Thursday, 28 March 2024

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत १८३ उमेदवारांचे २२९ अर्ज दाखल

 राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज

 दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत १८३ उमेदवारांचे २२९ अर्ज दाखल

 

            मुंबईदि. २७ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल २०२४ रोजी होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा  शेवटचा दिवस होता. आज सायंकाळ पर्यंत २२९अर्ज दाखल झाले आहेत.

            पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार असून यामध्ये रामटेकनागपूरभंडारा- गोंदियागडचिरोली- चिमूर आणि चंद्रपूरचा समावेश आहे.

            आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत रामटेक ५१नागपूर ६२भंडारा- गोंदिया ४९गडचिरोली- चिमूर १९ आणि चंद्रपूर ४८ असे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

00000

हम साथ साथ साथ है

 



Wednesday, 27 March 2024

प्रभू धनकुबेर यांच्या आरतीच्या पुस्तिकेचे प्रकाशन ; धन दैवतांची पूजा करण्याचे आवाहन

 


प्रभू धनकुबेर यांच्या आरतीच्या पुस्तिकेचे प्रकाशन ; धन दैवतांची पूजा करण्याचे आवाहन

पालघर. (प्रतिनिधी)  प्रभू धनकुबेर यांच्या आरतीच्या पुस्तिकेचे प्रकाशन श्री गोमातेश्वरी अंबाधाम आश्रम परिसरात स्थित प्रभू धनकुबेर मंदिरात अध्यक्ष विनोद सिंह यांच्या हस्ते करण्यात आले असून संपूर्ण महाराष्ट्रातील दुसरे प्रभू धनकुबेर यांचे मंदिर असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

यावेळी सिंह म्हणाले की, फक्त दिवाळी सणातील धनत्रयोदशी किंवा धनतेरस च्या दिवशी आपण धनलक्ष्मी ची पूजा करत असतो. आणि वर्षभर अधूनमधून आपल्या काही आर्थिक अडचणी जाणवली तर आपण धनलक्ष्मीची पूजा करत असतो. तसेच, आपण सर्वजण वर्षभर काबाडकष्ट करत असतो तरी देखील आपल्याकडे हवी अशी धनप्राप्ती होत नाही. धनप्राप्ती व्हावी म्हणून आपण धनलक्ष्मीची पूजा दररोज सकाळी करत असतो. परंतु एका बाजूला आपण धनलक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न करत असतो. पण, धनकुबेर यांना देखील प्रसन्न करण्याचे तितकेच महत्त्वाचे असून त्यांची आवश्यकता आहे. याची माहिती आम्हाला काही वेद, पुराण आदी ग्रंथांमधून आमचे मित्र एस. मुलाणी यांच्या वाचनातून मिळाल्यानंतर आम्ही धनकुबेर यांचे मंदिर स्थापन करण्याचा मानस केला. त्यानंतरच आम्ही भगवान प्रभू श्री धन कुबेर यांचे मंदिर बनवून त्यांची प्राणप्रिष्ठा नुकतीच केली आहे. आम्ही तमाम जनतेला आव्हान करू इच्छितो की, प्रभु श्री धनकुबेर यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी पालघर जिल्ह्यातील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाडाखडकोना मनोर जवळ श्री गोमातेश्वरी अंबाधाम आश्रम परिसरात येऊन आपण प्रभू श्री धनकुबेर यांची पूजा करून आपली मागणी प्रभू श्री धनकुबेर यांच्याकडे करावी जेणेकरून आपणास आशीर्वाद लाभेल असे आश्रमचे अध्यक्ष विनोद सिंह म्हणाले.

याप्रसंगी श्री गोमातेश्वरी अंबाधाम आश्रमाचे अध्यक्ष विनोद पारसनाथ सिंह, मनोज पारसनाथ सिंह, पारसनाथ देवनारायण सिंह, संतोष रुद्यनारायण सिंह, दैनिक परशुराम समाचार दिलीप सिंह, नितीन बोंबाडे, एस. मुलाणी, हेमांशु संजय सिंह, अभिषेक संजय सिंह, सुमित विनोद सिंह, आशिष माताप्रसाद सिंह, स्नेहा सिंह, यांच्या सह मंदिरातील पुजारी उपस्थित होते.



कोकणी हापूस कर्नाटकी हापूस फरक

 


चुक कुठे झाली ?..🫢

 *चुक कुठे झाली ?..🫢🤔*

   

एक खूप हुशार मुलगा होता. संपुर्ण शैक्षणिक आयुष्यात पहिल्या क्रमांकावर उत्तीर्ण होत राहिला. सायन्स मध्ये नेहमी 100% मार्क मिळवले.

     अशी बहुतेक मुलं इंजिनियरींग साईडला जातात, म्हणून त्याची ही निवड आय.आय.टी. चेन्नई मध्ये झाली. तेथून त्याने बी. टेक. ची पदवी मिळवली. पुढील शिक्षणासाठी तो अमेरिकेला गेला आणि यूनिव्हर्सिटी ऑफ़ कॅलिफोर्निया मधून तो एम. बी. ए. झाला. 

    आता इतके शिक्षण घेतल्यावर तेथे चांगली नोकरी तर मिळतेच. तो तेथेही नेहमी टॉपरच राहिला. तेथेच नोकरी करायला लागला.

     त्याचे पाच बेडरूमचे घर होते. चेन्नईच्याच एका खूपच सुंदर मुलीशी त्याचे लग्न झाले. एका माणसाला आपल्या जीवनात अजून काय पाहिजे? शिकून सवरुन इंजिनियर झाला, अमेरिकेत स्थाईक झाला, मोठ्या पगाराची नोकरी, बायको, मुले, सुखच सुख....

      पण दुर्भाग्याने आजपासून चार वर्षांपूर्वी त्याने तेथे अमेरिकेत, आपल्या पुर्ण परिवारासह आत्महत्या केली. आपली पत्नी आणि मुलांना गोळी मारून स्वतःला ही गोळी मारून घेतली. 

     काय चूक झाली होती? शेवटी असं काय घडलं? गडबड कुठे झाली?

      हे पाऊल उचलण्याआधी त्याने आपल्या पत्नीशी विचारविनिमय केला होता, मग एक लांबलचक सुसाईड नोट लिहिली आणि आपल्या या कृतीचे समर्थन केले.... आणि या परिस्थितीत हाच एक सर्वोत्तम मार्ग होता असे लिहीले.

     त्यांच्या या केसचा आणि सुसाईड नोटचा कॅलीफोर्निया इन्स्टीट्यूट आॅफ क्लिनीकल फिजीकाॅलाॅजी ने ‘काय चूक झाली ?' हे माहीत करण्यासाठी अभ्यास केला.

      सर्वात आधी कारण काय होते ते सुसाईड नोट मधून आणि मित्रांकडून माहीत केले.

     अमेरिकेच्या आर्थिक मंदीमुळे त्याची नोकरी गेली. बरेच दिवस रिकामे बसून रहावे लागले. नोकरी शोधत राहीला. मग आपला पगार कमी करत गेला आणि तरीही नोकरी मिळाली नाही, घराचा हप्ता थकला, रस्त्यावर येण्याची वेळ आली.

   काही दिवस कुठल्याशा पेट्रोल पम्पावर तेल भरायचे काम केले. वर्षभर हे सर्व सहन केले आणि शेवटी पति पत्नीने मुलांसह आत्महत्या केली...

       तज्ज्ञांनी या घटनेचा सार असा काढला की या माणसाची मानसिकता फक्त यश मिळवणे यासाठीच तयार झालेली होती, परंतु अपयशाचा सामना कसा करायचा याचे शिक्षण त्याला मिळालेच नव्हते....

      आता त्याच्या जीवनावर सुरुवातीपासून नज़र टाकू या. 

      अभ्यासात खूप हुशार होता, नेहमी पहिल्या क्रमांकावरच उत्तीर्ण झाला. अशा बऱ्याचशा पालकांना मी ओळखतो,

ज्यांची हीच इच्छा असते की त्यांच्या मुलाचा वा मुलीचा नेहमी पहिलाच क्रमांक यावा, त्यांच्याकडून कधीच चूक होऊ नये. चूक झालीच तर जसे खूप मोठे पाप केले आहे आणि त्यांने पहिला यावे यासाठी ते काहीही करायला तयार असतात. 

     मग अशी मुलं काहीशी जास्तच अभ्यासू असतात म्हणून खेळणे, कूदने, फिरणे, लढणे, भांडणे, मारामारी अशा संधी बिचाऱ्यांना फारच कमी मिळतात. 

    बारावी उत्तीर्ण होऊन आले तर इंजीनियरिंग कॉलेजचे ओझे लादले जाते बिचाऱ्यांवर, तेथून निघाला तर एम. बी. ए. आणि अजून शिकतच आहे तर मोठ्या पगाराची नोकरी. आता मोठा पगार म्हटला की जबाबदारी पण मोठी म्हणजे मोठे मोठे  टार्गेटस्...

      हे जग फार कठोर आहे. आणि हे जीवन वेगवेगळ्या परिक्षा घेते. आपली कॉलेज ची डिग्री आणि मार्कशीटशी त्याला काही देणेघेणे नाही. तेथे किती मार्क मिळवले याच्याशी काही फरक पडत नाही.

      हे जीवन आपली वेगळी प्रश्नपत्रीका समोर ठेवते. आणि सर्व प्रश्न अभ्यासक्रमाच्या बाहेरचे असतात, वेडेवाकडे, बिनबुडाचे, आणि दररोज परीक्षा घेते, कुठलेही वेळापत्रक नसते.

     एका इंग्रजी कादंबरीत एक गोष्ट वाचली होती...

एक मेंढीचे पिल्लू आपल्या आईपासून दूर निघून जाते. पुढे जाऊन आधी म्हशींच्या कळपात घेरले जाते. त्यांच्या पायांखाली चिरडले जाण्यापासून कसेतरी वाचते. आता थोडेच पुढे चालले होते की एक कोल्हा त्याच्याकडे झेपावतो. कसेतरी झुडपांमध्ये घुसून ते आपला जीव वाचवते तर समोरून लांडगे येताना दिसतात. खूप वेळ झुडपांमध्ये लपून बसते, कसं तरी आई जवळ परत येते व म्हणते, "आई, तेथे तर खूप भयानक जंगल आहे.

     अशा या खतरनाक भयाण जंगलात जिवंत टिकून रहाण्याचेही प्रशिक्षण मुलांना जरूर द्या.


       विशेष म्हणजे मुलांना फक्त पुस्तकी किडा बनवू नका, मुलांना अभ्यासा बरोबरच धार्मिक, व्यावहारिक, सामाजिक संस्कार देणं ही गरजेचे आहे. प्रत्येक परिस्थितिला आनंदाने व धैर्याने सामोरे जाण्याची क्षमता व त्यातून उभारण्याचे ज्ञान आणि मानसिकता मुलांमध्ये असणे आवश्यक आहे.


 *शेवटी आपली मुलं* *आपलीच आहेत ना!!!*

डास मारण्याचा देशी jughad,pl share


 

हसूnoन हसून पोट दुखेल

 हसून हसून पोट दुखेल  बाबाआजोबा आता तुमचा जमाना गेला...आता आमच्या नवीनम्हणी ऐका...आधुनिक युगाच्या अफलातून आधुनिक म्हणी-🍥

१) राहायला नाही घर म्हणे लग्न कर !🍥२) सासु क्लबमध्ये सुन पबमध्ये !🍥३) खिशात नाही डोनेशन, घ्यायला चालला ऍडमिशन !🍥४) मुलं करतात चॅनेल सर्फ़, आईबाप करतात होमवर्क !🍥५) चुकली मुलं सायबरकॅफ़ेत !🍥६) चुकल्या मुली ब्युटीपार्लरमध्ये !🍥७ ) ज्या गावचे बार, त्याच गावचे हवालदार !🍥८) नाजुक मानेला मोबाईलचा आधार !🍥९) मनोरंजन नको रिंगटोन आवर !🍥१०) स्क्रिनपेक्षा एस एम एस मोठा !🍥११) जागा लहान फ़र्निचर महान !🍥१२) उचलला मोबाईल लावला कानाला !🍥१३) रिकाम्या पेपरला जाहिरातिंचा आधार !🍥१४) काटकसर करुन जमवलं, इंकम टॅक्समध्ये गमावलं 🍥१५) साधुसंत येती घरा, दारंखिडक्या बंद करा !🍥१६) ज्याची खावी पोळी, त्यालाच घालावी गोळी🍥१७) एकमेका पुरवू कॉपी, अवघे होऊ उत्तीर्ण !🍥१८) लांबून देखणी, जवळ आल्यावर चकणी !🍥१९) चोर्या करुन थकला आणि शेवटी आमदार झाला🍥२०) आपले पक्षांतर, दुसर्याचा फुटीरपणा !🍥२१) प्रयत्ने लाईनीत उभे राहता रॉकेलही मिळे !🍥२२) अन्यायाचा फास बरा, पण चौकशीचा त्रास आवरा !🍥२३) जया अंगी खोटेपण, तया मिळे मोठेपण !🍥२४) एल.एल.बी झालो अन भिकेला लागलो !🍥२५) सरकार जेवू घालीना, पदवी भिक मागू देईना 🍥२६) वशिल्याच्या नोकरीला इंटरव्ह्यु कशाला !🍥२७) वयही गेले, पैसेही गेले, हाती राहीले दाखले !🍥२८) घोड्याच्या शर्यतीत वशिल्याचे गाढव पुढे !🍥२९) साहेबापुढे वाचली गीता, कालचा मेमो बराहोता !🍥३०) गाढवापुढे वाचली गीता वाचणारा गाढव होता !🍥३१) स्मगलींगचे खाणार, त्याला दाऊद देणार !🍥३३)न्हाव्यावर रुसला अन जंगल वाढवून बसला!🍥३४) पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा !🍥३५) पुढार्याचं मुळ व हॉटेलची चूल पाहु नये !🍥३६) नाव सुलोचनाबाई, चष्म्याशिवाय दिसत नाही !🍥३७) नाव गंगूबाई, आंघोळीला पाणी नाही!🍥३८) घरात नाही दाणा आणी म्हणे बर्शन आणा !🍥३९) घरावर नाही कौल पण अॅंटीनाचा डौल !🍥४०) घाईत घाई त्यात चष्मा नाही !🍥४१) रिकामा माळी ढेकळ फोडी !🍥४२) घरोघरी मॉडर्न पोरी !🍥४३) ओठापेक्षा लिपस्टीक जड !🍥४४) नाकापेक्षा चष्मा जड !🍥४५) अपुर्या कपडयाला फॅशनचा आधार !🍥४६) बायकोची धाव माहेरापर्यंत !🍥४७) गोष्ट एक चित्रपट अनेक !🍥४८) काम कमी फाईली फार!🍥४९) लाच घे पण जाच आवर !🍥५०) मंत्र्याच पोर गावाला घोर !🍥५१) मरावे परी मूर्तिरुपे उरावे !🍥५२) नटीच्या लग्नाला सतरा नवरे !🍥५३) मिळवत्या मुलीला मागणी फार !🍥५४) रिकामी मुलगी शृंगार करी!🍥५५) प्रेमात पडला हुंडयास मुकला !🍥५६) दुरुन पाहुणे साजरे !🍥५७) ऑफीसात प्यून शहाणा !🍥५) सत्ता नको पण खैरनार आवर !🍥५९) एक ना धड भाराभर पक्ष !🍥६०) हरावे परी डिपॉझिटरुपी उरावे !🍥६१) थेंबे थेंबे लोकसंख्या वाढे !🍥६२) तोंडाला पदर गावाला गजर !🍥६३) कष्टानं कमावलं बाटलीनं गमावलं !🍥६४) रात्र थोडी डास फार !🍥६५) शिर सलामत तो रोज हजामत ६६) नेता छोठा कटआऊट मोठा !🍥६७) चिल्लरपुरता सत्यनारायण!🍥६८) दैव देते आयकर नेत !🍥६९) डीग्री लहान वशिला महान!


करा शेअर...😀😀😀

Featured post

Lakshvedhi