Saturday, 22 June 2024

एमएचटी- सीईटी परीक्षा पद्धति पारदर्शक ही* -*

 एमएचटी- सीईटी परीक्षा पद्धति पारदर्शक ही*

-*आयुक्त दिलीप सरदेसाई*

 

मुंबईदि. 22 : व्यावसायिक पाठ्यक्रमों के लिए प्रवेश प्रक्रिया संगणकाधारित और केंद्रीय पद्धति से चलानेवाला महाराष्ट्र यह देश का पहला राज्य है. यहीं पद्धत बाद में केंद्र सरकार ने भी स्वीकार की है. यह पद्धति पूरी तरह से पारदर्शक और मानवी हस्तक्षेपरहित है. इसलिए छात्र और परिजनों ने अफवाहों पर भरोसा न रखने का आवाहन महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष के आयुक्त दिलीप सरदेसाई ने आज पत्रकार परिषद में किया. 

मंत्रालय के मंत्रालय और विधिमंडल वार्ताहर कक्ष में आज दोपहर में पत्रकार परिषद का आयोजन किया गया था. इस परिषद में आयुक्त श्री. सरदेसाई बोल रहे थे. इस दौरान उच्च शिक्षा विभाग के संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकरतकनीक शिक्षा विभाग के संचालक विनोद मोहितकर आदि उपस्थित थे. 

आयुक्त श्री. सरदेसाई ने बताया कि राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष की ओर से МНТ-СЕТ 2024 परीक्षा ली गई. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष की ओर से अभियांत्रिकी औषधनिर्माणशास्त्रकृषि शिक्षा इस पाठ्यक्रम के प्रवेश के लिए ली गई MHT-CET 2024 यह सामाईक प्रवेश परीक्षा 22 से 30 अप्रैल 2024 (पीसीबी ग्रुप) और से 16 मई 2024 (पीसीएम ग्रुप) इस अवधि में कुल 169 परीक्षा केंद्रों पर ली गई. पीसीबी ग्रुप की परीक्षा 12 सत्रों मेंवहीँ पीसीएम ग्रुप की परीक्षा 18 सत्रों में ली गई है. 

इस परीक्षा में कुल 3 लाख 30 हजार 988 छात्र, 3 लाख 94 हजार 33 छात्राएं और 31 ट्रान्सजेंडर उम्मीद्वारों ने ऑनलाईन पध्दति से पंजीकरण किया था. इसमें से 6 लाख 75 हजार 377 छात्रों ने परीक्षा दी. उम्मीदवारों के किसी प्रश्नों का जवाब गलत होने पर उस प्रश्न को ऋण गुण (Negative Marks) देने की पध्दत नहीं. प्रस्तुत परिणाम पर्सेंटाईल पध्द‌ति से घोषित किया गया है. प्रस्तुत  परीक्षा के परिणाम में किसी भी उम्मीद्वार को अनुग्रह गुण (Grace Marks) नहीं दिए गए है. इस परीक्षा के अंतर्गत प्रश्न अथवा जवाब को लेकर परिजनपरीक्षार्थी को कुछ आपत्ति तथा शिकायत होने पर सीईटी कक्ष के जरिये ऑनलाईन पध्द‌ति से आपत्ति पंजीकरण की सुविधा उपलब्ध कराई गई है. उम्मीदवारों द्वारा पंजीकृत आपत्तियों का विषय निहाय विशेषज्ञों की ओर से जांच कराई गई है और दृष्टि से उत्तर तालिका में (Answer Sheet) उचित वह परिवर्तन कर इस संदर्भ की रिपोर्ट उम्मीदवारों की जानकारी के लिए सीईटी कक्ष के वेबसाइट पर प्रकाशित किया गया है. सदर सुधारित उत्तरतालिका का अंतर्भाव कर परिणाम प्रक्रिया चलाई गई है. इसमें उम्मीदवारों को मिले अंक परिणाम प्रक्रिया के सूत्र के अनुसार और सत्रनिहाय परिणाम पर्सेंटाईल में घोषित किया गया है. 

एक ही सत्र में समान गुण (Raw Score) मिलें उम्मीदवारों को समान पर्सेंटाइल मिलें है. उसी तरह यह परीक्षा अलग-अलग दिन प्रत्येकी दो सत्रों में ली गई है. इसलिए विविध सत्रों के समान अंक (Raw Score) मिलें उम्मीदवारों को अलग-अलग पर्सेंटाईल मिलें है. वहीँ उम्मीदवारों को उपलब्ध की गई उत्तरतालिका की तरह ही उनके द्वारा निकाले अंक उन्हें नहीं मिले है. यह भी आपत्ति वस्तुस्थिति के नुसार नहीं. इस कार्यालय के जरिये उम्मीदवारों को ऑनलाईन पध्दति से आपत्ति दर्ज करने की सुविधा उपलब्ध कराई गई है. उम्मीदवारों द्वारा दर्ज आपत्तियों का विषय निहाय विशेषज्ञों की ओर से जांच कराई गई है और उस दृष्टि से उत्तर तालिका में (Answer Sheet) उचित वह परिवर्तन कर इस संदर्भ की रिपोर्ट उम्मीदवारों के जानकारी के लिए सीईटी कक्ष के cetcell.mahacet.org  इस वेबसाइट पर प्रकाशित किया गया है. प्रस्तुत सुधारित उत्तरतालिका का अंतर्भाव कर परिणाम प्रक्रिया चलाई गई है. इसमें उम्मीदवारों को मिले अंक परिणाम प्रक्रिया के सूत्र के अनुसार सत्रनिहाय परिणाम पर्सेंटाईल स्वरुप में घोषित किया गया है.

प्रस्तुत परीक्षा अलग-अलग बॅच के द्वार लेकर उसकी एक ही गुणवत्ता सूचि घोषित की जाती है. प्रत्येक बॅच को अलग-अलग प्रश्नपत्रिका होती है, यह भी आपत्ति थी. तथापिप्रत्येक सत्र का परिणाम स्वतंत्र रूप से तैयार किया जाता है. प्रस्तुत कार्यपध्द‌ति सीईटी सेल के वेबसाईट पर है. अप्रैल 2024 परीक्षा के पहले प्रकाशित की गई थी. इसलिए यह आपत्ति वस्तुस्थिति के अनुसार नहीं है. साथ ही अब तक सीईटी सेलमुंबई कार्यालय में ज्ञापन लेकर आये करीबन 200 परिजन/ उम्मीदवार और ई- मेल के द्वारा प्राप्त ज्ञापनों की जांच कर प्रत्येक शिकायत का निराकरण किया जा रहा है. साथ ही आपत्ति दर्ज करने के लिए छात्रों द्वारा जमा की गई रकम में से जो आपत्ति ग्राह्य मानी गई है, ऐसे 54 को उन्होंने जमा की गई रकम उनके बैंक खाते में ऑनलाइन पद्धति से जमा की जाएगी, यह भी इस परिषद में बताया गया है. 

इसमें सभी सत्रों के सभी छात्रों को समान अवसर मिलें, इसके लिए बॅच की तरह पर्सेंटाईल पध्दति से परिणाम घोषित किया जाता है. यह परीक्षा पद्धत वर्ष 2018-19 से चलाई जा रही है. साथ ही छात्रों को उनकी उत्तरपत्रिका देखने का अवसर तकनीकी बातों की परिपूर्तता के बाद 27 और 28 जून 2024 को सीईट सेल की वेबसाईंट पर उपलब्ध कराने के प्रस्तावित होने की बात इस दौरान आयुक्त श्री. सरदेसाई ने कही. इस दौरान डॉ. देवळाणकरश्री. मोहितकर ने भी यह परीक्षा पद्धति को लेकर जानकरी दी. 

०००००


मुंबई परिसरातील ऐतिहासिक बंदरे व गोदी यांच्या इतिहासावरील पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

 मुंबई परिसरातील ऐतिहासिक बंदरे व गोदी यांच्या इतिहासावरील पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

 

          मुंबई दि. 22: मुंबई परिसरातील सोपारा, वसई, वर्सोवा, माहीम, लिबाग, चौल यांसह विविध बंदरांच्या तसेच गोदींच्या इतिहासाचे संकलन असलेल्या 'गेटवेज टू द सी - हिस्टोरिक पोर्ट्स अँड डॉक्स ऑफ मुंबई रिजन' या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज राजभवन मुंबई येथे संपन्न झाले. 

            मुंबईचा सागरी वारसा सांगणाऱ्या संग्रहालयाच्या निर्मितीसाठी स्थापन करण्यात आलेल्या 'मेरीटाईम मुंबई म्युझियम सोसायटी'च्या पुढाकाराने सदर पुस्तक संकलित करण्यात आले असून  नामवंत इतिहासकार, लेखक, संशोधक, वास्तुरचनाकार यांनी लिहिलेल्या १८ प्रकरणांचा पुस्तकात समावेश करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या प्रकाशन विभागाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

            ज्या देशांनी समुद्रावर प्रभुत्व मिळवले त्यांची भरभराट झाली  असे नमूद करून गतकाळातील भारताच्या समृद्धीचे श्रेय देशाच्या विशाल सागरी वारशाला जाते, असे राज्यपाल श्री.बैस यांनी यावेळी बोलताना सांगितले.

            आजवर अनेक शहरे बंदरांभोवती निर्माण झाली.  बंदरांच्या विकासामुळे मुंबई भारताची आर्थिक राजधानी म्हणून उदयास आली असे सांगून राष्ट्र म्हणून देशाने केलेल्या प्रगतीचा धांडोळा घेताना भूतकाळातील आणि सध्याची बंदरे आणि गोदी यांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो असे राज्यपालांनी सांगितले. काही शहरे उदयास कशी येतात व कालांतराने आपले महत्व गमावून विस्मृतीत कसे जातात हे देखील बंदरांच्या इतिहासावरून  कळेल असे त्यांनी सांगितले.

            भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यासाठी प्रयत्नशील आहे. अशावेळी देशातील बंदरांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे भारतातील विविध  बंदरे आणि गोदी यांचा अभ्यास करणे संयुक्तिक ठरेल, असे राज्यपालांनी सांगितले.

            ‘गेटवेज टू द सी’ या पुस्तकाने मुंबई क्षेत्रातील आपल्या प्राचीन बंदरांचा वैभवशाली वारसा आपल्यासमोर आणला असून सदर पुस्तकाचा महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची शिफारस आपण विद्यापीठांच्या कुलगुरूंना करू असे राज्यपालांनी सांगितले. 


            सुरुवातीला मेरीटाईम मुंबई म्युझियम सोसायटीचे अध्यक्ष कॅप्टन के डी बहल यांनी पुस्तकाबाबत माहिती दिली.

 

            कार्यक्रमाला व्हाईस ऍडमिरल (नि.) इंद्रशील राव, संपादिका डॉ शेफाली शाह, सोसायटीच्या उपाध्यक्ष अनिता येवले, भारत सरकारच्या प्रकाशन विभागाच्या प्रतिनिधी संगीता गोडबोले व लेखक उपस्थित होते.    

 

 

 

 

 

 

 

 

 

Governor releases book on Historic Ports and Docks of Mumbai Region


          
Mumbai ,Date 22:Maharashtra Governor Ramesh Bais released the book 'Gateways to the Sea - Historic Ports and Docks of Mumbai Region' at Raj Bhavan Mumbai on Sat (22 Jun). 

 

            The book brought out by the Maritime Mumbai Museum Society is a compilation of authoritative articles on the history of various ports and docks of the Mumbai Region including Sopara, Vasai, Versova, Mahim, Alibag, Chaul etc.  The book has been published by the Publications Division of Government of India.


            Historians, researchers, maritime experts, conservation architects and writers have contributed 18 chapters in the book.  

 

            President of the Maritime Mumbai Museum Society Captain KD Bahl, Vice Admiral (Retd) Indrasheel Rao, Editor Dr Shefali Shah, Vice President Anita Yewale, Publications Division representative Sangeeta Godbole and the contributing writers were present. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


जिवंतपणी यकृत दान'

 *ही  वटपौर्णिमेच्या निमित्याने लिहिलेली कथा १००%सत्य असून त्यात  उल्लेख केलेली सर्व माहिती आणि डॉक्टरांचे तपशील तसेच सर्व माहिती शास्त्रीय असून वैद्यकीय मार्गदर्शनाखाली 'जिवंतपणी  यकृत दान' या संकल्पनेच्या जनहितार्थ प्रसार करण्याच्या हेतूनं लिहिली आहे*

अधिक माहितीसाठी संपर्क ..*डॉ.निनाद देशमुख.(लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन)

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल* पुणे.

Mob:9158883611

Mail: drninaddeshmukh@ yahoo.com

https://organtransplantpune.com* . 

लेखन : *क्षितिजा आगाशे

आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.

*ही कथा आपल्या स्नेही परिचित शेजारी,डॉक्टर यांच्यापर्यंत पोचवून आपण ह्या जनजागृती अभियानात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान देणार आहात*

तेव्हा ही कथा आवर्जून फॉरवर्ड करावी ही नम्र विनंती🙏🙏 .

तिसरी सत्यकथा

         *किमया*

आजचा म्हणजे खास वटपौर्णिमेचा दिवस तिला' पौर्णिमाला 'खूप खूप आवडायचा.ती जाणीवपूर्वक उपास करायची.नुसती फळ आणि दूध. आणि हो, खास ' वटपौर्णिमेच मेडिटेशन ' पण.भरपूर ऑक्सिजन देणाऱ्या या झाडाशी तिच नातं अगदी खास मैत्रीचं होत.आणि 

 'एनव्हायरमेंटल सायन्स '  मध्येच पुढचे शिक्षण घेऊन त्यातच अधिक सखोल संशोधन करायचं हेच तिच स्वप्न होत, या बाबतीत तिला तिच्या आईबाबांचाही पूर्ण पाठिंबा होताच.

       आणि तेजस तिचा नवरा तोही भाळला होता तो तिच्या असामान्य बुद्धिमत्तेवरच. दिसायला अगदी लाखात एक नसली तरी चारचौघीत ती आपल्या बुद्धीच्या तेजाने उठून दिसत असे.

       मात्र इथे अमेरिकेत स्थायिक झाल्यापासून इथल्या पाश्चात्य अन् अत्याधुनिक अशा लाईफस्टाईल कडे त्याची जरा अंमळ जास्तच ओढ आहे अस राहून राहून तिच्या मनात येत रहायचं.आजही तिने अगदी भारतीय पारंपरिक पोशाख साडी, नथ,गजरा परिधान केलेला पाहून त्याला तिला चिडवायची लहर आलीच.तो घसा  खाकरत  चेष्टेच्या सुरात तिला म्हणाला.. बर म्हणजे तुमच्या त्या सावित्रीने म्हणे त्या सत्यवानाचे गेलेले प्राण परत आणले,बरोबर ना?


 ......काय तू ,अग जग कुठे चालल आहे आणि तू एव्हढी सायन्स स्टुडंट आणि तू कशी अशा थोतांडावर विश्वास ठेवतेस? कमाल वाटते मला तुझी!

त्या वर तितक्याच शांतपणे  ती म्हणाली , "किती वेळा झालाय हा विषय तेजस? अरे शब्दशः नसतात अशा गोष्टी घ्यायच्या! त्याचा अर्थ रूपकात्मक असतो.आणि अर्थातच साऱ्यांना झाडांचं महत्त्व समजावं ,त्यांचं रक्षण करावं म्हणून त्या सतत

आपल्या मनावर बिंबवलेल्या असतात.

आणि  हो आणखी एक , तू हा विचार कर ना,की...माझी आवडती  सावित्री किती धीराची होती,तिन  लगेच गिव्ह अप नाही केलं,सी हर स्पिरीचुआलीटी !सी हर कॉन्फिडन्स!"

मात्र त्याने आपलं चिडवण चालूच ठेवलं.ओके ओके म्हणजे आता तिच्यापासून प्रेरणा घेऊन तू माझे प्राण परत आणणार आहेस तर हरकत नाहीये अजिबात माझी .अग मग आधी मला त्यासाठी मरा.....त्याला मध्येच तोडत ती म्हणाली,

"ए मला प्लीज ड्रॉप कर ना जाताजाता, 'क्रिएटिव्ह विमेंन्स क्लब'  मध्ये.आज सगळ्या महाराष्ट्रीयन लेडीज चा प्रोग्राम आहे. आणि माझे प्रेझेंटेशन आहे औषधी वनस्पती आणि त्याचे रोजच्या जीवनातील महत्त्व या विषयावर."

त्याने  त्वरित गाडी काढली..आणि ती त्याला बजावत  म्हणाली  ऐक,  "येताना मी येईन माझी माझी,तो पर्यंत माझी गाडी रिपेअर होऊन जाईल.डोन्ट वरी.काळजी करू नको ओके?," 

     तिचं लेक्चर अत्यंत अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद तर होतच ,परंतु रोजच्या माहितीतल्या झाडांचे शास्त्रीय उपयोग जसे तुळस,जास्वंद,बेल,दुर्वा आणि इतर अनेक ...ते सगळं ऐकून समस्त

महिलागण अतिशय प्रभावित झाला होता. ती अभ्यासपूर्वक आपले विचार मांडत होती स्लाईड ,त्यांची शास्त्रीय नावे,त्यांचे गुणधर्म सगळं तिनं तपशीलवार मांडल.त्याच्यावरील संशोधन,त्याचे निष्कर्ष सगळं मांडल.आणि आधुनिक  काळाला अनुसरून 'ह्या' झाडांचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने अनेक पौराणिक प्रसंग त्याला जोडले गेले आहेत हेही तिने नमूद केले.खरतर त्यातही अनेक स्फूर्तीकथाच आहेत.आपण नीट समजावून घेतलं तर त्यातून खूप प्रेरणा मिळते,मात्र त्याचा अन्वयार्थ लावता आला पाहिजे हेही तेव्हढच खर! .ह्या मुद्द्यावर तिन भाषणाची सांगता केली .आणि टाळ्यांच्या कडकडाट विरत असतानाच ,अचानक फोन व्हायब्रेट होत आहे..हे तिला जाणवलं.

तेजस च्या आॅफिस मधून फोन होता, त्याला अचानक पोटदुखीचा त्रास होऊ लागला होता तिने लगेचच दवाखाना गाठला.........

पुढचा अर्धा पाऊण तास अक्षरशः अत्यंत जीवघेणा होता. तेजस च्या रक्तवाहिन्यांवर सूज आली आहे.आणि काविळीची लक्षण आहेत.अस डॉक्टर म्हणताच तिला घटनेचं गांभीर्य लक्षात आलं.पुढच्या तपासण्या करून लगेचच निष्कर्ष हाती आला की लिव्हर सिऱ्होसिस ची आणखी पुढची धोकादायक  पातळी आहे.आधी काही फारशी गंभीर  लक्षणे कधीच न जाणवल्याने त्यांनाही हा धक्काच होता.

  पुष्कळ शोध घेऊनही उपचारासाठी  काही योग्य दिशा मिळेना.

आणि आता  तर इतर कुटुंबीयांचा पाठिंबाही गरजेचा होता. मानसिक आधार आणि आपली माणसं आता जवळ हवीतच ... या ओढीने दोघांनीही तत्परतेने भारतात प्रयाण करायचे एकमताने ठरवले.

          पुण्यात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये जाऊन डॉ.निनाद देशमुख या यकृताच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या कडे ते सुदैवाने पोचले.

डॉक्टर देशमुखांनी ताबडतोब  निदान केले की,तेजस ला नवीन यकृत प्रत्यारोपणाची नितांत आवश्यकता आहे. अमेरीकेत,खरेतर  

जिवंतपणीच यकृत प्रत्यारोपणाची म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लाट ची शस्त्रक्रिया अतिशय दुर्मिळ होती याबद्दल  खात्री करूनच ते पुण्यात धडकले होते .

पुण्यात मात्र डॉ. निनाद देशमुख यांनी अशा अनेक अत्यंत गुंतागुंतीच्या आणि आव्हानात्मक शस्त्रक्रिया लीलया पार पाडल्या होत्या.आणि त्या अत्यंत कसबीपणाने  यशस्वीही

केल्या होत्या.त्या बद्दल सविस्तर माहिती ,प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीत्या अनेकांनी त्यांना सांगितली.त्या बद्दल चे कथन त्यांनी सोशल मीडियावरही वाचले .आणि खर तर

डॉक्टरांशी प्रत्यक्ष बोलल्यावर त्यांना खूपच धीर आला. 

              *कोणतीही निरोगी व्यक्ती आपले यकृत जिवंतपणी दान देऊ शकते आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यकृत हा असा एक किमयागार हिस्सा असतो आपल्या शरीराचा ,ज्याचा थोडा हिस्सा कापून दुसऱ्याला दिला तरी तो परत पूर्वस्थिती प्राप्त करतो,देणाऱ्याचे यकृत ही परत वाढते तेही दोन ते अडीच महिन्यात.. आणि घेणाऱ्याचेही.आणि दोघेही जण अतिशय निरोगी आणि उत्तम प्रतीचे आयुष्य जगू शकतात.हे अगदी शास्त्रीय दृष्ट्या खरे आहे" डॉक्टर म्हणाले*

 .

         मात्र असा दाता आणायचा कुठून???? तेजस समोर यक्षप्रश्न उभा ठाकला होता.त्याचे भारताशी, इथल्या नातेवाईकांशी संबंध नाही म्हणल तरी थोडे औपचारिकच राहिले होते.

      पौर्णिमा मात्र तत्क्षणी उद्गारली, " मी देऊ शकते का लिव्हर चा काही भाग डॉक्टर? "हो, नक्कीच ! डॉक्टरांनी तिला सर्व तपशीलवार  प्रक्रिया अत्यंत सोप्या आणि सविस्तर पद्धतीने समजावून सांगितली.

निसर्गाच्या सहवासात सतत असल्याने पौर्णिमा अत्यंत निरोगी होती.आणि दोघेही सतत गिर्यारोहण करत असल्याने खर तर तेजस ही चांगलाच काटक होता. त्यालाही इतर कोणतेच प्रकृती अस्वास्थ्य असे नव्हते.त्या मुळे सर्व तपासण्या अतिशय तत्परतेने होऊन पौर्णिमा ही यकृत देण्यास अत्यंत सक्षम असल्याचे सिद्ध झाले.

 आपल्यासाठी  आपली पौर्णिमा कोणत्या दिव्यातून जायला तयार झाली आहे हे जाणवून तेजस खूप हळवा झाला होता. आपण तिच्या जागी असतो तर इतक्या सहजपणे आपणही असाच निर्णय घेतला असता का??? काय वाटतं असेल पौर्णिमाला..? कोणती प्रेरणा काम करत असेल?? त्याच डोकं विचारांनी सुन्न झालं होत.मागील सर्व संभाषण आठवून त्याला पौर्णिमाच्या डोळ्याला डोळा भिडवायची पण हिम्मत होईना.तिच्या पुढेही तिचं उत्तम करिअर होतच की..त्याला आता नाही म्हणल तरी खीळ बसेल आणि त्याला जबाबदार मी असेन.  अजून अपत्य नाही याचा त्याला त्याक्षणी दिलासा च वाटला.

      इतक्या सहज इतका मोठा आणि   आव्हानात्मक

निर्णय कसा घेतला असेल तिनं? माझ्याजागी पौर्णिमाला काही झालं असतं तर कसा रिॲक्ट झालो असतो मी? काय विचार केला असता? कोणाला दोष दिला असता? डॉक्टर म्हणाले की हा लाईफ स्टाईल डिसिज आहे..म्हणजे नेमक काय समजायचं? तस तर मी फार ताळतंत्र सोडून कधीच वागलो नाही,तरीपण माझ्या वाट्याला हा असा भयंकर आजार का यावा?मी खूप स्वकेंद्रित,चंगळवादी झालोय का ? पण स्वतःच सुख तर जो तो शोधतोच की, त्यात काय अस मोठसं?नक्की कुठे चुकतय? आणि पौर्णिमा,.. तिला मनातून काय वाटत असेल, माझाबद्दल,सहानुभूती,कीव की दयाबुद्धी..वरवर तर खूप शांत दिसते,पण मनात काय वादळ असेल तिच्या?आणि आई बाबा इतर नातेवाईक काय विचार करत असतील?

   खर तर ही वेळ योग्य नाही म्हणून कदाचित गप्प असतील. नाहीतर माझ्यासाठी  किती काय काय करत आहेत... माझ्यासाठी,केव्हढी धावपळ, केवढी सपोर्ट सिस्टीम उभी केली आहे इथे सगळ्यांनी.कसे आभार मानावेत यांचे? आणि आभार मानायला तरी मी असेन ना अस्तित्वात...??

तेजसला  निरनिराळ्या प्रश्नांचे डंख डसत होते,घायाळ करत होते.

     मात्र या उलट पौर्णिमाचे डोळे कृतार्थ दिसत होते. "डॉक्टर, माझ्या जोडीदाराचा प्राण परत मिळवण्याची प्रेरणा मला दिली ती माझ्या सवित्रिनीच..हो तीच पुराणकथेतील सत्यवान सावित्री मधील तिच ती सावित्री.मला ती कधीच अंधश्रद्धा वाटली नाही उलट मला तिचं फाईटींग स्पिरीट खूप इंस्पिरेटींग वाटत आलं आहे डॉक्टर.आजिबात न घाबरता हा निर्णय घ्यायची प्रेरणा मला मिळाली ती माझ्या सावित्रीकडूनच ..........डॉक्टर ..अगदी खर ते सांगते.मी तिचंच अनुकरण करणार ,माझा तेजस खडखडीत बरा होईल डॉक्टर.आज चक्क पेशंट च डॉक्टर ला धीर देत होता.माझी वटपौर्णिमे ची पूजा फळाला येणारच.

    आणि खरोखर दोघांच्याही शस्त्रक्रिया उत्तम पार पडल्या. अपेक्षेपेक्षा खूप भराभर तेजस ची तब्येत सुधारत गेली.रोज ध्यानधारणा करून 'सकारात्मक चेतनाशक्ती' त्याच्या पर्यंत नित्यनेमाने पोचवणारी आधुनिक सावित्री त्याच्या साठी जीवनदायिनी ठरली होती.पौर्णिमा ही उत्कृष्ट पद्धतीने रिकव्हर होत होती.

      डॉक्टर निनाद देशमुख आणि त्यांच्या पूर्ण टीमने ज्या खुबीने ,बारकाईने आणि तपशीलवार गोष्टी समजावून सांगितल्या होत्या ,सतत संवाद साधला जात होता,त्या मुळे आता ते  सर्वजण आणि डॉक्टर जणू त्यांच्या कुटुंबाचाच एक भाग बनले होते.


अमेरिकेत असताना घेतलेल्या ,  कागदोपत्री नोंदी ठेवणाऱ्या  ,आणि कोरड्या तांत्रिक उपचार पद्धतीपेक्षा इथला अत्यंत भावनापूर्ण ,संवेदनशील आणि माणुसकीचा गहिवर असणारा उपचारांचा  अनुभव घेतल्यावर तेजसच्या मनाच्या तारा छेडल्या गेल्या नसत्या तरच नवल!  


     त्याच्या दुपटीने तेज पूर्णिमाच्या  चेहऱ्यावर आले होते .आपल्या पतीचे प्राण मृत्यूच्या दाढेतून अक्षरशः खेचून आणल्यावर आतातरी  तुझी ' सत्यवान सावित्री ची ' गोष्ट म्हणजे नुसतं थोतांड आहे, हे तिला आता कधीच ऐकायला लागणार नव्हतं.


    आणि त्यापेक्षाही मोठ्ठा धक्का तिला तेव्हा बसला जेव्हा तेजसने डॉ.निनाद देशमुख यांना आपल्या तिकडच्या घरी अगदी सपत्नीक येऊन रहायचे आग्रहाचे निमंत्रण दिले तेही वटपौर्णिमेच्या सुमुहूर्तावर अगदी तिकिटासह.

      *फक्त लक्ष्मी देवतेची आराधना करणारा तेजस आता मात्र सावित्री देवीचे आजन्म न फिरणारे ऋण मनोमन मान्य करून कृतज्ञ झाला होता* .

लेखन. क्षितिजा आगाशे

मो. 9881095563

✨✨✨✨✨

आपल्या प्रतिक्रिया ऐकायला उत्सुक आहे.🙏🙏🙏🙏🙏

एका सैनिकाच्या पत्नीची वटपौर्णिमा!*

 *एका सैनिकाच्या पत्नीची वटपौर्णिमा!*


*शहीद विक्रांत सबनीस यांच्या सुविद्य पत्नीने २-३ वर्षापूर्वी एका  blog वर लिहिलेला भावूक लेख.*


 *प्रिय विक्रांत,*

कसा आहेस?

मी ठीक. 

सॉरी, काल लिहू शकले नाही. 

काल आपल्या पियुची शाळा सुरु झाली. मागच्या आठवड्यात जमलं नाही, म्हणून काल रात्री तिच्या वह्या पुस्तकांना कव्हर्स घालण्याचा 'सोहळा’ पार पडला. 

'सोहळा’च तो! कोऱ्या करकरीत पुस्तकांच्या सुवासाचं अत्तर शिंपडून पार पडणारा ! 

थोडक्यात...म्हणून काल लिहिणं जमलं नाही. 


आज वटपौर्णिमा होती. तू 'गेल्या'नंतरची पहिली.... 

काल लोकलच्या डब्यात कुणीतरी विषय काढला.


मी गप्पांमधून अंग काढत ट्रेनच्या खिडकीतून दिसणाऱ्या काळोखात बघत बसले. 

आपल्या लग्नापूर्वी तू सांगितलेला जोक आठवला - वटपौर्णिमेला बायका वडाजवळ काय मागतात ? - 'वडा-पाव' ! 

तुझ्या तोंडून प्रथम ऐकला तेव्हा केव्हढी हसले होते मी ! आठवतंय नं ?

 

आणखी एक प्रसंग आठवला. 

*आपलं नुकतंच लग्न झालं होतं. माझ्या एकंदरीत 'उत्साहावरून' सासुबाईंनी माझं मन ओळखलं असावं. माझा हात धरून मला सोसायटीतल्या वडाजवळ घेऊन गेल्या. मला म्हणाल्या उद्या सकाळी आपल्याला इथे येऊन पूजा करायची आहे. मी म्हटलं 'माझा विश्वास नाही'.*

*तर म्हणाल्या,’या निमित्ताने वडाला नमस्कार करायचा. इतकी वर्ष इथे उभा राहून तो आपल्याला सावली देतोय त्याबद्दल त्याचे आभार मानायचे.*


*परंपरेपेक्षा मला ही कृतज्ञतेची भावना जास्त भावली.*

 मी सासूबाईंबरोबर दर वर्षी पूजा करू लागले. 


आज सकाळी पुजेची थाळी घेऊन वडाजवळ गेले. सोबत सासूबाई होत्या. 

वडाजवळ उभी राहिले. बराच वेळ निःशब्द !


अचानक काय वाटलं माहित नाही -

*भरल्या डोळ्यांनी आणि थरथरत्या हातांनी वडाला एक salute ठोकला !*

*Afterall, तू मेजर होतास, विक्रांत !*


सासूबाई मला सावरायला म्हणून आल्या होत्या, पण आता त्यांचाच बांध फुटला. 


आधीच सोसायटीतल्या बायकांनी मी तिथे गेल्यामुळे भुवया उंचावल्या होत्या. 

आता तर मला ऐकू जाईल अशी कुजबुज सुरु झाली. 

'हिला आणायचं का इथे ? सबनीस काकींना तरी कळायला हवं होतं!'

 गर्दीतून कोणीतरी हळूच म्हणालं.


माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या त्या बायकांशी मला हुज्जत घालायची नव्हती, कारण मी काय करत होते याबद्दल मला विश्वास होता. 


विक्रांत, 

आपण या जन्मात भेटलो खरे -

पण तू 'मला असा' किती मिळालास? 

पुढचे सात जन्मच काय- सगळे जन्म तू मला हवा आहेस... 

हे, खरं तर, घरी बसून देखील मागता आलं असतं. 

पण का कोणास ठाऊक, मला वडाजवळ जावसं वाटलं. 

घरातल्या एखाद्या आजोबांसारखा असलेला तो वड माझं म्हणणं शांतपणे ऐकून घेईल असं वाटलं.

 

त्या दिवशी मला पहिल्यांदा जाणवलं की परंपरा-रूढी, प्रतीकं तुम्ही माना किंवा मानू नका ,

पण तुमच्या एकूण 'असण्याला'च या सगळ्या गोष्टी चिकटलेल्या असतात. 


तू असतास तर मला वेड्यात काढलं असतंस कारण तुझा या कशावर विश्वास नव्हता. 


पण एक सांगू ? विश्वास-अविश्वास या सगळ्याच्या पलीकडे एक प्रांत असतो.

मी त्याला 'instinct' म्हणते. 

भिकाऱ्याला कधीही भीक न देणारे आपण एखादवेळी पट्कन कुणालातरी भीक देऊन मोकळे का होतो, 

याला जसं लॉजिक नसतं तसंच काहीसं. 

अशावेळी आपण फक्त आपल्या 'instinct' ने दिलेली आज्ञा पाळत असतो. 


*सोळा डिसेंबरच्या रात्री बॉर्डरवर शत्रूशी चकमक झाली. फारशी कुमक जवळ नसताना तू कोणाच्या आज्ञेने लढलास आणि शहीद झालास?* 

*Vikrant, you just followed your instinct !*


वटपौर्णिमेला मला वडाजवळ पूजा करताना पाहून शेरे मारणाऱ्या समाजाबद्दल मला राग नाही, पण गंमत वाटते. 


*सो कॉल्ड प्रगतीच्या नावाखाली स्त्रियांच्या हातात सिगरेट आणि दारूचा ग्लास खपवून घेणारा समाज विधवा स्त्रीचा वड पुजण्याचा हक्क नाकारतो.* 


*आपल्या मुलीबाळी गणेशोत्सवात 'शीला की जवानी' म्हणत नाचलेल्या चालतात, पण पिरियड्स चालू असलेल्या स्त्रीला देवघरात यायचा मज्जाव असतो !* 

*हा paradox मला मान्य करावा लागतो*

तुम्ही ढीग शिका, पदव्या मिळवा, जग जिंका -


 *माझ्यासारख्या एकट्या बाईला समाजात राहायचं असेल तर जगण्यातल्या या विसंगतीला पर्याय नाही.* 


आर्मीत गेल्यानंतर तू आम्हा सिविलीयन्सना नेहमी नावं ठेवायचास. 'तुम्हाला जगण्याची शिस्त नाही' म्हणायचास.

नसेल आम्हाला शिस्त. *पण इथेही कुठलीही गोष्ट लढूनच मिळवावी लागते.*


*मी ही रोज लढते....*


*भ्रष्टाचाराने पोखरलेल्या देशाचं रक्षण करण्यासाठी. माझ्या नवऱ्याने रक्त सांडलं या जाणीवेसह जगत राहण्याबद्दल कुठलं शौर्यचक्र मिळणार नाही हे माहित असून लढते*.

 

*पियु, सासूबाई आणि बाबांसमोर कणखर राहण्याचा जो मी 'अभिनय' करते त्याबद्दल कुठलंही award मिळणार नाही हे माहित असून लढते.* 


*आपल्या पियुच्या न संपणाऱ्या प्रश्नांना न कंटाळता उत्तरं देण्याबद्दल कुणी पाठ थोपटणार नाही हे माहित असून लढते.*


*I am a soldier, I fight where I am told, and I win where I fight !*

तूच म्हणायचास ना? 


थांबते. पियुला गोष्ट सांगायची वेळ झाली. 

उद्या भेटू. 

बाय!

💐🙏

विकसित भारत की ताकत इनफ्रास्टचर

 

Indian Infra Matching Foreign Level. Let Us be Proud. 

Jai Hind.  ,विकसित भारत की ताकत इनफ्रास्टचर के क्षेत्र मे


जागतिक योग आणि संगीत

 आरवलीत श्री आदित्यनारायणाचं देऊळ आहे. गेली सुमारे १४७ वर्ष आदित्यनारायणाचा उत्सव सुरू आहे. या उत्सवात मुग्धा वैशम्पायन चे हे पहिलंच वर्ष. लळिताच्या कीर्तनाच्या वेळी या पदाने गायनसेवा केली. आणि तब्येला साथ प्रथमेश लघाटे, आज जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने हा व्हिडिओ शेअर करते आहे. तुम्हा सर्वांना जागतिक योग आणि संगीत दिनाच्या निरोगी आणि सुरेल शुभेच्छा !


अरे पेन्शन पेन्शन

 ((अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर,या कवितेवरून)

-------------------------- 

(प्रत्येक ओळीत 16 शब्द असतील असा प्रयत्न केला आहे)

-------------------------------   


अरे पेन्शन पेन्शन,जसा मिळतो पगार

आधी घेतले कष्ट ,मरे पर्यंत नाही घोर।।


अरे पेन्शन पेन्शन, उगा कधी माजू नये 

कामधेनूच्या दुधाला, कमी कधी म्हणू नये।।


अरे पेन्शन पेन्शन ,आहे आनंदी आनंद 

माऊलीरुपी बँकेचे, रतीबाचे आहे दूध।


अरे पेन्शन पेन्शन ,खिसा नेहमी गरम 

पोटापाण्याची असे सोय, नाही कसला गम।


अरे पेन्शन पेन्शन, तोट्याचा नाही विचार

सहा महिन्यांनी डीए,खात्रीने तो मिळणार।


अरे पेन्शन पेन्शन ,तारीख ती एकतीस 

कॅलेंडर वर नजर,फिकीर ना जीवास।


अरे पेन्शन पेन्शन,दोन जिवांचा विचार,

देतो सुखाला होकार, अन् दुखाला नकार ।


अरे पेन्शन पेन्शन, नित्य रविचा उदय।

अखंडित वाहे झरा, कशाला उरते भय।?


अरे पेन्शन पेन्शन, तोट्याचा नाही विचार

संसारी गाडा चाले न कधी करी कुरकुर।


अरे पेन्शन पेन्शन,दोन जीवांचे आरोग्य 

नेहमी नगद,औषध उपचाराचे भाग्य। 


अरे पेंशन पेंशन जशी भिशीची ती भेळ

दोस्तांचा गप्पा टप्पा आनंद मिळतो निखळ।


अरे पेन्शन पेन्शन,दोन जीवांचा संवाद

माय ती एसबीआय, परमेश्वर ती निर्विवाद।


अरे पेन्शन पेन्शन,आहे भारी जादूगार 

दोन जीवांचा तो मंत्र,त्याच्यावरती मदार।


अरे पेन्शन पेन्शन,आधी बॅक ही थोर

माझ्या दैवाला नमून, नाही त्याचा विसर|

Featured post

Lakshvedhi