Wednesday, 10 July 2024

बारवी धरण प्रकल्पग्रस्तांच्या समस्यासंदर्भात आठ दिवसांत बैठक घेऊन मार्ग काढावा

 बारवी धरण प्रकल्पग्रस्तांच्या समस्यासंदर्भात

आठ दिवसांत बैठक घेऊन मार्ग काढावा

उद्योगमंत्री उदय सामंत

 

            मुंबईदि. ९ : नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणग्रस्तांच्या समस्यांसंदर्भात येत्या आठ दिवसात संबंधित यंत्रणांची बैठक घेऊन मार्ग काढावाअसे निर्देश उद्योग मंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिले.

            बारवी धरणग्रस्तांच्या समस्यासंदर्भात आज मंत्रालयात आज श्री. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी आमदार महेश बालदीप्रशांत ठाकूरआमदार मनीषा कायंदेऔद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपिन शर्मानवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलाश शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

            बारवी धरणामुळे नवी मुंबईला पाणीपुरवठा होतो. या धरणासाठी जागा दिलेल्या शेतकऱ्यांना पुनर्वसन कायदा लागू करणेधरणग्रस्तांच्या गावांना पायाभूत सुविधा पुरविणे आदीसंदर्भात यावेळी चर्चा झाली. यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणनवी मुंबई महानगरपालिकासिडको आदी यंत्रणांची एकत्रित बैठक घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यात याव्यातअसे यावेळी मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi