Friday, 15 March 2024

मुंबादेवी, महालक्ष्मी मंदिर परिसर विकासासाठी २८० कोटी; जगन्नाथ शंकरशेठ स्मारकासाठी ३५ कोटी रुपयांचा निधी मुंबई महानगरपालिकाच्या माध्यमातून होणार विकास

 मुंबादेवीमहालक्ष्मी मंदिर परिसर विकासासाठी २८० कोटी;

जगन्नाथ शंकरशेठ स्मारकासाठी ३५ कोटी रुपयांचा निधी

मुंबई महानगरपालिकाच्या माध्यमातून होणार विकास

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            मुंबईदि. 13 : मुंबई शहरातील मुंबादेवी मंदिरमहालक्ष्मी मंदिरहाजीअली दर्गाजगन्नाथ शंकरशेठ स्मारक व भागोजी शेठ कीर स्मारकाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी महालक्ष्मी मंदिर परिसर विकासासाठी मुंबई महानगरपालिकेने ६० कोटी रुपयांचा निधी देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तर मुंबादेवी मंदीर सौंदर्यीकरणासाठी २२० कोटीजगन्नाथ शंकरशेठ स्मारकासाठी ३५ कोटी तर भागोजी शेठ कीर स्मारकासाठी २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. 

            सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या आढावा बैठकीस विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरमुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकरमुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढाखासदार राहुल शेवाळेआमदार सदा सरवणकरमुंबई महानगरपालिका आयुक्त आय. एस. चहलनगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ताअतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशीनाना शंकरशेठ यांच्या कुटुंबातील विलास शंकरशेटजिमी शंकरशेट आणि पद्मिनी शेट आदी उपस्थित होते.

            मुंबईतील महालक्ष्मीमुंबादेवीहाजी अली प्राचीन देवस्थान आहेत. त्यांच्या सौंदर्यीकरणासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देतानाच भाविकांना सुलभ दर्शनासाठी सोयीसुविधा करण्यात याव्यात. महालक्ष्मीमुंबादेवी मंदिराचा विकास करताना परिसरातील मंदिरांचे देखील सौंदर्यीकरण करावेअसे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मंदिर परिसरात वाहनतळाची सोय करताना त्याच ठिकाणी स्वच्छतागृहांची देखील व्यवस्था करावी. मंदिरांचे सौंदर्यीकरण करतानाच प्राचीन स्थापत्य शैलीचा देखील वापर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

            यावेळी महालक्ष्मी मंदिरमुंबा देवी मंदिरहाजीअली दर्गाजगन्नाथ शंकरशेट स्मारक व भागोजी शेट कीर स्मारकाच्या कामांचे सादरीकरण करण्यात आले. जगन्नाथ शंकरशेट स्मारक वडाळा येथे करण्यात येत असून मुंबई महानगरपालिकेने तातडीने ३५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा आणि स्मारकाचे काम वर्षभरात पूर्ण करावेअसे मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिकेला सांगितले.

००००


पीएम -उषा योजनेंतर्गत महाराष्ट्राला ७९१.१७ कोटी रुपये मंजूर

 पीएम -उषा योजनेंतर्गत महाराष्ट्राला ७९१.१७ कोटी रुपये मंजूर

- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

            मुंबईदि. १३ : पीएम उषा योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून मिळालेल्या अनुदानामुळे राज्याच्या सर्व जिल्ह्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या पायाभूत सुविधा व शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा वाढविण्यासाठी मदत होणार आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

            देशभरातील उच्च शिक्षण संस्थांमधील गुणवत्ता सुधारणे आणि उच्च शिक्षणासाठीच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) ही योजना २०१३ मध्ये सुरु केली. त्यानंतर या योजनेचा दुसरा टप्पा २०१८ मध्ये राबविण्यात आला. राज्याला रुसा १ मध्ये रुपये २३६ कोटी तर रुसा २ मध्ये रुपये ३८६ कोटी मंजूर झाले होते.

            नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने या योजनेचा तिसरा टप्पा पीएम-उषा या नावाने २०२३ मध्ये जाहीर करण्यात आला. राज्याने या योजनेत समाविष्ट होत राज्यातील सर्व विद्यापीठमहाविद्यालयांचे देशातील सर्वाधिक म्हणजे ६८१ प्रस्ताव केंद्राला सादर केले होते. सादर केलेल्या प्रस्तावांपैकी एकूण ५८ प्रकल्प व ७९१.१७ कोटी निधी महाराष्ट्राला  मंजूर झाला आहे.

            बहुविद्याशाखीय शिक्षण व संशोधन विद्यापीठ यासाठी ४ विद्यापीठांना प्रत्येकी १०० कोटीविद्यापीठांना सक्षमीकरणासाठी अनुदान अंतर्गत प्रत्येकी २० कोटीमहाविद्यालयांच्या सक्षमीकरणासाठी अनुदान अंतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यातील एकूण ४३ महाविद्यालयांना पायाभूत सुविधा आणि सर्वांगीण विकासासाठी एकूण २१४.०८ कोटी निधी मंजूर झाला आहे.

            या योजनेंतर्गत मंजूर झालेल्या महाविद्यालयाला प्रत्येकी ५ कोटी रु. इतका निधी मिळणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांना पीएम उषा (PM USHA) योजनेचा लाभ मिळाला आहे तर समानता उपक्रम या घटक ५ मध्ये गडचिरोलीनंदुरबारधाराशिव आणि वाशीम या जिल्ह्यांना मुलींसाठी वसतिगृह आणि प्रशिक्षण केंद्र तयार करण्यासाठी एकूण 37.09 इतका निधी मंजूर झाला आहे. घटक ५ अंतर्गत राज्याला देशात सर्वाधिक प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे.

            या योजनेसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी‘रुसा’चे संचालक निपुण विनायक यांनी रुसा कार्यालयामार्फत पीएम उषा (PM USHA) योजने संबंधित माहिती सर्व जिल्ह्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांना देऊन या योजनेत सहभागी होण्यासाठी पाठपुरावा केला होता.

0000

कल्याणसह परिसरातील महानगरपालिका, नगरपालिकांसाठी एकत्रित परिवहन सेवा प्रवाशांना आणखी एक सक्षम वाहतूक पर्याय उपलब्ध करुन देत असल्याचा आनंद

 कल्याणसह परिसरातील महानगरपालिकानगरपालिकांसाठी एकत्रित परिवहन सेवा

प्रवाशांना आणखी एक सक्षम वाहतूक पर्याय

उपलब्ध करुन देत असल्याचा आनंद

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबई दि. 13 : मुंबई महानगर क्षेत्रातील कल्याण-डोंबिवलीभिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकाउल्हासनगर महानगरपालिकाअंबरनाथ नगरपरिषद व कुळगांव बदलापूर नगरपरिषद या क्षेत्रांची एकत्रित परिवहन सेवा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांना रेल्वे व्यतिरीक्त आणखी एक सक्षम सार्वजनिक वाहतूक पर्याय उपलब्ध करुन देत असल्याचा आनंद होत असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

            मुंबई महानगर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्राच्या नजिकच्या भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकाउल्हासनगर महानगरपालिकाअंबरनाथ नगरपरिषद व कुळगांव बदलापूर नगरपरिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिवहन सेवा उपक्रम पूर्ण क्षमतेने अस्तित्वात नाहीत. या क्षेत्रांमध्ये कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमांमार्फत बससेवा सुरू करण्यात यावीअशी मागणी  नागरिकांकडून सातत्याने केली जात होती. एकत्रित परिवहन सेवा क्षेत्र 225 चौरस किलोमीटर इतके मोठे असणाऱ्या या परिसराची लोकसंख्या सन 2011 जनगणनेनुसार एकूण 33,43,000 इतकी आहे. गेल्या 13 वर्षात या भागातील लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहेत्या तुलनेत पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याचा शासन भर देत आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

            भविष्यात एकत्रित परिवहन सेवेमुळे प्रवाशांना सुलभ व सहज वाहतूक सेवा रास्तदरात उपलब्ध होणार आहे. तसेच परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होणार असून यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे. प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण संरक्षणावर शासनाचा भर आहे. या परिवहन सेवेत नवीन ईव्ही बसेस अंतर्भुत करण्यात येणार असल्याने शहरामधील हवा प्रदूषणाची पातळी नियंत्रित आणि कमी करणे शक्य होणार आहे. या परिवहन सेवेकरिता कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये शहाड येथे एकत्रित परिवहन उपक्रमाच्या प्रशासकीय कार्यालयासाठी परिवहन भवन बांधण्यात येणार आहे.

            एवढ्या विस्तृत परिसरासाठी एकत्रित परिवहन सेवेमुळे या भागातील विकासाला मोठी चालना मिळण्यास मदत होणार आहे. परिवहन सेवेतून नागरिकांना चांगल्या दर्जाच्या सेवा मिळू शकेलअसा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र शासनाचे १४ वर्षे मुदतीचे ३ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 महाराष्ट्र शासनाचे १४ वर्षे मुदतीचे

३ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 

मुंबईदि. १४ : महाराष्ट्र शासनाच्या १४ वर्षे मुदतीच्या ३ हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री २० मार्च २०२४ रोजी अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईलअशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्रएका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल. २० मार्च २०२४ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईलतर लिलावाचे बीडस् संगणकीय प्रणालीनुसाररिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

            यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान २० मार्च 2024 रोजी रोखीनेबँकर्स धनादेश/प्रदान आदेशडिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १४ वर्षांचा असूनरोख्यांचा कालावधी २० मार्च, २०२४ पासून सुरू होईलतर कर्जरोख्याची परतफेड दिनांक २० मार्च २०३८ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दरशेकडा कूपन दराएवढा असेल.  व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी २० सप्टेंबर आणि २० मार्च रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

            शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतीलअशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

००००

महाराष्ट्र शासनाचे १४ वर्षे मुदतीचे३ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 महाराष्ट्र शासनाचे १४ वर्षे मुदतीचे३ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस


मुंबई, दि. १४ : महाराष्ट्र शासनाच्या १४ वर्षे मुदतीच्या ३ हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री २० मार्च २०२४ रोजी अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.


अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल. २० मार्च २०२४ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल, तर लिलावाचे बीडस् संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.


            यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान २० मार्च 2024 रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.


कर्जरोख्याचा कालावधी १४ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी २० मार्च, २०२४ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक २० मार्च २०३८ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दरशेकडा कूपन दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी २० सप्टेंबर आणि २० मार्च रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.


            शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.


००००

मातंग समाजातील विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणासाठी २८ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 मातंग समाजातील विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणासाठी

२८ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

            मुंबईदि. १४ : मातंग समाजातील व तत्सम १२ पोट जातीतील विद्यार्थ्यांस प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावयाचा आहेअशा विद्यार्थ्यांनी २८ मार्च २०२४ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे मुंबई शहर/उपनगर जिल्हा व्यवस्थापक अंगद कांबळे यांनी केले आहे.

              विद्यार्थ्यांनी जातीचा दाखलाशैक्षणिक दाखलाट्रान्सफर सर्टीफिकेटआधारकार्डपॅनकार्डमतदानकार्डपासपोर्ट आकाराचे दोन छायाचित्रउत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळजिल्हा कार्यालय मुंबई शहर/उपनगररुम नं. ३गृहनिर्माण भवनम्हाडा बिल्डिंगकलानगरवांद्रे (पूर्व) मुंबई ४०० ०५१ या पत्त्यावर अर्ज करावेत. २८ मार्च २०२४ नंतर कोणतेही प्रशिक्षणाचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी. प्रशिक्षण विद्या वेतनासाठी विहीत नमुन्यातील अर्ज कार्यालयातून विनामूल्य मिळतील.

            जिल्ह्यातील मातंग समाज बांधव व तत्सम बारा पोटजाती मधील इच्छुक पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थी मांतग समाजातील व तत्सम बारा पोटजातीतील असावा, त्याचे वय १८ ते ५० वर्ष असावे. यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच प्रशिक्षणार्थीने आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशील सादर करावा.

            साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) जिल्हा कार्यालय मुंबई शहर/उपनगर प्रशिक्षण योजनेचे मुंबई शहरातील २०० मुंबई उपनगरातील २०० विद्यार्थ्यांचे उद्दिष्ट आहे. मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील कुटुंबांच्या सामाजिक, आर्थिक उन्नतीसाठी रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावीत याकरिता सन-२०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता प्राप्त झाले आहेअसे महामंडळाचे मुंबई शहर/उपनगर जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

****

प्रत्येक व्यक्तीस आशीर्वाद लाभावा म्हणूनच प्रभु श्री धनकुबेर यांची प्राणप्रतिष्ठा

 प्रत्येक व्यक्तीस आशीर्वाद लाभावा म्हणूनच प्रभु श्री धनकुबेर यांची प्राणप्रतिष्ठा – विनोद सिंह


# धन दैवतांची पूजा करण्याचे आवाहन


पालघर. (विशेष प्रतिनिधी) – प्रत्येक व्यक्तीस आशीर्वाद लाभावा म्हणूनच प्रभु श्री धनकुबेर यांची प्राणप्रतिष्ठा केली असल्याचे वाडाखडकोना श्री गोमातेश्वरी अंबाधाम आश्रमचे अध्यक्ष विनोद सिंह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. दरम्यान माता चामुंडा देवी, माता महाकाली, माता सरस्वती, श्री. खाटूराम यांची

देखील  प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.


यावेळी सिंह म्हणाले की, फक्त दिवाळी सणातील धनत्रयोदशी किंवा धनतेरस च्या दिवशी आपण धनलक्ष्मी ची पूजा करत असतो. आणि वर्षभर अधूनमधून आपल्या काही आर्थिक अडचणी जाणवली तर आपण धनलक्ष्मीची पूजा करत असतो. तसेच, आपण सर्वजण वर्षभर काबाडकष्ट करत असतो तरी देखील आपल्याकडे हवी अशी धनप्राप्ती होत नाही. धनप्राप्ती व्हावी म्हणून आपण धनलक्ष्मीची पूजा दररोज सकाळी करत असतो. परंतु एका बाजूला आपण धनलक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न करत असतो. पण, धन कुबेर यांना देखील प्रसन्न करण्याचे तितकेच महत्त्वाचे असून त्यांची आवश्यकता आहे. याची माहिती आम्हाला काही ग्रंथांमधून आमचे मित्र एस. मुलाणी यांच्या वाचनातून मिळाल्यानंतर आम्ही धनकुबेर यांचे मंदिर स्थापन करण्याचा मानस केला. त्यानंतरच आम्ही भगवान प्रभू श्री धन कुबेर यांचे मंदिर बनवून त्यांची प्राणप्रिष्ठा करण्याचे निश्चित केले. आणि तो सुवर्ण दिन उजाडला आहे. आम्ही तमाम जनतेला आव्हान करू इच्छितो की, प्रभु श्री धनकुबेर यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी पालघर जिल्ह्यातील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाडाखडकोन मनोर जवळ श्री गोमातेश्वरी अंबाधाम आश्रम परिसरात येऊन आपण प्रभू श्री धनकुबेर यांची पूजा करून आपली मागणी प्रभू श्री धनकुबेर यांच्याकडे करावी जेणेकरून आपणास आशीर्वाद लाभेल असे आश्रमचे अध्यक्ष विनोद सिंह म्हणाले.

प्रवक्त्या सौ. धनश्री केळशीकर यांनी मंदिर प्रवेश व मंदिर मधील आचारसंहिता कोणकोणती आहेत याचे सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी आश्रमाचे अध्यक्ष विनोद पारसनाथ सिंह, मनोज पारसनाथ सिंग, दिलीप सिंग, नितीन बोंबाडे, एस. मुलाणी, हवालदार दुबे यांनी विशेष मेहनत घेतली. याप्रसंगी माजी आमदार आंनद ठाकूर, आ. अमित घोडा, डॉ. ओमप्रकाश दुबे, प्रकाश दुबे, हवालदार दुबे, विनोद पारसनाथ सिंग, मनोज सिंग, सुमित सिंग, विठ्ठल जोशी, हेमंत धर्ममेहेर, सुशील शहा, दिलीप सिंग, एस. मुलाणी, नितीन बोंबाडे, धनश्री केळशीकर, प्रशांत पाटील, पंडित चव्हाण, प्रदुम शर्मा, सुमित गुप्ता, जे.पी. यादव, बॉबी वाल्मिकी, सचिन विष्ट, विशाल मदेशिया, सचिन  विष्ट, विजय सिंह, राध्ये, श्याम मदेशीया, आशिष सिंग, भरत कचरे, सर्वेश तिवारी आदी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi