चौथ्या टप्प्यातील निवडणूक
उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर 369 अर्ज वैध
मुंबई, दि. 26 : राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे 2024 रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 447 उमेदवारांचे 618 अर्ज दाखल झाले होते. आज या अर्जांची छाननी केल्यानंतर एकूण 369 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
चौथ्या टप्प्यातील उमेदवारी अर्जांची छाननी केल्यानंतर नंदुरबार लोकसभा मतदारसंघात 16, जळगाव - 20, रावेर - 29, जालना - 35, औरंगाबाद - 44, मावळ - 35, पुणे - 42, शिरूर - 35, अहमदनगर - 36, शिर्डी - 22 आणि बीड लोकसभा मतदारसंघात 55 असे एकूण 369 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.
00000
No comments:
Post a Comment