Saturday, 16 March 2024

ओबीसी विभागात तीन नवी महामंडळे, मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पोर्टलचे उदघाट्न

 ओबीसी विभागात तीन नवी महामंडळे

मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पोर्टलचे उदघाट्न

 

     मुंबईदि. १५ : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाअंतर्गत संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळसंत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळजगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ ही महामंडळे स्थापन करण्यात आली असून या नव्याने स्थापन केलेल्या महामंडळाच्या उपकंपनींचे व त्याअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या पोर्टलचे व नवीन कार्यालयाचे उद्घाटन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले.

             मंत्री श्री. सावे म्हणालेराज्यातील इतर मागास प्रवर्गातील समाजाची सामाजिक व आर्थिक उन्नती व्हावी तसेच विविध क्षेत्रातील स्वयंरोजगाराला चालना देण्याच्या उद्देशाने इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. गुरव समाजाकरिता संत काशिबा गुरव आर्थिक विकास महामंडळवीरशैव लिंगायत समाजाकरिता जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ आणि नाभिक समाजाकरीता संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ या महामंडळांची महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ  या मुख्य कंपनीची उपकंपनी म्हणुन स्थापना केली आहे. या तीन्ही महामंडळांचे कार्यक्षेत्र ३६ जिल्हयात आहेत.

            वैयक्तिक व शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत पात्रता प्रमाणपत्रथेट कर्ज योजनेंतर्गत लाभार्थीना मंजुरीपत्राचे वितरण मंत्री श्री. सावे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महामंडळाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या उपकंपनीच्या योजनांची माहिती व्यवस्थापकीय संचालक प्रफुल्ल ठाकूर यांनी दिली. या कार्यक्रमास महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमवरील विश्वास कायम ठेवला, निवडणुकीत बॅलेट पेपर वापरण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला

 सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमवरील विश्वास कायम ठेवला,

निवडणुकीत बॅलेट पेपर वापरण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला

            मुंबईदि. 15 : देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमवरील विश्वासाला पुन्हा प्रतिसाद देतआज 19 लाखांहून अधिक ईव्हीएम गहाळ झाल्याची शंका आणि निवडणुका घेण्यासाठी बॅलेट पेपरचा वापर करण्याबाबत अशा दोन रिट याचिका फेटाळून लावल्या. 19 लाख गहाळ ईव्हीएम याचिकेप्रकरणी निर्णय देतानान्यायालयाने अशा शंका आणि आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले आहे व हे प्रकरण भारत निवडणूक आयोगाच्या बाजूने निकाली काढले आहे. याचिकाकर्ता- आयएनसीपी (INCP) ने अशी भीती व्यक्त केली की2016-19 दरम्यान भारत निवडणूक आयोगाच्या कोठडीतून गहाळ झालेल्या 19 लाख ईव्हीएमचा वापर आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक2024 मध्ये फेरफार करण्यासाठी केला गेला असता.

            लोकप्रतिनिधी कायदा1951 चे कलम 61 अ बाजूला सारुन बॅलेट पेपर वापरून निवडणुका घेण्यासंदर्भातील आणखी एका याचिकेवर सुनावणी करण्यास नकार देताना न्यायमूर्ती खन्ना यांनी निरीक्षण नोंदविले की ईव्हीएमच्या कामकाजाशी संबंधित विविध मुद्द्यांवर 10 हून अधिक प्रकरणे तपासण्यात आली आहेत. न्यायालयाने वेळोवेळी याचिका फेटाळताना ईव्हीएमच्या कार्यपद्धतीवर नेहमीच विश्वास दर्शविला आहे.

            गेल्या दशकात आणि सुमारे 40 निकालांमध्येसर्वोच्च न्यायालयाने भारत निवडणूक आयोग ईव्हीएम आणि या संबंधांतील पारदर्शक प्रक्रिया आणि कठोर प्रशासकीय कार्यप्रणालीवर त्यांची श्रध्दा आणि विश्वास कायम ठेवला आहेत्यामुळे देशात ईव्हीएमच्या बाजूने मिळत असलेल्या न्यायाला मूल्य आणि सामर्थ्य मिळाले आहे.

            सर्वोच्च न्यायालयाचे नवीनतम निर्णयसर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या आदेशांच्या मजबूत आणि वाढत्या प्रतिमेमध्ये आणखीच भर घालतातज्यांनी विविध ईव्हीएम प्रकरणांची तपासणी केली आहे आणि भारत निवडणूक आयोगाच्या बाजूने निर्णय दिला आहे. अलीकडील एका प्रकरणात (मध्य प्रदेश जन विकास पक्ष विरुद्ध भारतीय निवडणूक आयोगविशेष रजा याचिका (सिव्हिल) 16870/ 2022सप्टेंबर2022)माननीय सर्वोच्च न्यायालयाने अर्जदारास 50,000 रुपये एवढा दंड ठोठावला आहे. याचिकाकर्त्याने असे निरीक्षण नोंदवले कीदेशात अनेक दशकांपासून ईव्हीएमचा वापर केला जात आहेपरंतु वेळोवेळी उपस्थित केलेले मुद्दे खोडण्यात आले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने देखील अशाच एका याचिकेवर (सी. आर. जया सुकीन विरुद्ध भारतीय निवडणूक आयोग आणि इतररिट याचिका (सिव्हिल) 6635/2021ऑगस्ट 2021) रु.10,000 चा दंड ठोठावला होता. ज्यामध्ये ईव्हीएमचा वापर थांबवण्यास सांगून आगामी सर्व निवडणुकांमध्ये ईव्हीएम आणि त्याऐवजी बॅलेट पेपर वापरण्याचे अर्जदाराने नमूद केले होते.

            तत्पूर्वीदिल्लीच्या उच्च न्यायालयानेदिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीने आगामी लोकसभा निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) आणि व्हीव्हीपॅटसाठी सुरू असलेली प्रथमस्तरीय तपासणी (एफएलसी) प्रक्रिया संपुष्टात आणण्याची विनंती करणारी याचिका फेटाळून लावली होती.

            एनसीआर न्यायालयानेआपल्या निकालातविद्यमान कार्यपद्धतीच्या मजबुती आणि पारदर्शकतेवर जोर दिला आणि याचिकाकर्त्यांचे दावे खोडून काढले. ईव्हीएम मॅन्युअलस्टेटस पेपरईव्हीएम प्रेझेंटेशनईव्हीएमच्या 40 वर्षांच्या प्रवासावरील प्रगतीपुस्तकईव्हीएमचा कायदेशीर इतिहास यासारख्या प्रकाशनांच्या स्वरूपात ईव्हीएमशी संबंधित प्रक्रिया आणि सुरक्षा उपायांची माहिती सार्वजनिक माध्यमांवर उपलब्ध करून देण्यात आणि सतत अद्ययावत केलेले EVM प्रश्नावलीबाबत भारत निवडणूक आयोग नेहमीच आघाडीवर आहे.

नागरिकांच्या जीवनात बदल घडवून त्यांचे जीवन सुखी समृध्द होण्यासाठी प्रयत्नशीलमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रु.1 हजार 129 कोटींच्या विविध नागरी सुविधा प्रकल्पांचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न

  


नागरिकांच्या जीवनात बदल घडवून त्यांचे जीवन सुखी समृध्द होण्यासाठी प्रयत्नशील


-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रु.1 हजार 129 कोटींच्या


 विविध नागरी सुविधा प्रकल्पांचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न


 


            ठाणे, दि.15 (जिमाका) :- शासन नेहमीच सर्वसामान्यांच्या विकासाचा विचार करीत आले आहे. नागरिकांच्या जीवनात बदल घडवून त्यांचे जीवन सुखी समृध्द होण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे. यादृष्टीने आज नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 129 कोटीं रुपये मूल्य असलेल्या विविध नागरी सुविधा प्रकल्पांचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न होत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले.


            नवी मुंबई महानगरपालिकेच्या तसेच सिडको महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील विविध विकास कामांचे ऑनलाईन भूमीपूजन व लोकार्पण मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे वर्षा निवासस्थान येथून संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.


            याप्रसंगी पालकमंत्री शंभूराज देसाई, क्रीडा व बंदरे मंत्री संजय बनसोडे, सर्वश्री आमदार रमेश पाटील, गणेश नाईक, प्रशांत ठाकूर, महेश बालदी, श्रीमती मंदा म्हात्रे, माजी खासदार संजीव नाईक, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर, सहव्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयल, सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.कैलास शिंदे, सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप ढोले आदि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध नागरी सुविधा प्रकल्पांचे ऑनलाईन भूमीपूजन व लोकार्पण होत आहे. हे प्रकल्प लोकोपयोगी व लोकांच्या गरजेचे आहेत. मुंबई, नवी मुंबई आता महामुंबई होत चालली आहे. तिसरी मुंबई आकाराला येत आहे. ती सर्वात मोठी मुंबई होणार आहे. शहराशहरांमधील संपर्क वाढत आहे. अटल सेतूमुळे मुंबई-ठाणे-नवी मुंबई-रायगड या शहरांमधील अंतर कमी होवून ही शहरे जवळ आली आहेत. अटल सेतू करताना पर्यावरणाची पूर्णत:काळजी घेण्यात आली आहे. फ्लेमिंगोची संख्या दुप्पट झाली आहे, यातून आपले सरकार पर्यावरण पूरक विकास अशा प्रकारचे काम करीत आहे, हे सिध्द होते. अटल सेतू, मेट्रो, सिडकोच्या माध्यमातून विविध विकास कामे, नवी मुंबई मध्ये नवनवीन व नाविण्यपूर्ण प्रकल्प होत आहेत. हे सर्व प्रकल्प राज्याच्या विकासाच्या गेम चेंजर प्रकल्प आहेत.


      स्वच्छतेमध्ये अमृतमध्ये राज्याला पहिला क्रमांक मिळाला आहे. राज्याला विविध पुरस्कार प्राप्त होत आहेत. त्यामुळे प्लॅन सिटी म्हणून नवी मुंबईचा नावलौकिक होत आहे. नवी मुंबई मध्ये अनेक ठिकाणी ग्रोथ इंजिन उभे राहत आहे. महाराष्ट्राच्या ग्रोथ इंजिनमध्ये नवी मुंबई ही अश्व शक्ती आहे. सुनियोजित विकास कामे होत आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळ सुध्दा लवकर होणार आहे. यावरुन विकासाचा मार्ग टेक ऑफ घेणार आहे. पायाभूत सुविधा, धार्मिक स्थळे, भूमीपुत्रांचा विकास असे अनेक उपक्रम सुरु झाले आहेत. पर्यावरणाचा समतोल राखीत राज्य सरकार पर्यावरण पूरक काम करीत आहे. राज्याला केंद्र शासनाचे देखील भक्कम पाठबळ मिळत आहे. केंद्राच्या अर्थसंकल्पामध्ये राज्यासाठी भरीव तरतूद केली आहे. केंद्र शासन राज्य सरकारच्या पाठीशी आहे. ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यांचा विकास व्हायला हवा. या जिल्ह्यांमध्ये उत्तम जागा, दळणवळाचे मार्ग, संपर्क यंत्रणा व कुशल मनुष्यबळ यांची उपलब्धता आहे. यामुळे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रकल्प येत आहेत. लोकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. सिंगल विंडो क्लियरन्स, कॅपिटल सबसिडी, उद्योगांना सुरक्षिततेची हमी, अशा विविध घटकांमध्ये राज्य पुढे येत आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था सुदृढ होत आहे. इन्फ्रास्ट्रक्चर ची कामेही मोठ्या प्रमाणात होत आहेत.


      मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडकोचे अभिनंदन केले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करायचे आहे. विमानतळाचे काम लवकरात लवकर करावे. विमानतळ नवी मुंबईच्या विकासामध्ये भर घालणारे आहे. लोकांचे म्हणणे काय, लोकांचे हित कशामध्ये आहे, यासाठी आपण काम करीत आहोत. त्यादृष्टीनेच हे शासन लोकांच्या हिताचे विविध निर्णय घेत आहे.


       याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील विविध नागरी सुविधा प्रकल्पांची चित्रफितीद्वारे माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज नियोजित पूर्णाकृती पुतळा, से.10 ए, ऐरोली शिलान्यास, घणसोली येथे पामबीच मार्गावर घणसोली ऐरोली खाडीपूल बांधणे भूमीपूजन, नमुंमपा क्षेत्र सीसीटीव्ही यंत्रणा व कमांड सेंटर, नमुनपा मुख्यालय लोकार्पण, से.38, सीवूड नेरुळ येथील ज्येष्ठ नागरिक काळजी केंद्र इमारत लोकार्पण, अमृत योजना 2.0 अंतर्गत सुविधा कामांचे भूमीपूजन, मलउदंचन केंद्रांची पुनर्बांधणी-20 से 25 बेलापूर. से. 1 ए शिरवणे, मलउदंचन केंद्रांची पुनर्बांधणी-से. 9 सानपाडा, से. 3 वाशी, से. 12 वाशी, से.28 वाशी, मलउदंचन केंद्रातील पम्पिंग मशिनरी बदल से. 6 बेलापूर, से.4 नेरुळ, से. 30 वाशी, मलउदंचन केंद्रातील पम्पिंग मशिनरी बदल से. 1 ए कोपरखैरणे, से. 2ए कोपरखैरणे, यादवनगर, ऐरोली येथे 2 द.ल.लि. क्षमतेचा पॅकेज ट्रिटमेंट प्लान्ट उभारणे, से.12 बेलापूर येथे 7.5 द.ल.लि. क्षमतेचा टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्ट उभारणे, बेलापूर विभागात 24 x 7 पाणीपुरवठा योजना, बेलापूर विभागात ज्वेल ऑफ नवी मुंबई आणि कोपरखैरणे विभागात से. 19 धारण तलाव पुनरुज्जीवन व सुशोभिकरण, भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र येथे 150 द.ल.लि. क्षमतेचे फिल्टर वेड बांधणे, नमुंमपा क्षेत्रातील रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करणे,, से. 30 व शाळा इमारत लोकार्पण, से. 15 घणसोली येथील शाळा इमारत लोकार्पण, से. 14, कोपरखैरणे नागरी आरोग्य केंद्र इमारत लोकार्पण, से.3. ऐरोली येथील अग्निशमन केंद्र इमारत लोकार्पण, विष्णुदास भावे नाटयगृह, वाशी येथील ग्रंथालय लोकार्पण, से. 22, तुर्भे येथील नियोजित विभाग कार्यालय इमारत भूमीपूजन नमंमपा परिवहन उपक्रम, तुर्भे आगार प्रशासकीय इमारत लोकार्पण या विकासकामांचे ऑनलाईन भूमीपूजन व लोकार्पण संपन्न होत आहे, असे सांगितले.


00000

जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय या आरोग्य मंदिरांचा कायापालट करण्यास प्राधान्यधाराशिव येथील ५०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाचे ऑनलाईन भूमिपूजन

 जिल्हा रुग्णालयवैद्यकीय महाविद्यालय या आरोग्य मंदिरांचा

 कायापालट करण्यास प्राधान्य

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

धाराशिव येथील ५०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाचे ऑनलाईन भूमिपूजन

            मुंबईदि. १५ :राज्य शासनाने ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा बळकट करण्यास प्राधान्य दिले आहे.  राज्यातील जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालये यांचा कायापालट करण्यात येणार असून या ठिकाणी दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देऊन आरोग्य सेवेची ही मंदिरे अधिक सुसज्ज केली जातील.असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले.

            सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत धाराशिव येथे उभारण्यात येणाऱ्या नवीन ५०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे करण्यात आले.   

             मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे),राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई,क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे,आमदार मंदा म्हात्रे,आमदार मनीषा कायंदेआमदार राजेश पवार,आमदार बालाजी कल्याणकर,माजी आमदार रामदास कदमसार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे)आरोग्य सचिव नवीन सोनाआयुक्त धीरजकुमार,आरोग्य सेवा संचालक डॉ.नितीन आंबाडेकर तर धाराशिव येथील भूमिपूजन कार्यक्रम स्थळावरून मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रविणसिंह परदेशीजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष,आरोग्य विभागाच्या लातूर परीमंडळाच्या उपसंचालक डॉ.अर्चना भोसलेसार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाबासाहेब थोरात,कार्यकारी अभियंता नरसिंग भांडे,प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.इस्माईल मुल्लाजिल्हा आरोग्य अधिकारी व अनील खोचरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी धाराशिव जिल्ह्यात होत असलेल्या सुसज्ज ५००  खाटांच्या रुग्णालयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.ते म्हणाले सर्व सामान्यांना दर्जेदार आणि कमी खर्चात आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे.आरोग्य विभागाला यासाठी आवश्यक निधी व यंत्र सामग्री उपलब्ध करून दिली जात आहे.  राज्यात वैद्यकीय महाविद्यालयांसोबतच स्वतंत्र सुपर स्पेशालिटी सिव्हिल हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी म्हणाले .

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीआमचे शासन हे दिलेला शब्द पाळणारे शासन असून धाराशिव येथे उभारण्यात येत असलेले ५००  खाटांचे जिल्हा रुग्णालय हे त्याचेच एक उदाहरण आहे. शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजनेत दीड लाखाहून पाच लाखापर्यंत उपचाराच्या खर्चास मान्यता दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या आयुष्यमान भारत योजना व राज्य शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजना यामुळे सर्वसामान्यांना वैद्यकीय सेवा विनासायास उपलब्ध होत असल्याचे सांगितले.

            मुख्यमंत्री सहायता निधीतूनही गेल्या दीड वर्षात सुमारे २०० कोटीपर्यंत मदत दिली असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणालेसर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी राज्यात ७०० ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात येत असून जवळपास ३०० ठिकाणी हे दवाखाने सुरू झाले आहेत.आता कॅशलेस वैद्यकीय सेवा ही सुरू करत असल्याचे ते म्हणाले.

            मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणालेसांगली सातारा जिल्ह्यात स्मार्ट पीएचसी सारखा उपक्रम  राबविला जात आहे. अशा उपक्रमातून सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळत आहेत. धाराशिव येथे उभारण्यात येत असलेल्या या रुग्णालयाचा औसाउमरगा,बार्शी व परंडा या भागातील जनतेस लाभ होणार असून या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल.

            आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री डॉ. सावंत म्हणालेराज्यातील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभाग नेहमीच दक्ष आहे. धाराशिव जिल्हा हा आकांक्षित जिल्हा म्हणून ओळखला जातो.या जिल्ह्यात होत असलेल्या या जिल्हा रुग्णालयामुळे या भागातील जनतेला चांगल्या व दर्जेदार आरोग्य सुविधा मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.प्रवीण परदेशी यावेळी म्हणालेपालकमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त भूमिपूजनाची भेट मिळाली आहे.३ वर्षात या जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण होणार आहे.असे त्यांनी सांगितले.

            आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर म्हणाले,राज्यात १० जिल्ह्यात सुसज्ज रुग्णालये बांधण्यात येत आहे.३६२ कोटी रुपयांचा निधी डॉ. परदेशी यांनी एशियन विकास बँकेकडून या रुग्णालयाच्या बांधकामासाठी उपलब्ध करून दिला असल्याचे मनोगतातून सांगितले.

००००

संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापनेचेसुतार समाजाच्या विकासासाठी शासन कटीबद्ध

 संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापनेचे

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

सुतार समाजाच्या विकासासाठी शासन कटीबद्ध

-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबई, दि.15 : राज्यातील सुतार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजाच्या प्रतिनिधींना दिले. शासन सुतार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबध्द असल्याची ग्वाही देखील मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.

            श्री क्षेत्र आळंदी येथे 24 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या सुतार समाज महामेळाव्यात मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी संत भोजलिग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापनेची मागणी सुतार समाजाने केली होतीसमाजाच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल सकारात्मकता  दर्शवली आहे. 

            याबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीराज्यातील सुतार समाज हा ग्रामीण भागातील बारा बलुतेदारांपैकी एक प्रमुख उद्यमशील समाज आहे. राज्याच्या आर्थिकसामाजिक विकासात सुतार समाजाने सातत्याने योगदान दिले आहे. राज्यातील प्रत्येक समाज घटकाच्या विकास हे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे.  या भूमिकेतून आणि भावनेतूनच सुतार समाजासाठी स्वतंत्र महामंडळ निर्मितीचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

            येत्या काळात महामंडळाच्या माध्यमातून सुतार समाजातील विद्यार्थीमहिलांसाठी आणि तरुण उद्योजकांकरिता विविध योजना राबविता येतील. त्यामुळे समाजाच्या मागणीचा सकारात्मक विचार केला आहे. यातून सुतार समाजासाठी विकासाची दिशा मिळू शकेलअसा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

0000


 


नवी मुंबईतील सिडकोचे प्रकल्प गेम चेंजररु.5 हजार कोटी मूल्य असलेल्या प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन व उद्घाटन

 नवी मुंबईतील सिडकोचे प्रकल्प गेम चेंजर

-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रु.5 हजार कोटी मूल्य असलेल्या प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन व उद्घाटन

 

            ठाणेदि.15 :- नवी मुंबईमध्ये सिडकोच्या माध्यमातून उभे राहात असलेले मेट्रोनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे प्रकल्प गेम चेंजर ठरणार असल्याचे उद्गार  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

      सिडकोतर्फे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणारा पूलखारघर-तुर्भे जोड मार्ग आणि उलवे किनारी मार्ग या प्रकल्पांचे भूमीपूजन त्याचप्रमाणे भूमीपूत्र भवनआणि प्रवासी जलवाहतूक टर्मिनस नेरुळ या नागरी हिताच्या प्रकल्पांचे उद्घाटन आज मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे वर्षा निवासस्थान येथून संपन्न झालेत्यावेळी ते बोलत होते. या विकास प्रकल्पांचे एकूण मूल्य सुमारे 5 हजार कोटी रुपये आहे.

            यावेळी पालकमंत्री श्री.शंभूराज देसाईक्रीडा व बंदरे मंत्री संजय बनसोडेसर्वश्री आमदार रमेश पाटीलगणेश नाईकप्रशांत ठाकूरमहेश बालदीश्रीमती मंदा म्हात्रेमाजी खासदार संजीव नाईकसिडको चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघलनवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकरसहव्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयलसहव्यवस्थापकीय संचालक डॉ.कैलास शिंदेसहव्यवस्थापकीय संचालक श्री. ढोले आदि उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणालेनवी मुंबईमध्ये सिडकोच्या माध्यमातून उत्तम प्रकारे विकासकामे होत असून नवी मुंबईमध्ये उभी राहणारी विकास केंद्रे (ग्रोथ सेंटर) ही राज्याकरिता अश्वशक्ती आहे. राज्य शासनाने अटल सेतू सारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टिव्हिटी समृद्ध करण्यावर भर दिला आहे. शासनाच्या या उद्दिष्टाला हातभार लावून सिडकोनेही परिवहनाचे विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. 

            श्री. सिंघल यांनी सांगितले की, सिडकोच्या उद्घाटन व भूमीपूजन होत असलेल्या प्रकल्पांचे सादरीकरण करून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पुलामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाकडे जाण्याकरिता व तेथून येण्याकरिता थेट प्रवेश मार्ग उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासदेखील थेट जोडणी मिळणार आहे. खारघर-तुर्भे जोड मार्ग हा 5.4 कि.मी. लांबीचा मार्ग असून या मार्गाद्वारे तुर्भे आणि खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्क दरम्यान थेट कनेक्टिव्हिटी निर्माण होणार आहे. 

0000000000

शेतकऱ्यांचे १ लाख ६० हजार पर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफबीड मधील किसान क्रेडीट कार्ड डिजिटायझेशन – जनसमर्थ प्रकल्पाचा शुभारंभ एका क्लिकने शेतकऱ्यांच्या खात्यात पीक कर्जाची रक्कम जमा

 शेतकऱ्यांचे १ लाख ६० हजार पर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

बीड मधील किसान क्रेडीट कार्ड डिजिटायझेशन – जनसमर्थ प्रकल्पाचा शुभारंभ

एका क्लिकने शेतकऱ्यांच्या खात्यात पीक कर्जाची रक्कम जमा

            मुंबईदि. १५ : - शेतकऱ्यांच्या एक लाख ६० हजार रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. बीड जिल्ह्यातील किसान क्रेडीट कार्डच्या डिजीटल प्रकल्प – जनसमर्थचा शुभारंभ दूकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली.

            'सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहणारे आहे.डिजीटल क्रांतीचा वापर शेतकऱ्यांसाठी करण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या डिजीटल प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती येणार आहेअसेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.

            कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील २२ शेतकऱ्यांच्या खात्यात किसान क्रेडीट कार्डच्या माध्यमातून थेट रक्कम एका क्लिकद्वारे जमा करण्यात आली. या कार्यक्रमास राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडेउत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईक्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडेआमदार बालाजी कल्याणकरआमदार राजेश पवारआमदार संजय रायमूलकरकृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुप कुमारकृषी आय़ुक्त डॉ. प्रवीण गेडामविभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दडजिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे आदी उपस्थित होते.

            किसान क्रेडीट कार्डच्या डिजीटायझेशनच्या या जनसमर्थ प्रकल्पासाठी देशातील दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये बीड जिल्ह्याचा समावेश करण्यात आला. बीड जिल्ह्यातील महसूलकृषी अशा विविध विभागांनी एकत्र येऊन गेल्या काही दिवसांत ४ लाख ७५ हजार शेतकऱ्यांची नोंदणी करून त्यांचे फार्मर्स आयडी तयार केले आहेत. याकरिता दोन ॲपचीही निर्मिती करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्याला कागदपत्र विरहीत आणि घरबसल्या अल्पमुदतीच्या कर्जासाठी अर्ज करता येतो. याशिवाय या आयडीमुळे त्यांना शासनाच्या अन्य योजनांसाठीही अर्ज करणे आणि लाभ घेणे सुलभ होणार आहे. "ॲग्रीस्टॅक- सीपीएमयू" यांच्याकडून या प्रकल्पाचे कार्यान्वयन केले जात आहे.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेआमचे सरकार सर्वसामान्यांचे आणि शेतकऱ्यांचे आहे. हे सरकार बळीराजाचे आहेयाचा आम्हाला अभिमान आहे. शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीगारपीट अशा नैसर्गिक संकटात आपण त्यांना भरभरून मदत केली आहे. आपला देश कृषि प्रधान आहे. आपण शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानूनच सर्व योजनांचे नियोजन करतो आहोत. शेतकऱ्याना गेल्या दीड वर्षात ४५ हजार कोटींचे मदत आपण केली आहे. सिंचनांचे १२० प्रकल्प मार्गी लावले आहेत. यामुळे राज्यातील १५ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. शेतीमाती आणि शेतकरी यांच्याशी आपली नाळ जोडलेली आहेअसे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी राज्य सरकार राबवत असलेल्या एक रुपयात पीक विमाजलयुक्त शिवार अशा योजनांचीही माहिती दिली.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेआपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना कृषी क्षेत्राचा विकास करण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळेच डिजीटल क्रांतिचा वापर शेतकऱ्यांसाठी आणि कृषि क्षेत्रासाठी करण्याचा हा त्यांच्या संकल्पनेतील प्रकल्प देखील शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती आणणारा ठरेल. आम्ही सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचा पुनरुच्चारही मुख्यमंत्र्यांनी केला.

            शेतकऱ्यांच्या कर्जासाठी लागणारे मुद्रांक शुल्क माफ करण्याच्या मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या घोषणेचे कृषीमंत्री श्री. मुंडे यांनी स्वागत केले. या निर्णयाचा पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना निश्चित मोठा दिलासा मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मंत्री श्री. मुंडे म्हणाले कीदेशातील सहा जिल्ह्यात हा पथदर्शी प्रकल्प राबवण्यात आला. त्यामध्ये बीड आणि उत्तर प्रदेशातील फरुखाबाद या जिल्ह्यांनीच याची यशस्वी कार्यवाही केली. बीड जिल्ह्यातील सर्वच यंत्रणांनी अहोरात्र राबून सुमारे १ हजार २५१ गावांतील शेतकऱ्यांचा डाटा एकत्र केला. यातून सुमारे ४ लाख ७५ हजार शेतकऱ्यांचे फार्मर्स आयडी तयार करण्यात आले आहेत. बीड जिल्ह्याची निवड ही आपल्या राज्यासाठी अभिमानास्पद आहे. तसेच राज्यातील कृषी क्षेत्रातील विकासाला चालना देणारी ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी या प्रकल्पासाठी काम करणाऱ्या तलाठीग्रामसेवककृषी सहायक तसेच जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांचेही कौतुक केले.

            जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ-मुंडे यांनी प्रास्ताविक केले तसेच आभार मानले.

0000


Featured post

Lakshvedhi