्त होतो तर त्यांनी मला सांगितले सर्व साफ करताना कोणताच त्रास होत नाही मात्र प्रवाशी महिला सॅनेटरी नॅपकिन पेड टॉयलेट मध्ये टाकून जेव्हा फ्लश चालू करतात, तेव्हा तो पॅड ड्रेनेज मध्ये जाऊन अडकतो ड्रेनेज चोकअप होतो. तो साफ करताना खूपच त्रास होतो. 

सबब आज आपण हा लेख सर्वत्र पाठवा व भाषांतरित करा. आणि आज निर्धार करा, यापुढे सॅनेटरी नॅपकिन पॅड कचऱ्याच्या डब्यात टाकणार. आणि मासिक पाळी पासून जीव गमावणाऱ्या गरीब नाका कामगारांच्या पत्नीला विधवा होण्यापासून वाचवणार. त्यांच्या मुलांना पोरक अनाथ होऊ देणार नाही. असा संकल्प करूया. जर काही चुकलं असेल तर माफ करा. ही विनंती. माझ्या नाका कामगारांसाठी जर मला मनातून शिव्या दिल्या, फोनवर जरी शिव्या दिल्या, तरी त्या घेण्याची तयारी माझी आहे.  हात जोडून विनंती यापुढे आपण चांगले वागू या, आणि *मासिक पाळीचे पुरुष बलिदान थांबवूया.*

लेख आवडला असेल तर सामाजिक जाणीव जागृत ठेवून नावासहित लेख पुढे पाठवा.


 📝आपला 

*सुरेंद्र नेमळेकर.*

 रायगड जिल्हा नाका कामगार संघटना. 

 अध्यक्ष ९४०४१३५६१९

@@@@@@@@@@@

अचलपूर आणि चांदूर बाजार नगरपरिषदेअंतर्गत घरकुल वाटपातील दिरंगाईबाबत मंत्रालयीनस्तरावर चौकशी

 अचलपूर आणि चांदूर बाजार नगरपरिषदेअंतर्गत

घरकुल वाटपातील दिरंगाईबाबत 

मंत्रालयीनस्तरावर चौकशी

- मंत्री उदय सामंत

            मुंबईदि. १० : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर आणि चांदूर बाजार नगरपरिषदेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल वाटपातील दिरंगाई झाल्याचे निदर्शनास आले आहे. या घरकुल वाटपातील दिरंगाईबाबत मंत्रालयीनस्तरावर चौकशी करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

             सदस्य ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या सूचनेच्या चर्चेमध्ये सदस्य सुलभा खोडके यांनीही सहभाग घेतला.

             मंत्री श्री. सामंत म्हणाले की, अचलपूर नगरपरिषदेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घरकुलासाठी ६,०६६ अर्जापैकी १,७३८ अर्ज मंजूर करण्यात आले असून ५०८ लाभार्थ्यांच्या प्रस्तावांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहेतर ७० प्रस्तावांबाबत तांत्रिक कारणांमुळे अहवाल तयार करण्यात आलेला नाही. ११२ लाभार्थ्यांनी मागणी केलेली घरकुलांची जागा नदी पात्रात असल्याने तसेच ६३८ लाभार्थ्यांनी अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे सादर केलेली नाहीत. चांदूर बाजार नगरपरिषदेतील प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घरकुलासाठी एकूण ६०७ अर्जापैकी ४१५ लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून १९२ घरकुलांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे.

            अचलपूर येथील प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये अतिक्रमण नियमानुकूल करण्याकरिता ९८६ लाभार्थ्यांचे प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीस सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी ३६० लाभार्थ्यांचे प्रस्ताव  जिल्हास्तरीय समितीकडून तपासण्यात आले. तसेच ४०२ लाभार्थ्यांचे प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीकडे मंजुरीकरीता सादर केले असता शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे पुढील निर्णयापर्यंत नियमित करण्यात येऊ नये असे निर्देश दिले आहेत.

००००

पूरग्रस्त वसाहतीमधील बांधकामासाठी धोरण तयार करण्यासाठी समिती

 पूरग्रस्त वसाहतीमधील बांधकामासाठी

धोरण तयार करण्यासाठी समिती

 - मंत्री उदय सामंत

            मुंबईदि. १० : पूरग्रस्त वसाहतींमध्ये बांधकामासाठी धोरण नसल्याने हे धोरण तयार करण्यासाठी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची समिती गठित करण्यात येईलअशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

            याबाबत सदस्य सिद्धार्थ शिरोळे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

            मंत्री श्री. सामंत म्हणाले कीपुणे महानगरपालिका हद्दीमधील पेठ शिवाजीनगर भागातील गोखलेनगर परिसरामध्ये पानशेत व खडकवासला पूरग्रस्तांसाठी मिळकती दिलेल्या आहेत. याबाबत पुणे महानगरपालिकेमार्फत एसआय सर्व्हे करण्यात आला असून या सर्व्हेमध्ये पुणे गृहनिर्माण महामंडळामार्फत वितरित केलेल्या मूळ बांधकामापेक्षा वाढीव बांधकामे आढळून आलेली आहेत. या परिसरातील इमारतींना मिळकत करावर लावण्यात आलेला  कर धोरण ठरत नाही, तोपर्यंत निवासी बांधकामांना पूर्वीप्रमाणेच कर आकारण्यात येईलअसे मंत्री श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले

००००

राज्यातील मोठ्या शहरांमधील शासकीय रुग्णालयांतील सोयी - सुविधांचा आढावा घेणार

 राज्यातील मोठ्या शहरांमधील शासकीय रुग्णालयांतील

सोयी सुविधांचा आढावा घेणार

मंत्री उदय सामंत

            मुंबईदि. 10 नगर विकास विभागाअंतर्गत मोठ्या शहरांमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून रूग्णालये कार्यान्वित आहेत. रुग्णालयातील जनरेटरची व्यवस्थाविविध आजारांचे निदान करणारी तपासणी यंत्रणा आदींबाबत मोठ्या शहरांमध्ये असलेल्या शासकीय रूग्णालयांचा आढावा घेण्यात येईल. या आढाव्यामध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल,  अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत  लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

        भांडूप येथील सुषमा स्वराज प्रसुतिगृहाच्या प्रकरणाबाबत सदस्य रमेश कोरगांवकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधी सुचनेच्या चर्चेत सदस्य श्री. रोहित पवार यांनीही भाग घेतला.

            मंत्री श्री. सामंत म्हणाले कीबृहन्मुंबई महापालिकेच्या अखत्यारित भांडूप (पश्चिम) येथे सावित्रीबाई फुले उपनगरीय प्रसुतिगृहाची जानेवारी 2024 पासून दुरूस्ती करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रसुतीगृहात नोंदणी केलेल्या रूग्णांना जवळील सुषमा स्वराज प्रसुतीगृहात आवश्यक सेवा देण्यात येत आहे. या रूग्णालयात झालेल्या माता व बाल मृत्यूप्रकरणी नविन समिती स्थापन करून याबाबत चौकशी अहवाल मागविण्यात येईल. या अहवालानंतर उचित कार्यवाही करण्यात येईल. या प्रकरणात दुय्यम अभियंतासहायक अभियंता यांची  विभागीय चौकशी करण्यात येत असून तर स्त्रीरोग तज्ज्ञ यांचे कंत्राटाचे नुतनीकरण करण्यात आले नाही. या रूग्णालयातच नवजात बालकांच्या उपचारासाठी असलेल्या 20 खाटा ठेवण्यात येतील. तसेच काम पूर्ण करून सावित्रीबाई फुले उपनगरीय प्रसुतिगृह सुरू करण्यात येईलअसेही मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

मराठवाडा, विदर्भातील जिल्ह्यात झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व आपत्ती निवारण यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश

 मराठवाडाविदर्भातील जिल्ह्यात झालेल्या 

भूकंपाच्या पार्श्वभूमीवर

जिल्हा प्रशासन व आपत्ती निवारण यंत्रणेला 

सतर्क राहण्याचे निर्देश

- उपमुख्यमंत्री अजित पवार

 

            मुंबईदि. 10 :- हिंगोलीपरभणीनांदेडछत्रपती संभाजीनगरजालनाबीडवाशीम जिल्ह्यांसह मराठवाडाविदर्भातील काही भागात बुधवारी सकाळी 7 वाजून 14 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.5 नोंदविण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावाजवळ असून सौम्य स्वरूपाच्या भुकंपामुळे कुठेही जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज  विधानसभेत दिली.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीमराठवाडाविदर्भातील काही जिल्ह्यात झालेल्या भुकंपाची राज्य शासनाने गंभीर नोंद घेतली आहे. तसेच संबंधित जिल्हाधिकारीप्रांताधिकारीतहसिलदार तसेच सर्व  प्रशासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे आणि नागरिकांना आवश्यक मदत तातडीने उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी घाबरुन न जाता सतर्क राहून बचावासाठीच्या दिलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. गावांमध्ये ज्या घरांवर पत्र्याचे छत आहेत्यावर आधारासाठी ठेवलेले दगड काढून टाकावेतअसे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना केले आहे. राज्य शासन संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून या भूकंप आणि नुकसानीसंदर्भातील अधिकची माहिती स्थानिक प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.

बारवी धरण प्रकल्पग्रस्तांच्या समस्यासंदर्भात आठ दिवसांत बैठक घेऊन मार्ग काढावा

 बारवी धरण प्रकल्पग्रस्तांच्या समस्यासंदर्भात

आठ दिवसांत बैठक घेऊन मार्ग काढावा

उद्योगमंत्री उदय सामंत

 

            मुंबईदि. ९ : नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणग्रस्तांच्या समस्यांसंदर्भात येत्या आठ दिवसात संबंधित यंत्रणांची बैठक घेऊन मार्ग काढावाअसे निर्देश उद्योग मंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिले.

            बारवी धरणग्रस्तांच्या समस्यासंदर्भात आज मंत्रालयात आज श्री. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी आमदार महेश बालदीप्रशांत ठाकूरआमदार मनीषा कायंदेऔद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपिन शर्मानवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलाश शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

            बारवी धरणामुळे नवी मुंबईला पाणीपुरवठा होतो. या धरणासाठी जागा दिलेल्या शेतकऱ्यांना पुनर्वसन कायदा लागू करणेधरणग्रस्तांच्या गावांना पायाभूत सुविधा पुरविणे आदीसंदर्भात यावेळी चर्चा झाली. यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणनवी मुंबई महानगरपालिकासिडको आदी यंत्रणांची एकत्रित बैठक घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यात याव्यातअसे यावेळी मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi