Saturday, 27 April 2024

चौथ्या टप्प्यातील निवडणूक

 चौथ्या टप्प्यातील निवडणूक

उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर 369 अर्ज वैध

            मुंबईदि. 26 : राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे 2024 रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 447 उमेदवारांचे 618 अर्ज दाखल झाले होते. आज या अर्जांची छाननी केल्यानंतर एकूण 369 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

       चौथ्या टप्प्यातील उमेदवारी अर्जांची छाननी केल्यानंतर नंदुरबार लोकसभा मतदारसंघात 16,  जळगाव - 20, रावेर - 29जालना - 35, औरंगाबाद - 44, मावळ - 35, पुणे - 42, शिरूर - 35, अहमदनगर - 36, शिर्डी - 22 आणि बीड लोकसभा मतदारसंघात 55 असे एकूण 369 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.  

00000


Art


 

Friday, 26 April 2024

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.७७ टक्के मतदान

 लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात

दुपारी १  वाजेपर्यंत ३१.७७ टक्के मतदान

 

         मुंबईदि.२६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.७७ टक्के मतदान झाले आहे.

दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :-

वर्धा - ३२.३२ टक्के

अकोला -३२.२५ टक्के

अमरावती - ३१.४०टक्के

बुलढाणा -  २९.०७ टक्के

हिंगोली -  ३०.४६ टक्के

नांदेड -  ३२.९३ टक्के

परभणी -३३.८८ टक्के

यवतमाळ - वाशिम -३१.४७ टक्के

000

निलेश तायडे / वि.स.अ

 

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

  

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात

 शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

 

            मुंबई  दि. २५ : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर२७- मुंबई उत्तर पश्चिम२८- मुंबई उत्तर पूर्व२९- मुंबई उत्तर मध्य या चार मतदारसंघात शुक्रवार दि. २६ एप्रिल २०२४ पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. त्यासाठीची तयारी संबंधित चारही लोकसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा निवडणूक यंत्रणेने केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.

            लोकसभा निवडणुकीची अधिसूचना २६- मुंबई उत्तर२७- मुंबई उत्तर पश्चिम२८- मुंबई उत्तर पूर्व२९- मुंबई उत्तर मध्य या चार मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातील सूचना फलकसहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय येथील सूचना फलकावरही प्रदर्शित करण्यात येणार आहेअशी माहिती निवडणूक यंत्रणेने दिली आहे.

            लोकसभेच्या या निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास २६ एप्रिल २०२४ पासून सुरवात होईल. ३ मे २०२४ पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येतील. दिनांक ४ मे २०२४ रोजी दाखल उमेदवारी अर्जांची छाननी होईल. त्यानंतर ६ मे २०२४ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत असेल. दिनांक २० मे २०२४ रोजी मतदान होईल. तर जून २०२४ रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे.

            २६ - मुंबई उत्तर मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयप्रशासकीय इमारतसातवा मजलाशासकीय वसाहतवांद्रे (पूर्व)मुंबई येथे२७- मुंबई उत्तर पश्चिमचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयप्रशासकीय इमारतनववा मजलाशासकीय वसाहतवांद्रे (पूर्व)मुंबई- ५१२८- मुंबई उत्तर पूर्वचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय फिरोजशहा नगरसांस्कृतिक सभागृहस्टेशन साइड कॉलनीगोदरेज कॉलनीविक्रोळी (पूर्व)मुंबई२९- मुंबई उत्तर मध्यचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयप्रशासकीय इमारतपाचवा मजलाशासकीय वसाहतवांद्रे (पूर्व)मुंबई- ५१ येथे असेल.

                                                              ०००

दिपक चव्हाण/ सं.सं./

 

 

लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रे भरणाऱ्या उमेदवारांच्या मिरवणुकांवर काटेकोरपणे लक्ष ठेवण्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे यांचे निर्देश

 लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रे भरणाऱ्या उमेदवारांच्या मिरवणुकांवर

काटेकोरपणे लक्ष ठेवण्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे यांचे निर्देश

        मुंबईदि. २५ : 'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४च्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्यातील निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रे भरण्याची लवकरच सुरुवात होत आहे. ही नामनिर्देशन पत्रे भरतेवेळी उमेंदवारासमवेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते येत असतात. ही बाब लक्षात घेता या मिरवणुकांमध्ये सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्यावाहनेकेला जाणारा खर्च इत्यादींची छायाचित्रांसह व व्हिडिओ छायाचित्रणासह सुयोग्य नोंद ठेवण्याचे निर्देश 'दक्षिण मध्य मुंबई'चे निवडणूक निर्णय अधिकारी तथा कोकण विभागाचे अपर आयुक्त  विकास पानसरे यांनी दिले आहेत.

 'ओल्ड कस्टम इमारती'च्या सभागृहात आज आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला मार्गदर्शन करताना श्री. पानसरे यांनी हे आदेश दिले. या बैठकीला भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी प्रवीण मुंडे यांच्यासोबत जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि मुंबई पोलीस दलातील संबंधित अधिकारी देखील उपस्थित होते.

            यावेळी श्री. पानसरे यांनी सांगितले कीनामनिर्देशन पत्रे भरण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांसमवेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते येत असतात. या कार्यकर्त्यांची संख्यात्यांच्या वाहनाचे क्रमांक व वाहनांचा तपशीलमिरवणुकी दरम्यान वितरित होणारे खाद्यपदार्थ इत्यादींवर कडक व काळजीपूर्वक लक्ष ठेवण्याचे निर्देश श्री. पानसरे यांनी दिले आहेत. याकरिता आवश्यकतेनुसार मुंबई पोलीस दल व बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडे असणारे आवश्यक ते सीसीटीव्ही फुटेज देखील काळजीपूर्वक पडताळून पाहण्याचे आदेशही श्री. पानसरे यांनी दिले आहेत.

           सर्व संबंधित बाबी पडताळल्यानंतर भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार निर्धारित करण्यात आलेल्या दर पत्रकाच्या आधारे वाहन खर्चखाद्यपदार्थ खर्चपेय पदार्थप्रचार साहित्य इत्यादींसाठीच्या विविध खर्चाचे निर्धारण करावे‌. जेणेकरून हा खर्च उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करता येईल. त्याचबरोबर वाहनांवर झेंडे व प्रचार साहित्य लावण्यासाठी संबंधित सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी (Assistant Returning Officer) व आरटीओ यांची परवानगी घेणे आवश्यक असते. अशा प्रकारची परवानगी न घेता झेंडे लावल्याचे आढळून आल्यास ती वाहने आचारसंहिता संपेपर्यंत अटकवून ठेवण्याची कारवाई करण्याचे आदेशही आजच्या बैठकीदरम्यान देण्यात आले.

               लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवाराने त्याचा प्रचार करताना केलेला खर्च हा निर्धारित रकमेपेक्षा अधिक आढळून आल्यास भारत निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार  त्या उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्याचे प्रस्तावित करण्यात येईलअसेही निवडणूक निर्णय अधिकारी श्री. पानसरे यांनी नमूद केले आहे. त्याचबरोबर नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या उमेदवारांसोबत जास्तीत जास्त ३ वाहने व ५ व्यक्तींनाच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात येण्याची मुभा असेलअसेही श्री. पानसरे यांनी आजच्या बैठकीदरम्यान सांगितले.

0000

शैलजा पाटील/विसंअ/


लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चौथ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 447 उमेदवारांचे 618 अर्ज दाखल

 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४

चौथ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत

447 उमेदवारांचे 618 अर्ज दाखल

 

             मुंबईदि. २५ : राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे २०२४ रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. आज सायंकाळी शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 447 उमेदवारांचे 618 अर्ज दाखल झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

             चौथ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत नंदुरबार लोकसभा मतदार संघात 18 उमेदवारांचे 31 अर्ज, जळगाव- 24 उमेदवारांचे 36 अर्जरावेर- 31 उमेदवारांचे 45 अर्जजालना -47 उमेदवारांचे 68 अर्जऔरंगाबाद- 51 उमेदवारांचे  78 अर्ज    मावळ- 38 उमेदवारांचे 50 अर्जपुणे - 42 उमेदवारांचे 58 अर्जशिरूर- 46 उमेदवारांचे 58 अर्जअहमदनगर- 43 उमेदवारांचे 55 अर्जशिर्डी- 31 उमेदवारांचे 40 अर्ज आणि बीड लोकसभा मतदारसंघात 76 उमेदवारांचे  99 अर्ज दाखल झाले आहेत.

0000


 


लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ७.४५ टक्के मतदान

 लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात 

 सकाळी ९ वाजेपर्यंत ७.४५ टक्के मतदान

 

            मुंबईदि.२६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात सकाळी  ९.०० वाजेपर्यंत सरासरी ७.४५ टक्के मतदान झाले आहे.

 

पहिल्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

वर्धा - ७.१८ टक्के

अकोला - ७.१७ टक्के

अमरावती -६.३४ टक्के

बुलढाणा - ६.६१ टक्के

हिंगोली - ७.२३ टक्के

नांदेड - ७.७३ टक्के

परभणी - ९.७२ टक्के

यवतमाळ - वाशिम - ७.२३ टक्के

000

निलेश तायडे / वि.स.अ

 


Featured post

Lakshvedhi