Saturday, 2 March 2024

बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी सहा कोटीवर निधी वितरणास मान्यता

 बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी


 सहा कोटीवर निधी वितरणास मान्यता


निधी उपलब्ध झाल्याने बाधितांना दिलासा - मंत्री अनिल पाटील


 


            मुंबई दि. १ :- बुलढाणा जिल्ह्यात गतवर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिके व शेतजमीनीच्या नुकसानीच्या मदतीसाठी ६ कोटी ४७ लाख ४१ हजाराचा निधी वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.


            आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याने बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असल्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त सांगितले.


            बुलढाणा जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत अतिवृष्टीमुळे ७ हजार ८९९ शेतकऱ्यांच्या ७ हजार ५४९.५५ हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिके व शेतजमीनीचे नुकसान झाले होते. या बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी अमरावती विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाला होता. त्यानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून ६ कोटी ४७ लाख ४१ हजाराचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ही मदत ९ नोव्हेंबर २०२३ च्या शासन निर्णयानुसार २ ऐवजी ३ हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे.


०००००

निवडणूक विषयक कामकाजास सर्वोच्च प्राधान्य -जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर विहित वेळेत कामे पूर्ण करण्याचे अधिकारी - कर्मचारी यांना दिले निर्देश

 निवडणूक विषयक कामकाजास सर्वोच्च प्राधान्य

 -जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर

विहित वेळेत कामे पूर्ण करण्याचे अधिकारी - कर्मचारी यांना दिले निर्देश

 

            मुंबई, दि.1 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नेमून दिलेल्या अधिकारी - कर्मचाऱ्यांनी त्यांची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडावी. निवडणूक विषयक कामकाजास सर्वच नियुक्त अधिकारी कर्मचारी यांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे. विहित वेळेत कामे पूर्ण होतील याची दक्षता घ्यावीअसे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिले.

            मुंबई शहर उपनगर जिल्हा कार्यालयात आज जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. क्षीरसागर यांनी मुंबई शहर उपनगर जिल्हा अंतर्गत चारही लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारीसहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह निवडणूक कामाशी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली.             यावेळी अपर जिल्हाधिकारी श्री. गोहाडउपजिल्हाधिकारी दादाराव दातकर व वंदना सूर्यवंशी,  उपजिल्हाधिकारी शशिकांत काकडेउप जिल्हा निवडणूक अधिकारी तेजस समेळआदींची उपस्थिती होती. इतर अधिकारी हे दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

            येत्या काही दिवसात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर होईल. या निवडणुकीत आचारसंहिता काळात सर्व नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांच्या पातळीवर पथकाच्या स्थापना करावयाच्या आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक मनुष्यबळ आणि सर्व साधनसामुग्री संबंधित यंत्रणांना पुरविण्यात येईल असेही जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. क्षीरसागर यांनी सांगितले.

            चारही लोकसभा मतदारसंघात 18 वर्षे पूर्ण झालेल्या युवा मतदारांची नोंदणी करण्यावर भर देण्यात यावा. त्याचबरोबर मतदान जनजागृती मोहिमेच्या माध्यमातून मतदार संघातील प्रत्येक भागातील नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून देण्यात यावे. मतदारसंघाचा विस्तार मोठा असल्याने कामकाजात अधिक गतिमानता आणणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

            भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचना आणि निर्देशाप्रमाणे सर्व कार्यवाही होणे अपेक्षित आहे. मतदार याद्यांचे अद्यावतीकरणमतदान केंद्र संख्यातेथील व्यवस्थाआदर्श मतदान केंद्र उभारणी या सर्व बाबींकडे कटाक्षाने लक्ष द्यावेअशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. क्षीरसागर यांनी केल्या.

            भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचना आणि निर्देश यांच्याबाबत वेळोवेळी राजकीय पक्षांना अवगत करण्यात यावेअशा सूचनाही त्यांनी चारही निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिल्या.

000

खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय नियमावलीबाबत पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

 खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय नियमावलीबाबत

पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

 

            मुंबई, दि 1 : खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय नियमावलीबाबत पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे आढावा बैठक झाली.

            या बैठकीस आमदार विनय कोरेसचिव तुकाराम मुंढेमहाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन पाटीलसंचालक शिक्षण तथा अधिष्ठाता डॉ शिरीष उपाध्येकुलसचिव मोना ठाकूर हे उपस्थित होते.

            नागपूर येथे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आहे. खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यासाठी नियमावली लवकरात लवकर अंतिम करावी व त्यानुसार महाविद्यालयास मान्यता देण्यास प्रस्ताव सादर करणेतपासणी करणे यासाठी कालबद्ध कार्यक्रम ठरविण्यात यावाअसे निर्देश महसूल आणि पशुसंवर्धन विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

००००

सर्व स्तरांचा विचार करणारा सर्वसमावेशक अंतरिम अर्थसंकल्प

 सर्व स्तरांचा विचार करणारा सर्वसमावेशक अंतरिम अर्थसंकल्प

- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

§  जीडीपी जास्त आणि वित्तीय तूट मर्यादित

§  केंद्र सरकारचे ७ हजार कोटीचे अनुदान राज्याला प्राप्त

            मुंबईदि. १ : राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामुळे विकासाची नवनवीन दालने खुली होणार आहेत.  यामध्ये सर्व स्तराचा विचार करण्यात आला असून हा सर्व समावेशक अर्थसंकल्प असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना सांगितले.

            विधानपरिषदेत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचेसह विविध सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर यांनी उत्तर दिले. ते म्हणाले कीराज्याचे सकल उत्पादन (जीडीपी) जास्त आहे. वित्तीय तूट तीन टक्के असावी असे मानक आहे. या मर्यादेत आपले राज्य नेहमीच राहिले आहे. वित्तीय तूट तीन टक्के पेक्षा मर्यादेत असल्याने राज्याला पन्नास वर्षासाठी  यावर्षी ७ हजार कोटी बिनव्याजी कर्ज दिलेले आहे,चालू वर्षात महसुली तूट दहा हजार कोटींनी कमी होईल असा  विश्वास  श्री. केसरकर यांनी व्यक्त केला.

            मंत्री श्री.केसरकर म्हणाले, पायाभूत प्रकल्पांना चालना मिळून बेरोजगारीला आळा बसण्यास मदत होणार आहे. नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांच्यासाठी वेळोवेळी तरतूदएनडीआरएफच्याना निकषापेक्षा जास्त मदत, एक रुपयात पिक विमा देण्याचा निर्णयनमो शेतकरी सन्मान योजनेसाठी तरतूदगरीबांना आनंदाचा शिधाशिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ यामुळे पुरवणी मागण्याच्या तरतुदीत वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

            श्री. केसरकर म्हणालेराज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्याचा शासनाचा निर्धार आहे. त्यासाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषद स्थापन करण्यात आली असून राज्याची अर्थव्यवस्था सुदृढ करण्यासाठी  अहवालानुसार पायाभूत सुविधा प्रकल्पासाठीकृषीसेवाउद्योगगृहनिर्माण क्षेत्राकरिता मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक करण्याचे धोरण स्वीकारले आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पाबरोबरच लोककल्याणकारी व सामाजिक योजनांना सरकार प्राधान्य देत आहे, असेही श्री. केसरकर यांनी सांगितले.

            इतिहासातील महापुरुषांचा सन्मान आपण करीत आहोत. अयोध्यात महाराष्ट्र सदन उभारणे आणि संभाजी महाराजांचे स्मारकांसाठी भरीव निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तसेच मातंगबारा बलुतेदारघरेलू कामगार आणि अल्पसंख्याक या सर्वांच्या मागण्यानुसार स्वतंत्र विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. राज्याची जीएसटी वसुली अडीच लाख कोटी रुपयांची असून देशात प्रथम स्थानी असल्याचे श्री. केसरकर यांनी यावेळी सांगितले.

            श्री. केसरकर म्हणालेधनगर समाज बांधवांसाठी 22 योजनांसाठी गेल्यावर्षी 142 कोटीची तरतूदमदत पुनर्वसन विभागासाठी 12 हजार 274 कोटीची तर सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची तरतूद 22 हजार कोटी पेक्षा जास्त केली आहे. नगर विकास विभागात पायाभूत सुविधांसाठी 20 हजार 171 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. महिला व बालविकास विभागासाठी 4827 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.  राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे 13 लक्ष 5 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून यासाठी 1270 कोटी मदत मंजूर करण्यात आली आहे. त्यापैकी आठ लक्ष शेतकऱ्यांना 678 कोटीचे वितरण करण्यात आले आहे. 

             श्री. केसरकर म्हणालेमोदी आवास घरकुल योजनेसाठी पंधराशे कोटीची तरतूद अर्थसंकल्पात केलेली आहे. लेक लाडकी योजनेसाठी अनुदान वितरित करण्यात येईल. महिलांसाठी 17 शक्ती सदन सुरू असून एकूण 50 कार्यान्वित करण्यात येणार आहेत,  वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करण्यात आली आहे.

             पुणे रिंग रोडसाठी 60% भूसंपादन झाले असून जून 2024 पर्यंत संपूर्ण भूसंपादन करण्याचा शासनाचा मानस आहे. विरार बहुउद्देशीय वाहतूक मार्गाबद्दल 104 गावांची मोजणी झाली असून सहा हजार कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पाणंद रस्ते योजनेसाठी 800 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.   सौरऊर्जेसाठी प्राधान्य मराठवाड्याच्या सिंचनासाठी  2800 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. परळी येथे सोयाबीन संशोधन केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. तीर्थक्षेत्र व ज्योतिर्लिंग शक्तीपीठ महामार्ग एकमेकांना विविध कामांसाठी या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याचे श्री. केसरकर यांनी सांगितले.

००००

अनिकेत तटकरे यांची विधिमंडळातील कारकीर्द अतिशय उल्लेखनीय

 अनिकेत तटकरे यांची विधिमंडळातील कारकीर्द अतिशय उल्लेखनीय

-   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

             मुंबईदि. 1 : विधानपरिषदेत तालिका सदस्य म्हणून अनिकेत तटकरे यांनी उत्तम काम केले असून त्यांची विधिमंडळातील कारकीर्द अतिशय उल्लेखनीय आहेअशा भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या. विधानपरिषदेचा कार्यकाळ संपत असलेले सदस्य श्री. तटकरे यांना विधानपरिषदेत निरोप देण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

             मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, श्रीवर्धन पर्यटन महोत्सवदिवेआगार पर्यटन महोत्सवरोहा पर्यटन महोत्सवाचे उत्तम आयोजन त्यांनी केले आहे. सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान मार्फत गरीब गरजू लोकांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप केले आहे. बॉडी बिल्डिंग स्पर्धाराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे रोहा येथे आयोजन त्यांनी केले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. त्याचप्रमाणे त्यांच्या  पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

              विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेविरोधी पक्षनेते अंबादास दानवेमंत्री उदय सामंतमंत्री आदिती तटकरे सदस्य सचिन अहिरसदस्य भाई जगतापसदस्य अमोल मिटकरीसदस्य प्रवीण दरेकर यांनी श्री. तटकरे यांच्या समाजकारणात तसेच सभागृहात केलेल्या कामकाजाला यावेळी उजाळा दिला.

००००

सर्व स्तरांचा विचार करणारा सर्वसमावेशक अंतरिम अर्थसंकल्प

 सर्व स्तरांचा विचार करणारा सर्वसमावेशक अंतरिम अर्थसंकल्प

- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

§  जीडीपी जास्त आणि वित्तीय तूट मर्यादित

§  केंद्र सरकारचे ७ हजार कोटीचे अनुदान राज्याला प्राप्त

            मुंबईदि. १ : राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामुळे विकासाची नवनवीन दालने खुली होणार आहेत.  यामध्ये सर्व स्तराचा विचार करण्यात आला असून हा सर्व समावेशक अर्थसंकल्प असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना सांगितले.

            विधानपरिषदेत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचेसह विविध सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर यांनी उत्तर दिले. ते म्हणाले कीराज्याचे सकल उत्पादन (जीडीपी) जास्त आहे. वित्तीय तूट तीन टक्के असावी असे मानक आहे. या मर्यादेत आपले राज्य नेहमीच राहिले आहे. वित्तीय तूट तीन टक्के पेक्षा मर्यादेत असल्याने राज्याला पन्नास वर्षासाठी  यावर्षी ७ हजार कोटी बिनव्याजी कर्ज दिलेले आहे,


Featured post

Lakshvedhi