Thursday, 4 July 2024

सहानुभूतीपूर्वक विचारानंतरच प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या

 सहानुभूतीपूर्वक विचारानंतरच प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या

- ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

            मुंबई, दि. 4 : प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली करताना ज्या शिक्षकांच्या समस्या  होत्या त्या लक्षात घेवून प्राधान्याने बदल्या केल्या असल्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

             प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत त्यांच्या समस्या जाणून घेवून शिक्षकांची बदलीबाबत प्रश्न विधानपरिषदेत नियम 92 अन्वये गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री श्री.महाजन म्हणाले की, प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत संवर्ग एक मध्ये येणाऱ्या शिक्षकांना प्राधान्य देण्यात आले आहे. जेणेकरून त्यांच्या अडचणी दूर होऊन त्यांना सेवा उत्तमरित्या करता यावी यासाठी शासन शिक्षकांच्या हिताचे निर्णय घेत आहे. २५०० शिक्षकांच्या बदल्या केल्या आहेत, असे उत्तर मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.

            यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य विक्रम काळे यां

वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये विषशोध यंत्रणेच्या पडताळणीसाठी समिती

 वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये

विषशोध यंत्रणेच्या पडताळणीसाठी समिती

- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

 

            मुंबईदि. 4 : शासकीय रुग्णालयांमध्ये विषबाधा किंवा विषाशी संबंधित रुग्णांचे रक्त तपासणी करण्यात येते. रुग्णाच्या क्लिनिकल’ इतिहासावरून विषारी औषधाचा शोध घेण्यात येतो. त्यानंतर उपचार करण्यात येतात. या रुग्णालयांमध्ये विषाचा प्रकार शोधणारी टॉक्सिकोलॉजिकल स्क्रिनिंग’ यंत्रणा कार्यान्वीत करण्याबाबत समिती नियुक्त करून यंत्रणेची पडताळणी करण्यात येईल. यंत्रणेची विश्वासार्हता तपासून सर्व रूग्णालयांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वीत करण्यात येईलअशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

               याबाबत सदस्य किशोर जोरगेवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारजयंत पाटीलबाळासाहेब थोरातनारायण कुचेकैलास गोरंट्यालअमित देशमुखसुलभा खोडकेप्रकाश आबिटकर यांनी भाग घेतला.

              मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले कीकोल्हापूरमधील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे सर्व व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोल्हापूरमध्ये खासगी रुग्णालयात यकृत बदलाचा प्रस्ताव आला असल्यास त्याबाबत तपासून निर्णय घेण्यात येईल. लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयातील फर्निचर व  विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी निधीची तरतूद उपलब्ध करून देण्यात येईल. अमरावती येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेसाठी वाद होतायाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीकडून जागा निश्चित करण्यात आली आहे.  वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील उपजिल्हा रूग्णलय परिसरातील जागेवर वैद्यकीय महाविद्यालय करण्याची बाब तपासून घेवून निर्णय घेण्यात येईल. याबाबत आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यात आली आहे.

            जालना येथील वैद्यकीय महाविद्यालयात या शैक्षणिक सत्रापासून प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करुन रुग्णालयाचे बांधकामही सुरू करण्यात येईल. राज्यातील मोठ्या शहरातील शासकीय रूग्णालयांमध्ये दर्जेदार आरोग्य व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचेही वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

पुण्यात स्वतंत्र कर्करोग रुग्णालय उभारणार

 पुण्यात स्वतंत्र कर्करोग रुग्णालय उभारणार

- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

 

            मुंबईदि. 4 : पुणे शहरातील ससून सर्वोपचार रुग्णालय दर्जेदार आरोग्य सेवा देणारे आहे. या रुग्णालयाच्या परिसरात कर्करोग रुग्णालय उभारणीबाबत कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. या रुग्णालयासमोर जागा आहे. ही जागा मिळण्याबाबत सकारात्मक निर्णय घेवून ससून रुग्णालय परिसरात स्वतंत्र शासकीय कर्करोग रुग्णालय उभारण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

             ससून रुग्णालयाबाबत सदस्य भीमराव तापकीर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारजयंत पाटीलयशोमती ठाकूरअनिल देशमुखविश्वजित कदमरवींद्र धंगेकरअशोक पवारमाधुरी मिसाळ  यांनी भाग घेतला.

            मंत्री श्री. मुश्रीफ म्हणालेससून रुग्णालयात बेरियाट्रिक शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आले आहे. नवजात बालकांवरील उपचारांसाठी डॉक्टरांची संख्या पुरेशी असून उपचारांसाठी अतिदक्षता विभागात खाटांची संख्या वाढविण्यात येणार आहे. ससूनमधील सुविधा व सद्य:स्थितीबाबत पुणे शहरातील सर्व लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन रूग्णालयाच्या पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात येईल.  वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही एमपीएससीमार्फत करण्यात येत आहे. गट ’ मधील सर्व रिक्त पदे भरण्यात आली आहेत. गट ’ पदाची रिक्त पदे भरण्यासाठी कंत्राटी स्वरूपात स्थानिकस्तरावर जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहे.

                वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयांमध्ये औषधे खरेदीचे अधिकार अधिष्ठाता यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे तातडीने औषधांची गरज असल्यास स्थानिक पातळीवर खरेदी करण्यात येत आहेत. औषधे नसल्याचे निदर्शनास आल्यास तातडीने तक्रार करावी.  ससूनमध्ये मागील काळात घडलेल्या गुन्ह्यांबाबत आरोपींवर कडक कारवाई करण्यात आली आहे. या रुग्णालयात डायलिसीसची व्यवस्था करण्याबाबत पडताळणी करण्यात येईल.  यकृत बदल उपचाराची व्यवस्था मुंबईत असून पुण्यातही शासकीय रुग्णालयातही सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, असेही वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

अंजनवेल पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणार

 अंजनवेल पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणार

- मंत्री गुलाबराव पाटील

 

            मुंबईदि. ०४ : रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील मौजे अंजनवेल गावात जलजीवन योजनेचे ७० टक्के, तर पेठ अंजनवेल या गावात जलजीवन योजनेचे १० टक्के काम झाले आहे. या योजनेसाठी ग्रामपंचायतीसाठी ७६ लाख रुपये मंजूर झाले असून लवकरच काम पूर्ण करून ही पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

                   सदस्य संजय केळकर यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य राजेश टोपे, योगेश सागरविजय वडेट्टीवारनाना पटोले यांनीही उपप्रश्न उपस्थित केले.

                  मंत्री श्री. पाटील म्हणाले कीकुठल्याही योजनेच्या कामासाठी  ग्रामसभेची संमती घेऊनच काम सुरू केले जाते. पाण्याच्या उद्भवासाठी भूजल सर्वेक्षण विभागाकडून पाणी उपलब्धता प्रमाणपत्र देण्यात येते. प्रमाणपत्र असल्याशिवाय पाणीपुरवठा योजनेतील पाण्याचा उद्भव करण्यात येत नाही.

                  पाणीपुरवठा योजनांची कामाची संख्या जास्त असल्यामुळे एका कंत्राटदाराकडे एकापेक्षा जास्त योजनांची कामे आहेत. तालुक्यातील एकत्रित कामांची एकच निविदा काढण्यात आली होती. मात्र, न्यायालयाच्या निकालामुळे एकत्र कंत्राट न देता सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळावेयासाठी त्यांच्या कामाच्या अनुभवानुसार कंत्राट देण्यात आले आहे. पाणीपुरवठा योजनांचे देयक त्रयस्थ संस्थेकडून कामाचे अंकेक्षण केल्याशिवाय काढण्यात येत नाही. तसेच या गावातील योजनेमधील तांत्रिकदृष्ट्या त्रुटींची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्याचे आदेश देण्यात येतील, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

आदर्श पतसंस्थेसह महिला बँकेच्या ठेवीदारांना ठेवींच्या परताव्यासाठी कार्यवाही

 आदर्श पतसंस्थेसह महिला बँकेच्या

ठेवीदारांना ठेवींच्या परताव्यासाठी कार्यवाही

- सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

 

            मुंबईदि. 4 : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आदर्श नागरी सहकारी पतसंस्था आणि आदर्श नागरी महिला सहकारी बँकेतील गुंतवणुकदारांना त्यांच्या ठेवी परत कशा मिळतील यासाठी राज्य शासनाचा प्रयत्न आहे. या बँकेत गैरव्यवहार करणाऱ्या संचालक मंडळाच्या जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव करून ती रक्कम ठेवीदारांना मिळण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत दिली.

            सदस्य हरिभाऊ बागडे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

            मंत्री श्री. वळसे पाटील म्हणाले कीआदर्श पतसंस्था आणि आदर्श नागरी महिला सहकारी बँकेतील संचालक मंडळाच्या चुकीच्या कारभारामुळे या संस्था अडचणीत आल्या. पतसंस्थेच्या लेखा परीक्षण आणि विशेष अहवालात अपहारगैरव्यवहारफसवणूकविनाकारण कॅश क्रेडिट  कर्जवाटप आदी गंभीर बाबी समोर आल्या. याप्रकरणी ५५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच संबंधितांवर कार्यवाही करण्याबाबत सहकार विभागाची चौकशी अंतिम टप्प्यात आहे. संस्थेच्या मालकीच्या मालमत्तांपैकी ३ मालमत्तांची विक्री करण्यात आली आहे. त्यातून ठेवीदारांच्या ठेवी अदा करण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

            यावेळी सदस्य प्रकाश सोळंकेबबनराव लोणीकरनारायण कुचे यांनी लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत सहभाग घेतला.

000

Dadi दादी हैं

 


कोल्हापूर जिल्ह्यातील 24 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1200 क्युसेक विसर्ग

कोल्हापूर जिल्ह्यातील 24 बंधारे पाण्याखाली

राधानगरी धरणातून 1200 क्युसेक विसर्ग

 

        कोल्हापूर, दि. 4 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 2.97 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

 

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, वारणा नदीवरील- चिंचोली व माणगांव, भोगावती नदीवरील- हळदी, राशिवडे व सरकारी कोगे, कासारी नदीवरील- यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व वालोली, घटप्रभा नदीवरील- पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगांव, कानडे-सावर्डे, अडकूर, कानडेवाडी, तारेवाडी व हिरण्यकेशी नदीवरील - साळगांव असे 24 बंधारे पाण्याखाली आहेत.

 

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 2.97 टीएमसी, तुळशी 1.47 टीएमसी, वारणा 13.26 टीएमसी, दूधगंगा 5.86 टीएमसी, कासारी 1.01 टीएमसी, कडवी 1.37 टीएमसी, कुंभी 0.96 टीएमसी, पाटगाव 1.82 टीएमसी, चिकोत्रा 0.52 टीएमसी, चित्री 0.71 टीएमसी, जंगमहट्टी 0.61 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.76 टीएमसी, आंबेआहोळ 0.91 टीएमसी, सर्फनाला 0.12 टीएमसी व कोदे लघु प्रकल्प 0.12 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

 

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 26.4 फूट, सुर्वे 25.4 फूट, रुई 55 फूट, इचलकरंजी 52 फूट, तेरवाड 45.9 फूट, शिरोळ 36 फूट, नृसिंहवाडी 33 फूट, राजापूर 22.9 फूट तर नजीकच्या सांगली  10.9 फूट व अंकली 14.2 फूट अशी आहे.

***

 

 

आजरा येथे 64.8 मिमी पाऊस

 

   कोल्हापूर, दि. 4 (जिमाका): जिल्ह्यात काल दिवसभरात आजरा तालुक्यात सर्वाधिक 64.8 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे - हातकणंगले- 1 मिमी, शिरोळ -0.5 मिमी, पन्हाळा- 13 मिमी, शाहुवाडी- 19.6 मिमी, राधानगरी- 40.6 मिमी, गगनबावडा- 63.8 मिमी, करवीर- 3.6 मिमी, कागल- 6.3 मिमी, गडहिंग्लज- 17.8 मिमी, भुदरगड- 55 मिमी, आजरा- 64.8 मिमी, चंदगड- 58.9 मिमी, असा एकूण 22.2 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

***

Featured post

Lakshvedhi