सर्व स्तरांचा विचार करणारा सर्वसमावेशक अंतरिम अर्थसंकल्प
- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
§ जीडीपी जास्त आणि वित्तीय तूट मर्यादित
§ केंद्र सरकारचे ७ हजार कोटीचे अनुदान राज्याला प्राप्त
मुंबई, दि. १ : राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामुळे विकासाची नवनवीन दालने खुली होणार आहेत. यामध्ये सर्व स्तराचा विचार करण्यात आला असून हा सर्व समावेशक अर्थसंकल्प असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना सांगितले.
विधानपरिषदेत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचेसह विविध सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, राज्याचे सकल उत्पादन (जीडीपी) जास्त आहे. वित्तीय तूट तीन टक्के असावी असे मानक आहे. या मर्यादेत आपले राज्य नेहमीच राहिले आहे. वित्तीय तूट तीन टक्के पेक्षा मर्यादेत असल्याने राज्याला पन्नास वर्षासाठी यावर्षी ७ हजार कोटी बिनव्याजी कर्ज दिलेले आहे,
No comments:
Post a Comment