Thursday, 14 March 2024

होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये दोन शासकीय महाविद्यालये

 . होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये

दोन शासकीय महाविद्यालये

            डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीमुंबई या समूह विद्यापीठामध्ये शासकीय न्यायसहायक विज्ञान संस्था व सिडनहेम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट स्टडीज या दोन शासकीय महाविद्यालयांचा घटक महाविद्यालय म्हणून समावेश करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी करताना विद्यापीठाला बहुविद्याशाखीय शिक्षण आणि संशोधन विद्यापीठाचा दर्जा देऊन तो अधिक सक्षम करण्यासाठी मुंबईतील अन्य शासकीय महाविद्यालयांचा या विद्यापीठात समावेश करण्याची विनंती करण्यात आली होती.

गिरणी कामगारांसाठी घरकुले

 गिरणी कामगारांसाठी घरकुले

            बंद पडलेल्या 58 गिरण्यांमधील गिरणी कामगारांना सदनिका देण्यासंदर्भात आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            यासाठी सुमारे 1500 कोटी रुपये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निधीतून उपलब्ध करून देण्यात येतील. सदनिका बांधण्यासाठी प्रधान मंत्री आवास योजना शहरी अंतर्गत संयुक्त भागीदारीद्धारे घराची निर्मिती करण्यात येईल. यासाठी महाहाऊसिंगच्या कार्यकक्षेचा विस्तारही करण्यात येईल. ही घरे बांधण्याकरिता अनुदानापोटी 3 हजार कोटी इतकी रक्कम गृहनिर्माण विभागास तत्काळ उपलब्ध करून देण्यात येईल. एक तृतियांश म्हणजेच 1000 कोटी रुपये रक्कम अर्थसंकल्पीय तरतुदीतून उपलब्ध करून द्यावयाची असल्याने स्वतंत्र लेखाशिर्षातून ही रक्कम उपलब्ध करून देण्यात येईल.  उर्वरित महाराष्ट्र निवारा निधीतून देण्यात येईल.

वनहक्क धारकांना सर्व योजनांचा लाभ देणार

 वनहक्क धारकांना सर्व योजनांचा लाभ देणार

            राज्यातील वनहक्क धारकांना सर्व शासकीय योजनांचा लाभ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            वनहक्क धारकांमध्ये ते ज्या शासकीय योजनांच्या लाभास पात्र आहेत त्याबाबत जनजागृती करण्यात येईल.

            ज्या योजनांचे लाभ वनहक्कधारकांना त्यांच्या मागणीनुसार वैयक्तिक रित्या देणे शक्य आहे,अशा योजनांचा लाभ विनाविलंब वनहक्क धारकांना देण्यात येईल. सामुहिकरित्या शासकीय योजनांचे लाभ वनहक्क  धारकांना मिळण्याच्या दृष्टीने वनपट्टे दिलेल्या वनहक्क धारकांचे क्षेत्रनिहाय समूह (Cluster) तयार करण्यात येईल. क्षेत्रनिहाय समूह तयार केल्यावर वनहक्क धारकांच्या मागणीनुसार ज्या योजनांचा लाभ एकत्रितरित्या वनहक्क धारकांना देणे शक्य आहेत्याबाबत कालबद्ध आराखडा तयार करून विविध शासकीय योजनांचे लाभ  अभिसरणाच्या माध्यमातून वनहक्क धारकांना देण्यात येईल.

            सामुहिक वनहक्कांचे संवर्धन व व्यवस्थापन आराखडे तयार करणे व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या तालुका स्तरीय कन्व्हर्जन्स समितीने कालबद्ध आराखडा तयार करण्याची जबाबदारी घ्यावयाची आहे.  जिल्हास्तरीय कन्व्हर्जन्स समितीने आराखड्यास मान्यता द्यावयाची आहे.

            वनहक्क धारकांना ज्या शासकीय योजनांचे लाभ देण्यास काही अडचणी उद्भवत असतील,अशा प्रकरणी अडचणींचे निराकरण जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या जिल्हास्तरीय कन्व्हर्जन्स समितीने त्वरीत करुन अशा योजनांचे लाभ वनहक्क धारकांना मिळतील याची खातरजमा करावयाची आहे.

-----०-----

राज्याच्या तृतीयपंथी धोरण २०२४ ला मान्यता

 राज्याच्या तृतीयपंथी धोरण २०२४ ला मान्यता

            महाराष्ट्र राज्याच्या तृतीयपंथी धोरण २०२४ ला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागदिव्यांग कल्याण विभागइतर मागास व बहुजन कल्याण विभागकौशल्य व उद्योजकता विभागउद्योगउर्जा व कामगार विभागपाणी पुरवठा व स्वच्छता विभाग,  आदिवासी विकास विभागअन्न नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण विभाग. शालेय शिक्षण विभागग्राम विकास व पंचायतराज विभागअल्पसंख्याक विभागरोजगार हमी योजना प्रभाग आणि उच्च व तंत्रशिक्षण विभाग  इ.विभागांच्या योजना विहित निकषांनुसार पात्र तृतीयपंथी लाभार्थ्यांना लागू करण्यास मान्यता देण्यात आली.

-----०-----

जिल्हा बँक संचालकांवर दोन वर्षांत अविश्वास प्रस्ताव आणता येणार नाही

 जिल्हा बँक संचालकांवर दोन वर्षांत

अविश्वास प्रस्ताव आणता येणार नाही

            जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या संचालकावर दोन वर्षांच्या आत अविश्वास प्रस्ताव दाखल करता येणार नाही अशा सहकार विभागाच्या तरतुदीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. याविषयीचे विधिमंडळातील मांडलेले गेले विधेयक मागे घेण्यास देखील या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम1960 च्या कलम 73 (1ड)(2) दुसऱ्या परंतुकात सहकारी संस्थेच्या निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांविरूद्ध अविश्वास प्रस्ताव  सहा महिन्यांच्या आत सादर केला जाणार नाही अशी तरतूद होती. या तरतुदीमुळे समिती स्थापन झाल्यानंतर निवडून आलेल्या समितीच्या पदाधिकाऱ्यांविरूद्ध सहा महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर अविश्वासाचा ठराव घेवून व्यव‍स्थापकीय समितीचा कालावधी सुरक्षित राहण्यास अडचण निर्माण होत आहे. अशा पद्धतीने सहा महिन्यांच्या कालावधीत अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यास व्यवस्थापनासाठी पुरेसा कालावधी न मिळाल्याने निर्णय घेण्यास अडचणी निर्माण होतात. ही बाब विचारात घेवून 15 जानेवारी2024 रोजीच्या अध्यादेशाद्वारे दोन वर्षांची तरतूद करण्यात आली. त्यानुषंगाने सन 2024 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधेयक सादर करण्यात आले. पण हे विधेयक विधान सभेत संमत झाले. परंतुविधान परिषदेत संमत होऊ शकलेले नाही. त्यामुळे सन 2024 चा अध्यादेश व मांडले गेलेले विधेयक मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या बाबतीत दोन वर्षांची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम1960 चे कलम 73(1ड)(2)  मध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या अधिकाऱ्यापैकी कोणत्याही अधिकाऱ्याने ज्या तारखेस त्याचे पद धारण केले असेलत्या तारखेपासून दोन वर्षांच्या कालावधीत विशेष सभेसाठी कोणतेही मागणीपत्र सादर करण्यात येणार नाही. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडले गेलेले विधेयक मागे घेण्यास मान्यता देण्यात आली.

-----०-----

सामाजिक न्याय विभाग

राज्याच्या तृतीयपंथी धोरण २०२४ ला मान्यता

            महाराष्ट्र राज्याच्या तृतीयपंथी धोरण २०२४ ला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागदिव्यांग कल्याण विभागइतर मागास व बहुजन कल्याण विभागकौशल्य व उद्योजकता विभागउद्योगउर्जा व कामगार विभागपाणी पुरवठा व स्वच्छता विभाग,  आदिवासी विकास विभागअन्न नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण विभाग. शालेय शिक्षण विभागग्राम विकास व पंचायतराज विभागअल्पसंख्याक विभागरोजगार हमी योजना प्रभाग आणि उच्च व तंत्रशिक्षण विभाग  इ.विभागांच्या योजना विहित निकषांनुसार पात्र तृतीयपंथी लाभार्थ्यांना लागू करण्यास मान्यता देण्यात आली.


गुढीपाडवा, आंबेडकर जयंती निमित्त ‘आनंदाचा शिधा’

 गुढीपाडवाआंबेडकर जयंती निमित्त आनंदाचा शिधा

            राज्यात गुढीपाडवाडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सणानिमित्त आनंदाचा शिधा वितरणाचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            या निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजनाप्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील (एपिएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी 1 किलो या परिमाणात रवाचणाडाळसाखर व 1 लिटर या परिमाणात सोयाबीन तेल हे शिधाजिन्नस समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा प्रतिशिधापत्रिका 1 शिधाजिन्नस संच याप्रमाणे वितरित करण्यात येईल.

            राज्यातील सुमारे 25 लक्ष अंत्योदय अन्न योजना1.37 कोटी प्राधान्य कुटुंब व 7.5 लक्ष शेतकरी योजनेतील शिधापत्रिकाधारक अशा सुमारे 1.69 कोटी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधादेण्यात येईल.

            यासाठी येणाऱ्या 550 कोटी 57 लाख रुपये इतक्या खर्चास मंजुरी देण्यात आली.   

-----०-----

सारथी संस्थेसाठी अमरावतीतील जमिनीच्या आरक्षणात बदल

 सारथी संस्थेसाठी अमरावतीतील जमिनीच्या आरक्षणात बदल

            छत्रपती शाहू महाराज संशोधनप्रशिक्षण व मानव विकास संस्था - सारथी संस्थेसाठी मागणी करण्यात आलेल्या मौजे नवसारी येथील जमिनीवरील क्रीडांगणाचे आरक्षण बदलण्यास मंत्रिमंडळ बैठकीत आज मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील मौजे नवसारी येथील सर्व्हे क्र.29 मधील 1.44 हेक्टर व सर्व्हे क्र.133 मधील 0.81 हेक्टर क्षेत्र सारथीपुणे या संस्थेस देण्यात येणार आहे. या जागेवर सारथी संस्था 500 मुलांचे व 500 मुलींचे स्वतंत्र वसतिगृह व जिल्हास्तरावर मुले व मुलींचे प्रत्येकी 250 क्षमतेचे निवासी वसतिगृह500 विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व ग्रंथालयकौशल्य विकास केंद्रसैन्य भरती व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रज्येष्ठ नागरिक समुपदेशन कक्षमहिला सक्षमीकरण केंद्र इत्यादी सुविधा उभी करणार आहे. या जागेवर अमरावती शहराच्या मंजूर सुधारित विकास योजनेत प्राथमिक शाळावाचनालयव सुधारित विकास योजनेत क्रीडांगणांचे आरक्षण होते.


Featured post

Lakshvedhi