Tuesday, 14 May 2024

मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात ज्येष्ठ, दिव्यांग मतदारांनी बजावला गृहमतदानाचा

 मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात

ज्येष्ठदिव्यांग मतदारांनी बजावला गृहमतदानाचा हक्क

- निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर

 

             मुंबईदि. 14 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २८ – मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात २० मे २०२४ रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. मतदारसंघात एकूण १८२ ज्येष्ठ आणि ८ दिव्यांग मतदार गृहमतदान पद्धतीने मतदान करणार आहेत. आजपर्यंत १५० मतदारांनी गृहमतदान केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली आहे. १५ तारखेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

            १५६ विक्रोळी विधानसभा मतदारसंघात २८ ज्येष्ठ मतदार आणि तीन दिव्यांग मतदार होते. त्यापैकी एक व्यक्ती मृत झाल्याने ३० मतदारांनी मतदान केले आहे. निवडणुकीसाठी नियुक्त पथकाने घरोघरी जाऊन त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले असल्याचे १५६ - विक्रोळी विधानसभा मतदारसंघाच्या अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गिता गायकवाड यांनी सांगितले. मतदारांनी एका मतासाठी निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी घरी आल्याचे समाधान आणि मतदान करता आल्याचा आनंद व्यक्त केला असल्याचेही त्यांनी सांगितले.

            १६९ घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघात ५८ ज्येष्ठ नागरिक तर एक दिव्यांग मतदार आहेत. यापैकी ५० ज्येष्ठ नागरिक आणि एक दिव्यांग असे एकूण ५१ मतदारांनी गृहमतदान करून आनंद व्यक्त केला असल्याचे समन्वय अधिकारी श्री. वानखेडे  यांनी सांगितले.

            १७० – घाटकोपर पूर्व येथे २८ पैकी २७ मतदारांनी गृहमतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती, तहसीलदार वृषाली पाटील यांनी दिली आहे.

            १५७ – भांडूप पश्चिम विधानसभा मतदारसंघात ३७ मतदार गृहमतदान करणार होते. त्यापैकी ३५ जणांनी गृहमतदान केले असल्याची माहिती एस.ए.खानविलकर यांनी दिली.

            १७१ – मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात ९ मतदार गृह मतदान पद्धतीने मतदान करणार आहेत. यापैकी सात जणांनी मतदान केले असूनउर्वरित मतदारांचे मतदान होणार असल्याची माहिती तहसीलदार सतीश कदम यांनी दिली.

विक्रोळीमधील १०० वर्षीय काशिबाई कुपटे यांनी केले मतदान

            आजपर्यंत मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. आता प्रकृती खालावल्याने कुठेही जाऊ शकत नाही. यावेळी आपले मतदान वाया जाईलअसेच वाटत होते. मात्रनिवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी घरी येऊन गुप्त पद्धतीने मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. मत वाया गेले नाहीमतदानाचा हक्क बजावता आला याचा आनंद काशिबाई कुपटे या १०० वर्षीय आजीबाई यांनी यावेळी व्यक्त केला. सर्व तरूणांनीही मतदान नक्की करावेअसेही त्यांनी आवर्जून सांगितले.

०००


 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi