Thursday, 28 March 2024

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत १८३ उमेदवारांचे २२९ अर्ज दाखल

 राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज

 दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत १८३ उमेदवारांचे २२९ अर्ज दाखल

 

            मुंबईदि. २७ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल २०२४ रोजी होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा  शेवटचा दिवस होता. आज सायंकाळ पर्यंत २२९अर्ज दाखल झाले आहेत.

            पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार असून यामध्ये रामटेकनागपूरभंडारा- गोंदियागडचिरोली- चिमूर आणि चंद्रपूरचा समावेश आहे.

            आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत रामटेक ५१नागपूर ६२भंडारा- गोंदिया ४९गडचिरोली- चिमूर १९ आणि चंद्रपूर ४८ असे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

00000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi