Friday, 15 March 2024

मुंबादेवी, महालक्ष्मी मंदिर परिसर विकासासाठी २८० कोटी; जगन्नाथ शंकरशेठ स्मारकासाठी ३५ कोटी रुपयांचा निधी मुंबई महानगरपालिकाच्या माध्यमातून होणार विकास

 मुंबादेवीमहालक्ष्मी मंदिर परिसर विकासासाठी २८० कोटी;

जगन्नाथ शंकरशेठ स्मारकासाठी ३५ कोटी रुपयांचा निधी

मुंबई महानगरपालिकाच्या माध्यमातून होणार विकास

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            मुंबईदि. 13 : मुंबई शहरातील मुंबादेवी मंदिरमहालक्ष्मी मंदिरहाजीअली दर्गाजगन्नाथ शंकरशेठ स्मारक व भागोजी शेठ कीर स्मारकाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी महालक्ष्मी मंदिर परिसर विकासासाठी मुंबई महानगरपालिकेने ६० कोटी रुपयांचा निधी देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तर मुंबादेवी मंदीर सौंदर्यीकरणासाठी २२० कोटीजगन्नाथ शंकरशेठ स्मारकासाठी ३५ कोटी तर भागोजी शेठ कीर स्मारकासाठी २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. 

            सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या आढावा बैठकीस विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरमुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकरमुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढाखासदार राहुल शेवाळेआमदार सदा सरवणकरमुंबई महानगरपालिका आयुक्त आय. एस. चहलनगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ताअतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशीनाना शंकरशेठ यांच्या कुटुंबातील विलास शंकरशेटजिमी शंकरशेट आणि पद्मिनी शेट आदी उपस्थित होते.

            मुंबईतील महालक्ष्मीमुंबादेवीहाजी अली प्राचीन देवस्थान आहेत. त्यांच्या सौंदर्यीकरणासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देतानाच भाविकांना सुलभ दर्शनासाठी सोयीसुविधा करण्यात याव्यात. महालक्ष्मीमुंबादेवी मंदिराचा विकास करताना परिसरातील मंदिरांचे देखील सौंदर्यीकरण करावेअसे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मंदिर परिसरात वाहनतळाची सोय करताना त्याच ठिकाणी स्वच्छतागृहांची देखील व्यवस्था करावी. मंदिरांचे सौंदर्यीकरण करतानाच प्राचीन स्थापत्य शैलीचा देखील वापर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

            यावेळी महालक्ष्मी मंदिरमुंबा देवी मंदिरहाजीअली दर्गाजगन्नाथ शंकरशेट स्मारक व भागोजी शेट कीर स्मारकाच्या कामांचे सादरीकरण करण्यात आले. जगन्नाथ शंकरशेट स्मारक वडाळा येथे करण्यात येत असून मुंबई महानगरपालिकेने तातडीने ३५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा आणि स्मारकाचे काम वर्षभरात पूर्ण करावेअसे मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिकेला सांगितले.

००००


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi