Thursday, 4 July 2024

आदर्श पतसंस्थेसह महिला बँकेच्या ठेवीदारांना ठेवींच्या परताव्यासाठी कार्यवाही

 आदर्श पतसंस्थेसह महिला बँकेच्या

ठेवीदारांना ठेवींच्या परताव्यासाठी कार्यवाही

- सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

 

            मुंबईदि. 4 : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आदर्श नागरी सहकारी पतसंस्था आणि आदर्श नागरी महिला सहकारी बँकेतील गुंतवणुकदारांना त्यांच्या ठेवी परत कशा मिळतील यासाठी राज्य शासनाचा प्रयत्न आहे. या बँकेत गैरव्यवहार करणाऱ्या संचालक मंडळाच्या जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव करून ती रक्कम ठेवीदारांना मिळण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत दिली.

            सदस्य हरिभाऊ बागडे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

            मंत्री श्री. वळसे पाटील म्हणाले कीआदर्श पतसंस्था आणि आदर्श नागरी महिला सहकारी बँकेतील संचालक मंडळाच्या चुकीच्या कारभारामुळे या संस्था अडचणीत आल्या. पतसंस्थेच्या लेखा परीक्षण आणि विशेष अहवालात अपहारगैरव्यवहारफसवणूकविनाकारण कॅश क्रेडिट  कर्जवाटप आदी गंभीर बाबी समोर आल्या. याप्रकरणी ५५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच संबंधितांवर कार्यवाही करण्याबाबत सहकार विभागाची चौकशी अंतिम टप्प्यात आहे. संस्थेच्या मालकीच्या मालमत्तांपैकी ३ मालमत्तांची विक्री करण्यात आली आहे. त्यातून ठेवीदारांच्या ठेवी अदा करण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

            यावेळी सदस्य प्रकाश सोळंकेबबनराव लोणीकरनारायण कुचे यांनी लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत सहभाग घेतला.

000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi