Monday, 20 May 2024

लोकसभा मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात महिला,

 लोकसभा मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात महिला,

युवा व दिव्यांग विशेष संचलित केंद्र सज्ज

निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी


       मुंबईदि. 19 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात 20 मे 2024 रोजी सकाळी ते सायंकाळी वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्याअनुषंगाने मुंबई उपनगर जिल्ह्यातील 27-  मुंबई उत्तर पश्चिममधील विधानसभा मतदारसंघात प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी हजार 361 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच या विधानसभा मतदारसंघात महिलायुवा व दिव्यांग विशेष संचलित केंद्रे देखील  सज्ज झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी सांगितले.

            27 मुंबई उत्तर पश्चिम अंतर्गत 158- जोगेश्वरी पूर्व, 159- दिंडोशी, 163- गोरेगाव, 164- वर्सोवा, 165- अंधेरी पश्चिम, 166- अंधेरी असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून या सहा मतदारसंघामध्ये हजार 753 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्न पार पडावी यासाठी काटेकोरपणे नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी 240 क्षेत्रीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली असून हजार 361 इतक्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. याचबरोबर मतदानाच्या दिवशी 828 वाहने निवडणूक यंत्रणेत दाखल करण्यात आली असून मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी बंदोबस्तासाठी पोलिसही तैनात करण्यात आले आहे.

            लोकशाहीच्या या उत्सवात मुंबई उपनगर जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत परिपूर्ण तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी आज जोगेश्वरीदिंडोशीगोरेगाववर्सोवाअंधेरी पूर्वआणि अंधेरी पश्चिम या मतदारसंघात मतदानाच्या दिवशी लागणाऱ्या सर्व साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. तसेच 27- मुंबई उत्तर पश्चिम मधील मतदान केंद्र देखील सज्ज करण्यात आली आहे. यावेळी इतर मतदान केंद्रांबरोबर महिलायुवा व दिव्यांग विशेष संचलित केंद्र हे आकर्षणाचा विषय ठरणार आहे. मतदारांना मतदानाचा सुखद अनुभव देण्यासाठी प्रशासनामार्फत योग्य नियोजन करण्यात आले असून 20 मे 2024 रोजी जास्तीत जास्त मतदारांनी आपल्या मतदारसंघातील मतदान केंद्रावर जावून मतदानाचा हक्क बजावा असे आवाहन देखील निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सूर्यवंशी यांनी केले आहे.

 

ही आहेत महिला संचलित केंद्रे

 

1) 158 जोगेश्वरी पूर्व- एकूण मतदार- 676 असून मतदान केंद्र क्रमांक -269 कनोसा हायस्कूलमहाकाली गुफा रोडअंधेरी पूर्वमुंबई-93 हे केंद्र असणार आहे.

2) 159 दिंडोशी- एकूण मतदार-  1405 असून मतदान केंद्र क्रमांक- 226 निवारा स्कूलतळमजलारुम न. 7, अर्बन निवारा कौन्सिल कॉलनीअरुणकुमार वैद्य मार्गगोरेगाव पूर्व मुंबई-65

3) 163 गोरेगाव- एकूण मतदार- 718 असून मतदान केंद्र क्रमांक- 194 जवाहर हायस्कूलतळमजलारुम नंबर 2, महात्मा गांधी रोडगोरेगाव पश्चिममुंबई-104

4) 164-  वर्सोवा- एकूण मतदार- 511 असून मतदान केंद्र क्रमांक- 208 चिल्ड्रन्स वेल्फेअर हायस्कूलरुम नंबर 1, यारी रोडवर्सोवा व्हीलेजअंधेरी पश्चिममुंबई-61

5) 165- अंधेरी पश्चिम- एकूण मतदार- 739 असून मतदान केंद्र क्रमांक- 69 उशा मित्तल इन्टिरुट्यूट ऑफ टेक्नोलॉजी एसएनडीटी वुमन्स युनिव्हर्सिटी

6) 166 अंधेरी पूर्व- एकूण मतदार- 1018 असून मतदान केंद्र क्रमांक- 63 प्रायमरी ॲकेडमी स्कूलतळमजलास्टील्ट डीमरोळ रोडअंधेरी पूर्वमुंबई-59

 

युवा संचलित केंद्र


1) 158 जोगेश्वरी पूर्व- एकूण मतदार- 1162 असून मतदान केंद्र क्रमांक -79 सेंट झेवियर्स हायस्कूलपूनमनगरमहाकाली गुफा रोडअंधेरी पूर्व.

2) 159 दिंडोशी- एकूण मतदार- 792 असून मतदान केंद्र क्रमांक – 32 अनुदत्त विद्यालयाइंग्लिश मीडियम स्कूलतळमजलारुम नंबर 16, अकुर्ली रोडक्रांतिनगरकांदिवली पूर्वमुंबई- 01

3) 163 गोरेगाव- एकूण मतदार- 870 असून मतदान केंद्र क्रमांक- 129 शंकरधाम केळवाणी मंडळ जे. एम. पटेल कॉलेज ऑफ कॉमर्स रुम नंबर 01, महात्मा गांधी रोडगोरेगावमुंबई-04

4) 164 वर्सोवा- एकूण मतदार- 1134 असून मतदान केंद्र क्रमांक- 210 चिल्ड्रन्स वेल्फेअर हायस्कूलरुम नंबर 1, यारी रोडवर्सोवा व्हीलेजअंधेरी पश्चिम मुंबई-61

5) 165 अंधेरी पश्चिम- एकूण मतदार- 889 असून मतदान केंद्र क्रमांक- 250 जमुनाबाई नर्से स्कूल नॉर्थ साऊथ रोडनंबर जुहू- विले पार्ले रोडमुंबई-49

6) 166 अंधेरी पूर्व- एकूण मतदार- 673 असून मतदान केंद्र क्रमांक- 163 श्री राम लक्ष्मी विद्यामंदिर तळमजलारुम नंबर 1, मोगरा व्हीलेज रोडअंबोली लेव्हल क्रॉसिंगअंधेरी पूर्वमुंबई-69


दिव्यांग विशेष संचलित केंद्र


1) 158 जोगेश्वरी पूर्व- एकूण मतदार- 787 असून मतदान केंद्र क्रमांक – 78 अस्मिता विद्यालय भांडारकर वाडीअलियावर जंग मार्गजोगेश्वरी पूर्व मुंबई – 60

2) 159 दिंडोशी- एकूण मतदार- 715 असून मतदान केंद्र क्रमांक – 209 मुंबई पब्लिक स्कूल दिंडोशी कॉलनी मराठी स्कूल नंबर 1, तळमजला.

3) 163 गोरेगाव- एकूण मतदार- 1384 असून मतदान केंद्र क्रमांक- 228 विवेक विद्यालय नॉथ साईड विंगतळमजलारुम नंबर सिद्धार्थनगर गोरेगावमुंबई-04

4) 164 वर्सोवा- एकूण मतदार- 462 असून मतदान केंद्र क्रमांक- 85 ए.के. हुसेन अलना इंग्लिश मीडिअम स्कूललोखंडवाला अंधेरी पश्चिमतळमजलामुंबई-53

5) 165 अंधेरी पश्चिम- एकूण मतदार- 479 असून मतदान केंद्र क्रमांक- 42 भारती विद्या भवन ए.एच. वाडिया हायस्कूलजे.पी. रोडअंधेरी पश्चिममुंबई-53

6) 166 अंधेरी पूर्व- एकूण मतदार- 1069 असून मतदान केंद्र क्रमांक- 170 श्री राम लक्ष्मी विद्यामंदिर तळमजलारुम नंबर 1, मोगरा व्हीलेज रोडअंबोली लेव्हल क्रॉसिंगअंधेरी पूर्वमुंबई-69


मी बजावला मतदानाचा हक्कआपणही बजवावा मतदानाचा हक्क

 

            भारतीय राज्यघटनेने आपल्याला मतदानाचा मौलिक अधिकार दिला आहे. या अधिकारामुळे आपण देशात सक्षम लोकशाही उभारू शकतो. आणि आपल्या देशाची संयुक्त राष्ट्रसंघात एक वेगळी ओळख निर्माण करू शकतो. त्यामुळे देशातील एक जबाबदार नागरिक म्हणून मी मतदानाचा हक्क टपाली सेवेने बजावला आहे. आज तुम्ही देखील आपला मतदानाचा हा हक्क बजवावाअसे आवाहन करते.

            निरपेक्ष आणि निर्भिड वातावरणात आपल्याला मतदान करण्याचा सुखद अनुभव मिळावा ही बाब विचारात घेऊन प्रत्येक मतदान केंद्रावर पुरेसे मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीही उपलब्ध करून देण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. याचबरोबर मतदारांना मतदानाची सुखद अनुभूती मिळावी यासाठी नाविन्यपूर्ण कल्पनांचा वापर करून मतदान केंद्रांची उभारणीही करण्यात आली आहे. मतदारांना सावलीसाठी व बसण्याची जागापिण्याच्या पाण्याची सोयदिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांना विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी 27- मुंबई उत्तर पश्चिम कार्यालयात सज्ज असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सूर्यवंशी यांनी सांगितले.


0000


मुंबई उपनगरातील मतदान केंद्रे झाली सज्ज !

 मुंबई उपनगरातील मतदान केंद्रे झाली सज्ज !

74 लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

मतदान केंद्र आणि शंभर मीटर परिसरात मोबाईल नेण्यास प्रतिबंध

        मुंबईदि. 1: मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघासाठीची मतदानासाठीची  सर्व तयारी पूर्ण झाली असून मतदानासाठीचे साहित्य घेऊन मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी मतदान केंद्रांवर पोहोचले. आता मतदान प्रक्रियेसाठी ही मतदान केंद्रे सज्ज झाली असून 20 मे रोजी  सकाळी वाजता मतदान सुरु होणार आहे. या मतदान केंद्रांना प्रतीक्षा आहे ती मतदानासाठी येणाऱ्या मतदारांची! सर्वच मतदारांनी  त्यांचा मतदानाचा हक्क बजावावाअसे आवाहन जिल्हा निवडणूक यंत्रणेने केले आहे. मतदान करण्यासाठी जाताना सोबत मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी नाहीही बाब मतदारांना आवर्जून लक्षात ठेवावी लागणार आहे.

            मुंबई उपनगर जिल्ह्यात 26- मुंबई उत्तर, 27- मुंबई उत्तर पश्चिम, 28- मुंबई उत्तर पूर्व आणि 29- मुंबई उत्तर मध्य या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघातील 7384 मतदान केंद्रांवर हे मतदान होत आहे. मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली असून आज या मतदारसंघांतील 26 विधानसभा क्षेत्रात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत मतदान साहित्याचे वाटप मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचारी यांना करण्यात आले. त्यानंतर संबंधित अधिकारी-कर्मचारी यांना नियुक्त मतदान केंद्रांवर पोहोच कऱण्यात आले. सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांना पिण्याचे पाणीसावलीची व्यवस्था कऱण्यात आली आहे. मतदार केंद्रांवर नाव शोधण्यासाठीही याठिकाणी स्वयंसेवक नियुक्त कऱण्यात आले आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता मतदारांनी सकाळीच घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावाअसे आवाहन कऱण्यात आले आहेत.

मतदान केंद्रांपासून 100 मीटर परिसरात मोबाईल आणण्यास बंदी

            लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान केंद्रापासून 100 मीटर परिसरात मोबाईल आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. मतदानाची सर्व प्रक्रिया गोपनीय आहे. मतदान केंद्रावरील गोपनीयतेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. मतदारांच्या गोपनीयतेसाठी मतदान केंद्रापासून 100 मीटर परिसरात मोबाईल आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. मतदारांनीही मतदानासाठी येताना मोबाईल आणू नयेतअसेही आवाहन जिल्हा निवडणूक यंत्रणेने केले आहे.

मतदानासाठी मतदान ओळखपत्राशिवाय 12 पुरावे ग्राह्य

            मतदारांनी मतदानासाठी जाताना भारत निवडणूक आयोगाने त्यांना दिलेले निवडणूक ओळखपत्र सोबत घेऊन जायचे आहे. ओळखपत्र मिळाले नसेल तर इतर 12 ओळखपत्र ही पुरावा म्हणून ग्राह्य धरणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. यामध्येपासपोर्टवाहन चालक परवानाशासनसार्वजनिक उपक्रम तसेच पब्लिक लिमिटेड कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना वितरित छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्रबॅंक किंवा टपाल विभागाचे छायाचित्र असलेले पासबुकपॅन कार्डराष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही स्मार्ट कार्डमनरेगा रोजगार ओळखपत्रकामगार आरोग्य विमा स्मार्ट कार्डनिवृत्तीवेतन दस्तऐवजदिव्यांग व्यक्ती ओळखपत्र आणि आधारकार्ड यांचा समावेश आहे.

 

तब्बल 74 लाखांहून अधिक मतदार बजावणार मतदानाचा हक्क

            मुंबई उपनगर जिल्ह्यातील 26 विधानसभा मतदारसंघात एकूण 7384 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर 40 लाख 02 हजार 749 पुरुष, 34 लाख 44 हजार 819 महिलातर 815 तृतीयपंथी असे एकूण 74 लाख 48 हजार 383 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

            यामध्ये 26- मुंबई उत्तर मतदारसंघात विधानसभेचे बोरिवलीदहिसरमागाठाणेकांदिवली (पूर्व)चारकोपमालाड (पश्चिम) या मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात एकूण 1702 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर लाख 68 हजार 983 पुरुष, 8 लाख 42 हजार 546 महिलातर 443 तृतीयपंथी असे एकूण 18 लाख 11 हजार 942 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील.

            27- मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघात विधानसभेचे जोगेश्वरी पूर्वदिंडोशीगोरेगाववर्सोवाअंधेरी पश्चिम आणि अंधेरी या मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात  1753 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर लाख 38 हजार 365 पूरूष मतदार तसेच लाख 96 हजार 663 महिला मतदार तर 60 तृतीयपंथी असे एकुण 17 लाख 35 हजार 088 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील.

            28- मुंबई उत्तर पुर्व या मतदारसंघात विधानसभेचे मुलुंडविक्रोळीभांडुप पश्चिमघाटकोपर पश्चिमघाटकोपर पूर्व तसेच मानखुर्द शिवाजीनगर या मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात 1682 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर लाख 77 हजार 855 पूरूष मतदार तसेच लाख 58 हजार 799 महिला मतदार तर 236 तृतीयपंथी असे एकुण 16 लाख 36 हजार 890 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील.

            29- मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघात विधानसभेचे विलेपार्लेचांदीवलीकुर्ला एससीकलीनावांद्रे पूर्ववांद्रे पश्चिम या मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात 1698 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर लाख 41 हजार 288 पूरूष मतदार तसेच लाख हजार 775 महिला मतदार तर 65 तृतीयपंथी असे एकुण 17 लाख 44 हजार 128 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील.

            30 मुंबई दक्षिण मध्य या मतदारसंघात अणूशक्ती नगर आणि चेंबुर या मतदारसंघात 549 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर लाख 76 हजार 258 पूरूष मतदार तसेच लाख 44 हजार 36 महिला मतदार तर 41 तृतीयपंथी असे एकुण लाख 20 हजार 335 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील.

0000


 

Sunday, 19 May 2024

भारत - चीन बॉर्डर वर फक्त आपले सैन्यच उभे नाही.. तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून तेथील शेतकरी देखील उभा ठाकला आहे...*

 सुप्रभात 🌹*भारत - चीन बॉर्डर वर फक्त आपले सैन्यच उभे नाही..  तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून तेथील शेतकरी देखील उभा ठाकला आहे...* 

⬇️⬇️⬇️

- - 30 अंश सेल्सिअस मध्ये १०१ प्रकारच्या भाज्या पिकवण्याचा रेकॉर्ड आपल्या DRDO व  DIHAR ने केला आहे. 

 

भारत - चीन च्या सियाचिन ग्लेशियर, लद्दाख बॉर्डर वर अंदाजे भारताचे २,५०,००० सैन्य उभे ठाकले आहे..ह्या सैन्याला पूर्वी टिनबंद अन्न पुरवले जायचे आणि लागणारा भाजीपाला चंदीगडहून एअरलिफ्ट करून हेलिकॉप्टरने सियाचीन ला पाठवला जायचा ..

 

Defence Research and Development Organisation's (DRDO) आणि Defence Institute of High Altitude Research (DIHAR) ह्यांनी मिळून सियाचिन ग्लेशियर बेस कॅम्पपासून सुमारे १५० किमी अंतरावर असलेल्या पाल्मो, लडाखमधील लेह, कारगिल, परतापूर आणि तुर्तुकमधील सुमारे २०,००० लहान शेतकऱ्यांना एकत्र करून Trench Cultivation आणि Polycarbonate Greenhouse च्या माध्यमातून प्रगत शेती तंत्र अवलंबण्यास शिकवले व त्यातून येणारे शेती उत्पादन भारतीय आर्मी ने खरेदी करण्यास सुरवात केली.. 


