Wednesday, 10 July 2024

*'मासिक पाळी'चे पुरुष बळी.

 *'मासिक पाळी'चे पुरुष बळी..*


*लेख -*

 ✒️ 

*सुरेंद्र नेमळेकर.*

शीर्षक वाचून तुम्ही हादरला असाल, पण हे सत्य आहे. संपूर्ण भारतात दरवर्षाला 5000 सफाई कामगार जे हंगामी काम करणारे कामगार असतात, एकाद्या कंत्राटदाराचकडे पाचशे रुपये हजेरी वरती दिवसभर काम करणारे कामगार आणि कुठल्यातरी झोपडपट्टीत राहणारे असतात. अशा कामगारांना हाताशी धरून हाउसिंग सोसायटीमध्ये एखाद्या गटाराचा चेंबर किंवा नाल्याचा चेंबर  चॉक झाला असेल, तर तो ते साफ करण्याचे काम असे कामगार करत असतात. एखादा दारू चा पेग पोटात घालून हे अश्या मेन हॉल मध्ये खाली उतरतात. कधी कधी अशा चेंबरमध्ये मिथेन गॅस तयार झालेला असतो तेथे गुदमरून अशा कामगारांचा मृत्यू होतो. पनवेल मध्ये तर एका वेळेला तीन कामगार6 अशाच उतरले आणि बराच वेळ आले नाही म्हणून त्यांचा कंत्राटदार जो स्वतः इंजिनीयर होता तो सिडकोचा कंत्राटदार मस्कर भाऊ म्हणून फेमस होता. तो सुद्धा आत मध्ये गुदमरून मेला. नाका कामगारांना ड्रेनेज चोकअप होण्याची कारणे विचारली असता त्यांची उत्तरं ठरलेली असतात. मासिक पाळीच्या वेळी महिला ज्या सॅनेटरी पॅड वापरतात ते बहुतेक वेळा संडासा मध्ये टाकून फ्लश चालू करतात. फ्लश मुळे साधारण कोरडे असलेले सॅनेटरी नॅपकिन पेड पाईप मधून खाली उतरते. जोपर्यंत त्यामध्ये असलेला कापूस मोठ्या आकाराचा होत नाही तोपर्यंत तो पुढे पुढे प्रवास करत जात असतो. मात्र त्याचा प्रवास सुरू असताना वाटेमध्ये चेंबरच्या पाईप मध्ये त्याचा आकार पाणी झिरपून मोठा होतो, व तो काढण्यासाठी चेंबर मध्ये मेन हॉल मध्ये कंत्राटी कामगार उतरतात. कधी कधी तर चेंबर आठ फूट उंच असतो व तोंडो तोंड शिगोशीग भरलेला असतो. अशा वेळेला कामगार खाली उतरून नाक दाबून चेंबर साफ करणाऱ्यांचे फोटो व्हायरल झालेले आहेत. मघाशी सांगितल्याप्रमाणे कधीकधी त्या कापसा भोवती येऊन इतर प्लास्टिकचे तुकडे कंडोम गुटख्याची पाकिटे जमा होऊन चेंबर जाम झालेले असतात. हे प्रमाण 99 टक्के असते. एक टक्का उंदीर किंवा घुशी ने माती काढल्यामुळे चेंबर जाम होतात. आपणास कल्पना नसेल दरवर्षी भारतात किमान साडेचार ते पाच हजार कामगार चेंबर साफ करताना मेन हॉल मध्ये गुदमरून मेले आहेत. आणखी एक उदाहरण देतो भारतात सर्वात स्वच्छ पेट्रोल पंप म्हणून ओळखला जाणारा पेट्रोल पंप संगमेश्वर धामणी येथे असून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला तो आहे. इतका स्वच्छ पेट्रोल पंप पाहून बरेच लोक आपली गाडी त्या पंपावरची घेऊन जातात त्या पंपावर असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची मी एकदा मुलाखत घेतली, मुलाखतीमध्ये त्याला प्रश्न विचारला तुम्ही एवढा पेट्रोल पंपपरिसर प्रसाधनगृह स्वच्छ करता तर तुम्हाला कोणत्या गोष्टीचा त्रास जास्त होतो तर त्यांनी मला सांगितले सर्व साफ करताना कोणताच त्रास होत नाही मात्र प्रवाशी महिला सॅनेटरी नॅपकिन पेड टॉयलेट मध्ये टाकून जेव्हा फ्लश चालू करतात, तेव्हा तो पॅड ड्रेनेज मध्ये जाऊन अडकतो ड्रेनेज चोकअप होतो. तो साफ करताना खूपच त्रास होतो. 

सबब आज आपण हा लेख सर्वत्र पाठवा व भाषांतरित करा. आणि आज निर्धार करा, यापुढे सॅनेटरी नॅपकिन पॅड कचऱ्याच्या डब्यात टाकणार. आणि मासिक पाळी पासून जीव गमावणाऱ्या गरीब नाका कामगारांच्या पत्नीला विधवा होण्यापासून वाचवणार. त्यांच्या मुलांना पोरक अनाथ होऊ देणार नाही. असा संकल्प करूया. जर काही चुकलं असेल तर माफ करा. ही विनंती. माझ्या नाका कामगारांसाठी जर मला मनातून शिव्या दिल्या, फोनवर जरी शिव्या दिल्या, तरी त्या घेण्याची तयारी माझी आहे.  हात जोडून विनंती यापुढे आपण चांगले वागू या, आणि *मासिक पाळीचे पुरुष बलिदान थांबवूया.*

लेख आवडला असेल तर सामाजिक जाणीव जागृत ठेवून नावासहित लेख पुढे पाठवा.


 📝आपला 

*सुरेंद्र नेमळेकर.*

 रायगड जिल्हा नाका कामगार संघटना. 

 अध्यक्ष ९४०४१३५६१९

@@@@@@@@@@@

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi