Tuesday, 14 May 2024

राज्यपालांचे छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन

 राज्यपालांचे छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन

            मुंबई, दि. 14 : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन मुंबई येथे  महाराजांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन केले.  यावेळी राजभवनातील अधिकारी व  कर्मचारी यांनी देखील छत्रपती संभाजी महाराज यांना पुष्पांजली वाहिली.

००००

 

Governor Bais offers floral tributes to Chhatrapati Sambhaji Maharaj

      Mumbai Dated 14 : Maharashtra Governor Ramesh Bais offered floral tributes to the portrait of Chhatrapati Sambhaji Maharaj on the occasion of his birth anniversary at Raj Bhavan, Mumbai on Tue (14 May). Officers and staff of Raj Bhavan were also present.

0000


विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पुढे ढकलल्या

 विधानपरिषद शिक्षकपदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पुढे ढकलल्या

            मुंबईदि. 14 : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर करून याबाबतची मतदान प्रक्रिया 10 जून 2024 रोजी पार पडणार होती. तथापि या निवडणुका शाळेच्या उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीनंतर घेण्याबाबत आयोगाकडे निवेदन प्राप्त झाले. त्यानुसार भारत निवडणूक आयोगाने या मागणीचा विचार करून महाराष्ट्र विधानपरिषद शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघाच्या द्वैवाषिक निवडणुका पुढे ढकलल्या आहेतअशी माहिती भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

            मुंबई पदवीधर मतदारसंघातून विलास विनायक पोतनीसकोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन वसंत डावखरेनाशिक शिक्षक मतदारसंघातून किशोर भिकाजी दराडे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातून कपिल हरिश्चंद्र पाटील हे 7 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळे 2 शिक्षक मतदारसंघ आणि 2 पदवीधर मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.

000

मुंबई शहरात ११ सखी मतदान केंद्र

 मुंबई शहरात ११ सखी मतदान केंद्र

         मुंबईदि.१४ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यात २० मे २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. या मतदानासाठी जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील १० विधानसभा मतदारसंघात 'महिला संचालित मतदान केंद्रेउभारण्यात येत आहेत. महिला मतदारांनी मतदान प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावेयासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून 'सखी मतदान केंद्रउभारण्यात येत आहेत.

            मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण मध्य आणि दक्षिण मुंबई या दोन लोकसभा मतदारसंघात मिळून एकूण ११ सखी मतदान केंद्रे असणार आहेत. ११ सखी मतदान केंद्रापैकी मुंबई दक्षिण मध्य मतदार संघात ६ तर मुंबई दक्षिण मतदारसंघात ५ सखी मतदान केंद्र असणार आहेत. प्रत्येक मतदारसंघात एक सखी मतदान केंद्र असून धारावी मतदारसंघात दोन सखी मतदान केंद्र असणार आहेत. भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल येथील मतदान केंद्र क्रमांक १०० आणि धारावी ट्रान्सलेट कॅम्प मनपा शाळा येथील मतदान केंद्र क्रमांक ८२ ही धारावी मतदारसंघातील दोन सखी मतदान केंद्र असणार आहेत.

             सखी मतदान केंद्रांवर महिलांसाठी आवश्‍यक सुविधा देण्यात येणार आहेत. स्त्री - पुरुष समानता आणि मतदार प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून लोकसभा निवडणुकीसाठी महिलांनी चालविलेले महिला मतदान केंद्र म्हणून याला 'सखी मतदान केंद्रअसे नाव ठेण्यात आले आहे. सखी मतदार केंद्रावर सर्व अधिकारीकर्मचारी या महिलाच असणार आहेत. या मतदान केंद्राला लग्न मंडपासारखे सजविण्यात येते. जागोजागी रांगोळीस्वागत कमानीसह मतदानाचा हक्क बजाविण्यासंदर्भात जनजागृती करण्यात येते.

0000

मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांसाठी धावणार बस

 मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांसाठी धावणार बस

25 रिंगरूट व शटल रूटवर दिव्यांग सुलभ बससह

613 ठिकाणी रिक्षा व इको व्हॅनची व्यवस्था

           

            मुंबई, दि. 14 : मुंबई उपनगर जिल्ह्यात 20 मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यादृष्टीने एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये’ या संकल्पानुसार जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी मतदानासाठी विशेष वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विधानसभा मतदारसंघानिहाय ठरविलेल्या एका निश्चित मार्गावर बेस्टमार्फत व्हिलचेअर प्रवेश योग्य मोफत बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा दिव्यांग समन्वयक अधिकारी प्रसाद खैरनार यांनी दिली.

            जिल्ह्यातील सर्वसामान्य मतदारांसोबतच दिव्यांग मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्ह्यात दिव्यांग पुरूष मतदार 9364 तर महिला दिव्यांग मतदार 6750दिव्यांग तृतीयपंथी मतदार 2 असे एकूण 16 हजार 116 चिन्हांकीत दिव्यांग मतदार आहे. मतदान केंद्रावर जावून मतदान करता यावे यासाठी 1106 व्हिलचेअर मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मतदारांना 613 ठिकाणाहून वाहतूक व्यवस्था पुरविण्यात येणार आहे. यासाठी एकूण 1106 स्वयंसेवकांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे.

            दिव्यांग मतदारांसाठी सुरू करण्यात आलेल्या स्वयंम ॲपबद्दल जिल्ह्यातील एकूण 13 हजार 888 दिव्यांग मतदारांना माहिती देऊन जनजागृती करण्यात आलेली आहे. मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांना कोणतीही अडचण येवू नये तसेच मतदानाची प्रक्रिया समजावून सांगणे आणि जनजागृती करणे यासाठी 25 सामाजिक तसेच अपंग संस्थांच्या समन्वयाने 85 मेळावे देखील घेण्यात आले आहेत. तसेच 1321 मतदारांना ब्रेल वोटर स्लीपचे वाटप करण्यात आले आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांसाठी 25 रिंगरूट व शटल रूटवर दिव्यांग सुलभ बसेस चालविण्यात येणार असून 613 ठिकाणी रिक्षा इको व्हॅनची व्यवस्था करण्यात आली असल्याचेही श्री. खैरनार यांनी कळविले आहे.

मुंबई उपनगरात 2290 मतदारांनी बजावला गृहमतदानाचा हक्क

 मुंबई उपनगरात 2290 मतदारांनी बजावला गृहमतदानाचा हक्क

 

            मुंबईदि. 14 : लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात 85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले आणि दिव्यांग अशा 2,735 मतदारांनी गृह मतदानासाठी नोंदणी केलेली आहे. त्यापैकी दोन हजार 290 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहेअशी माहिती जिल्हा निवडणूक शाखेतर्फे देण्यात आली आहे.

            मुंबई उपनगर जिल्ह्यात 26- मुंबई उत्तर27- मुंबई उत्तर पश्चिम28- मुंबई उत्तर पूर्व आणि 29- मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघांचा समावेश आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप’ समितीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार 85 वर्षांवरील मतदार आणि दिव्यांग मतदारांना गृहमतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात अशा मतदारांची संख्या दोन हजार 735 एवढी आहे. या मतदारांच्या घरी मतदान पथके पाठवून टपाली मतपत्रिकेद्वारे त्यांच्या मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मतदान पथकांमध्ये एक मतदान अधिकारीसहाय्यकएक सूक्ष्म निरीक्षकएक पोलिसएक व्हीडिओग्राफर यांचा समावेश आहे.

            नोंदणी केलेल्या 85 वर्षांपेक्षा जास्त वय आणि दिव्यांग मतदारांना मतदानाच्या वेळापत्रकाची माहिती संबंधित उमेदवारांना देण्यात आली आहे. उमेदवार अशा मतदान पथकांसमवेत त्यांचे प्रतिनिधी मतदानाच्या वेळी त्यांचा प्रतिनिधी उपस्थित ठेवू शकतात. गृहमतदानाच्या वेळी मतदाराच्या गोपनीयतेचा भंग होणार नाही याची दक्षता घेऊन या सर्व प्रक्रियेचे व्हीडिओ चित्रीकरण देखील करण्यात येत आहे. आतापर्यंत दोन हजार 290 मतदारांचे गृहमतदान पूर्ण झाले आहे. गृहमतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याबद्दल 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांनी समाधान व्यक्त केले आहे.

0000

मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात ज्येष्ठ, दिव्यांग मतदारांनी बजावला गृहमतदानाचा

 मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात

ज्येष्ठदिव्यांग मतदारांनी बजावला गृहमतदानाचा हक्क

- निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर

 

             मुंबईदि. 14 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २८ – मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात २० मे २०२४ रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. मतदारसंघात एकूण १८२ ज्येष्ठ आणि ८ दिव्यांग मतदार गृहमतदान पद्धतीने मतदान करणार आहेत. आजपर्यंत १५० मतदारांनी गृहमतदान केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली आहे. १५ तारखेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

            १५६ विक्रोळी विधानसभा मतदारसंघात २८ ज्येष्ठ मतदार आणि तीन दिव्यांग मतदार होते. त्यापैकी एक व्यक्ती मृत झाल्याने ३० मतदारांनी मतदान केले आहे. निवडणुकीसाठी नियुक्त पथकाने घरोघरी जाऊन त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले असल्याचे १५६ - विक्रोळी विधानसभा मतदारसंघाच्या अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गिता गायकवाड यांनी सांगितले. मतदारांनी एका मतासाठी निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी घरी आल्याचे समाधान आणि मतदान करता आल्याचा आनंद व्यक्त केला असल्याचेही त्यांनी सांगितले.

            १६९ घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघात ५८ ज्येष्ठ नागरिक तर एक दिव्यांग मतदार आहेत. यापैकी ५० ज्येष्ठ नागरिक आणि एक दिव्यांग असे एकूण ५१ मतदारांनी गृहमतदान करून आनंद व्यक्त केला असल्याचे समन्वय अधिकारी श्री. वानखेडे  यांनी सांगितले.

            १७० – घाटकोपर पूर्व येथे २८ पैकी २७ मतदारांनी गृहमतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती, तहसीलदार वृषाली पाटील यांनी दिली आहे.

            १५७ – भांडूप पश्चिम विधानसभा मतदारसंघात ३७ मतदार गृहमतदान करणार होते. त्यापैकी ३५ जणांनी गृहमतदान केले असल्याची माहिती एस.ए.खानविलकर यांनी दिली.

            १७१ – मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात ९ मतदार गृह मतदान पद्धतीने मतदान करणार आहेत. यापैकी सात जणांनी मतदान केले असूनउर्वरित मतदारांचे मतदान होणार असल्याची माहिती तहसीलदार सतीश कदम यांनी दिली.

विक्रोळीमधील १०० वर्षीय काशिबाई कुपटे यांनी केले मतदान

            आजपर्यंत मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. आता प्रकृती खालावल्याने कुठेही जाऊ शकत नाही. यावेळी आपले मतदान वाया जाईलअसेच वाटत होते. मात्रनिवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी घरी येऊन गुप्त पद्धतीने मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. मत वाया गेले नाहीमतदानाचा हक्क बजावता आला याचा आनंद काशिबाई कुपटे या १०० वर्षीय आजीबाई यांनी यावेळी व्यक्त केला. सर्व तरूणांनीही मतदान नक्की करावेअसेही त्यांनी आवर्जून सांगितले.

०००


 

छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

 छत्रपती संभाजी महाराज यांना

जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

 

            मुंबईदि.14: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

            यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रवींद्र पेठकरकक्ष अधिकारी घनश्याम जाधवविजय शिंदे आदीसह मंत्रालयातील अधिकारीकर्मचारी उपस्थित होते. मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.


Featured post

Lakshvedhi