Saturday, 22 June 2024

अरे पेन्शन पेन्शन

 ((अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर,या कवितेवरून)

-------------------------- 

(प्रत्येक ओळीत 16 शब्द असतील असा प्रयत्न केला आहे)

-------------------------------   


अरे पेन्शन पेन्शन,जसा मिळतो पगार

आधी घेतले कष्ट ,मरे पर्यंत नाही घोर।।


अरे पेन्शन पेन्शन, उगा कधी माजू नये 

कामधेनूच्या दुधाला, कमी कधी म्हणू नये।।


अरे पेन्शन पेन्शन ,आहे आनंदी आनंद 

माऊलीरुपी बँकेचे, रतीबाचे आहे दूध।


अरे पेन्शन पेन्शन ,खिसा नेहमी गरम 

पोटापाण्याची असे सोय, नाही कसला गम।


अरे पेन्शन पेन्शन, तोट्याचा नाही विचार

सहा महिन्यांनी डीए,खात्रीने तो मिळणार।


अरे पेन्शन पेन्शन ,तारीख ती एकतीस 

कॅलेंडर वर नजर,फिकीर ना जीवास।


अरे पेन्शन पेन्शन,दोन जिवांचा विचार,

देतो सुखाला होकार, अन् दुखाला नकार ।


अरे पेन्शन पेन्शन, नित्य रविचा उदय।

अखंडित वाहे झरा, कशाला उरते भय।?


अरे पेन्शन पेन्शन, तोट्याचा नाही विचार

संसारी गाडा चाले न कधी करी कुरकुर।


अरे पेन्शन पेन्शन,दोन जीवांचे आरोग्य 

नेहमी नगद,औषध उपचाराचे भाग्य। 


अरे पेंशन पेंशन जशी भिशीची ती भेळ

दोस्तांचा गप्पा टप्पा आनंद मिळतो निखळ।


अरे पेन्शन पेन्शन,दोन जीवांचा संवाद

माय ती एसबीआय, परमेश्वर ती निर्विवाद।


अरे पेन्शन पेन्शन,आहे भारी जादूगार 

दोन जीवांचा तो मंत्र,त्याच्यावरती मदार।


अरे पेन्शन पेन्शन,आधी बॅक ही थोर

माझ्या दैवाला नमून, नाही त्याचा विसर|

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi