Saturday, 18 May 2024

व पक्क्या परवाना चाचणीकरिता २० मे रोजी 'अपॉइंटमेंट' घेतलेल्या तारखेत बदल

  व पक्क्या परवाना चाचणीकरिता २० मे रोजी

  'अपॉइंटमेंटघेतलेल्या तारखेत बदल

 

            मुंबईदि.१८:  परिवहन विभागाचे संकेतस्थळ  https://parivahan.gov.in द्वारे अनुज्ञप्ती (Licence) संबंधीची सर्वच कामे ऑनलाईन पध्दतीने होत आहेत. त्यासाठी कार्यालयात येणाऱ्या नागरीकांना शिकाऊ परवाना चाचणी व पक्का परवाना वाहन चालक चाचणी देण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अपॉइंटमेंट घेणे अनिवार्य आहे. त्याअनुषंगाने २० मे २०२४ रोजी  प्रादेशिक परिवहन कार्यालयमुंबई (पूर्व) या कार्यालयात शिकाऊ परवाना चाचणी  व पक्का परवाना वाहन चालक चाचणीकरीता घेतलेल्या अपॉइंटमेंटच्या तारखेत लोकसभा निवडणूक मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्यामुळे बदल करण्यात आला आहे. आता ही चाचणी २२ मे २०२४ रोजी होणार आहे.

              ज्या उमेदवारांची पक्के परवाण्याकरिता  वाहन चालक चाचणी २० मे २०२४ रोजी होतीती दि.२१ ते २४ मे २०२४ दरम्यानच्या कालावधीमध्ये बदलण्यात (Re-schedule करण्यात) आली आहे. तसेच त्याबाबत प्रणालीमध्ये नमुद भ्रमणध्वनी क्रमांकावर प्रणालीकडून संदेश (मेसेज/SMS) देखील पाठविण्यात आले आहेत.

            तरी कार्यालयात येणाऱ्या सर्व उमेदवारमोटार ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी यांनी २० मे रोजीची अपॉइंटमेंट घेतली असल्यासत्यासर्वांनी चाचणीसाठी कार्यालयास या दिवशी भेट न देता  बदल केलेल्या (Re-scheduled) दिनांकांस भेट द्यावी.  संबंधित कागदपत्रांसह बदल केलेल्या दिनांकास उमेदवारांनी  कार्यालयात चाचणीकरिता उपस्थित राहावेअसे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) यांच्यावतीने करण्यात आले आहे.

00000


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi