गिरणी कामगारांसाठी घरकुले
बंद पडलेल्या 58 गिरण्यांमधील गिरणी कामगारांना सदनिका देण्यासंदर्भात आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
यासाठी सुमारे 1500 कोटी रुपये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निधीतून उपलब्ध करून देण्यात येतील. सदनिका बांधण्यासाठी प्रधान मंत्री आवास योजना शहरी अंतर्गत संयुक्त भागीदारीद्धारे घराची निर्मिती करण्यात येईल. यासाठी महाहाऊसिंगच्या कार्यकक्षेचा विस्तारही करण्यात येईल. ही घरे बांधण्याकरिता अनुदानापोटी 3 हजार कोटी इतकी रक्कम गृहनिर्माण विभागास तत्काळ उपलब्ध करून देण्यात येईल. एक तृतियांश म्हणजेच 1000 कोटी रुपये रक्कम अर्थसंकल्पीय तरतुदीतून उपलब्ध करून द्यावयाची असल्याने स्वतंत्र लेखाशिर्षातून ही रक्कम उपलब्ध करून देण्यात येईल. उर्वरित महाराष्ट्र निवारा निधीतून देण्यात येईल.
No comments:
Post a Comment