सहा महिन्यांच्या हिवाळ्यात तिथे जेव्हा तापमान -३० अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाते आणि जमीन गुडघाभर बर्फाच्या ढिगाऱ्याखाली दबली जाते तेव्हा ही अश्या वातावरणात हे शेतकरी आता शेती करतात आणि ह्याच प्रगत तंत्राचा वापर करून कोंबडी पालन ही करतात.. हिवाळ्याच्या हंगामात अंडी उबवण केंद्रे चालवतात. हे स्थानिक शेतकरी भाजीपाला लागवडीसाठी, उत्पादकता वाढवण्यासाठी, भाजीपाला आणि नाशवंत अन्नपदार्थांवर प्रक्रिया आणि जतन करण्यासाठी, ऊर्जा उत्पादनासाठी बायोडिग्रेडेबल कचऱ्याचा वापर करतात.आता तिथे स्थानिक पशु / प्राण्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.भारतीय सैन्याला हजारो टनांपर्यंत लागणारा सकस ताजा भाजीपाला, फळे, दूध, मांस आणि पोल्ट्री आता लगेच व जवळच उपलब्ध होत आहे.. 

  

अति थंड वातावरणात आणि एवढ्या उच्च उंचीच्या प्रदेशात शेती करणे, भाजीपाला पिकवणे आतापर्यंत अश्यक्य बाब होती.. आपल्या सैन्यासाठी ताजे अन्नपदार्थ, भाज्या, फळे, दूध, मांस, अंडी आणि औषधी आणि सुगंधी वनस्पतींची ह्याची गरज लागते आणि आतापर्यंत ह्या सर्व गरजेच्या वस्तू खूप लांबून एअर लिफ्ट करून आणाव्या लागत होत्या.. 


DRDO व  DIHAR चे हे अथक प्रयत्न व टेक्नॉलॉजि ने तेथील स्थानिक शेतकर्‍यांना आर्थिक मदतच झाली ... तर सीमेवर, विशेषत: जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीन हिमनदीवर खडा पहारा देण्यासाठी तैनात असलेल्या आपल्या सैन्यासाठी ही शेती आता वरदान ठरली आहे.. 


गेल्या वर्षी,तेथील शेतकऱ्यांनी लेहमध्ये एकाच हंगामात १०१ प्रकारच्या भाज्या पिकवण्याचा रेकॉर्ड केला आहे...( पूर्वी तिथे फक्त १० प्रकारचाच भाजीपाला पिकवला जात असे.) 


नोंद:- भारत - चीन बॉर्डर वर फक्त आपले सैन्यच उभे नाही..  तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून तेथील शेतकरी देखील उभा ठाकला आहे...


जय हिंद

Copy paste

मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई

 मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई

 

            मुंबईदि. १९  : मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी २० मे२०२४ रोजी सकाळी ०७.०० ते सायंकाळी ०६.०० वा. दरम्यान मतदान होत आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई असणार आहेअशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली.   

          श्री. यादव म्हणाले कीमुंबई शहर जिल्ह्यात दोन्ही लोकसभा मतदारसंघात एकूण २५२० मतदान केंद्रे आहेत. मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास मनाई असल्याचे स्पष्ट निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. आयोगाच्या प्रत्येक निर्देशाची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासन दक्ष आहे.  

          मतदान प्रक्रियेत बाधा निर्माण करणेमतदान केंद्रांवरील शांतता भंग करणे तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी मोबाईलचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मोबाईल घेऊन जाण्यास मतदारांना मज्जाव करण्यात आला आहे. मतदारांना मतदान केंद्रापासून १०० मीटर बाहेर मोबाइल ठेऊन मतदान करण्यासाठी जावे लागेलअसे श्री. यादव यांनी सांगितले. 

मुंबई शहरात २० मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदार कामगार अधिकारी-कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी द्या

 मुंबई शहरात २० मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी

मतदार कामगार अधिकारी-कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी द्या

 

मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांचे निर्देश

 

            मुंबईदि. १९ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने राज्यात तसेच राज्याच्या सीमेलगतच्या निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगारअधिकारीकर्मचारी यांना जरी ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावीअसे निर्देश मुंबई शहराचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत. 

        मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघात दि. २० मे२०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर हे निर्देश देण्यात आले आहेत. 

       मतदानाच्या दिवशी कार्यरत कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देणे महाराष्ट्र शासनाच्या उद्योगऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना कारखानेदुकाने इत्यादींना बंधनकारक आहे. खाजगी कंपन्यांमधील आस्थापना सर्व दुकाने व इतर आस्थापनानिवासी हॉटेलखाद्यगृहेअन्य गृहेनाट्यगृहेव्यापारऔद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्याशॉपिंग सेंटरमॉल्सरिटेलर्स यांमधील कार्यरत कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी लागू असणार आहे. 

       अत्यावश्यक सेवेसाठी कामगार अधिकारी-कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी संस्थेतील अधिकारी- कर्मचारी मतदान करण्यापासून वंचित राहणार नाहीतयाची दक्षता घेऊन मतदानासाठी दोन ते तीन तासांची सवलत देण्यात यावी. याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहेअसे निर्देशही श्री. यादव यांनी दिले आहेत. 

        मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी देण्याबाबतच्या निर्देशाचेसूचनांचे उद्योगऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनाकारखानेदुकाने यांच्या मालकांनी व व्यवस्थापनाने योग्य ते पालन करण्याचे निर्देश श्री. यादव यांनी दिले आहेत. 

       मतदानाच्या दिवशी आस्थापना बंद न ठेवता मतदारांना मतदान करणे शक्य न झाल्याबाबत तक्रारी आल्यास संबंधित आस्थापनेवर कारवाई करण्यात येणार आहे. 

        मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते. तसेच काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. मात्रनिवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगतच्या जिल्ह्यामध्ये काही मतदार मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहू नयेयासाठी हे निर्देश मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी दिले आहेत. 

            आपल्या देशाने लोकशाही पद्धती स्वीकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करणे अपेक्षित आहे. ही बाब लक्षात घेता लोकप्रतिनिधित्व कायदा१९५१ च्या परिच्छेद १३५ (बी) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावायासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. मात्रगेल्या काही निवडणुकांमध्ये असे दिसून आले आहे कीकाही संस्था आस्थापना त्यांच्या कामगारांना भरपगारी सुट्टी किंवा

 

सवलत देत नाहीत, त्यामुळे अनेक मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित रहावे लागतेजे लोकशाहीसाठी घातक आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी हे निर्देश निर्गमित केले आहेत.   

      महाराष्ट्र शासनाच्या उद्योगऊर्जाकामगार व खनिकर्म विभागानेही ०५ एप्रिल२०२४ रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करिता लोकसभा मतदारसंघातील खाजगी कंपन्यांमधील आस्थापना सर्व दुकाने व इतर आस्थापनानिवासी हॉटेलखाद्यगृहेअन्य गृहेनाट्यगृहेव्यापारऔद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्याशॉपिंग सेंटरमॉल्सरिटेलर्स यांमधील कार्यरत कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी देण्याबाबत परिपत्रक काढले आहे.

0000

_🌳 मानव सेवा ही,माधव सेवा 🌳_

 🪴""""""""""""""""""""""""""""""""""""""🪴

*_🌳 मानव सेवा ही,माधव सेवा  🌳_*

🪴"""""""""""""”""""""""""""""""""""""""🪴   

          _*एक नगर में बहुत धनवान सेठ रहता था।* वह बहुत सी फैक्ट्रियों का स्वामी था! लेकिन था...! पक्का नास्तिक...! *ईश्वर को बिल्कुल नहीं मानता था।*_

             _एक सायंकाल अचानक उसे बहुत बैचेनी होने लगी।_

        _डॉक्टर को बुलाया गया- सारी जाँचें करवा ली, परन्तु कुछ भी नहीं निकला।_

   *_उसकी बैचेनी बढ़ती गयी।_*

     _उसके समझ में नहीं आ रहा था- कि ये क्या हो रहा है।_

            _रात्रि हुई,नींद की गोलियां भी खा ली- पर ना नींद आने को तैयार,और ना ही बैचेनी कम होने का नाम ले।_

       _वो रात्रि को उठकर- *तीन बजे घर के बगीचे में घूमने लगा।* घूमते -घूमते उसे लगा कि बाहर थोड़ी शांति है- तो वह बाहर सड़क पर पैदल निकल पड़ा।_

     _चलते- चलते हजारों विचार मन में चल रहे थे। अब वो घर से बहुत दूर निकल आया था।_

              _और थकान की वजह से एक चबूतरे पर बैठ गया।_

        _*उसे थोड़ी शान्ति मिली, तो वह आराम से बैठ गया।*_

         _इतने में एक कुत्ता आया- और उसकी चप्पल उठाकर ले गया। सेठ ने देखा- तो वह दूसरी चप्पल उठाकर कुत्ते के पीछे भागा।_ 

      _कुत्ता पास ही बनी झुग्गी-झोपडि़यों में घुस गया। सेठ भी उसके पीछे था, सेठ को समीप आता देखकर कुत्ते ने चप्पल वहीं छोड़ दी,और चला गया।_ 

           _सेठ जी ने चैन की सांस ली- और अपनी चप्पल पहनने लगा।_

           _इतने में उसे किसी के रोने की आवाज सुनाई दी।_

       _वह और समीप गया तो एक झोपड़ी में से आवाज आ रहीं थीं।_

       _उसने झोपड़ी के फटे हुए बोरे में झाँक कर देखा- तो वहाँ एक औरत फटेहाल मैली सी चादर पर दीवार से सटकर रो रही हैं।_

    _और ये बोल रही है,*हे भगवान!! मेरी सहायता करो ओर रोती जा रहीं है।*_

           _*सेठ के मन में आया- कि यहाँ से चले जाओ,कहीं कोई गलत ना सोच लें।*_

    _वो थोड़ा आगे बढ़ा तो उसके दिल में विचार आया कि- *आखिर वो औरत क्यों रो रहीं हैं...?* उसकी समस्या क्या है....…?_ 

      _*आखिर सेठ जी ने अपने दिल की सुनी-* और वहाँ जाकर द्वार खटखटाया।_

           _उस औरत ने द्वार खोला- और सेठ को देखकर घबरा गयी।_

       _सेठ ने हाथ जोड़कर कहा तुम घबराओं मत! मुझे तो बस इतना जानना है- *कि तुम रो क्यों रही हो।*_

        _औरत की आखों से आँसू टपकने लगे- और उसने पास ही  *गुदड़ी में लिपटी हुई  7-8 साल की बच्ची* की ओर संकेत किया।_

      _और रोते -रोते कहने लगी कि मेरी बच्ची बहुत ज्यादा बीमार है- उसके इलाज में- बहुत व्यय होगा।_ 

      _मैं तो घरों में जाकर झाड़ू -पोछा करके,जैसे- तैसे हमारा पेट पालती हूँ।_ 

    _मैं कैसे उपचार कराऊं- इसका ?_

           _सेठ ने कहा: तो किसी से माँग लो! इसपर औरत बोली: मैने सबसे माँग कर देख लिया- *व्यय बहुत अधिक है,* कोई भी देने को तैयार नहीं।_ 

        _सेठ ने कहा: तो ऐसे रात को रोने से मिल जायेगा क्या....?_

    _औरत ने कहा: कल एक संत यहाँ से गुजर रहे थे- तो मैने उनको मेरी समस्या बताई- *तो उन्होंने कहा: बेटा...!*_

     _*तुम सुबह 4 बजे उठकर अपने ईश्वर से माँगो।* आसन बिछाकर बैठ जाओ- और रो कर, गिड़गिड़ा कर,उससे सहायता माँगो- वो सबकी सुनता है- *तो तुम्हारी भी सुनेगा।*_

     _मेरे पास इसके सिवाय कोई चारा नहीं था। *इसलिए मैं उससे माँग रही थीं-* और वो बहुत जोर से रोने लगी।_

       _*ये सब सुनकर सेठ का दिल पिघल गया* और उसने तुरन्त फोन लगाकर एम्बुलेंस बुलवायी-और उस लड़की को एडमिट करवा दिया।_

     _*डॉक्टर ने डेढ़ लाख का खर्चा बताया* तो सेठ ने उसकी जवाबदारी भी अपने ऊपर ले ली,और उसका पूरा इलाज कराया।_     _उस औरत को अपने यहाँ नौकरी देकर- अपने बंगले के सर्वेन्ट क्वाटर में जगह दी!और उस लड़की की पढ़ाई का जिम्मा भी ले लिया।_

    _सेठ कर्म प्रधान तो था- पर *नास्तिक* था। अब उसके मन में सैकड़ो सवाल चल रहे थे।_

          _*क्योंकि उसकी बैचेनी तो उस वक्त ही खत्म हो गयी थी- जब उसने एम्बुलेंस को बुलवाया था।*_

      _वह यह सोच रहा था- कि आखिर कौन सी ताकत है-जो मुझे वहाँ तक खींच ले आई ?_   

         *_क्या यही ईश्वर हैं.....?_* 

    _और यदि ये ईश्वर है तो सारा संसार आपस में धर्म, जात-पात के लिये क्यों लड़ रहा है...? क्योंकि ना मैने उस औरत की जात पूछी और ना ही ईश्वर ने जात-पात देखी।_

         _बस *ईश्वर ने तो उसका दर्द देखा-* और मुझे इतना घुमाकर उस तक पहुंचा दिया।_ 

       _अब सेठ समझ चुका था कि *कर्म के साथ सेवा भी कितनी जरूरी है-* क्योंकि इतनी शांति उसे जीवन में कभी भी नहीं मिली थी!_

*_मानव और प्राणी-मात्र की सेवा का धर्म ही असली भक्ति हैं_*


   *_यदि ईश्वर की कृपा पाना चाहते हो- तो मानवता अपना लो- और समय-समय पर उन सबकी सहायता करो,जो लाचार या बेबस है। क्योंकि "ईश्वर इन्हीं के आस-पास रहता हैं "।।_*


*_🌸 जय श्री राधे  🌸_*


*_🪴।।जय जय श्री राम।। 🪴_*

*_🪷 ।।हर हर महादेव।।  🪷_*

Saturday, 18 May 2024

व पक्क्या परवाना चाचणीकरिता २० मे रोजी 'अपॉइंटमेंट' घेतलेल्या तारखेत बदल

  व पक्क्या परवाना चाचणीकरिता २० मे रोजी

  'अपॉइंटमेंटघेतलेल्या तारखेत बदल

 

            मुंबईदि.१८:  परिवहन विभागाचे संकेतस्थळ  https://parivahan.gov.in द्वारे अनुज्ञप्ती (Licence) संबंधीची सर्वच कामे ऑनलाईन पध्दतीने होत आहेत. त्यासाठी कार्यालयात येणाऱ्या नागरीकांना शिकाऊ परवाना चाचणी व पक्का परवाना वाहन चालक चाचणी देण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अपॉइंटमेंट घेणे अनिवार्य आहे. त्याअनुषंगाने २० मे २०२४ रोजी  प्रादेशिक परिवहन कार्यालयमुंबई (पूर्व) या कार्यालयात शिकाऊ परवाना चाचणी  व पक्का परवाना वाहन चालक चाचणीकरीता घेतलेल्या अपॉइंटमेंटच्या तारखेत लोकसभा निवडणूक मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्यामुळे बदल करण्यात आला आहे. आता ही चाचणी २२ मे २०२४ रोजी होणार आहे.

              ज्या उमेदवारांची पक्के परवाण्याकरिता  वाहन चालक चाचणी २० मे २०२४ रोजी होतीती दि.२१ ते २४ मे २०२४ दरम्यानच्या कालावधीमध्ये बदलण्यात (Re-schedule करण्यात) आली आहे. तसेच त्याबाबत प्रणालीमध्ये नमुद भ्रमणध्वनी क्रमांकावर प्रणालीकडून संदेश (मेसेज/SMS) देखील पाठविण्यात आले आहेत.

            तरी कार्यालयात येणाऱ्या सर्व उमेदवारमोटार ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी यांनी २० मे रोजीची अपॉइंटमेंट घेतली असल्यासत्यासर्वांनी चाचणीसाठी कार्यालयास या दिवशी भेट न देता  बदल केलेल्या (Re-scheduled) दिनांकांस भेट द्यावी.  संबंधित कागदपत्रांसह बदल केलेल्या दिनांकास उमेदवारांनी  कार्यालयात चाचणीकरिता उपस्थित राहावेअसे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) यांच्यावतीने करण्यात आले आहे.

00000


Featured post

Lakshvedhi