Saturday, 22 June 2024

जिवंतपणी यकृत दान'

 *ही  वटपौर्णिमेच्या निमित्याने लिहिलेली कथा १००%सत्य असून त्यात  उल्लेख केलेली सर्व माहिती आणि डॉक्टरांचे तपशील तसेच सर्व माहिती शास्त्रीय असून वैद्यकीय मार्गदर्शनाखाली 'जिवंतपणी  यकृत दान' या संकल्पनेच्या जनहितार्थ प्रसार करण्याच्या हेतूनं लिहिली आहे*

अधिक माहितीसाठी संपर्क ..*डॉ.निनाद देशमुख.(लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन)

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल* पुणे.

Mob:9158883611

Mail: drninaddeshmukh@ yahoo.com

https://organtransplantpune.com* . 

लेखन : *क्षितिजा आगाशे

आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.

*ही कथा आपल्या स्नेही परिचित शेजारी,डॉक्टर यांच्यापर्यंत पोचवून आपण ह्या जनजागृती अभियानात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान देणार आहात*

तेव्हा ही कथा आवर्जून फॉरवर्ड करावी ही नम्र विनंती🙏🙏 .

तिसरी सत्यकथा

         *किमया*

आजचा म्हणजे खास वटपौर्णिमेचा दिवस तिला' पौर्णिमाला 'खूप खूप आवडायचा.ती जाणीवपूर्वक उपास करायची.नुसती फळ आणि दूध. आणि हो, खास ' वटपौर्णिमेच मेडिटेशन ' पण.भरपूर ऑक्सिजन देणाऱ्या या झाडाशी तिच नातं अगदी खास मैत्रीचं होत.आणि 

 'एनव्हायरमेंटल सायन्स '  मध्येच पुढचे शिक्षण घेऊन त्यातच अधिक सखोल संशोधन करायचं हेच तिच स्वप्न होत, या बाबतीत तिला तिच्या आईबाबांचाही पूर्ण पाठिंबा होताच.

       आणि तेजस तिचा नवरा तोही भाळला होता तो तिच्या असामान्य बुद्धिमत्तेवरच. दिसायला अगदी लाखात एक नसली तरी चारचौघीत ती आपल्या बुद्धीच्या तेजाने उठून दिसत असे.

       मात्र इथे अमेरिकेत स्थायिक झाल्यापासून इथल्या पाश्चात्य अन् अत्याधुनिक अशा लाईफस्टाईल कडे त्याची जरा अंमळ जास्तच ओढ आहे अस राहून राहून तिच्या मनात येत रहायचं.आजही तिने अगदी भारतीय पारंपरिक पोशाख साडी, नथ,गजरा परिधान केलेला पाहून त्याला तिला चिडवायची लहर आलीच.तो घसा  खाकरत  चेष्टेच्या सुरात तिला म्हणाला.. बर म्हणजे तुमच्या त्या सावित्रीने म्हणे त्या सत्यवानाचे गेलेले प्राण परत आणले,बरोबर ना?


 ......काय तू ,अग जग कुठे चालल आहे आणि तू एव्हढी सायन्स स्टुडंट आणि तू कशी अशा थोतांडावर विश्वास ठेवतेस? कमाल वाटते मला तुझी!

त्या वर तितक्याच शांतपणे  ती म्हणाली , "किती वेळा झालाय हा विषय तेजस? अरे शब्दशः नसतात अशा गोष्टी घ्यायच्या! त्याचा अर्थ रूपकात्मक असतो.आणि अर्थातच साऱ्यांना झाडांचं महत्त्व समजावं ,त्यांचं रक्षण करावं म्हणून त्या सतत

आपल्या मनावर बिंबवलेल्या असतात.

आणि  हो आणखी एक , तू हा विचार कर ना,की...माझी आवडती  सावित्री किती धीराची होती,तिन  लगेच गिव्ह अप नाही केलं,सी हर स्पिरीचुआलीटी !सी हर कॉन्फिडन्स!"

मात्र त्याने आपलं चिडवण चालूच ठेवलं.ओके ओके म्हणजे आता तिच्यापासून प्रेरणा घेऊन तू माझे प्राण परत आणणार आहेस तर हरकत नाहीये अजिबात माझी .अग मग आधी मला त्यासाठी मरा.....त्याला मध्येच तोडत ती म्हणाली,

"ए मला प्लीज ड्रॉप कर ना जाताजाता, 'क्रिएटिव्ह विमेंन्स क्लब'  मध्ये.आज सगळ्या महाराष्ट्रीयन लेडीज चा प्रोग्राम आहे. आणि माझे प्रेझेंटेशन आहे औषधी वनस्पती आणि त्याचे रोजच्या जीवनातील महत्त्व या विषयावर."

त्याने  त्वरित गाडी काढली..आणि ती त्याला बजावत  म्हणाली  ऐक,  "येताना मी येईन माझी माझी,तो पर्यंत माझी गाडी रिपेअर होऊन जाईल.डोन्ट वरी.काळजी करू नको ओके?," 

     तिचं लेक्चर अत्यंत अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद तर होतच ,परंतु रोजच्या माहितीतल्या झाडांचे शास्त्रीय उपयोग जसे तुळस,जास्वंद,बेल,दुर्वा आणि इतर अनेक ...ते सगळं ऐकून समस्त

महिलागण अतिशय प्रभावित झाला होता. ती अभ्यासपूर्वक आपले विचार मांडत होती स्लाईड ,त्यांची शास्त्रीय नावे,त्यांचे गुणधर्म सगळं तिनं तपशीलवार मांडल.त्याच्यावरील संशोधन,त्याचे निष्कर्ष सगळं मांडल.आणि आधुनिक  काळाला अनुसरून 'ह्या' झाडांचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने अनेक पौराणिक प्रसंग त्याला जोडले गेले आहेत हेही तिने नमूद केले.खरतर त्यातही अनेक स्फूर्तीकथाच आहेत.आपण नीट समजावून घेतलं तर त्यातून खूप प्रेरणा मिळते,मात्र त्याचा अन्वयार्थ लावता आला पाहिजे हेही तेव्हढच खर! .ह्या मुद्द्यावर तिन भाषणाची सांगता केली .आणि टाळ्यांच्या कडकडाट विरत असतानाच ,अचानक फोन व्हायब्रेट होत आहे..हे तिला जाणवलं.

तेजस च्या आॅफिस मधून फोन होता, त्याला अचानक पोटदुखीचा त्रास होऊ लागला होता तिने लगेचच दवाखाना गाठला.........

पुढचा अर्धा पाऊण तास अक्षरशः अत्यंत जीवघेणा होता. तेजस च्या रक्तवाहिन्यांवर सूज आली आहे.आणि काविळीची लक्षण आहेत.अस डॉक्टर म्हणताच तिला घटनेचं गांभीर्य लक्षात आलं.पुढच्या तपासण्या करून लगेचच निष्कर्ष हाती आला की लिव्हर सिऱ्होसिस ची आणखी पुढची धोकादायक  पातळी आहे.आधी काही फारशी गंभीर  लक्षणे कधीच न जाणवल्याने त्यांनाही हा धक्काच होता.

  पुष्कळ शोध घेऊनही उपचारासाठी  काही योग्य दिशा मिळेना.

आणि आता  तर इतर कुटुंबीयांचा पाठिंबाही गरजेचा होता. मानसिक आधार आणि आपली माणसं आता जवळ हवीतच ... या ओढीने दोघांनीही तत्परतेने भारतात प्रयाण करायचे एकमताने ठरवले.

          पुण्यात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये जाऊन डॉ.निनाद देशमुख या यकृताच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या कडे ते सुदैवाने पोचले.

डॉक्टर देशमुखांनी ताबडतोब  निदान केले की,तेजस ला नवीन यकृत प्रत्यारोपणाची नितांत आवश्यकता आहे. अमेरीकेत,खरेतर  

जिवंतपणीच यकृत प्रत्यारोपणाची म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लाट ची शस्त्रक्रिया अतिशय दुर्मिळ होती याबद्दल  खात्री करूनच ते पुण्यात धडकले होते .

पुण्यात मात्र डॉ. निनाद देशमुख यांनी अशा अनेक अत्यंत गुंतागुंतीच्या आणि आव्हानात्मक शस्त्रक्रिया लीलया पार पाडल्या होत्या.आणि त्या अत्यंत कसबीपणाने  यशस्वीही

केल्या होत्या.त्या बद्दल सविस्तर माहिती ,प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीत्या अनेकांनी त्यांना सांगितली.त्या बद्दल चे कथन त्यांनी सोशल मीडियावरही वाचले .आणि खर तर

डॉक्टरांशी प्रत्यक्ष बोलल्यावर त्यांना खूपच धीर आला. 

              *कोणतीही निरोगी व्यक्ती आपले यकृत जिवंतपणी दान देऊ शकते आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यकृत हा असा एक किमयागार हिस्सा असतो आपल्या शरीराचा ,ज्याचा थोडा हिस्सा कापून दुसऱ्याला दिला तरी तो परत पूर्वस्थिती प्राप्त करतो,देणाऱ्याचे यकृत ही परत वाढते तेही दोन ते अडीच महिन्यात.. आणि घेणाऱ्याचेही.आणि दोघेही जण अतिशय निरोगी आणि उत्तम प्रतीचे आयुष्य जगू शकतात.हे अगदी शास्त्रीय दृष्ट्या खरे आहे" डॉक्टर म्हणाले*

 .

         मात्र असा दाता आणायचा कुठून???? तेजस समोर यक्षप्रश्न उभा ठाकला होता.त्याचे भारताशी, इथल्या नातेवाईकांशी संबंध नाही म्हणल तरी थोडे औपचारिकच राहिले होते.

      पौर्णिमा मात्र तत्क्षणी उद्गारली, " मी देऊ शकते का लिव्हर चा काही भाग डॉक्टर? "हो, नक्कीच ! डॉक्टरांनी तिला सर्व तपशीलवार  प्रक्रिया अत्यंत सोप्या आणि सविस्तर पद्धतीने समजावून सांगितली.

निसर्गाच्या सहवासात सतत असल्याने पौर्णिमा अत्यंत निरोगी होती.आणि दोघेही सतत गिर्यारोहण करत असल्याने खर तर तेजस ही चांगलाच काटक होता. त्यालाही इतर कोणतेच प्रकृती अस्वास्थ्य असे नव्हते.त्या मुळे सर्व तपासण्या अतिशय तत्परतेने होऊन पौर्णिमा ही यकृत देण्यास अत्यंत सक्षम असल्याचे सिद्ध झाले.

 आपल्यासाठी  आपली पौर्णिमा कोणत्या दिव्यातून जायला तयार झाली आहे हे जाणवून तेजस खूप हळवा झाला होता. आपण तिच्या जागी असतो तर इतक्या सहजपणे आपणही असाच निर्णय घेतला असता का??? काय वाटतं असेल पौर्णिमाला..? कोणती प्रेरणा काम करत असेल?? त्याच डोकं विचारांनी सुन्न झालं होत.मागील सर्व संभाषण आठवून त्याला पौर्णिमाच्या डोळ्याला डोळा भिडवायची पण हिम्मत होईना.तिच्या पुढेही तिचं उत्तम करिअर होतच की..त्याला आता नाही म्हणल तरी खीळ बसेल आणि त्याला जबाबदार मी असेन.  अजून अपत्य नाही याचा त्याला त्याक्षणी दिलासा च वाटला.

      इतक्या सहज इतका मोठा आणि   आव्हानात्मक

निर्णय कसा घेतला असेल तिनं? माझ्याजागी पौर्णिमाला काही झालं असतं तर कसा रिॲक्ट झालो असतो मी? काय विचार केला असता? कोणाला दोष दिला असता? डॉक्टर म्हणाले की हा लाईफ स्टाईल डिसिज आहे..म्हणजे नेमक काय समजायचं? तस तर मी फार ताळतंत्र सोडून कधीच वागलो नाही,तरीपण माझ्या वाट्याला हा असा भयंकर आजार का यावा?मी खूप स्वकेंद्रित,चंगळवादी झालोय का ? पण स्वतःच सुख तर जो तो शोधतोच की, त्यात काय अस मोठसं?नक्की कुठे चुकतय? आणि पौर्णिमा,.. तिला मनातून काय वाटत असेल, माझाबद्दल,सहानुभूती,कीव की दयाबुद्धी..वरवर तर खूप शांत दिसते,पण मनात काय वादळ असेल तिच्या?आणि आई बाबा इतर नातेवाईक काय विचार करत असतील?

   खर तर ही वेळ योग्य नाही म्हणून कदाचित गप्प असतील. नाहीतर माझ्यासाठी  किती काय काय करत आहेत... माझ्यासाठी,केव्हढी धावपळ, केवढी सपोर्ट सिस्टीम उभी केली आहे इथे सगळ्यांनी.कसे आभार मानावेत यांचे? आणि आभार मानायला तरी मी असेन ना अस्तित्वात...??

तेजसला  निरनिराळ्या प्रश्नांचे डंख डसत होते,घायाळ करत होते.

     मात्र या उलट पौर्णिमाचे डोळे कृतार्थ दिसत होते. "डॉक्टर, माझ्या जोडीदाराचा प्राण परत मिळवण्याची प्रेरणा मला दिली ती माझ्या सवित्रिनीच..हो तीच पुराणकथेतील सत्यवान सावित्री मधील तिच ती सावित्री.मला ती कधीच अंधश्रद्धा वाटली नाही उलट मला तिचं फाईटींग स्पिरीट खूप इंस्पिरेटींग वाटत आलं आहे डॉक्टर.आजिबात न घाबरता हा निर्णय घ्यायची प्रेरणा मला मिळाली ती माझ्या सावित्रीकडूनच ..........डॉक्टर ..अगदी खर ते सांगते.मी तिचंच अनुकरण करणार ,माझा तेजस खडखडीत बरा होईल डॉक्टर.आज चक्क पेशंट च डॉक्टर ला धीर देत होता.माझी वटपौर्णिमे ची पूजा फळाला येणारच.

    आणि खरोखर दोघांच्याही शस्त्रक्रिया उत्तम पार पडल्या. अपेक्षेपेक्षा खूप भराभर तेजस ची तब्येत सुधारत गेली.रोज ध्यानधारणा करून 'सकारात्मक चेतनाशक्ती' त्याच्या पर्यंत नित्यनेमाने पोचवणारी आधुनिक सावित्री त्याच्या साठी जीवनदायिनी ठरली होती.पौर्णिमा ही उत्कृष्ट पद्धतीने रिकव्हर होत होती.

      डॉक्टर निनाद देशमुख आणि त्यांच्या पूर्ण टीमने ज्या खुबीने ,बारकाईने आणि तपशीलवार गोष्टी समजावून सांगितल्या होत्या ,सतत संवाद साधला जात होता,त्या मुळे आता ते  सर्वजण आणि डॉक्टर जणू त्यांच्या कुटुंबाचाच एक भाग बनले होते.


अमेरिकेत असताना घेतलेल्या ,  कागदोपत्री नोंदी ठेवणाऱ्या  ,आणि कोरड्या तांत्रिक उपचार पद्धतीपेक्षा इथला अत्यंत भावनापूर्ण ,संवेदनशील आणि माणुसकीचा गहिवर असणारा उपचारांचा  अनुभव घेतल्यावर तेजसच्या मनाच्या तारा छेडल्या गेल्या नसत्या तरच नवल!  


     त्याच्या दुपटीने तेज पूर्णिमाच्या  चेहऱ्यावर आले होते .आपल्या पतीचे प्राण मृत्यूच्या दाढेतून अक्षरशः खेचून आणल्यावर आतातरी  तुझी ' सत्यवान सावित्री ची ' गोष्ट म्हणजे नुसतं थोतांड आहे, हे तिला आता कधीच ऐकायला लागणार नव्हतं.


    आणि त्यापेक्षाही मोठ्ठा धक्का तिला तेव्हा बसला जेव्हा तेजसने डॉ.निनाद देशमुख यांना आपल्या तिकडच्या घरी अगदी सपत्नीक येऊन रहायचे आग्रहाचे निमंत्रण दिले तेही वटपौर्णिमेच्या सुमुहूर्तावर अगदी तिकिटासह.

      *फक्त लक्ष्मी देवतेची आराधना करणारा तेजस आता मात्र सावित्री देवीचे आजन्म न फिरणारे ऋण मनोमन मान्य करून कृतज्ञ झाला होता* .

लेखन. क्षितिजा आगाशे

मो. 9881095563

✨✨✨✨✨

आपल्या प्रतिक्रिया ऐकायला उत्सुक आहे.🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi