Tuesday, 14 May 2024

विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पुढे ढकलल्या

 विधानपरिषद शिक्षकपदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पुढे ढकलल्या

            मुंबईदि. 14 : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर करून याबाबतची मतदान प्रक्रिया 10 जून 2024 रोजी पार पडणार होती. तथापि या निवडणुका शाळेच्या उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीनंतर घेण्याबाबत आयोगाकडे निवेदन प्राप्त झाले. त्यानुसार भारत निवडणूक आयोगाने या मागणीचा विचार करून महाराष्ट्र विधानपरिषद शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघाच्या द्वैवाषिक निवडणुका पुढे ढकलल्या आहेतअशी माहिती भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

            मुंबई पदवीधर मतदारसंघातून विलास विनायक पोतनीसकोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन वसंत डावखरेनाशिक शिक्षक मतदारसंघातून किशोर भिकाजी दराडे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातून कपिल हरिश्चंद्र पाटील हे 7 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळे 2 शिक्षक मतदारसंघ आणि 2 पदवीधर मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.

000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi